Advertisement

देवाडा बूज सेवा सहकारी संस्थेची महत्वाची सूचना- कर्जदार सभासदांच्या माहितीचे संगणिकीकरण — 5 ते 6 दिवसांत कागदपत्रे जमा करणे आवश्यक

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क — 


देवाडा बूज सेवा सहकारी संस्थेची महत्वाची सूचना-

कर्जदार सभासदांच्या माहितीचे संगणिकीकरण — 5 ते 6 दिवसांत कागदपत्रे जमा करणे आवश्यक

पोंभुर्णा : तालुका प्रतिनिधी 
देवाडा बूज सेवा सहकारी संस्थेच्या सर्व चालू व थकीत कर्जदार सभासदांना तातडीची सूचना देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या परिपत्रकानुसार कर्जदार सभासदांच्या कर्जासंबंधीची सर्व माहिती संगणीकृत (Digital) स्वरूपात सादर करण्याचे आदेश संस्थेला प्राप्त झाले आहेत.

या प्रक्रियेसाठी प्रत्येक कर्जदार सभासदाकडून खालील कागदपत्रांची पूर्तता आवश्यक आहे :

आवश्यक कागदपत्रे :

  1. कर्जदाराचा आधार कार्ड झेरॉक्स
  2. कर्जदाराचा बँक पासबुक झेरॉक्स
  3. Farmer ID
  4. बँक खात्याशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक
  5. वारसदाराचा आधार कार्ड

तसेच एखादा कर्जदार सभासद मयत असल्यास त्या व्यक्तीच्या वारसदाराकडून ₹100 च्या स्टॅंप पेपरवर Affidavit करून संपूर्ण कर्जाची जबाबदारी स्वीकारणे बंधनकारक आहे, असे सूचनेत नमूद करण्यात आले आहे.


कागदपत्र सादरीकरणासाठी मर्यादित वेळ

संस्थेकडून कळविण्यात आले आहे की कागदपत्रे जमा करण्यासाठी फक्त 5 ते 6 दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.
कागदपत्रांची पूर्तता निर्धारित वेळेत न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कर्जदार सभासदांचीच राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


संपर्क

अध्यक्ष : श्री. रवींद्र बि. मरपल्लीवर — 9527894999
सचिव : श्री. निखिल एन. तिमांडे — 9623546814


📍 स्रोत : देवाडा बूज सेवा सहकारी संस्था
🖊️ दरारा 24 तास न्यूज नेटवर्क



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या