गडचिरोलीत प्रतिष्ठित कुटुंबांचा शुभविवाह सोहळा; २० जून रोजी चंद्रप्रकाश बंडावार व जयश्री (अमिषा) बोलूवार विवाहबद्ध
वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या दोन प्रतिष्ठित कुटुंबांमध्ये विवाहबंधन जुळत असून, भारतीय जनता पार्टी किसान आघाडीचे गडचिरोली जिल्हा महामंत्री, चामोर्शी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मनमोहन बंडावार यांचे ज्येष्ठ सुपुत्र चंद्रप्रकाश बंडावार यांचा शुभविवाह अल्लापल्ली येथील पोलिस दलात कार्यरत शासकीय सेवक संजयराव बोलूवार यांची सुपुत्री,व समाज संघटना माजी जिल्हा अध्यक्ष दिवंगत संतोष यांची भाची जयश्री उर्फ अमिषा बोलूवार यांच्यासोबत संपन्न होत आहे.
हा शुभविवाह सोहळा दि. २० जून २०२६ रोजी सुमानंद सभागृह, आरमोरी रोड, गडचिरोली येथे मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडणार आहे. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय व , सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद देणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
मनमोहना बंडावार यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि ग्रामीण विकास क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना जिल्हाभरात मानाचे स्थान आहे. तसेच बोलूवार कुटुंबही सामाजिक बांधिलकी आणि सार्वजनिक सेवेसाठी परिचित आहे. त्यामुळे या दोन प्रतिष्ठित कुटुंबांच्या विवाह सोहळ्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने दोन्ही कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण असून, नातेवाईक व मित्रपरिवाराकडून नवदाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
नवदाम्पत्यास हार्दिक शुभेच्छा
चंद्रप्रकाश बंडावार व जयश्री (अमिषा) बोलूवार यांना त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य, यश आणि अखंड आनंद लाभो, हीच सदिच्छा.
वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क तसेच दरारा २४ तास न्यूज नेटवर्क परिवाराकडून नववधू-वरांना कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा! 💐💐💐
– वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
– दरारा २४ तास न्यूज नेटवर्क





0 टिप्पण्या
Thanks for reading