दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
देवरी-आमगांव व गडचिरोली जिल्ह्याच्या विकास प्रश्नांवर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासन
✍️ गडचिरोली, दि. १३ सप्टेंबर २०२५
देवरी-आमगांव विधानसभा क्षेत्रातील प्रलंबित विकासकामे व गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित रस्ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेतली.
या चर्चेत नागरिकांच्या जीवनमानाशी निगडीत महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली.
विशेष मागण्या
- रावणवाडी–कामठा–आमगांव–सालेकसा–दर्रेकसा–पनियाजोब–डोंगरगाव–तुमडी बोर्ड (छ.ग.) मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा.
- देवरी–आमगांव मार्गावरील बामणी व किडगींपार रेल्वे क्रॉसिंगवरील मंजूर उड्डाणपूलाचे काम तातडीने सुरू करणे.
- आमगांव नगरपरिषद व उद्वीर सात गाव ग्रामपंचायतींचे प्रलंबित प्रशासकीय प्रश्न मार्गी लावणे.
- धानोरा–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील संथगतीने सुरू असलेल्या कामांना गती देणे.
- गडचिरोली–आरमोरी फोर-लाईन मंजुरीबद्दल अभिनंदन व काम त्वरित सुरू करणे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी सर्व मुद्द्यांवर सहानुभूतीपूर्वक चर्चा करून आवश्यक निर्णय घेण्याचे व कामांना गती देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी माजी आमदार भैरसिंगजी नागपूरे, माजी जि.प. अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, जेष्ठ नेते झामसिंगजी येरणे, भाजप नेते घनश्यामजी अग्रवाल, अनिल येरणे, देवेंद्र मच्छीरके, राजेश शिवणकर, कैलासजी तिवारी, धनलाल मेंढे, संतोष श्रीखंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
डॉ. अशोकजी नेते म्हणाले, “आमगांव-देवरी मतदारसंघ व गडचिरोली जिल्ह्यातील विकासकामांना गती देणे हेच आपले ध्येय आहे. राज्य व केंद्र सरकारच्या सहकार्याने रस्ते, पूल व प्रशासकीय प्रश्न मार्गी लावून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
0 टिप्पण्या
Thanks for reading