Advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

 

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क


डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मूल (दि. 06 डिसेंबर 2025) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने भावपूर्ण अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवार दिनांक 06 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:00 वाजता काँग्रेस भवन, मूल येथे आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेसचे महासचिव सन्मा. संतोषभाऊ रावत (माजी अध्यक्ष – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


कार्यक्रमासाठी सर्व पदाधिकारी आणि नागरिकांना आवाहन

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, शहर काँग्रेस, कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व संचालक, सर्व सरपंच, सदस्य, ओबीसी सेल, औद्योगिक सेल तसेच सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या समता, बंधुता, स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांचे स्मरण आणि संविधानाबद्दल आदर व्यक्त करण्याचा हा प्रसंग आहे. त्यामुळे समाजातील सर्व घटकांनी उपस्थित राहून या ऐतिहासिक दिवशी अभिवादन करावे, असे आयोजन समितीने सांगितले आहे.


कार्यक्रम स्थळ

📍 काँग्रेस भवन, मूल
🕚 वेळ : सकाळी 11:00 वाजता


आपले विनीत

मूल तालुका काँग्रेस कार्यकारिणी
मूल शहर काँग्रेस कार्यकारिणी
महिला काँग्रेस व युवक काँग्रेस कार्यकारिणी


👉 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क — ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी

🙏🏼

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या