पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शून्यातून विश्व निर्माण करा:चांगली कमाई ● उत्तम जीवनशैली ● mi lifestyle marketing

इमेज
शून्यातून विश्व निर्माण करा:चांगली कमाई ● उत्तम जीवनशैली ● mi lifestyle marketing दरारा 24 तास Mi Lifestyle Marketing अशा व्यक्तींसाठी एक फायद्याची मोफत व्यवसाय संधी देते ज्यांना त्यांच्या कुटुंबाला थेट विक्रीद्वारे उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध करून द्यायचा आहे.  नोंदणीकृत वितरक बनून, तुम्ही जीवनशैली उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीमध्ये प्रवेश मिळवू शकता जे तुम्ही ग्राहकांना त्यांच्या गरजा आणि आवश्यकतांवर आधारित देऊ शकता.  Mi Lifestyle वितरक म्हणून, तुमच्याकडे थेट विक्रीद्वारे कंपनीच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांचा प्रचार आणि विक्री करून अमर्याद उत्पन्न मिळवण्याची क्षमता आहे.  Mi Lifestyle चे डायरेक्ट सेलिंग मॉडेल नोंदणीकृत वितरकांना त्यांच्या जीवनशैली आणि वेळापत्रकानुसार उत्पन्न मिळवण्याचा एक लवचिक मार्ग ऑफर करते.   Mi Lifestyle विविध प्रकारच्या उत्पादनांची ऑफर देते, ज्यात पोषण, कृषी काळजी, होमकेअर आणि वैयक्तिक काळजी उत्पादने यांचा समावेश आहे जे नैसर्गिक घटक आणि प्रगत तंत्रज्ञान वापरून बनवले जातात.  हे तुम्हाला ग्राहकांच्या विस्तृत श्रेणीसाठी आणि थेट विक्रीद्वारे त्यांच्या जीवनशै...

*नागभीड येथे वाल्मिकी जयंती भव्य शोभयात्रा.*

इमेज
*नागभीड येथे वाल्मिकी जयंती भव्य शोभयात्रा.* अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी *नागभीड*: नागभीड येथे वाल्मिकी जयंती निमित्ताने ढीवर समाज मित्र मंडळ, महर्षी वाल्मिकी ऋषी जयंती महोत्सव समिती,नागभीड, व ढीवर समाज नागभीड, नवखळा, कोथुळना, बोथली यांच्या संयुक्त विद्यमाने शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले.. सर्वप्रथम रामायण रचीयता महर्षी वाल्मिकी यांच्या फोटो ला गुलाबराव भानारकर, गिरीश नगरे सर,दिलीप भानारकर, नीलकंठ चांदेकर सर, विजय नान्हे यांच्या हस्ते फुलहार अर्पण करून दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.  यांनतर शोभायात्रेत महर्षी वाल्मिकी, धनुर्धर एकलव्य, लवकुश यांच्या झाकी तयार करण्यात आल्या नवखळा व नागभीड येथील मुख्य मार्गांवरून यात्रा काढण्यात आली.. सदर शोभा यात्रेत लेझीम पथक, या सह बहुसंख्या समाज समाज बांधव सहभागी झाले होते.. या शोभा यात्रेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश भाऊ वारजूरकर यांनी भेट दिली व ढिवर समाजाच्या या आनंद उत्सवात ते सहभागी झाले.. सदर यात्रेला मार्गदर्शक म्हणून होमदेवजी मेश्राम सर,नागोरावजी नान्हे सर,मधुकरजी डहारे, विलासजी दिघोरे,गजानन मारभते,नागोजी भ...

*ठाणेदारांच्या विरोधातील अजित सुकारे यांच्या उपोषणाचा पोलीस पाटील संघटनेने केला निषेध* जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन;तळोधीवासीय जनता तथा तं मु सं समितीने उपोषणाचा डाव हाणून पाडला

ठाणेदारांच्या विरोधातील अजित सुकारे यांच्या उपोषणाचा पोलीस पाटील संघटनेने केला निषेध* जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन;तळोधीवासीय जनता तथा तं मु सं समितीने उपोषणाचा डाव हाणून पाडला अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी            नागभिड----नागभिड तालुक्यातील तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या 42 गावांत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून ठाणेदारांचा यामागे आशिर्वाद असल्याचा आरोप लावत चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथील अजित दुर्गादास सुकारे ,सामाजिक कार्यकर्ता यांनी उप मुख्यमत्र्यांपासुन तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ठाणेदारांची तक्रार करून शनिवार दिनांक 28/10/2023 रोजी तळोधी पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणाला बसण्याचा प्रयत्न केला. मात्र तळोधी(बा.)वासिय जनता व तं.मु.स.समिती यांनी तातडीने पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देऊन उपोषणाचा बेत हाणून पाडला. तसेच तळोधी (बा.)परिसरातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेने सुकारे यांच्या उपोषणाचा विरोध व निषेध करीत त्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातुन केली आहे.   ...

आपतग्रस्त शेतकऱ्याला काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार यांचे कडून सांत्वन व आर्थिक मदत

इमेज
आपतग्रस्त शेतकऱ्याला काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार यांचे कडून सांत्वन व आर्थिक मदत  जुनगाव: (अजित गेडाम) प्रतिनिधी पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुद्रुक येथील शेतकऱ्याची आग लागल्याने त्यांचे घर जळून मोठी नुकसान झाली. दिनांक 21/10/2023 रोज शनिवारला मौजा देवाडा बुज येथील अत्यंत गरीब कुटूंबातील शेतकरी श्री. ठुमदेव जैराम घोटेकार यांचे घर पूर्णपणे जळुन खाक झाले होते. ही बाब काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ मर्पलीवार यांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत नगदी स्वरूपात दिली. मान. रविभाऊ मरपल्लीवार अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभूर्णा यांना गावातील कांग्रेस पदाधिकारी मार्फत कळविण्यात आले असता ते काही कामानिमीत्य बाहेर ठिकाणी गेले असल्याने आज दिनांक 29/10/2023 रोज रविवारला सकाळी संबंधित कुटूबांला आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. व पुन्हा काही भरीव मदतीचं आश्वासन दिले..  याप्रसंगी गावातील कांग्रेस पदाधिकारी मान. दादाजी पा. व्याहाडकर घोसरी , मान. अतुल चुदरी तं.मु.स.अध्यक्ष , सौ. भा...

आपतग्रस्त शेतकऱ्याला काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार यांचे कडून सांत्वन व आर्थिक मदत

इमेज
आपतग्रस्त शेतकऱ्याला काँग्रेस तालुकाध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार यांचे कडून सांत्वन व आर्थिक मदत  जुनगाव: (अजित गेडाम) प्रतिनिधी पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुद्रुक येथील शेतकऱ्याची आग लागल्याने त्यांचे घर जळून मोठी नुकसान झाली. दिनांक 21/10/2023 रोज शनिवारला मौजा देवाडा बुज येथील अत्यंत गरीब कुटूंबातील शेतकरी श्री. ठुमदेव जैराम घोटेकार यांचे घर पूर्णपणे जळुन खाक झाले होते. ही बाब काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ मर्पलीवार यांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदत नगदी स्वरूपात दिली. मान. रविभाऊ मरपल्लीवार अध्यक्ष तालुका कांग्रेस कमेटी तथा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभूर्णा यांना गावातील कांग्रेस पदाधिकारी मार्फत कळविण्यात आले असता ते काही कामानिमीत्य बाहेर ठिकाणी गेले असल्याने आज दिनांक 29/10/2023 रोज रविवारला सकाळी संबंधित कुटूबांला आर्थिक मदत देऊन त्यांचे सांत्वन केले. व पुन्हा काही भरीव मदतीचं आश्वासन दिले..  याप्रसंगी गावातील कांग्रेस पदाधिकारी मान. दादाजी पा. व्याहाडकर घोसरी , मान. अतुल चुदरी तं.मु.स.अध्यक्ष , सौ. भारती श्याम...

अल्लापल्लीत युवकाचा खून! अल्लापल्ली शहरात खळबळ

इमेज
आलापल्ली प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका च्या लगत असलेल्या अल्लापल्ली शहरात रात्री ( रविवार सकाळी उघडकीस आली)एका युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे. राकेश कन्नाके वय 32 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो आलापल्ली येथीलच रहिवाशी होता. जुनगाव येथील संजय गेडाम, माजी सरपंच जीवनदास गेडाम, संतोष गेडाम, डॉक्टर विलास गेडाम, यांचे ते जावई होते. त्यामुळे जूनगावातही नातेवाईकांमध्ये शोक कळा पसरल्याचे दिसून आले. पुढील तपास सुरू असून वेळोवेळी अपडेट देण्यात येईल.

महिलांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देईन : आ. प्रतिभाताई धानोरकर

इमेज
महिलांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देईन : आ. प्रतिभाताई धानोरकर जिल्हा प्रतिनिधी धर्मपाल कांबळे. चंद्रपूर घुग्घूस महोत्सव गरबा व दांडिया कार्यक्रम घुग्घूस : संजीवनी बहुउद्देशिय संस्था तथा राजुरेड्डी मित्र परिवाराच्या वतीने दिनांक 27 ऑक्टोबर रोजी तुकडोजी नगर गाडगेबाबा मंदिर परिसरात भव्य गरबा व दांडीया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार प्रतिभाताई धानोरकर तर उदघाटक महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर या होत्या काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने आमदार धानोरकर, जिल्हाध्यक्ष ठेमस्कर यांचे मानचिन्ह व पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय संभाषणात धानोरकर यांनी महिलांना सक्रियपणे राजकारणात येण्याचे आवाहन केले तसेच महिलांवरील होणारे अत्याचार शोषणाची माहिती देण्याची विनंती केली. व महिलांच्या न्याय हक्कासाठी शेवटच्या श्वासा पर्यंत लढा देऊ अशी ग्वाही दिली. माऊली माता मंदिर ग्रुप साईनगर, उत्सवी ग्रुप बहिरम बाबा नगर,ए.एस.के ग्रुप सुभाष नगर, योगा ग्रुप गांधीनगर,तुकडोजी नगर महिला...

🔹कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत. 🔹 महाराष्ट्र शासन निर्णय घेण्यात अपयशी

इमेज
🔹 कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळीत.  🔹 महाराष्ट्र शासन निर्णय घेण्यात अपयशी.  गडचिरोली / चक्रधर मेश्राम दिनांक.28/10/2023-  राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी शासनाकडून प्रतिसाद नसल्याने शेवटी स्थायी करण्याच्या न्यायीक मागणीसाठी २५ ऑक्टोंबर पासून गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला. काही भागातील कंत्राटी डॉक्टरांपासून चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने सार्वजनिक आरोग्य विभागातील रुग्णालयांतील रुग्णांचा जीव टांगणीला आला आहे. आंदोलकांच्या माहितीनुसार, ओडिशा, पंजाब, राजस्थान, मणिपूरसह इतर काही राज्यांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांना तेथील शासनाने स्थायी केले आहे. महाराष्ट्रातही या अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचे वारंवार आश्वासन दिले गेले. परंतु, काहीही केले जात नाही. त्यामुळे १६ ऑक्टोंबरला नागपुरातील संविधान चौकात आंदोलन केले होते. त्यात मोठ्या संख्येने कंत्राटी अधिकारी- कर्मचारी सहभागी झाल्य...

दोन भीषण अपघातात 10 जनांचा मृत्यू

इमेज

जुनगाव येथे रावण दहन! आदिवासी समाजाचा विरोध?

इमेज
अजित गेडाम, प्रतिनिधी जुनगाव चंद्रपूर जिल्ह्यातील जुनगाव येथे दसऱ्यानिमित्त आदिवासींचे दैवत असणाऱ्या रावणाचे दहन केल्यामुळे आदिवासी समाजात संताप पसरला आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत ही प्रथा गावात नव्हती. सोने लुटण्याचे कार्य दरवर्षी होतेे. मात्र रावणाचा पुतळा करून जाळणे हा प्रथमच प्रकार बघायला मिळाला. त्यामुळे आदिवासी समाजातील युवकांनी या घटनेचा विरोध करून निषेध नोंदविला. शेवटी पुतळा करून जाळणाऱ्यांनी आपली चूक कबूल केली. आणि आदिवासी समाजाची माफी मागितली त्यामुळे या प्रकरणावर सध्या तरी पडदा पडला असला तरी सुद्धा अशा घटना घडू नये घडू नये यासाठी शासनाने व पोलीस प्रशासनाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून भविष्यात समाजात तेढ निर्माण करणाऱ्या घटना घडणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असली तरी प्रत्येक गावात पोलिसांचा प्रतिनिधी म्हणून पोलीस पाटील हा प्रत्येक गावात कार्यरत असतो.

जुनगाव येथे आज डान्स कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
सार्वजनिक शारदा मंडळ जुनगाव च्या वतीने सोमवार रोजी नागपूर येथील नृत्य कलाकारांचा नृत्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाा उपाध्यक्ष आणि जूनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीमान राहुल भाऊ पाल हे करणार असून अध्यक्षस्थानी माजी सरपंच व पत्रकार जीवनदास गेडाम,पुनम ताई उधरी या राहणार आहेत.तर प्रमुख पाहुणे ग्रामपंचायत सदस्य तेजपाल रंगारी, माधुरी झबाडे, सोनी चुधरी, माजी सरपंच जीवनदास गेडाम, पोलीस पाटील कान्होजी भाकरे, विश्वेश्वर जी भाकरे, गजानन येल्पुलवार, हरिचंद्र पाल, इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री दहा वाजता हा कार्यक्रम सादर होणार असून या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

*वीर बाबुराव शेडमाके शहीद दिनानिमित्त बेंबाळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केले प्रतिमेचे पूजन*

*वीर बाबुराव शेडमाके शहीद दिनानिमित्त बेंबाळ ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केले प्रतिमेचे पूजन* *बेंबाळ:-* १८५७ च्या उठावातील थोर क्रांतिकारक वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या पुण्यतिथी निमित्त बेंबाळ ग्रामपंचायत कार्यालयात वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके यांच्या प्रतिमेला सरपंच चांगदेवजी केमेकार यांच्या हस्ते माल्यार्पन करून पूजन करण्यात आले.     वीर बाबुराव पुलेश्वर शेडमाके चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील थोर क्रांतिकारक होऊन गेले. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी सामना करून इंग्रजांना सळो की पडो करून लावले होते. आपल्या चातुर्य बुद्धीने व पराक्रमाने या परिसरात त्याकाळी इंग्रजाप्रति दबदबा तयार केला होता. अशा या महान क्रांतिकारकाला चंद्रपूरला कारागृहात आजच्या दिवशी फाशी देण्यात आली होती. या महान क्रांतिकारकांच्या पुण्यतिथी निमित्त सरपंच चांगदेवजी केमेकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदर कार्यक्रमाला बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार, उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार, सदस्य अरुणाताई गेडाम, गावातील प्रतिष्ठित नागरिक किशोर नंदिग्रामवार , प्रकाश पंधरे, उमाकांत मडावी, नरे...

संतप्त आदिवासींचा वनविभागावर हल्लाबोल! वन विभागाचे कार्यालय फोडले- परिसरात छावणीचे स्वरूप: जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळावर तैनात- आंदोलनाचा आज चौथा दिवस- आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आदिवासींचा रात्रभर ठिय्या, वन प्रशासन हादरले !

इमेज
संतप्त आदिवासींचा वनविभागावर हल्लाबोल! वन विभागाचे कार्यालय फोडले- परिसरात छावणीचे स्वरूप: जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळावर तैनात- आंदोलनाचा आज चौथा दिवस- आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आदिवासींचा रात्रभर ठिय्या, वन प्रशासन हादरले ! जिवनदास गेडाम: आदिवासी संस्कृतीची अवहेलना प्रकरणी आदिवासींनी पुकारलेल्या आंदोलनाने आता उग्ररूप धारण केले आहे. चार दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलनाने आज टोकाची भूमिका घेत वनविभागाच्या कार्यालयावरच हल्लाबोल केला. तत्कालीन वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, मोठा गाजावाजा करत कोट्यवधी रुपये खर्चून पोंभुर्णा येथे इको पार्कची निर्मिती करण्यात आली, परंतु काहीच दिवसांत या पार्कची अवस्था भंगार झाली. इको पार्कमध्ये असलेल्या आदिवासी संस्कृती दर्शवणाऱ्या विविध वास्तू उभारण्यात आल्या होत्या, पण वन विभागाने या वास्तूंची तोेडफोड केली. सोबतच या ठिकाणी असलेला आदिवासींचा झेंडा काढून फेकला. यामुळे आदिवासी बांधवांत तीव्र संताप पसरला आहे. वनविभागाच्या विरोधात आदिवासींनी शेकडोंच्या संख्येत वन विभागाच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. याच ठिकाणी त्यांनी र...

पाच जणांच्या हत्येने गडचिरोली सहित महाराष्ट्रात खळबळ

इमेज
पाच जणांच्या हत्येने गडचिरोली सहित महाराष्ट्रात खळबळ गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव येथे एकाच कुटुंबातील पाच जणांची जेवणात विष कालवून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील महागाव येथे घडली आहे. विशेष म्हणजे हत्याकांड घडवलं आणले असल्याने अनेक तर्कवितर्क लावल्या जात आहेत.अवघ्या 20 दिवसांत एकामागून एक मृत्यू होऊ लागल्याने संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या प्रकरणात तपास करत हत्याकांड घडवून आणणाऱ्या सुनेसह तिच्यासोबत असलेल्या आणखी एका महिलेस अटक केली आहे. दोघींनीही हत्या घडवून आणल्याची कबुली दिली आहे. या घटनेमुळे महागाव येथील लोकांना जादूटोण्याची भीती वाटू लागली, एकाच कुटुंबातील पाच जणांचा एकामागून एक मृत्यू झाला, हा मृत्यू संशयास्पद होता. त्यामुळे पोलिसांचा ताण वाढला, पोलिसांनी तपास सुरू केला, त्यानंतर तपासात धक्कादायक बाब समोर आली. व सर्वांच्या पायाखालची जमीन सरकली. घरात सातत्याने होत असलेला जमिनीवरून वाद तसेच सासरकडील लोकांकडून मिळत असलेल्या टोमण्यांमुळे सुनेने अन्य एका महिलेच्या मदतीने घरातील सर्वांना विष देऊन संपवल्याची बाब समोर आ...

आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आदिवासींचा रात्रभर ठिय्या, वन प्रशासन हादरले !

इमेज
आदिवासी संस्कृती जपण्यासाठी आदिवासींचा रात्रभर ठिय्या, वन प्रशासन हादरले ! दरारा 24 तास : तत्कालीन वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून, मोठा गाजावाजा करत कोट्यवधी रुपये खर्चून पोंभुर्णा येथे इको पार्कची निर्मिती करण्यात आली, परंतु काहीच दिवसांत या पार्कची अवस्था भंगार झाली. इको पार्कमध्ये असलेल्या आदिवासी संस्कृती दर्शवणाऱ्या विविध वास्तू उभारण्यात आल्या होत्या, पण वन विभागाने या वास्तूंची तोेडफोड केली. सोबतच या ठिकाणी असलेला आदिवासींचा झेंडा काढून फेकला. यामुळे आदिवासी बांधवांत तीव्र संताप पसरला आहे. वनविभागाच्या विरोधात आदिवासींनी शेकडोंच्या संख्येत वन विभागाच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केले. याच ठिकाणी त्यांनी रात्रही काढली. अजूनही हे आंदोलन सुरूच आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोंभुर्ण्यात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात आला आहे. जनतेचे कोट्यवधी रुपये पाण्यात... चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मुल, बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात पोंभुर्णा तालुका येतो. मुनगंटीवारांनी आपल्या क्षेत्राचा कायापालट करीत पोंभुर्ण्यात मोठमोठ्या इमारती बांधल्या. प...

*युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी भोजराज नवघडे यांची निवड*.

इमेज
*युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी भोजराज नवघडे यांची निवड*. अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी                                             नागभीड ---येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी भोजराज नवघडे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी निवड करण्यात आली. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश रामराव कचकलवार यांनी भोजराज नवघडे यांना पत्र देऊन ही निवड केली आहे. नवघडे यांच्या निवडीबद्दल नागभीड तालुक्यातील पत्रकार सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.              युवा ग्रामीण पत्रकार संघ हा सर्वाधिक सभासद असलेला पत्रकार संघ आहे पत्रकाराला न्याय व हक्कासाठी ,सामाजिक प्रगती करिता सदैव कटिबंध असलेला संघ म्हणून विभाग ग्रामीण पत्रकार संघाने आपली ओळख निर्माण केलेली आहे,

एसटी बसलाही रविवारी सुट्टी असते का हो?प्रवाशांचा संतप्त सवाल

इमेज
एसटी बसलाही रविवारी सुट्टी असते का हो?प्रवाशांचा संतप्त सवाल जुनगाव:(अजित गेडाम) एसटीला राज्याची जीवन वाहिनी समजले जाते आणि मानलेही जाते. सर्वसामान्यांच्या हक्काचे प्रवासाचे वाहन म्हणजे एसटी आहे. ग्रामीण भागात एसटी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी मानव विकास योजनेअंतर्गत बसेस सुरू आहेत. परंतु रविवारी पूर्णपणे बस सेवा बंद राहिल्याने संतप्त झालेल्या प्रवाशांनी इतर सुट्ट्यांप्रमाणे एसटी बसला आहे सुट्टी असते का? असा संतप्त सवाल प्रवाशांनी केला आहे. सविस्तर वृत्त असे की, पोंभुर्णा ते जुनगाव अशी बस सेवा सुरू असून दिवसभरातून तीन बस सुरू आहेत. मात्र काल दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी रविवार असल्याने तीन पैकी एकही एसटीची बस आली नसल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एसटी महामंडळावर संताप व्यक्त करत असा खडा सवाल केला आहे. त्याचे उत्तर एसटी महामंडळाने प्रवाशांना द्यावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर चुकीच्या वेळापत्रकात सुधारणा करून नियमित बस सेवा सुरू ठेवावी अशी मागणी ही प्रवाशांनी केली आहे.

आज साजरा होत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा

इमेज
आज साजरा होत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन दरारा ट्वेंटी फोर न्यूज चंद्रपूर: धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक बौद्ध धर्मीय सण आहे. बौद्ध धर्म यांद्वारे हा सण उत्सव म्हणून दरवर्षी अशोक विजयादशमीच्या दिवशी दीक्षाभूमी नागपूर येथे साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला लाखोच्या संख्येने उपस्थिती दर्ज करतात. या उत्सवाची पार्श्वभूमी म्हणजे हा एक धर्मांतरण सोहळा आहे. अशोक विजयादशमीला 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षाभूमी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्मात प्रवेश केला. तेव्हापासून हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. सम्राट अशोक राजाने केलेली ही एक मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतरण करण्याचे ठरविले आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर मध्ये आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. त्यामुळेच...