Advertisement

उद्धव ठाकरे यांचा दशहरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार

 👉



उद्धव ठाकरे यांचा दशहरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार

मुंबई : दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाचा पारंपरिक दशहरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात आली असून, त्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

शिवाजी पार्क मैदानावरील हा मेळावा महाराष्ट्राच्या राजकारणात ऐतिहासिक व महत्वाचा मानला जातो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी होणाऱ्या या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. ठाकरे गटासाठी हा मेळावा ताकद दाखवण्याची आणि कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह निर्माण करण्याची संधी आहे.

यावेळी उद्धव ठाकरे पक्षाच्या आगामी राजकीय रणनीतीबाबत भाष्य करणार असल्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे राज्यातील सत्तासंघर्ष, कायदेशीर लढाई आणि आगामी निवडणुका या सर्व घडामोडींमध्ये हा मेळावा निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारोच्या संख्येने शिवसैनिक, पदाधिकारी आणि समर्थक शिवाजी पार्क मैदानावर दाखल होण्याची अपेक्षा आहे. उद्धव ठाकरे स्वतः मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून, त्यांच्या भाषणाकडे राज्यभरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले असेल.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या