Advertisement

🕯️ दुर्दैवी बातमी | 24 तास विशेष 🕯️ भिक्षी (ता. चामोर्शी) :

 

🕯️ दुर्दैवी बातमी | 24 तास विशेष 🕯️

भिक्षी (ता. चामोर्शी) :
अत्यंत दु:खद आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना भिक्षी गावातून समोर आली आहे. गावातील रहिवासी कुळीराम शेंडे (वय अंदाजे 35 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून सर्वतोपरी प्रयत्न करूनही उपचारादरम्यान त्यांची जीवनज्योत मालवली. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

कुळीराम शेंडे हे अत्यंत साधे, मनमिळावू आणि कष्टाळू व्यक्तिमत्व होते. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून, त्यांच्या निधनामुळे हे कुटुंब अक्षरशः निराधार झाले आहे.

गावकऱ्यांच्या मते, “असा माणूस पुन्हा होणे नाही. कुळीराम नेहमीच इतरांच्या मदतीला धावून जायचा. आज त्याच्यावरच अशी वेळ येईल, हे कुणालाच वाटले नव्हते.”

या घटनेमुळे भिक्षी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांनी शोक व्यक्त करत कुटुंबाला धीर दिला आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि दुःखी परिवाराला हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना. 🙏



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या