📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
विद्यार्थ्यांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे — उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांचे प्रतिपादन
श्रीराम विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
गडचिरोली (कुरखेडा):✍️ सुखसागर एम. झाडे
कुरखेडा येथील आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचालित श्रीराम विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय कुरखेडा येथे जिल्हा गडचिरोली पोलीस विभाग आणि पोलीस स्टेशन कुरखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर सुरक्षा मास” या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी (एस.डी.पी.ओ.) रवींद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा म्हणजे काय, सायबर गुन्ह्याचे प्रकार, तसेच ऑनलाइन जगात सुरक्षित कसे राहावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
🔹 भोसले म्हणाले:
“सायबर सुरक्षा म्हणजे संगणक नेटवर्क, मोबाइल अॅप्स व वैयक्तिक डेटाचे अनधिकृत प्रवेश, नुकसान किंवा गैरवापरापासून संरक्षण करणे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येक विद्यार्थ्याने सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करावा. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, वैयक्तिक माहिती शेअर करणे किंवा फसवणूक करणाऱ्या मेसेजेसवर विश्वास ठेवणे टाळावे. सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी सतर्कता, जागरूकता आणि कायद्यांचे पालन आवश्यक आहे.”
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदिवासी ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष व शाळा समिती अध्यक्ष वामनराव फाये यांनी भूषविले.
यावेळी पोलीस निरीक्षक महेंद्र वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका आघाव यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना सायबर फसवणूक, डेटा चोरी, ऑनलाईन गेम्सच्या व्यसनाचे धोके आणि सुरक्षित इंटरनेट वापराविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला संस्थेचे सचिव दोषहरराव फाये, तसेच विद्यालयाचे प्राचार्य नागेश्वर फाये सर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे कुशल सूत्रसंचालन प्रा. प्रदीप पाटणकर यांनी केले.
या सायबर सुरक्षा उपक्रमाला शिक्षकवर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. उपस्थित सर्वांनी सायबर सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळण्याचा निर्धार व्यक्त केला.
✍️ प्रतिनिधी : सुखसागर एम. झाडे
दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

 



 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
0 टिप्पण्या
Thanks for reading