"दरारा 24 तास न्यूज नेटवर्क"
अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा विकास परिषद संघटनेची बैठक संपन्न
बैठकीत विविध विषयांकित बाबींवर सखोल विचारमंथन
✍️ सुखसागर एम. झाडे, गडचिरोली
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, नियोजन तसेच गंभीर समस्यांवर उपाययोजना शोधण्यासाठी गडचिरोली जिल्हा विकास परिषद संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे पार पडली.
या बैठकीत जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर चिंतन, विचारविनिमय आणि पुढील रणनीती ठरविण्यात आली. अन्यायाला वाचा फोडत न्याय मिळवून देण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या हेतूने या संघटनेची कार्यवाही अधिक गतीमान करण्याचे ठरले.
बैठकीला माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, जेष्ठ पत्रकार रोहीदास राऊत, चंद्रशेखर भंडागे, बाळकृष्ण सावसाकडे, प्रकाशभाऊ तांकसाडे, मनोहर हेपट, गुरुदेवभाऊ भोपये, प्रकाश अर्जुनवार, विजय श्रुगारपंवार, माजी नगरसेवक गुलाब मडावी, भास्कर इंगळे, तुळशीराम सहारे (माजी नगरसेवक), जाणिकराव नन्नावरे, दिवाकर साखरे, प्रविण घाटे यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत मांडण्यात आलेल्या मुद्द्यांना सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून आगामी काळात जिल्हा विकास परिषदेच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जातील, असा विश्वास बैठकीतून व्यक्त करण्यात आला.
0 टिप्पण्या
Thanks for reading