दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
✍️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
पोंभुर्णा तालुका भाजपाची जंबो कार्यकारिणी जाहीर
जिल्हाध्यक्षांकडून प्रमुख पदांची घोषणा, तर तालुकाध्यक्षांकडून उर्वरित पदाधिकारी निश्चित
पोंभुर्णा : महाराष्ट्राचे लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात आणि जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोंभुर्णा तालुका भाजपाची जंबो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी महिला शहराध्यक्ष, भाजयुमो अध्यक्ष व तीन तालुका महामंत्र्यांची घोषणा केली. यात महिला शहराध्यक्ष म्हणून वैशाली बोलमवार यांची नियुक्ती झाली असून, तालुका महामंत्रीपदी विनोद देशमुख, गुरूदास पिपरे आणि ज्योती बुरांडे यांचा समावेश आहे.
तालुकाध्यक्ष हरीष ढवस यांनी ७ उपाध्यक्ष, ६ तालुका सचिव, कोषाध्यक्ष आणि इतर आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली.
- उपाध्यक्ष : राहुल काशिनाथ पाल,धनराज बुरांडे, मनोज मुलकलवार, तुळशीराम रोहणकर, रंजित पिंपळशेंडे, सुनिता मॅकलवार आणि माधुरी मोरे.
- तालुका सचिव : बंडू नैताम, श्वेता महेंद्र वनकर, गंगाधर मडावी, रजिया कुरेशी, नैलेश चिंचोलकर व जमनादास गोवर्धने.
- कोषाध्यक्ष : लक्ष्मण ठेंगणे.
भाजयुमो तालुकाध्यक्ष म्हणून अजय मस्के यांची फेरनियुक्ती झाली असून महामंत्री म्हणून चंद्रशेखर झगडकर, जितेंद्र चुदरी, वैभव ठाकरे आणि अमोल पाल यांची निवड झाली.
महिला आघाडी शहराध्यक्षपदी वैशाली बोलमवार यांना पुन्हा संधी देण्यात आली असून, महामंत्रीपदी छाया जनगनवार, वनिता वाकुडकर, शुभांगी कुत्तरमारे, पपिता तोडसाम आणि पपिता पोलपोलवार यांची नियुक्ती झाली आहे.
याशिवाय अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, किसान मोर्चा, अल्पसंख्याक, व्यापारी आघाडी, वैद्यकीय आघाडी, मच्छिमार आघाडी, भटके विमुक्त आणि सोशल मीडियाच्या अध्यक्षांचीही घोषणा करण्यात आली आहे.
सामाजिक सलोखा राखून सर्वसमावेशक कार्यकारिणी गठीत करण्यात आल्याने भविष्यात भाजपाला निश्चितच बळ मिळेल, असे तालुकाध्यक्ष हरीष ढवस यांनी प्रसिद्धपत्रकात स्पष्ट केले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, माजी जि.प. सदस्य राहुल संतोषवार आणि रुषी कोटरंगे आदींनी स्वागत करून अभिनंदन केले.
👉
0 टिप्पण्या
Thanks for reading