Advertisement

तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत यशोधरा विद्यालयाची झळाळती कामगिरी


तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत यशोधरा विद्यालयाची झळाळती कामगिरी

चामोर्शी | प्रतिनिधी – दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

चामोर्शी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत विद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. बारावी वर्गातील तीन विद्यार्थिनींनी विविध धावस्पर्धांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

🏅 प्राप्त यशाचे तपशील खालीलप्रमाणे :

अंडर-19 वयोगटातील 800 मीटर धावस्पर्धेत कु. सलोनी डोमाजी किरमे (वर्ग 12वी) हिने उत्तुंग कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

अंडर-19 वयोगटातील 3000 मीटर धावस्पर्धेत कु. साजन सुखदेव कोमावार (वर्ग 12वी) हिने द्वितीय क्रमांक मिळवून स्वतःची छाप पाडली.

अंडर-19 वयोगटातील 400 मीटर धावस्पर्धेत कु. राणी प्रवीण कुळमेथे हिने द्वितीय क्रमांक मिळवला, तर कु. नयना चावरे हिने तृतीय क्रमांक पटकावला.

या सर्व यशस्वी खेळाडूंची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, त्यांच्या पुढील प्रवासासाठी संपूर्ण विद्यालय परिवाराने शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

🎉 गुणगौरव सत्कार समारंभ

या उल्लेखनीय यशानिमित्त विद्यालयात आयोजित सत्कार समारंभात राहुल लोक विकास मंडळाच्या अध्यक्षा सौ. कौशल्या सहारे, सचिव श्री. विवेक सहारे, कोषाध्यक्ष श्री. वक्तुजी उंदिरवाडे, सदस्य श्रीमती रेखा साखरे, श्री. माणिक साखरे, प्राचार्य श्री. शाम रामटेके, तसेच ज्येष्ठ शिक्षक राजू धोडरे, गुरुदेव सातपुते, निलेश क्षीरसागर, लोकनाथ दुधबळे, सरिता आखाडे, जयश्री कोठारे, प्रा. प्रेमानंद वालदे, प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे, श्री. लक्ष्मण गव्हारे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच या यशात मोलाचा वाटा उचलणाऱ्या प्रा. प्रदीप भांडेकर व क्रीडा शिक्षक प्रवीण नैताम यांचाही विशेष सन्मान करण्यात आला.

📣 दरारा 24 तास न्यूज नेटवर्कतर्फे यशस्वी खेळाडूंना आणि त्यांच्या मार्गदर्शकांना हार्दिक शुभेच्छा!


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या