पोस्ट्स

डिसेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Happy New Year 2025 :

इमेज
Happy New Year 2025 : दरारा 24 तास न्यूज नेटवर्क   बघता बघता २०२४ वर्ष संपले, हे वर्ष कधी आले कधी गेले हे कळलेच नाही. सुखाच्या दुःखाच्या, आनंदाच्या, विरहाच्या अनेक आठवणी ठेऊन हे वर्ष निघून गेले. नवे वर्ष म्हटल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागण्याचा संकल्प तुम्ही केला असेल.  हे वर्ष जास्तीत जास्त आनंदाने, प्रियजनांच्या सहसावात, प्रगती आणि भरभराटीने जावे अशी सर्वांची इच्छा असते. याच गोष्टी मनात ठेऊन आपण आपल्या आप्तेष्टांचेही हित चिंतत असतो. सरत्या वर्षाची संध्याकाळ आणि नवीन वर्षाची पहाट आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत कुणाला घालवायला आवडणार नाही.  त्या दृष्टीने बहुतेक जण नियोजन पण करीत असतील परंतु ज्यांच्या काही जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून दूर देखील राहत असतील. त्यांना आपण फोनकरुन किंवा एसएमएस करुन शुभेच्छा देणे अगत्याचे आहे. मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे असे आपण जरुर सांगू शकतो. काही लोकांची आठवण आपण रोज काढत नाही हे सत्य आहे परंतु जेव्हा त्या व्यक्ती समोर येतात तेव्हा आपण एकमेकांना विसरलो हे कधी पटतच नाही. अशा सर्व नातेवाईक, मित्रांना नवी...

ट्रकच्या धडकेत नांदगाव (मुल) येथील शेतकऱ्याचा बैल जखमी.. केवळ 4000 देऊन शेतकऱ्यांची केली थट्टा

इमेज
ट्रकच्या धडकेत नांदगाव (मुल) येथील शेतकऱ्याचा बैल जखमी.. केवळ 4000 देऊन शेतकऱ्यांची केली थट्टा काय आहे प्रकरण जाणून घेण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.. चला तर जाणून घेऊया बातमीची रूपरेषा... संतोष गोंगले, (तालुका प्रतिनिधी) मुल: गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पामुळे चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील अनेकांना आपले जीवन गमवावे लागले आहे. सुरजागड लोह प्रकल्पातून अवजड ट्रक भरधाव वेगाने धावत असल्याने पर्यायी रस्ता तयार करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी अनेकदा केली. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अहेरी-अल्लापल्ली येथील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून पर्यायी रस्त्यासाठी आंदोलन केले होते. तरीही प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे अपघाताची शृंखला वाढतच जात आहे.गोंडपिपरी ते खेडी या महामार्गावरून ही वाहतूक सुरू झाली असल्याने या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्यावर सुद्धा या ट्रकांच्या अपघातात काही जणांचे जीव गेले काही दिवसापूर्वीच चांदापूर क्रॉसिंग वर एका परिचारिकेला या वाहनांनी चिरडले होते.य...

रीतीकच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, अरोपीला अटक

इमेज
रीतीकच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव; संतप्त नागरिकांचा चक्काजाम, अरोपीला अटक मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली. दरारा 24 तास न्युज नेटवर्क चंद्रपूर आरोपींनी चाकूने वार करून रितिकला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत असलेल्या रितिकला येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ आगडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी रितिकला मृत घोषित केले.  विशेष म्हणजे शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे. चंद्रपूर : मूल तहसील कार्यालयासमोर रितिक शेंडे (२८) या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली. शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे. शुक्रवारी रात्री मूल पोलीस ठाण्यात नागरिकांनी एकत्र येत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली. शनिवारी शवविच्छेदनानंतर संतप्त नागरिकांनी मूल तहसील आणि पंचायत समितीजवळील घटनास्थळी मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन केले. यामुळे चंद्रपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक खोळंबली. दरम्यान, शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी आरोपी रा...

25 डिसेंबरला जूनगावात गहाण नाटकाचे आयोजन - नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगडे राहणार उपस्थित

इमेज
25 डिसेंबरला जूनगावात गहाण नाटकाचे आयोजन - नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगडे राहणार उपस्थित पोंभुर्णा : प्रतिनिधी झाडीपट्टीतील सुपरहिट कॉमेडी, "हरिदास वैद्य" यांच्या लेखणीतून साकार झालेले तीन अंकी नाट्य पुष्प "गहाण" या नाटकाचा प्रयोग दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी जुनगाव येथे गोमाजी नागापुरे यांच्या भव्य आवारात आयोजित करण्यात आला आहे. या नाटकाला उद्घाटक म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार देवराव दादा भोंगडे हे राहणार असून त्यांच्या व्यतिरिक्त अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या नाटकाचा आस्वाद रसिकांनी घ्यावा असे आवाहन नाट्यकला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करा-माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर

इमेज
लोखंडी रॉडने मारहाण करणाऱ्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करा-माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर विजय जाधव प्रतिनिधी, नांदगाव: येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या शिक्षकाने सातवीच्या विद्यार्थ्यास लोखंडी रॉडने मारहाण केल्याची समताप जनक घटना घडली. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहीरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. नांदगाव येथे जिल्हा परिषद हायस्कूल आहे. या शाळेतील सहायक शिक्षक मनोज आगलावे यांनी बुधवार (ता. १८) दुपारच्या सुटीत सातवीच्या वर्गात प्रवेश केला. वास्तविक वर्ग सात मध्ये आगलावे यांचा कसलाही रोल नाही. तरी सुद्धा त्यांनी वर्गात जाऊन लोखंडी रॉडने वर्गातील मुलांना मारहाण केली. त्यात सुमित दिलीप शिंदे या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागला. मंजित रोशन भंडारे या विद्यार्थ्यालाही इजा झाली. मनोज आगलावे यांनी यापूर्वी शाळेतील नयन नायगमकार यालाही मारहाण केली होती. याप्रकरणात मुख्याध्यापकांनी आगलावे यांच्यावर कारवाई केली होती. मा...

देवाडा बुज येथील घटना! ट्रॅक्टर उलटली! आदिवासी तरुणाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू...

इमेज
देवाडा बुज येथील घटना! ट्रॅक्टर उलटली! आदिवासी तरुणाचा ट्रॅक्टर खाली दबून मृत्यू... दरारा 24 तास न्युज नेटवर्क  विजय जाधव (प्रतिनिधी) नांदगाव: मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व बेंबाळ पोलीस चौकी अंतर्गत येत असलेल्या देवाडा बुज येथे ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात देवाळा बुज येथील आदिवासी तरुण नागेश अरुण मेश्राम वय अंदाजे 21 वर्ष याचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जन जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. ही दुर्घटना काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मुल पोलिसांना होताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले. घटनास्थळ पंचनामा करून जेसीबी च्या साह्याने सहाय्याने ट्रॅक्टर उचलून मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह शबाविच्छेदनगृहात मुल येथे पाठवण्यात आला. मात्र काल रात्री सवविच्छेदन होऊ न शकल्याने आज शुक्रवार रोजी शवविच्छेदन होईल असे सूत्रांनी सांगितले आहे. ट्रॅक्टर शामराव आरेकर यांच्या मालकीची असून त्यांचा मुलगा दारू पिऊन ट्रॅक्टर चालवत होता त्याचेवर कारवाई व्हावी अशी मागणी व जा चर्चा गावात होताना दिसली. दरम्यान आई-वडिलांचा एकुलता एक तरुण मुलगा काळाने हिरावल्याने कुटुंबावर...

आष्टीत दिव्यांग वृद्धाची शस्त्राने निघृण हत्या। अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू।

इमेज
आष्टीत दिव्यांग वृद्धाची शस्त्राने निघृण हत्या। अज्ञात आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू। गडचिरोली। (विकास रामटेके,विशेष प्रतिनिधि) किरायाच्या घरात राहत असलेल्या दिव्यांग वृद्धाची अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही धक्कादायक घटना १५ डिसेंबरला उघडकीस आल्यानंतर आष्टीसह संपूर्ण परिसर हादरला आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. रशीद अहमद शेख (६०, रा. बुटीबोरी, नागपूर) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. रशीद शेख हे पायाने दिव्यांग होते. ते २० वर्षांपासून आष्टी येथे किरायाची खोल्वे घेऊन वास्तव्यास होते. त्यांनी १२ डिसेंबर रोजी नातेवाइकांना दूरध्वनीद्वारे गावाकडे येत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर चारपाच दिवसांचा कालावधी लोटल्यानंतर त्यांचा फोन लागत नसल्याने नातेवाइकांना शंका येऊ लागली. त्यामुळे शेख यांचे नातेवाइक नागपूरवरून आष्टी येथे आले. त्यांचा फोटो दाखवून हा व्यक्ती कुठे राहतो, अशी विचारणा करू लागले. तेव्हा आष्टी येथील चौकातील काहींनी चामोर्शी मार्गावरील खुशाल कुकडकर यांच्या घरी किरायाने राहत असल्याची माहिती नातेवाइकांना दिली. त्यानंतर नातेवाइकांनी कुकडकर यांचे ...

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

इमेज
सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दरारा 24 तास  चंद्रपूर (प्रति ) सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे विदर्भातील भाजपचे एकमेव ज्येष्ठ नेते तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तीन व दोन वेळा निवडून आलेले अनुक्र मे किर्तीकुमार भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही, याबाबत दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू होती. १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात भोपळा १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासू नेते आमदार मुगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या चांगल्या कामगिरीमुळे ओळखला जातो. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो, की वाघांच्या स्थलांतरणाचा विषय, मुनगंटीवार यांनी आपल्या कामाची छाप सोडली. शिलकीचे अंदाजपत्रक सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडे बघितले ...

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

इमेज
सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दरारा 24 तास  चंद्रपूर (प्रति) सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे विदर्भातील भाजपचे एकमेव ज्येष्ठ नेते तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तीन व दोन वेळा निवडून आलेले अनुक्र मे किर्तीकुमार भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही, याबाबत दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू होती. १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात भोपळा १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासू नेते आमदार मुगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या चांगल्या कामगिरीमुळे ओळखला जातो. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो, की वाघांच्या स्थलांतरणाचा विषय, मुनगंटीवार यांनी आपल्या कामाची छाप सोडली. शिलकीचे अंदाजपत्रक सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडे बघित...

ओम राईस मिल गोवर्धन च्या वतीने शेतकऱ्यांसाठी घरपोच सेवा उपलब्ध

इमेज
ओम राईस मिल गोवर्धन च्या वतीने शेतकऱ्यांसाठी घरपोच सेवा उपलब्ध पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी सरकारही शेतकऱ्यांसाठी विविध योजना अमलात आणत असते तसेच आता व्यापारी वर्ग व ध्यान भरडाई केंद्र, अर्थात राईस मिल इत्यादी कामासाठी शेतकऱ्यांना घरपोच सेवा सर्व प्रकारची उपलब्ध करून देण्यात आली आहे. तत्पूर्वी स्वतःच्या बैलबंडीने किंवा कुठल्या साधनाने राईस मिलवर ध्यान दळून आणावे लागत होते. आजच्या युगात बदलत्या काळात सर्वच स्तरात बदल झाला असून आता घरपोच धान पिसाई करून नेयांकडून मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप त्रास आणि आर्थिक भुर्दंड वाचला आहे.  गोवर्धन येथील ओम राईस मिल च्या वतीने शेतकऱ्यांसाठी घरपोच सेवा उपलब्ध करून दिली आहे. तांदळात कोण खडे गोटे माती राहू नये याकरिता व्यापारी मिलमध्ये लागणारी मशनरी खास शेतकऱ्यांच्या मालाची पिसाई करण्याकरिता लावलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन मिल चे संचालक विनोद वर्घंटीवार यांनी केले आहे.  खालील नंबर वरती संपर्क साधण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.  विनोद वर्गंटीवार-97 64 45 26 04/94 23 62 99 94/७२४८९५१६४६  सुभाष-70 83...

ग्राहक राजा जागा हो !

इमेज
ग्राहक राजा जागा हो ! रेशनवर नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या सुस्त, नवीन समित्यांचे तातडीने गठण करण्याची मागणी.:-दीपक देशपांडे  राज्यातील वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रेशनवर नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या सुस्त असून कुठे त्यांची निवड ही नावालाच केली जाते की काय असा संशय निर्माण होत असून जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. *ही आहेत दक्षता समितीची कामे* शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाब दुकानांतून केला जातो किवा नाही तपासणे, बनावट, खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी बाबात आढावा घेणे, धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे, गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक कार्ये दक्षता समितीमार्फत पार पाडली जातात.```  रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष, सचिव, सदस्य अनेक वर्षांपासून अनेक तालुक्यात निवडल्याच गेल्या नाहीत तर कुठे नामधारी समित्या असल्याने रेशन दुकानातील दक्षता समिती केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. ग्राम पातळीवर सार...

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू

इमेज
नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू नांदगाव: विजय जाधव  मुल: नांदगाव कडून गोंडपिपरीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीचा गोवर्धन स्मशानभूमी वळणावर अपघात झाल्याने या अपघातात फोन लाईनचे काम करणारे सुपरवायझर सागर मिश्रा वय 25 रा.नागपूर यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री उघडकीस आली.घटनेची माहिती बेंबाळ पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. पुढील कारवाई प्रशांत गायकवाड मेजर व त्यांचे सहकारी करत आहेत.

वडिलांना 'टकल्या' म्हणल्याचा राग; मुलाच्या संतापाचा कडेलोट, रागाच्या भरात एकाला संपवलं

इमेज
वडिलांना 'टकल्या' म्हणल्याचा राग; मुलाच्या संतापाचा कडेलोट, रागाच्या भरात एकाला संपवलं ============== दरारा 24 तास न्युज नेटवर्क  पुणे:किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाने एका व्यक्तीचा दगडाने ठेचून खून केलाय. वडिलांना 'टकल्या' म्हणल्याच्या राग आला आणि अल्पवयीन आरोपीच्या संतापाचा कडेलोट झाला. संतापलेल्या आरोपीने एकाचा दगडाने ठेचून खून केलाय. ही घटना वाघोली परिसरात आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडलीये. दारुच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने वडिलांना टकल्या म्हटल्याचा राग आल्याने या अल्पवयीन मुलाने हा खून केलाय. राजू लोहार (वय 46) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान या प्रकरणी 16 वर्षीय अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आता वनमंत्रांनीच वाघाचा बंदोबस्त करावा-इंजी. वैभव पिंपळशेंडे

इमेज
आता वनमंत्रांनीच वाघाचा बंदोबस्त करावा-इंजी. वैभव पिंपळशेंडे पोंभुर्णा: वन विभागाचे अधिकारी कर्मचारी वाघाचा बंदोबस्त करण्यास अपयशी ठरले असल्यामुळे आता नरभक्षी वाघाचा बंदोबस्त खुद्द वनमंत्र्यांनीच करावा अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इंजिनीयर वैभव पिंपळशेंडे यांनी केली आहे. तालुक्यातील पिपरी देशपांडे, चेक ठाणा, गोवर्धन,नांदगाव परिसरातील शेत शिवारात अनेक महिन्यापासून वाघांचा वावर आहे. नुसता वावरच नसून हा नरभक्षी वाघ अनेक जनावरांचे बळी घेतलेले आहे. मानव प्राण्यावर सुद्धा हल्ले होत आहेत. वनविभाग मोठ्या प्राणहानीची वाट बघत आहे की काय? असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. दररोज वाघाच्या दर्शनामुळे शेतकरी भाई भीत झाले असून शेतात काम करणे थांबविले आहे. शेतमजूर शेतात काम करण्यास तयार नसल्याने त्यांचेवरही उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची खरोखर काळजी असेल तर शासनाने तात्काळ वाघाला जर बंद करून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना न्याय द्यावा अशी मागणी वैभव पिंपळशेंडे यांनी केली आहे. वाघाच्या भीतीमुळे अनेक कामे पडली आहेत.

पोंभुर्णा तहसील कार्यालय वाऱ्यावर! अधिकारी कर्मचारी धुर्‍यावर

इमेज
पोंभुर्णा तहसील कार्यालय वाऱ्यावर! अधिकारी कर्मचारी धुर्‍यावर जिवनदास गेडाम, (विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर: गतिमान प्रशासनाचा दावा करणारा महसूल विभाग जनतेची विहित वेळेत कामे करण्यास समर्थ ठरत आहे. पोंभुर्णा तहसील कार्यालयात प्रभारी तहसीलदार नियुक्त असल्यामुळे वेळ देऊ शकत नाही. तहसीलदारच तहसील कार्यालयात उपस्थित नसल्याने त्यांच्या हाताखालच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अधिकच फावत चालले आहे. जनतेची कामे वेळेत करीत नाहीत, कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाहीत. कार्यालयीन वेळेत अनेक कर्मचारी, अधिकारी "बाजार" करीत दिसतात.  या तालुक्याचे व क्षेत्राचे नेतृत्व करणारे राज्याचे वजनदार मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभेत निवडून गेले. मात्र जनतेच्या समस्यांना त्यांनी कधीच गांभीर्याने घेतले नसल्याचा आरोप होत आहे. चार डिसेंबर रोजी तालुक्यातील समस्यांचा पाढा वाचत प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांवर आमदारांचा कसल्याही प्रकारे वचक नसल्यामुळे नागरिकांची कामे अधिकारी करीत नसल्याचा आरोपही नागरिकांमधून केल्या जात आहे.  तालुक्याला नियमित तहसीलदार...

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

इमेज
पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला.. दरारा २४ तास न्युज नेटवर्क... विजय जाधव (तालुका प्रतिनिधी) नांदगाव: पोंभुर्णा तालुक्यातील पिंपरी देशपांडे शेतशिवारात कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेवर शेतात दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले.  परंतु सोबतच्या महिलांनी आरडाओरडा केल्यामुळे वाघ पळून गेला. वाघाच्या हल्ल्यात रसिका अंकुश कुमरे (२८) रा. पिपरी देशपांडे ही गंभीररीत्या जखमी झाली आहे. ही घटना काल रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. पोंभूर्णा वनपरिक्षेत्राअंतर्गत चकठाणा- पिपरी देशपांडे-गोवर्धन शेतशिवारात मागील अनेक दिवसांपासून वाघाची दहशत असून शेती हंगाम अडचणीत असलेले आहे. दिवसेंदिवस वाघाचे वावर वाढलेले असल्याने वन्यप्राणी-मानव संघर्ष होण्याची भीती व्यक्त करून वाघाचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्र सहायक अजय बोधे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचार केले जात आहेत.