Advertisement

🗳️ आता पदवीधर मतदार बना! गडचिरोलीत भाजपची मोठी मोहीम सुरू | Ashok Nete | Milind Narote


गडचिरोली : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला गडचिरोली जिल्ह्यात जोमदार सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष नोंदणी कार्याला आरंभ झाला असून, या अभियानाचे नेतृत्व माजी खासदार डॉ. श्री. अशोकजी नेते आणि गडचिरोलीचे लोकप्रिय आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

या अभियानाचे मार्गदर्शन मा. प्रा. रमेशजी बारसागडे, जिल्हा अध्यक्ष, भाजप गडचिरोली तसेच माजी जिल्हाध्यक्ष व पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख प्रा. प्रशांतजी वाघरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. याशिवाय जिल्हा भाजप उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर यांचे सहकार्य विशेष उल्लेखनीय ठरत आहे.

📍 चामोर्शी व घोट-आष्टी मंडळातही नोंदणीस सुरुवात
चामोर्शी व घोट-आष्टी मंडळातही पदवीधर मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. स्थानिक भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व बूथ प्रमुखांनी आपल्या परिसरातील व गावातील पदवीधरांची नावे शोधून त्यांची नोंदणी सुनिश्चित करण्याचे आवाहन चामोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती मनमोहन बंडावार यांनी केले आहे.

२०२२ पूर्वी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल्या सर्व व्यक्तींनी (स्त्री-पुरुष) पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन भाजपकडून करण्यात आले आहे.

📩 नोंदणीसाठी कार्यकर्ते घरी येऊन फार्म भरतील
नोंदणी प्रक्रियेबाबत भाजपा कार्यकर्ते प्रत्येक पदवीधरांपर्यंत जाऊन नोंदणी फॉर्म भरून घेणार आहेत. तसेच अधिक माहितीसाठी भाजपा कार्यालय, चामोर्शी येथे संपर्क साधता येईल.

📞 संपर्क क्रमांक:

  1. श्री. रमेशजी बारसागडे – 9422558000
  2. श्री. प्रशांतजी वाघरे – 70305805572
  3. श्री. डॉ. अशोकजी – 9420757999
  4. श्री. डॉ. मिलिंदजी नरोटे – 9420145291
  5. श्री. दिवाकरजी गेडाम – 9673757718
  6. श्री. अनिलजी पोहनकर – 9404130274
  7. सौ. रोशनीताई – 9765783789

📢 सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या गावातील सर्व पदवीधरांची यादी तयार करून ती मंडळ अध्यक्षांकडे सुपूर्द करावी, जेणेकरून त्यांची नावे पदवीधर मतदार यादीत समाविष्ट करता येतील.


✍️ श्री. मनमोहन बंडावार
माजी उपसभापती, पंचायत समिती चामोर्शी
जिल्हा महामंत्री, शेतकरी आघाडी, भाजप गडचिरोली



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या