नगर पंचायत पोंभुर्णा तर्फे रस्ते व नाली बांधकामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न
✍️ जीवनदास लवंगुजी गेडाम
पोंभुर्णा – दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजना अंतर्गत नगर पंचायत पोंभुर्णा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण विकासकामांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रभाग क्र. १ मधील बुद्ध विहार ते समीर पठाण यांच्या घरापर्यंत सी.सी. रोड व आर.सी.सी. कव्हर्ड ड्रेन बांधकाम तसेच सुधाकर निमसरकार ते महेंद्र उराडे यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजूंना आर.सी.सी. कव्हर्ड ड्रेन बांधकामाची कामे हाती घेण्यात आली असून, या सर्व कामांचा भूमिपूजन सोहळा नगर पंचायत तर्फे करण्यात आला.
या वेळी नगर पंचायत पोंभुर्णा येथील नगराध्यक्षा सौ. सुलभा गुरुदास पिपरे यांच्या शुभहस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी प्रभाग क्र. १ चे नगरसेवक श्री. बालाजी कामसेन मेश्राम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. नंदाताई ऋषी कोटरंगे, मुख्याधिकारी श्री. निखिल अंकुश लांडगे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना मान्यवरांनी सांगितले की, “या विकासकामांमुळे स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील. तसेच स्वच्छता राखण्यास मदत होऊन सुलभ व सुरक्षित वाहतूक व्यवस्थाही निर्माण होईल.”
सोहळ्याला नगर पंचायत पोंभुर्णाचे स्थापत्य अभियंता कु. वैष्णवी मेश्राम, लिपिक रोशन येमुलवार, संकोच मानकर यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थानिक रहिवाशांनी नगर पंचायत प्रशासनाचे आभार मानत, या उपक्रमामुळे परिसरातील जीवनमान उंचावेल, असा विश्वास व्यक्त केला.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading