पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*दोन पत्रकार पोंभूर्णा कृ.उ.बा. समीतीच्या निवडणुकीत आमनेसामने*- *दोन्ही दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला*

इमेज
पोंभूर्णा:-तालुका प्रतिनिधी  पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा प्रचार चांगलाच शिगेला पोहचला आहे.दि.३० एप्रिल रोज रविवारला मतदार उमेदवारांच्या भविष्यावर शिक्कामोर्तब करणार आहे.सहकार क्षेत्रातील हि निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने आप आपल्या अस्तित्वासाठी भाजप व महाविकास आघाडी शक्तीनिशी मैदानात उतरली असल्यामुळे प्रचारात चांगलाच धुरळा उडताना दिसत आहे.. तालुक्यामध्ये चर्चा आहे ती विमुक्त जाती-भटक्या जमाती गटातून नामांकित दैनिकाचे दोन पत्रकार एकमेकांसमोर उभे असल्यामुळे या मतदार संघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी तर्फे नगर पंचायतचे विरोधी गटनेता व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) गटाचे तालुका प्रमुख आशिष कावटवार व भाजपचे माजी नगरसेविका यांचे पती नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपातून काँग्रेसमध्ये जात उमेदवारी घेऊन पराभव झाल्याने निराश होत पुन्हा भाजपात प्रवेश घेऊन या गटातून उमेदवारी अर्ज दाखल करून मैदानात उतरले आहेत.   आशिष कावटवार आणि दिलीप  मॅकलवार एकाच समाजाचे असल्यामुळे या गटामधील ही लढत प्रतिष्ठेची असणार आहे. ------------ पोंभूर्णा पत्रकार संघात...

बाजार समितीच्या निवडणुकीची चुरस वाढली, मतदार गेले सहलीला: पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक - नऊ उमेदवारांची माघार -१८ संचालकासाठी आता ४० उमेदवार रिंगणात

इमेज
पोंभूर्णा:- भाजपच्या ताब्यात राहिलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता कशी आणता येईल यासाठी रंगीत तालीम सुरू झाली आहे. या तालमीत मतदारांना अतिशय महत्त्व आले असून मतदार चक्क सहलीवर निघाले आहेत.    राजकीय दृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक येत्या ३० तारखेला होत आहे. राजकीय वाटाघाटी नंतर शेवटच्या दिवशी (२० एप्रिल) विविध गटातील नऊ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करावयाच्या शेवटच्या दिवशी ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये एक अर्ज रद्दबातल ठरविण्यात आला होता. तर ४९ उमेदवारी अर्ज कायम होते. २० एप्रिल हा उमेदवारी अर्ज मागे घ्यायचा शेवटचा दिवस होता.शेवटच्या दिवशी नऊ अर्ज मागे घेतल्याने उर्वरित उमेदवारांसाठी निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस, भाजपाच्या ठरलेल्या पॅनल व्यतिरिक्त केवळ चार उमेदवार जास्तीचे आहेत. ते कोणती भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. २० एप्रिल ला सेवा सहकारी गटातून ४ उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. त्यात वासुदेव गोपाळा पाल फुटाणा (सर्वसाधारण),दादाजी लक्ष्...

पोंभुर्णा बाजार समिती निवडणुकी च्या रणधुमाळीत काँग्रेस भाजपात रस्सीखेच ‌

इमेज
पोंभुर्णा बाजार समिती निवडणुकी च्या रणधुमाळीत काँग्रेस भाजपात रस्सीखेच ‌ पोभुर्णा: येत्या 30 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होऊ घातली असून या निवडणुकीत अनेक धुरंधर रिंगणात उतरलेले आहेत.दस्तूरखुद्द काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रविभाऊ मरपल्लीवार हे सुद्धा सेवा सहकारी सोसायटी गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालेली आहे.भाजपानेही कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलेली आहे. यामुळे ही निवडणूक चांगलीच रंगणारअसल्याची चर्चा सुरू आहे.       परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ श्रेष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते दुखावल्याचे चिन्ह दिसून येत आहे.एकंदरीत या तालुक्यात काँग्रेसमध्ये दुफळी माजली आहे.या तालुक्यातील बाजार समिती चे प्रथम सभापती तथा काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष ज्येष्ठ नेते कवळुजी कुंदावार यांचे सुपुत्र काँग्रेसचे युवा कार्यकर्ते प्रितिश कुंदावर यांनी बाजार समितीवर यावेळी काँग्रेसची सत्ता येणार नाही. अशी प्रतिक्रिया दिल्याने एकंदरीत काँग्रेसमध्ये उभी फूट दिसून येत आहे. विद्यमान तालुका अध्यक्ष रवींद्र मरपलीवार बाजार समिती कशा पद्धतीने ...

दुसऱ्या दिवशीही आंदोलन उग्र: प्रशासन- शासन बेदखल ? आदिवासी आंदोलनाची शासन दरबारी दखलच नाही? पालकमंत्र्यांची चुप्पी काय दर्शविते? आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता!

इमेज
चंद्रपूर: जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात आदिवासींचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन कालपासून सुरू असले तरी शासन आणि प्रशासनाने या आंदोलनाची दखलच घेतली नसल्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या दोन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.       या घटनेनंतर हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. चंद्रपूरात तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या तापमानात हजारो आदिवासींनी जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन मंगळवारपासून सुरू केले आहे. या आंदोलनात अनेक महिलांनी सहभाग घेतला आहे. रणरणत्या उन्हामुळे आंदोलनातील दोन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.         करिष्मा कुसराम, अर्चना कुळमेथे असे प्रकृती खालवलेल्या महिलांचे नाव आहे. या घटनेनंतर हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत...

रखरखत्या उन्हात आजही आदिवासींचे ठीय्या आंदोलन ✍️ हजारो आदिवासी बांधव महिला आंदोलनात सहभागी ✍️ गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जगन एलके व विलास गरकर यांचे नेतृत्व ✍️ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा✍️

इमेज
रखरखत्या उन्हात आजही आदिवासींचे ठीय्या आंदोलन हजारो आदिवासी बांधव महिला आंदोलनात सहभागी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जगन एलके व विलास नगरकर यांचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना पक्षांचा आंदोलनाला पाठिंबा प्रशासनाकडून उपाययोजना तोकडी, उष्माघात झाल्यास जबाबदार कोण? पेसा कायदा लागू करा या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन आदिवासी समाजाचा जन आक्रोश मोर्चा काल तालुक्या च्या मुख्यालय न भूतो न भविष्यती असा निघाला. प्रिया आंदोलनाची वजन आक्रोश मोर्चाची दखल न घेतल्याने व मागण्या मान्य न केल्याने आजही आदिवासी समाज बांधव व भगिनी मोठ्या प्रमाणात रखरखत्या क** उन्हात आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी उपस्थित आहेत.

*कोटगांव येथे म.फुले,सम्राट अशोक व डांँ. बाबासाहेब आंबेडकर यांची तिन दिवसीय कार्यक्रमाने जयंती साजरी*

इमेज
अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी           नागभीडः--- नागभीड तालुक्यातील कोटगांव आदर्श येथे संयुक्त जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.                                    या कार्यक्रमाचे उद्घाटक संजय माकोडे हे होते तर सह उद्घाटक सुनील वाघमारे सरपंच ग्रा.प.कोटगांव हे होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदी पुरषोत्तम बगमारे सामाजिक कार्यकर्ता हे होते तर प्रमुख पाहुने म्हणुन यशवंत भेंडारकर, आनंद जांभुळे, रंजना बांबोळे, छाया भेंडारकर, वैशाली पागोटे, विश्वनाथ कुंभरे हे होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून डाँ. विशेष फुटाने व डाँ. प्रा. पुनम घोनमोडे हे होते. कार्यक्रमाची सुरवात दिपप्रज्वलीत करुन व स्वागत गीताने सुरु करण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक डाँ.विशेष फुटाने म्हणाले की या देशात खरी लोकशाही गौतम बुद्धाच्या कालखंडात होती. अडीज हजार वर्षापुर्वी लोकशाही अस्तित्वात होती तर ईतर देशात चारशे वर्षाआधी लोकशाही अस्तित्वात आली.गौतम बुद्ध हे कुणबी होते. ...

काय सांगता!चक्क देशी दारू दुकानात चोरी पैशासह २१ बिअर व एक देशी २२ पेट्यांवर हात साफ

इमेज
मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीत सद्यस्थितीत चोरीच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या पंधरवड्यात अनेक ठिकाणी चोऱ्या झाल्या आहेत.      मूल तालुक्यातील भेजगाव येथील सरपंच, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अखिल गांगरेड्डीवार यांच्या मालकीच्या "न्यू देशी दारू" दुकानात अज्ञातांनी रविवारच्या रात्री मागच्या बाजूने लोखंडी ग्रील कटरने कापून दरोडा टाकला. यात चोरट्यांनी २१ पेट्या बियर तर एक देशी दारूची पेटी आणि जवळपास पाच हजार रुपये रोख असा ८५००० रु.चा मुद्देमाल चोरट्यांनी ल॑पास केला. सोमवारला सकाळी देशी दारू दुकानाचे दिवाणजी अमोल अर्जुन शेंडे यांनी सकाळी सात वाजता देशी दारू दुकान उघडण्याकरिता गेले असता बाहेरचे शटर जैसे थे असून आतील रुमच्या दरवाजाला कुलूपच नसल्याने इतरत्र पाहणी केली असता मागच्या खिडकीचा ग्रील कटरने कापून दिसला.आणि आतील सामान अस्ताव्यस्त पसरलेले दिसल्याने लगेच त्यांनी ही घटना मालक अखिल गांगरेड्डीवार यांना कळविली. देशी दारू दुकानाचे मालक अखिल विलास गांगरेडीवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मूल पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.        घटनेची माहित...

नांदगाव येथे बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

इमेज
    ‌ मूल तालुक्यातील नांदगाव येथे विश्वरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. दुपारी तीन वाजता गावातील मुख्य चौकांमध्ये महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तदनंतर सायंकाळी सहा वाजता पासून गावातील मुख्य चौकातून भव्य रॅली काढण्यात आली. भिमरायाच्या या रॅलीन अख्खी नांदगाव नगरी दुमदुमली. फटाक्यांच्या आतिशबाजीत, डीजेच्या तालावर अवघी तरुणाई थिरकली. मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नांदगाव नगरीत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी परिसरातील अनुयायी फार मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाल्याचे दिसून आले. गावातील गणमान्य व्यक्ती, पदाधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश होता. महिलांचा सुद्धा उदंड प्रतिसाद लाभला. बाबासाहेबांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला. या रॅलीचा समारोप बुद्धविहाराजवळ करण्यात आला. x x

*खाजगी ट्रॅव्हल्स ने बालकाला चिरडले* दोन्ही पाय व छातीस मार, बालक गंभीर ,ब्रम्हपुरी हास्पिटल मध्ये भरती*Private Travels Crushes Child* Hit on both legs and chest, child seriously, admitted to Bramhapuri Hospital

इमेज
अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभीड:____ भरधाव धावणाऱ्या एम.एच.46 ए.एच.6299 क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्स ने रस्ता ओलांडणाऱ्या बालकाला दुपारी एक वाजताच्या दरम्यान धडक दिल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला. सिद्धार्थ भास्कर शिंदेवय (11) वर्ष हा आपल्या मित्रासह नागरे ऑटोमोबाईल्स जवळ रस्ता ओलांडत असताना गडचिरोलीवरून नागपूर कडे जाणाऱ्या साई ट्रॅव्हल्स ने जोरदार धडक दिल्याने सिद्धार्थ गंभीररित्या जखमी झाला.. यात त्याच्या पायाला व छातीला मार लागला.. नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला तातडीने ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येथे पंचनामा करून ट्रॅव्हल्स व चालकाला ताब्यात घेतला आहे.. पुढील तपास ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनात पो.ह.गायकवाड करीत आहेत. नागभीड हे मध्यवर्ती ठिकाण असून 100 किमी वर नागपूर,80 किमी वर भंडारा,75 किमी गडचिरोली हे शहर असल्याने मोठ्या प्रमाणात खाजगी वाहतूक या शहरातून होत असते.. दररोज अवैध रित्या 100 पेक्षा जास्त हायवा ट्रक रेतीची वाहतूक करतात तर 150 पेक्षा जास्त ट्रॅक्टर अवैध म...

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या अभिवादन शुभेच्छा

इमेज

महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांच्या अभिवादन शुभेच्छा

इमेज
अश्फाक कुरेशी शिवसैनिक गोंडपिपरी