Advertisement

गोंडपिपरी / पोंभुर्णा तालुक्यात पेट्रोल-डिझेल मुबलक; टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

 


📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क
सविस्तर बातमी

गोंडपिपरी / पोंभुर्णा तालुक्यात पेट्रोल-डिझेल मुबलक; टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नका – प्रशासनाचे आवाहन

गोंडपिपरी / पोंभुर्णा (प्रतिनिधी) : तालुक्यात पेट्रोल व डिझेलच्या टंचाईबाबत पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यात इंधनाचा साठा नियमित मागणीनुसार मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोणतीही टंचाई निर्माण झालेली नाही.

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच विनाकारण पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. काही ठिकाणी ‘पॅनिक बायिंग’मुळे (भीतीपोटी गरजेपेक्षा जास्त खरेदी) अनावश्यक तणाव निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून केवळ आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, असेही सांगण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रमुख तेल कंपन्या – BPCL, HPCL आणि IOCL यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून इंधन पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याची खात्री देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही चिंता न बाळगता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती लघिमा तिवारी (भा.प्र.से.) यांनी नागरिकांना शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन :

  • अफवांवर विश्वास ठेवू नका
  • पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळा
  • गरजेपुरतेच इंधन खरेदी करा
  • प्रशासनाला सहकार्य करा

दरम्यान, तालुक्यातील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून इंधन पुरवठा नियमित सुरू असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या