पोस्ट्स

नागपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा

इमेज
नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा दरारा 24 तास / प्रतिनिधी नागपूर: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होताब देशाच्या राजकारणालाच कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चास्सो पार'ची घोषणा देणाऱ्या भाजपला निकालाने पक्का दिला आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यायी प्रचिती मंगळवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानापुढे पक्षाच्या कार्यकत्यांनी दिलेल्या घोषणांमुळे आली. नागपूर लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तिसन्यांदा विजयी झाले. या निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले होते. गडकरी यांच्या विजयाची घोषणा होताच मोठ्या संख्येने भाजप कार्यकत्यांनी गडकरी यांच्या निवासस्थानापुढे जालोष केला. यावेळी अनेक कार्यकत्यांच्या हाती गडकरी यांना पंतप्रधान करा, अशा आशयाचे फलक होते. त्यावर देशाचे पंतप्रधान नितीन गडकरी साहेब हो ही देवाकडे प्रार्थना' असे लिहिले होते. हा फलक सर्वांचे लक्ष वेधून घेणारा होता. गडकरीच्या विजयाचा आंनंद साजरा करतानाथ त्यांना पंतप्रधानपदी पाहण...

पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्यांना इशारा

इमेज
पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाचा पोलीस अधिकाऱ्यांना इशारा  (विशेष प्रतिनिधी) नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूर्ण यांच्या खंडपीठाने सांगितले की, घटनेच्या कलम 19 आणि 22 नुसार पोलीस कोणत्याही पत्रकाराची सूत्रे विचारू शकत नाहीत आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात न्यायालयही विचारू शक्त नाही. जोपर्यंत तपास आणि ठोस पुराव्याशिवाय पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे आणि साक्ष तपासली जात नाहीत. आजकाल पोलीस पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा लादत आहे. बहुतांश घटनांमध्ये पोलीस स्वतःला चांगले बनवण्यासाठी असे करतात, या संदर्भात उच्च न्यायालयाने आता पोलीसानी असे करताना आपली कठोर भूमिका दाखवण्यास सांगितले आहे. तसे असेल तर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. कोणतीही बातमी छापण्यासाठी पत्रकार त्यांच्या स्रोतांचा वापर करतात हे लक्षात घेण्यायोगे आहे, परंतु अनेक वेळा भ्रष्ट राजकीय माफिया आणि पोलीस संघटित गुन्हेगारीच्या धर्तीवर पत्रकार...

आजपासून ४ जून पर्यंत.. फक्त एवढं करा! - ज्ञानेश वाकुडकर

इमेज
आजपासून ४ जून पर्यंत.. फक्त एवढं करा! - ज्ञानेश वाकुडकर ~~~ जिथं असाल तिथून, जसं जमेल तसं, जेवढं जमेल तेवढं.. ४ जून पर्यंत खाली दिल्याप्रमाणे करा. कारण.. आपला देश धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे. संविधान धोक्यात आहे. आपल्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य धोक्यात आहे. कृपया खालील गोष्टी काळजीपूर्वक वाचा. विचार करा. कृती करा..! १. ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल आहे. स्वातंत्र्यानंतरची ही सर्वात वादग्रस्त आणि संवेदनशील निवडणूक आहे.  २. या निवडणुकीत आपली लोकशाही, संविधान आणि देशाचे अस्तित्व देखिल धोक्यात आहे. ३. विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. ते २०१४ पासून सत्ताधाऱ्यांनी जवळपास उध्वस्त करून टाकले आहेत. ४. निवडणूक आयोगाच्या गळ्यात कुणाचा खाजगी पट्टा बांधला आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. आयोगातील महत्त्वाचे शिलेदार तुकडेवारी विकले गेले आहेत, अशी लोकांची भावना आहे.  ५. अशा संवेदनशील वेळी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विदेशात सुटीवर गेलेले आहेत. पण आपल्याला मात आपला देश असा वाऱ्यावर सोडता येणार नाही.  ६. संसदेची सुरक्षाव्...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट गंभीर जखमी

इमेज
अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट गंभीर जखमी नागपूर (विशेष प्रतिनिधी): नागपूरातील कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडारस्त्यावर सोमवार दि. ४ मार्च रोजी संध्याकाळी ७/७:३० च्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. बिबट्या रस्ता ओलांडताना वाहनाने दिलेल्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला असून या बिबट्यावर वनविभागामार्फत उपचार सुरू आहेत. “जखमी असलेला बिबट्या दोन अडिच वर्षांचा असून त्याच्या दोन पायांमध्ये फ्रॅक्चर आहे. बिबट्याच्या पाठीच्या कण्याला ही गंभीर दुखापत झाली असल्याची शक्यता असून त्यासाठी त्याचे एक्स रे काढण्यात येणार आहे. सरकारी आणि खाजगी अनूभवी डॉक्टरांच्या माध्यमातून या बिबट्यावर उपचार केले जात असून वनविभाग बिबट्याला वाचविण्याचे पुर्ण प्रयत्न करत आहे”, अशी माहिती नागपूरचे उपवनसंरक्षक डॉ. भरतसिंह हांडा यांनी बोलताना दिली. उपवनसंरक्षक हांडा यांच्या समवेत सहाय्यक वनसंरक्षक आर. एम. घाडगे व कळमेश्वरचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी. आर. शिरपुरकर हे वनअधिकारी पुढील तपास करत आहे.

दोन महिने वीज बिल भरलं नसेल तर कनेक्शन कापले जाणार; महावितरणचा इशारा

इमेज
दोन महिने वीज बिल भरलं नसेल तर कनेक्शन कापले जाणार; महावितरणचा इशारा महावितरणच्या वीज बिल थकबाकीचा डोंगर ८७ हजार कोटींवर पोहोचला आहे. त्यामध्ये महिन्याला ४०० ते ५०० कोटी रुपयांची भर पडत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणने थकबाकी वसुलीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार कृषिपंप वगळता सुमारे १३ हजार ४३३ कोटी रुपयांची थकबाकी मार्चमध्ये वसूल केली जाणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास वीज कापण्याचा इशाराही महावितरणने दिला आहे. महावितरणची कृषिपंपधारक आणि कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांना वगळून सुमारे ८३ लाख घरगुती आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांकडे १३ हजार कोटी रुपयांहून अधिकची थकबाकी आहे. त्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये वाढ होऊ नये, मार्चअखेर जास्तीत जास्त थकीत रक्कम वसूल करण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना दिले आहेत. तसेच एखाद्या वीज ग्राहकाची दोन वीज बिलांची थकबाकी राहिल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश दिले असल्याचे महावितरणच्या मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

अवैध सुगंधित तंबाखूचा साठा जप्त, 👉 लाखो रुपयांचा माल कंपनीतुन येतो का? 👉 हानीकारक वस्तूंच्या निर्मितीसाठी शासनाने परवाने देऊ नये.

इमेज
अवैध सुगंधित तंबाखूचा साठा जप्त, 👉 लाखो रुपयांचा माल कंपनीतुन येतो का? 👉 हानीकारक वस्तूंच्या निर्मितीसाठी शासनाने परवाने देऊ नये. नागपूर – (चक्रधर मेश्राम)  सुगंधित तंबाखूच्या विक्री आणि वितरणाला आळा घालण्याच्या महत्त्वपूर्ण हालचालीमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच यशस्वी छापा टाकला. 21 फेब्रुवारीच्या मध्यरात्री गोपनीय माहितीवरून सदर कारवाई करित गुन्हे शाखेने चिमूर तालुक्यातील नेरी गावातील एका गोदामावर छापा टाकला. या छाप्यात 2 लाख 37 हजार 645 रुपये किमतीचा फ्लेवरयुक्त तंबाखू जप्त केला. नेरी शेतशिवारात गजानन चांदेकर यांच्या मालकीच्या गोदामात हुक्का शिशा तंबाखू, मुसफिर पान मसाला, गरुड हुक्का, माझा फ्लेवर्ड तंबाखू, रजनीगंधा पान मसाला आणि पान मसाला यासह विविध प्रकारचा तंबाखूचा साठा जप्त केल्याचे आढळून आले. कारवाई दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने अवैध धंद्यात सहभागी असलेल्या दोघांना अटक केली. ४३ वर्षीय किराणा दुकान मालक जगदीश काशिनाथ अष्टनकर आणि नागभीड येथील आदिल कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम 328, 188, 272, 273, 34 तसेच स...

पाणीपुरी खाल्ल्याने नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; 2 मैत्रीणी ICU मध्ये भरती, उपराजधानीत खळबळ

इमेज
पाणीपुरी खाल्ल्याने नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू; 2 मैत्रीणी ICU मध्ये भरती, उपराजधानीत खळबळ      नागपूर:जम्मू कश्मीर येथील नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनीचा मृत्यू, पाणीपुरी खाल्ल्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नागपूरः पाणीपुरी खाणे एका विद्यार्थीच्या जीवावर बेतल्याची घटना नागपूरमध्ये घडली आहे. जम्मू कश्मीर येथून बीएससी नर्सिंगच्या शिक्षणासाठी आलेल्या 18 वर्षे विद्यार्थिनीचा नागपूर मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शितल कुमार असं विद्यार्थिनीचे नाव आहे. प्राथमिक अंदाजानुसार या मुलीचा मृत्यू पाणीपुरी खाल्ल्यामुळे झाला आहे. पाणीपुरीसाठी करण्यात आलेल्या पाणी दुषित असल्याने तिला गॅस्ट्रोची लागण झाल्याने तसेच योग्य वेळी उपचार न घेतल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनाच्या अहवालातुन मृत्यूच कारण स्पष्ट होईल. तसेच तिच्यासह आणखी दोन मैत्रिणींवर आयसीयूमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती नागपूर मेडिकल कॉलेजचे तथा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दिली आहे.  शितल कुमार ही 18 वर्षाची विद्यार्थिनी आहे...

नागरिकांना कोणत्याही पोलिस ठाण्याचे फोटो, व्हिडिओ काढता येणार

इमेज
नागरिकांना कोणत्याही पोलिस ठाण्याचे फोटो, व्हिडिओ काढता येणार नागपूर: आता कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पोलीस ठाण्याचे आतील व बाहेरील फोटो व्हिडिओ काढता येणार आहे.या संबंधीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. पोलिस स्टेशन ही "लिगल पब्लिक प्लेस" आहे, आणि पोलिस पब्लिक सर्वंट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा सर्वसामान्य जनतेला अधिकार आहे. त्याला कोणतेही पोलीस अधिकारी व कर्मचारी अडकाठी आणू शकत नाही. कामात पारदर्शकता आणण्याचा दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. रस्त्यावर ड्युटी बजावत असलेल्या पोलिसांचेही फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

टोमॅटोच्या दरात तिप्पटीने वाढ, गृहिणींचे बजेट कोलमडले

इमेज
दरारा 24 : सलाडपासून ते प्रत्येक भाजी आणि आमटीमध्ये टोमॅटो हमखास वापरला जातो. टोमॅटोने जेवणाला थोटी आंबट आणि स्वाविष्ट अशी चव येते. त्यामुळे जेवणात टोमॅटो कायम वापरला जातो. या टोमॅटोचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. मात्र टोमॅटोमुळे आता तुमच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. कारण वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात तिपटीने वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर भीडले गगनाला टोमॅटोच्या दरात वाढ होउन १८ ते २० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो थेट ६० रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीये. तसेच गृहिणींचे महिन्याभराचे बजेटही कोलमडले आहे. वाशी कृषी उत्पन्ना बाजार समितीमधील दर ४० रुपयांवर पोहचले आहेत. भाजीपाल्याचे दर कडाडले; सामन्य जनतेला फटका वाढतं तापमान आणि कडाक्याच्या उन्हाचा परिणाम थेट भाजीपाल्यावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोथींबीर महागली होती. त्यानंतर आता टोमॅटोचे दर वाढले आहेत. वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात आलेत. माल कमी आणि मागणी जास्त असल्याने बाजारातील टोमॅटोचे दर कडाडले आहेत. आवक कमी झाल्याने भाव वाढले असं व्यापाऱ्...

आठव्या मजल्यावरून उडी घेऊन प्रसिद्ध बिल्डरची आत्महत्या, नागपुरात खळबळ

इमेज
आठव्या मजल्यावरून उडी घेऊन प्रसिद्ध बिल्डरची आत्महत्या, नागपुरात खळबळ नागपूर जिल्हा प्रतिनिधी इमारतीच्या आठव्या माळ्यावरून उडी घेऊन नागपूर येथील प्रसिद्ध बिल्डरने आपली जीवन यात्रा संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अभिजीत बापूराव दुधाने वय 44 वर्ष राहणार तात्या टोपे नगर नागपूर असे आत्महत्या केलेल्या बिल्डरचे नाव असून ही घटना रविवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे बांधकाम क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शासनाने सुरू केला शोषणाचा ‘खाणमार्ग’! 👉 संवेदनशीलता नावाचा गुण शासनाच्या दरबारात नाही? 👉 उद्योजक प्रेमातून बाहेर पडून आंदोलनाची दखल घ्यावी. ✍️नागपूर /चक्रधर मेश्राम

नागपूर /चक्रधर मेश्राम दि. ५/५/२०२३:- महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील डोंगर, दुर्गम भागात राहाणाऱ्या आदिवासींनी संविधानिक मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला पन्नास दिवस होत आहेत. तरीही राज्यातील शासन योग्य दखल घेत नसल्याने महाराष्ट्र व छत्तीसगडच्या सीमेवरील आदिवासींनी सुरू केलेले आंदोलन संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मध्यमवर्गीय मानसिकतेत जगणाऱ्या समाजाला असे काही आंदोलन सुरू आहे, त्यात शेकडो आदिवासी सहभागी झाले आहेत हे ठाऊक सुद्धा नाही. कारण आंदोलनाला जिल्ह्यातील प्रसिद्धी माध्यमेही प्रसिद्धीच द्यायला तयार नाहीत. यामागे काही गौडबंगाल तर आहे की काय हे समाजाला मार्ग नाही. ते प्रसार माध्यम वर्तुळालाच माहीत? कंपनीचा इतका प्रभाव काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. एटापल्ली तालुक्यातील तोडगट्टा, गर्देवाडा परिसरात दमकोंडवाही बचाव समितीच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनाची महत्त्वाची मुख्य मागणी शासनाच्या दरबारात अनेकदा निवेदन सादर करुन कळविण्यात आली आहे. या परिसरात येऊ घातलेल्या प्रस्तावित खाणी रद्द करा. या आंदोलनाची दखल राज्यकर्त्यांनी सुद्धा का घेतलेली नाही. गडचि...

कॅन्सरचे प्रकार आणि लक्षणांची माहिती प्रत्येक नागरिकांनी जाणुन घ्यावी. 🛑 कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे अनेक आहेत प्रकार . 🛑 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे यांनी दिली जनहितार्थ माहिती.

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि.४/२/२०२३:-   कर्करोग हा आजार फार गंभीर असून या आजाराबाबत सर्वांना माहीती असणे आवश्यक आहे. या आजाराबाबतची लक्षणे काय आहेत याबद्दल आवश्यक तेवढी माहिती प्रत्येक नागरिकांना नसते. म्हणूनच या जीवघेण्या आजाराचे सर्व प्रकार आणि माहिती सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोर एक आव्हानात्मक जीवघेणी समस्या आहे. दरवर्षी कर्करोगामुळे हजारो लोक मृत्यू पावतात. कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. परंतु हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की, कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. कर्करोग शरीरात असूनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तसे.... तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कर्करोगापासून वाचवणारे उपचारही आलेत. पण तरी आजही जनमानसात कर्करोगाबद्दल पाहिजे तितकी जागरुकता नाही. कर्करोग हा आता एक सामान्य आजार झाला आहे. त्यामुळे त्याबद्दल प्र...

आयकर विभागाने दिला अंतिम इशारा, 👉 लवकर करा ‘हे’ काम अन्यथा होईल PAN card निष्क्रिय

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 6/1/2023:-  सध्याच्या काळात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे बनले आहेत. अनेक महत्वाच्या कामांमध्ये याचा वापर अनिवार्य झाला आहे. याबरोबरच अनेक सरकारी योजनांचा लाभ देखिल याशिवाय घेता येणार नाही. मात्र आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केलेल्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे. एका ताज्या एडवायझरीनुसार, जर आपले पॅन कार्ड 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होईल. कारण या तारखेनंतर अशा लोकांना आपले पॅन कार्ड वापरता येणार नाही. आयटी अॅक्टनुसार 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही तर ते निष्क्रिय होईल. ज्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून याचा वापर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही. आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालयातील जनतेला यातून सूट देण्यात आली आहे, याशिवाय 80 वर्षांवरील लोकांनाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅनला आधारशी जोडण्याची मुदत ३१ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत दिली आहे. आपले पॅन- आधार लिंक आहे की नाही ते तपासावे . सर्वात आधी आयकर विभागाच्या ई-फ...

आरोपीला तात्काळ अटक करा 🔹अन्यथा पोफाळी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार- 🔹दादासाहेब शेळके यांनी दिला इशारा

इमेज
नागपूर / प्रतिनिधी दि. 1/1/2023:-       बोथा ता.महागाव येथे 5 घरे असलेल्या बौद्ध समाजाची महिला संरपंच झाल्यामुळे जातीय भावनेतून सर्व ग्राम पंचायत सदस्य बौद्ध महीला संरपंच यांचा सतत अपमान करणे , कुटुंबाला जीव मारण्याची धमकी देणे , कामात हस्तक्षेप करणे , राजीनामा दे म्हणून सांगणे , सगळ्या परिवाराचा खून करण्या ची धमकी देणे, जातिवाचक शिवीगाळ करत असल्या मुळे आरोपीवर अट्रोसिटी अक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून आरोपीला आत्तापर्यंत अटक झाली नाही.  त्यामुळे भीम टायगर सेना प्रमुख दादासाहेब शेळके व जेष्ठ कायदे तज्ञ एड.पि.एल. नवसागरे वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष जोगदंड ज्येष्ठ पत्रकार तथा भिम टायगर शहर अध्यक्ष सिद्धूभाऊ दिवेकर भिम टायगर सेना सेना तालुकाप्रमुख कैलासदादा कदम पप्पुभाउ कावळे,विजय लहाने डि.एन.मनवर आदिनी खंडागळे कुटुंबाची भेट घेतली यावेळी आरोपीला तात्काळ अटक करा अन्यथा भिम टायगर सेना व वंचित आघाडीच्या वतीने पोलीस स्टेशनवर मोर्चा काढणार असल्याचे दादासाहेब शेळके यांनी सांगितले.

वनविभागाच्या सबसिडी अनुदान वाटपात जनवन समिति अध्यक्षाने केला लाखोचा घोटाळा 🔹ज्ञानिवंत मांढरे, राष्ट्रपाल गोंडाने आणि ग्रामस्थांनी केली तक्रार. 🔹वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली डोळेझाक

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 25/12/2022:- नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील मौजा चिकना, येथील भ्रष्टाचारी श्री तुळशीदास कळंभे (जनवन समिती अध्यक्ष तथा उपसरपंच चिकना) व त्यांचे सहकारी श्री गॅस एजेंसी, उमरेड यांनी प्रचंड भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले असले तरी वरिष्ठ अधिकारी कारवाई करण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे. मौजा चिकना हे गाव उमरेड-करांडला वन्यजीव अभयारण्या लगत असून पुनर्वसनाच्या वाटेवर आहे. गावाचे पुनर्वसन होईपर्यंत ग्राम जनांच्या विकासासाठी जनांच्या सहकार्याने वनविभागाची समिती म्हणजे जन वन समिति कार्यरत आहे. या माध्यमातून गावाच्या सुविधांसाठी विविध उपक्रम राबविले जातात, त्यातलाच एक उपक्रम म्हणजे घरगुती गैस सिलेंडर पुनर्भरनावर 75% अनुदान (सबसिडी) आणि याच सबसिडी वाटपात जनवन समिती अध्यक्ष  तुळशीदास कळंभे (उपसरपंच) यांनी 4 ते 10 लाखांचा घोटाळा व भ्रष्टाचार केला आहे.  याबाबत  ३-मार्च-२०२२ रोजी वरिष्ठ वन अधिकारी व जिल्हाधिकारी  यांच्याकडे  केली, 22-4-2022 रोजी आठवणपर निवेदनही दिले. पण रीतसर चौकशी अजूनपर्यंत झालेली नाही. जुन-जुलै-2022 मध्...

देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेल काय ? 🔹 जिल्ह्यातील ओबीसींचा राज्यकर्त्यांना सवाल.

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 16/12/ 2022 :-  मागील २० वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्याबाबत सातत्याने लढा सुरू आहे विविध राजकीय पक्षांची सरकारे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सोडवू अशी आश्वासने देत सत्तेत आलेत आणि गेलेत परंतु जिल्ह्यातील ओबीसींचा आरक्षणाचा प्रश्न मात्र अजूनही कायमच आहे.गडचिरोली जिल्ह्यातील राजकीय आरक्षण शून्यच आहे आणि नोकरीतील आरक्षण सुद्धा शून्याच्या बरोबरीतच आहे . देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात तरी आरक्षणाचा प्रश्न निकालात निघावा ही आशा बाळगून राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. देवेंद्र फडणवीस , वणे व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार, इतर मागास वर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. हंसराज अहिर, राज्याचे मुख्य सचिव,बहुजन कल्याण विभागा चे प्रधान सचिव तसेच खासदार अशोक नेते, जिल्ह्यातील आमदार यांना निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात गडचिरोली जिल्ह्यात सर्व पदाकरीता नोकर भरती मध्य...

सावधान! माइल्‍ड हार्ट अटॅक? 🔹ताबडतोब डॉक्टरांकडे जा नाहीतर जीव येऊ शकतो धोक्यात!

इमेज
🔹हवामान थंड होताच हृदयविकाराचा धोका खूप वाढतो.  🔹हृदयरोग तज्ञ डॉ. अनिल रुडे यांचा जनहितार्थ सल्ला.  नागपूर / प्रतिनिधी दि. 11/12/2022:- हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टीं व्यतिरिक्त त्याची काही लक्षणेही जाणून घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे वेळीच स्वत:सोबत इतरांचा जीव वाचविण्यासाठी मदत होते.    माइल्‍ड हार्ट अटॅकची लक्षणं, ताबडतोब डॉक्टरांकडे जा नाहीतर जीव धोक्यात येऊ शकतो .  हृदयविकाराच्या झटक्याने दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत टीव्ही आणि सिनेमाच्या माध्यमातून हृदयविकाराची लक्षणे माहीत होतात.यामध्ये छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणं आणि घाम येणं यांचा समावेश होतो. पण याशिवाय हृदयविकाराची अशीही काही लक्षणे आहेत ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. ही लक्षणे गांभीर्याने न घेतल्यास जीव देखील जाऊ शकतो. म्हणूनच मायनर हार्ट अटॅकच्या काही न ऐकलेल्या लक्षणांबद्दल माहिती देणे महत्त्वाचे वाटते. त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यास स्वत:चाच नाही तर घरातील इतर अनेक व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी मदत होते.  हृदयविकाराचा झटका ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाला ...

गावोगावी ओबीसींनी संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा - ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचे आवाहन

इमेज
  नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 28/11/2022:- ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी भारतीय संविधानात ३४० वे पहिले कलम ओबीसींसाठी नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संविधानानेच ओबीसींना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आजतागायत ओबीसींना त्यांचे हक्क व अधिकार कोणत्याच राज्यकर्त्यांनी मिळू दिले नाही व त्यासाठीच मागील कित्येक दशकापासून ओबीसींचा लढा सुरू आहे. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या जिवन कार्यातून समतेचा व न्यायाचा संदेश दिला. त्यांचा स्मृती दिन समाजातील विविध घटकांनी त्यांच्या हक्काची जाणीव जागृती होण्यासाठी साजरा करावा, यासाठी दोन्ही दिवस ओबीसी समाज बांधवांनी प्रेरीत होवून साजरे करावे. ओबीसी समाजबांधवांनी गावोगावी घरोघरी दिंड्या, रॅली, प्रभात फेरी, व्याख्यान, प्रबोधन, सभा, मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा, असे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे एस.सी. एस.टी. व्ही.जे.एन.टी. व ओबीसी समूदायासाठी त्यांचे हक्क व अधिकार...