पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस एक आदर्श व्यक्तिमत्त्वाचा 🌷 सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि जामतुकुम ग्रामपंचायतचे सरपंच माननीय भालचंद्र बोधनकर यांचा उद्या वाढदिवस

इमेज
एक आदर्श व्यक्तिमत्व । 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 नाविन्याचा ध्यास असणारे 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 निस्वार्थी 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 युवकांचे आशास्थान, मार्गदर्शक 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 प्रचंड इच्छाशक्ती असणारे 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 प्रतिभा शक्ती लाभलेले 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 अष्टपैलू नेतृत्व 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 समाजसेवेसाठी सदैव तत्पर असणारे 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 आपल्या कर्तुत्वाने सर्वांना आपलेसे करणारे 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 युवकांचे प्रेरणास्थान 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 सर्वांचे लाडके, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष 🥦🥦🥦🥦🥦🥦🥦 माननीय भालचंद्र बोधलकर , तालुका अध्यक्ष सरपंच संघटना तथा सरपंच ग्रामपंचायत जामतुकुम यांचा उद्या 1 जून 2023 रोजी वाढदिवस आहे.         कोणतेही काम निस्वार्थपणे करणारे समाज परिवर्तक, समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी शिक्षण मिळावे यासाठी कायम मेहनत घेऊन त्यांना मदतीचा हात देणारे, कार्यसम्राट, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम योगदान असणारे, उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले, तरुणांचे आदर्श व्यक्तिमत्व पोंभुर्णा तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष ...

*पोटच्या मुलीला बापाने 25 वेळा चाकूने भोसकले पत्नीचीही बोटे कापली* दिल्लीनंतर आणखी एक भयानक Video viral

इमेज
नेमकं असं काय घडलं की, एका बापाने आपल्या लेकीची इतक्या निघृणपणे हत्या केली. नेमकं असं काय घडलं की, एका बापाने आपल्या लेकीची इतक्या निघृणपणे हत्या केली.  सूरत, 31 मे : बहुचर्चित दिल्लीतील शाहबाद डेअरी हत्याकांडांचा भयानक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता गुजरातमधील सुरत येथून एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक वडील आपल्या 19 वर्षीय लेकीची अत्यंत निघृणपणे हत्या करीत असल्याचं दिसून येत आहे. नराधम वडिलांनी पोटच्या लेकीवर 25 वेळा सुऱ्याने वार केले. यात तिचा मृत्यू झाला. असं नेमकं काय घडलं की, एका बापाने आपल्या लेकीची इतक्या निघृणपणे हत्या केली. गच्चीवर झोपण्यावरुन सुरू झाला वाद... आरोपीचं नाव रामानुज साहू असून ते आपल्या कुटुंबासह सुरत येथील सत्य नगर सोसायटीत भाड्याच्या घरात राहत होते. रामानुज आणि त्यांच्या पत्नीमध्ये मुलगी रात्रीच्या वेळी गच्चीवर झोपण्यावरुन वाद झाला. रात्री साधारण 11.20 वाजता वादाचा एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यात वडील पत्नीसमोर मुलीवर हल्ला करतात. तब्बल 25 वेळा बापाने मुलीवर क्रूरपणे वार केले. यावेळी मुलगी गंभीर जखमी झाली. यावेळी आईने मुलीला वाचवण्यासाठी हस्त...

नांदगाव ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.

इमेज
मुल तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात नांदगावच्या प्रथम नागरिक कुमारी हिमानी ताई वाकुडकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सहारे साहेब ग्रामपंचायत मधील कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते. यावेळी सरपंच महोदयांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  तसेच गाव विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या वतीने गावातील दोन कर्तबगार महिलांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकांचे आभार मानले.

लाडके खासदार बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप

इमेज
काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. त्यांची अंत्ययात्रा थोड्याच वेळात निघणार आहे या यात्रेला काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित आहेत. काँग्रेस सह सर्वच पक्षाचे नेते पुढारी कार्यकर्ते हजारोच्या संख्येने लाडक्या खासदाराला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित आहेत.

*खा. बाळूभाऊ धानोरकरांचे राजकिय गुरु खा. विनायकजी राऊत धानोरकरांच्या अंतिम दर्शनाला राहणार उपस्थित*

इमेज
भद्रावती : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे विद्यमान खासदार तथा शिवसेनेचे पूर्वाश्रमीचे माजी आमदार बाळूभाऊ धानोरकर यांचे आज (दि. ३०) ला पहाटे २ च्या सुमारास  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (दि. ३१) ला अंतिम संस्कार होणार आहेत. या अंतिम संस्काराला खासदार बाळूभाऊ धानोरकरांचे राजकिय गुरु शिवसेना नेते खासदार मान. श्री. विनायकजी राऊत साहेब व माजी विधानपरिषद सदस्य मान. दुष्यंतजी चतुर्वेदी तथा  पूर्व विदर्भ शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे अन्य पदाधिकारी वरोरा येथे सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहणार आहेत. खासदार बाळूभाऊ धानोरकर हे शिवसेनेत होते त्यावेळेस पासून शिवसेना नेते मान. विनायकजी राऊत यांचेसह त्यांचे घनिष्ठ ऋणानुबंध होते. बाळूभाऊ धानोरकर यांची जळणघळण ही प्रामुख्याने शिवसेनेतूनच झाली. या घटनेचे त्यांना अतीव दुःख झाले आहे. अशा कठीण प्रसंगी पार्थिवाचे अंतिम दर्शन घेवून पक्षातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्याकरीता व त्यांच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी शिवसेना नेते मान. विनायकजी राऊत उपास्थित राहतील. राऊत साहेब यांचे सकाळी मुंबईवरुन विमानाने ड...

घोसरी येथील स्मशानभूमी शेडच्या बांधकामात प्रचंड भ्रष्टाचार - दोषींवर कारवाई करण्याची उपसरपंच जितू चौधरी यांची मागणी

इमेज
 पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथे दहनविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने तत्कालीन ग्रामपंचायत कमिटीने स्मशानभूमी शेडची मागणी केली होती. त्यानुसार सन 2018 ते 19 या वर्षात जन सुविधा योजनेअंतर्गत 4 लाख 38 हजार 660 रुपयाचे अंदाजपत्रकीय किमतीनुसार स्मशानभूमी सेडचे काम मंजूर करण्यात आले.  ग्रामपंचायत स्तरावरून एका ठेकेदाराला सदर काम देण्यात आले. ग्रामपंचायत ने संबंधित ठेकेदाराशी करारनामा करून बांधकाम पूर्ण करून देण्याची हमी घेतली होती. संबंधित कंत्राटदाराने ग्रामपंचायतीने ठरवून दिलेल्या जागेवर बांधकाम सुरू केले. मात्र बांधकाम सुरू असताना संबंधित सदर कामाचे मूल्यांकन न करता एकूण कामापैकी 75 टक्के रकमेची उचल केल्याचे दिसून येते.वास्तविक पाहता झालेल्या कामाचे मूल्यांकन करून त्यानुसार संबंधित कंट्रात दाराला रक्कम अदा करणे हे तत्कालीन सरपंच सचिवांना बंधनकारक होते.परंतु कोणतेही मूल्यांकन न करता व संबंधित अधिकाऱ्यांच्या सूचनेचे पालन न करता तत्कालीन सरपंच सचिवांनी मूल्यांकन नसताना सुद्धा 4 लाख 38 हजार 660 रुपयाच्या एकूण रकमेपैकी तीन लाख 35 हजार रुपयाची उचल करून सदर कंत्राट दाराला देण्यात आल्याचे दाखविण्यात...

नागभीड येथील बस्टॅन्ड च्या शौचालयात घाणीचे साम्राज्य.एस. टि.प्रशासनाचे शौचालयच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

इमेज
अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभीड - ---येथील बस्टॅन्ड च्या परिसरात काही महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांच्या स्थानिक विकास निधीतून प्रवास्यांकारिता सुलभ शौचालयाचे बांधकाम केले. या सुलभ शौचालयाची स्वच्छतेची जबाबदारी राज्य परिवहन विभागाकडे आहे. मात्र एस . टि. प्रशासनाकडून शौचालयाच्या स्वच्छतेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. सदर शौचालय बाहेरून जरी आकर्षक दिसत असले तरी आतून स्वच्छतेअभावी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. यामुळे शौचालयात दुर्गंधी युक्त वातावरण असून प्रवास्यांना नाक झाकून शौचालयात जावे लागत असल्याचे दृश्य पाहावयास मिळते. विशेष करून स्त्रियांना शौचालयातील अस्वच्छतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.शौचालयातील पाण्याच्या नळाला तोट्याच नाहीत.बरेचदा शौचालयात पाणी उपलब्ध राहत नाही. सध्यास्थीतीत शौचाल्याच्या टाकीला पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडली आहे. विहिरीला बोअरवेल ची पर्यायी व्यवस्था नाही.यामुळे प्रवास्यांपुढे नैसर्गिक विधी करिता कुठे जावे? असा प्रश्न निर्माण झाला असून एस. टि. प्रशासनविरोधात प्रवास्यांमध्ये तीव्र अस...

आत्ताची बिग ब्रेकिंग: चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्लीत निधन: जिल्ह्यात शोक कळा

इमेज
महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे दिल्ली येथे आज पहाटे दुःखद निधन झाल्याची बातमी पसरली आहे. या बातमीमुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला असून सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. शिवसेनेच्या स्थानिक शाखेचे प्रमुख, तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख असा धडाकेबाज प्रवास त्यानी लवकरच पूर्ण केला. युतीच्या सुवर्णकाळात त्यांनी भाजपच्या दृष्टीने कधीच सर न झालेला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ बांधून काढला. त्यांना 2009 साली शिवसेनेने याच क्षेत्रातून तिकीट दिली. मात्र यशाने थोडक्यात हुलकावणी दिली. 2014 पर्यंत वेगवेगळी आंदोलने आणि संघटनात्मक बांधणी करत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेसाठी मतदारसंघ अनुकूल केला परिणामी शिवसेनेच्या तिकिटावर त्यांनी आमदारकी जिंकली. महाराष्ट्रात निवडूण आलेले काँग्रेसचे एकमेव खासदार फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी जिल्ह्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या हजेरीनंतरही शिवसेना वाढविली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत धानोरकर यांना अचानकपणे काँग्रेसची चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात उमेदवारी मिळाली. कार्यकर्त्यांचे मोहोळ आणि भक्कम जनसंपर्क या बळावर त्या...

चंद्रपुरात खळबळ : क्रीष्णा अपार्टमेंट मधील खोलीत आढळला युवतीचा अर्धनग्न मृतदेह

इमेज
चंद्रपुर : वणी घुग्गुस मार्गावरील शिव मंदिरापासून जवळच असलेल्या क्रिष्णा अपार्टमेंट मधील एका खोलीत चोवीस वर्षीय युवतीचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे.  आज 29 मे ला सकाळी 10.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या युवतीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. रूम मधून दुर्गंधी येऊ लागल्याने घर मालकाने याबाबत पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून खोलीची पाहणी केली असता ही खळबळजनक घटना उघडकीस आली. आरोही वैभव बारस्कर (२४) व आरोही वानखडे अशी दोन नावे असलेली आधारकार्ड मृतक युवती जवळ आढळून आल्याने तिचे माहेरचे नाव कोणते व सासरचे कोणते हा संभ्रम निर्माण झाला असून तिचे कुटुंबीय आल्यानंतरच तिच्या नावाची स्पष्टता होईल.  ही युवती वर्धा जिल्ह्यातील समुद्रपुर तालुक्यातील निंबी या गावची रहिवासी असल्याचे प्रथम दर्शनी समोर आले आहे. युवतीचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आल्याने घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे.   पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान या घटनेमुळे चंद्...

*केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्य शासकीय रुग्णालय नागभीड येथे फळवाटप*

इमेज
अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी  नागभिड-----भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्य बंटिभाऊ भांगडिया आमदार चिमुर विधानसभा क्षेत्र यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी तालुका नागभीडच्या वतीने शासकीय रुग्णालय नागभीड येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.  यावेळी संतोष रडके भाजपा तालुकाध्यक्ष,इंदुताई आंबोरकर तालुकाध्यक्ष महिला आघाडी, ईश्वर मेश्राम माजी सभापती, आवेश पठाण कृषी ऊ.बा.स. सभापती,गणेश तर्वेकर संचालक कृ.ऊ.बा.स.,सचिन आकुलवार माजी बांधकाम सभापती,शिरीष वानखेडे मा.नगरसेवक, रामदासजी बहेकर,सुनील शिवणकर तालुका महामंत्री, जहांगीरजी कुरेशी, हेमंत नन्नावरे, राजू पिसे,संजय मालोदे,अमोल देशमुख ,विनोद मेश्राम ,राजेश मिसार,डॉ.मुंगनकर रुग्णालयातील इतर कर्मचारी व भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेस नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंहरावत यांचे वरील हल्लेखोर आणि सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी- सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

इमेज
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे वर झालेल्या प्राणघातक हल्ला व गोळीबार प्रकरणी हल्ल्यातील आरोपी व त्यामागे असणारे सूत्रधार यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोंभुर्णा तालुक्यातील सर्वपक्षीय पुढार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.             निवेदन देताना तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, देवळा खुर्द चे सरपंच विलासराव मोगरकर, शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक गणेश वासलवार, माजी नगरसेवक अमरसिंह बघेल, नगरसेवक नंदकिशोर बुरांडे, पराग मूलकलवार, जाम तुकोमचे सरपंच भालचंद्र बोधलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ गेडाम, सुनील कुंडोजवार, संजय ढोंगे, प्रकाश नैताम,विकास कोवे, राजू बोलमवार, राहुल देवतळे व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.     या ...

काँग्रेस नेते व जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंहरावत यांचे वरील हल्लेखोर आणि सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी- सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

इमेज
जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर: काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे वर झालेल्या प्राणघातक हल्ला व गोळीबार प्रकरणी हल्ल्यातील आरोपी व त्यामागे असणारे सूत्रधार यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पोंभुर्णा तालुक्यातील सर्वपक्षीय पुढार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.             निवेदन देताना तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. मध्ये प्रामुख्याने काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष ओमेश्वर पद्मगिरीवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल संतोषवार, देवळा खुर्द चे सरपंच विलासराव मोगरकर, शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक गणेश वासलवार, माजी नगरसेवक अमरसिंह बघेल, नगरसेवक नंदकिशोर बुरांडे, पराग मूलकलवार, जाम तुकोमचे सरपंच भालचंद्र बोधलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वसंत पोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक भाऊ गेडाम, सुनील कुंडोजवार, संजय ढोंगे, प्रकाश नैताम,विकास कोवे, राजू बोलमवार, राहुल देवतळे व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.     या घटनेतील गुन्हेगारांना ताबडतोब पकडून त्यांचेव...

भीषण अपघातात सात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

इमेज
गुवाहाटी:आसाममध्ये भीषण रस्ते अपघातामध्य ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथील जलुकबारी परिसरात रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे. गुवाहाटीचे सह पोलीस आयुक्त ठुबे प्रतीक विजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासानुसार या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. रविवारी रात्री जलुकबारी उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात आसाम इंजिनिअरिंग कॉलेजच्या (AEC) सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी कारमधून प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या भरधाव कारने जळुकबारी उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार डिव्हायडरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले. या कारमधून इंजिनिअरिंगचे दहा विद्या...