दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत चामोर्शी येथे तालुका स्तरीय कार्यशाळा संपन्न
✍️सुखसागर एम. झाडे
, चामोर्शी
चामोर्शी (दि. १३ सप्टेंबर २०२५) – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन चामोर्शी येथील सभागृहामध्ये करण्यात आले.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेले एल. बी. जुवारे (गटविकास अधिकारी, पंचायत समिती चामोर्शी) यांनी अभियानाबाबत सखोल माहिती दिली. त्यांनी विविध विभागीय अधिकारी, पंचायत समितीचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना संबोधित करताना अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडून योजना प्रभावीपणे गावागावात पोहोचविण्याचे आवाहन केले.
प्रशांत घोरुडे (तहसीलदार, चामोर्शी) यांनी महसूल विभागाच्या योजनांचा आढावा घेत नागरिकांना त्याचा प्रत्यक्ष फायदा मिळावा यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच "महसूल पंधरवडा" अंतर्गत अधिकाधिक लाभधारकांपर्यंत योजना पोहोचविण्यावर भर दिला.
मोनिका राऊत (पुरवठा निरीक्षक) यांनी आपल्या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देत नागरिकांना लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे आयोजन व समन्वयन कल्पना म्हशाखेत्री (तालुका व्यवस्थापक, पंचायत समिती चामोर्शी) यांनी यशस्वीरित्या सांभाळले.
सदर कार्यशाळेला पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभाग नोंदविला.
📌 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
0 टिप्पण्या
Thanks for reading