Advertisement

शेतात काम करताना विजेचा कहर – कान्होलीतील युवकाचा मृत्यू, एक शेतमजूर जखमी

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 



शेतात काम करताना विजेचा कहर – कान्होलीतील युवकाचा मृत्यू, एक शेतमजूर जखमी

✍️ सुखसागर एम. झाडे, चामोर्शी
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथे आज (११ सप्टेंबर २०२५) सायंकाळी ४ च्या सुमारास विज कोसळून शेतातील एका युवकाचा मृत्यू तर एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी सुरज मनोहर देशमुख हे आपल्या ५ ते ६ मजुरांसह शेतात धानाला रासायनिक खत देण्याचे काम करत होते. दरम्यान, मुसळधार पावसासोबत सुरू झालेल्या विजांच्या कडकडाटामुळे ते सर्व घरी परतण्याची तयारी करत असतानाच अचानक विजेचा आघात झाला. यामध्ये सुरज देशमुख शेतातील बांधावर कोसळले, तर त्यांच्यासोबत असलेला मजुर दिपक शेंडे हाही गंभीररीत्या जखमी झाला.


दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याने तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दाखल करण्यात आले. मात्र, विजेच्या जोरदार आघातामुळे सुरज देशमुख यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केल्यानंतर उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. शेतमजूर दिपक शेंडे यांच्यावर सध्या ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे उपचार सुरू असून त्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते.

या दुर्दैवी घटनेमुळे कान्होली गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या