Advertisement

चंद्रपूर जिल्हा परिषदेत मोठी कारवाई – ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची गाज

 

🔴 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क


चंद्रपूर जिल्हा परिषदेत मोठी कारवाई – ग्रामपंचायत अधिकाऱ्यावर निलंबनाची गाज

चंद्रपूर : प्रतिनिधी 
घाटकुळ ग्रामपंचायतीतील सेती पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात मोठ्या अनियमितता झाल्याच्या तक्रारीनंतर अखेर जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. ग्रामपंचायत अधिकारी श्री. खुशाब व्येकाणी मानपल्लीवार यांना सेवेतून निलंबित करण्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह (भा.प्र.से.) यांनी दिला आहे.



काय आहे प्रकरण?

👉 नैसर्गिक आपत्ती अंतर्गत शेतकऱ्यांच्या पिक नुकसानीचे पंचनामे तयार करण्यासाठी फेब्रुवारी 2024 मध्ये अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले होते.
👉 मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी मौजा घाटकुळ येथे चुकीचे पंचनामे सादर केल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
👉 विशेष म्हणजे 9 लाभार्थ्यांची नावे सातबारा नसल्यानाही त्यांचे पंचनामे करण्यात आले होते.
👉 या चुकीच्या पंचनाम्यामुळे ₹4,18,690/- इतके अनुदान शासनाकडून वितरित झाले.

तहसीलदार, पोंभुर्णा यांचा चौकशी अहवाल तसेच पं.स. पोंभुर्णा येथील गट विकास अधिकाऱ्यांच्या सादर केलेल्या पत्रावर आधारित हा निर्णय घेतला आहे.


जिल्हा परिषदेची कारवाई

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा (शिस्त व अपील) नियम 1961 नुसार खालील निर्णय लागू केले :

अधिकारी खुशाब मानपल्लीवार यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले.
✔ निलंबन काळात त्यांचे मुख्यालय पंचायत समिती वरोरा येथे निश्चित.
✔ मुख्यालय सोडताना गट विकास अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य.
✔ नियम 68 नुसार निर्वाह भत्ता मंजूर, पण
✔ या कालावधीत खाजगी नोकरी, धंदा किंवा व्यापार करण्यास सक्त मनाई.
✔ दर महिन्याला “मी कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यापार केलेला नाही” असे प्रमाणपत्र पं.स. पोंभुर्णा येथे सादर करणे बंधनकारक.


पुढील कार्यवाही

गट विकास अधिकाऱ्यांना खालील सूचना देण्यात आल्या :

➡ निलंबन आदेशाची तामील करून पोचपावती जिल्हा परिषदेला पाठवावी.
➡ घाटकुळ ग्रामपंचायतीतील संबंधित अधिकाऱ्याच्या कारकीर्दीत झालेल्या सर्व कामकाजाची सखोल चौकशी करावी.
➡ दोषारोपपत्रासाठी आवश्यक जोडपत्रे (१ ते ४) हार्ड व सॉफ्ट कॉपीसह त्वरित जिल्हा परिषदेस सादर करावीत.


ही कारवाई चुकीच्या पंचनाम्यामुळे शासनाला बसलेल्या आर्थिक फटक्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची ठरली असून, जिल्हा परिषदेने अनियमिततेविरुद्ध कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.


📌 बातमी : दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या