पोस्ट्स

मे, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वाढदिवस एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचा

इमेज
वाढदिवस एका आदर्श व्यक्तिमत्त्वाचा कोणतेही काम निःस्वार्थपणे करणारे, समाज परिवर्तक, समाजातील होतकरू मुलांना योग्य ठिकाणी शिक्षण मिळावे या साठी कायम मेहनत घेऊन त्यांना मदतीचा हात देणारे, कार्यसम्राट, उचशिक्षित, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उत्तम योगदान असणारे, उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले, तरुणांचे आदर्श... "जामतुकूम गावचे सरपंच मान. भालचंद्र बोधलकर यांना दरारा 24 तास न्यूज पोर्टल आणि वैनगंगा न्युज लाईव्ह युट्युब चॅनेल परिवाराकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्या कडुन अशीच समाजसेवा घडो ! आपल्याला उदंड आयुष्य लाभो आपल्याला वाढदिवसानिमित्त मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा " गणपती बाप्पा मोरया" तुम्हाला उदंड आयुष्य देवो, मनी हाच ध्यास आहे ! * एक आदर्श व्यक्तिमत्व ! * नाविण्याचा ध्यास असणारे ! *नि:स्वार्थी*! * युवकांचे मार्गदर्शक ! *अपार इच्छाशक्ती*! * असामान्य प्रतिभाशक्ति लाभलेले ! * सार्वजनिक क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणारे ! * अष्टपैलु नेतृत्व ! * समाज सेवेसाठी सदैव तत्पर असणारे ! * आपल्या कर्तुत्वाने सर्वांना आपलेसे करणारे! * सर्वांचे लाडके ! * आदरणीय श्री. भालचंद्...

आपला विकास आणि गांव भकास!

इमेज
आपला विकास आणि गांव भकास! शिवराम पाटील ९२७०९६३१२२ महाराष्ट्र जागृत जनमंच जळगाव   बीज,खते,औषधी आणि माल विक्री यात शेतकरीची दैना होत आहे.शेतकऱ्यांची मुले सरकारी नोकरीत लागलीत कि,ते बापालाही सोडत नाहीत.तर इतरांची कशी कदर करणार?    याला कारण आहे.मी अनेकदा विस्तृत लिहीले आहे कि, शेतकरी वर्गात, ग्रामीण भागात बुद्धी, ज्ञान,निती ची अलर्जी आहे.कोणी माणूस डॉक्टर वकील इंजिनिअर प्रोफेसर बनला तर त्याचा सत्कार होत नाही.पण पोलिस , फौजदार, तहसीलदार,बीडीओ बनला तर सत्कार करतात.का?याला आता शेतकऱ्यांना लुटण्याचा सरकारी परवाना मिळाला आहे.डॉक्टर, वकिल इंजिनिअर प्रोफेसर ला तसा परवाना मिळत नाही.त्याला बुद्धी ज्ञान वापरून व्यवसाय करावा लागतो.    शिवाय गावात जो माणूस लुटमार करतो,दारू मटण खाऊ घालतो लोक त्याला नेता म्हणतात.सरपंच निवडून देतात.म्हणे जो लुटतो तोच खाऊ पिऊ घालतो.जो लुटत नाही,दारू दरफडा करीत नाही तो काय कामाचा?असा खुलासा देतात.     घर, जमीन,खळे साठी भाऊ भाऊ, शेजारी शेजारी वाद घालून पोलिस स्टेशनमध्ये येतात.एकमेकांच्या शेतीवर अतिक्रमण करतात.या वेळेस गीता,भागवत, रामायण,...

पाणीटंचाईग्रस्त चेकठाणामध्‍ये वाहतोय माणुसकीचा झरा! ▪️शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे टँकरद्वारे करीत आहे पाणी पुरवठा

इमेज
पाणीटंचाईग्रस्त चेकठाणामध्‍ये वाहतोय माणुसकीचा झरा! ▪️शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे  टँकरद्वारे करीत आहे पाणी पुरवठा जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी  चंद्रपूर:-पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणा येथील भूगर्भातील पाण्याची पातळी आटल्याने विहीर,हातपंप व नळाद्वारे होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला. त्यामुळे गावातील  लहानग्यांपासून ते वयोवृद्धांना पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे.  या गावाला भीषण टंचाईला समोर जावे लागत आहे.याबाबत गावातील शिवसेना कार्यकर्ते यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांना माहिती देताच या तहानलेल्या चेकठाणावासीयांसाठी पाणीपुरवठा करण्याचा शब्द देत तत्काळ स्वखर्चाने टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. चेकठाणा गावापासून चार - पाच किमी अंतरावर वैनगंगा नंदी आहे,त्या नदिवरून नळाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. परंतु नदी कोरडी पडली आहे. या नदी वर अवलंबून असलेली पाणी पुरवठा योजना बंद पडली व गावात असणारे विहिरी, हातपंप ला पाणी येत नाही. त्यामुळे  गावांमध्ये भिषण पाणी टंचाई आहे. असे असताना सुद्धा ग्रामपंचायतने कुठली उपयोजना केली नाही.गावात ग...

कुर्‍हाडीने वार करून पत्नीचे मुंडके केले धडावेगळे: गडचिरोली जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना

इमेज
कुर्‍हाडीने वार करून पत्नीचे मुंडके केले धडावेगळे: गडचिरोली जिल्ह्यातील थरकाप उडवणारी घटना कोरची:-मुख्यालयापासून 10 किमि अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे रात्री 3 वाजताच्या दरम्यान पत्नी आणि 5 वर्षाची मुलगी झोपेत असताना पती रोहिदास बंजार याने आपल्या पत्नीच्या गळ्यावर कुर्‍हाडीने 3 वेळा वार करून धडावेगळे केले.ही सर्व घटना 5 वर्षाची मुलगी बघत असताना तिला सुद्धा धमकावल्याची माहिती असून आरोपी रोहिदास राऊत याला पोलिसांनी अटक केली आहे. अमरोतीन बंजार (33) असे मृतक महिलेचे नाव आहे. अमरोतीन बंजार आणि रोहिदास बंजार यांचे 2009 ला लग्न झाले व त्यांना 4 मुली आहेत. नवव्या वर्गात असलेली सर्वात मोठी मुलगी ही घटनेवेळी छत्तीसगडला आपल्या मामाच्या गावी गेली होती. दोन मधल्या मुलीही आपल्या आजीकडे झोपून होत्या तर लहान मुलगी आरोपी रोहिदास व आपल्या आईसोबत झोपून होती. आरोपी रोहिदास हा आपल्या पत्नीला मारझोड करतो म्हणून 4 वर्षापूर्वी बेतकाठी येथे बैठक घेऊन त्याची समझूत काढण्यात आली होती. मात्र कुठला तरी राग मनात धरून त्या नराधमाने आपल्या पत्नीला लहानशा चिमुकलीसमोर क्रूरपणे संपवून टाकल्यामुळे या 4 मुलींचे आईचे छत्र ...

प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले चिंतलधाबा येथील घटना ; मृत्यूचे कारण अस्पष्टआ

इमेज
  प्रेमीयुगुलांचे मृतदेह आढळले चिंतलधाबा येथील घटना ; मृत्यूचे कारण अस्पष्टआ आत्महत्या की हत्या लोकांमध्ये संभ्रम कायम! पोंभूर्णा ऐवजी चंद्रपूरात करण्यात आले फाॅरेन्सीक शवविच्छेदन जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी चंद्रपूर:-दिड वर्षांपासून प्रेमाच्या आणाभाका घेतलेले दोन्ही विवाहीत प्रेमीयुगुलांचे अखेर शेतशिवारात संशयितरित्या मृतदेह सापडले.सदर घटना दि.२७ मे सोमवारला सात वाजताच्या सुमारास निदर्शनास आली.रुपेश मधुकर मिलमिले वय (३२), रा.चिंतलधाबा, व शशिकला खुशाब कुसराम वय (२७) रा.भटारी असे आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे. भटारी येथील शशिकला कुसराम हि आपल्या नवऱ्यापासून विभक्त राहत होती.तर रुपेश ने दिड वर्षांपुर्वी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला होता.रुपेश भाजीपाला विक्रीसाठी भटारी येथे जात होता.यादरम्यान त्यांचे सुत जुळले.दोघांचेही एकमेकावर प्रेम होते.घटनेच्या दिवशी दुपारी शशिकला व रुपेश हे दोघेही गणेश मिलमिले यांच्या शेतशिवाराकडे गेले.व दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली.रुपेशचा शव हा विहिरीत तर शशीकला हि विहीरीच्या बाजूला मृतावस्थेत आढळले.सदर घटनेची माहिती पोंभूर्णा पोलिसांना मिळताच पोलिस...

कृषी केंद्रातून जादा दराने कापूस बियाणे विक्री करताना रंगेहात पकडले

इमेज
जळगाव - खरीप हंगामाची सुरुवात झालेली  असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी करण्यात येत आहे. यामध्ये राशी कापसाचे 659 या वाणाची मागणी होत आहे. मागणी जास्त असल्याचा फायदा घेत या बियाण्याचे पाकीट बाजारात बाराशे रुपयांच्या जादा दराने विकले जात आहे. आज (दि. 24) रोजी म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाने डमी ग्राहक पाठवून विक्रेत्याला ज्यादा दराने बियाण्याची विक्री करताना रंगेहाथ पकडत कारवाई केली आहे. आज दि. 24 रोजी जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर तत्काळ सापळा रचण्याचे ठरवले. पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट 1200 रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा, विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाई कामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. या कारवाई दरम्यान जिल्हा भरारी पथकातील कृषी विकास अधिकारी सुरज जगताप, मोहीम अधिकारी विजय पवार, जिल्हा गुण नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, धीरज बडे, कृषी अधिकारी व कृषी सहाय्यक सदर सापळा पथकात सहभागी होते.

*⭕दारू विक्री संदर्भात अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करा* *⭕जिल्हाधिकाऱ्यांचे दारू दुकानदार व बारमालकांना सक्त निर्देश

इमेज
*⭕दारू विक्री संदर्भात अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करा* *⭕जिल्हाधिकाऱ्यांचे दारू दुकानदार व बारमालकांना सक्त निर्देश* *✍️जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी* चंद्रपूर, दि. 27 : पुणे येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री व परवानाबाबत जिल्हा प्रशासन एक्शन मोडवर आले असून दारू विक्री संदर्भात सर्व अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे. अन्यथा सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दुकानदार व बारमालकांना दिला आहे. एफ एल - ३ अनुद्यप्तीधारकांनी कुठल्याही संबंधित किरकोळ मद्य विक्री अबकारी अनुद्यप्तीतून २१ वर्षाखालील व्यक्तीस मद्य विक्री करू नये. तसेच २१ ते २५ वर्ष वयोगटात असलेल्या व्यक्तीस सौम्य बियर / सौम्य मद्य विक्री करावी. २५ वर्षापेक्षा कमी वयोगटात असलेल्या व्यक्तीस तीव्र मद्य देऊ नये. अनुद्यप्तीच्या वेळेचे काटेकोरपणे पालन करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील अनुद्यप्ती सकाळी ११.३० ते रात्री ११.३० या वेळेतच सुरू राहील, याची दक्षता घ्यावी. मद्य सेवन करणाऱ्या व्यक्ती जवळ मद्य सेवनाचा परवाना असणे आवश्यक आहे. अनुद्यप्तीच्या जागेत कोणत्याही असमा...

आत्ताची ब्रेकिंग न्यूज बोंडेळा बुज. येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

इमेज
आत्ताची ब्रेकिंग न्यूज बोंडेळा बुज. येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या अजित गेडाम, प्रतिनिधी जुनगाव: मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेंबाळ पोलीस दूर क्षेत्राच्या अंतर्गत येत असलेल्या बोंडेळा बुद्रुक येथील युवकाने आज दिनांक 27 मे 2024 रोज सोमवारला दुपारी एक वाजताच्या सुमारास शेतातील झाडाला गळफास लावून आपली जीवन यात्रा संपविली. आकाश श्रीकृष्ण झंजाळ वय 23 वर्ष असे गळफास घेतलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने आत्महत्या का केली याचे गुढ कायम असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सावरगाव - गिरगांव बायपास मार्गावरील डांबर उडाले जागोजागी रस्त्यावर खड्डे आणि गिट्टी उखळून; डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी

इमेज
सावरगाव - गिरगांव बायपास मार्गावरील डांबर उडाले जागोजागी रस्त्यावर खड्डे आणि गिट्टी उखळून; डांबरीकरण करण्याची नागरिकांची मागणी अरुण रामुजी भोले नागभिड तालूका प्रतिनिधी                  नागभिड--- नागभीड तालुक्यातील सावरगाव - नवरगाव मार्गावरील अगदी जवळचा असलेल्या सावरगाव- गिरगाव हया बायपास डांबरी रस्त्यावरील डांबर पूर्णतः नाहीसा झाला असून जागोजागी खड्डे पडलेले आहे.आणि रस्त्यावरील गिट्टी पूर्णत-- उखळून पडली आहे. या रस्त्याने वाहन चालविताना खूपच सावधगिरी बाळगावी लागते. ही एक तारेवरची कसरतच असून या रस्त्याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने कित्येक दिवसांपासून या रस्त्याची समस्या आहे त्याच अवस्थेत आहे.         सावरगाव वरून नवरगावला जाण्यासाठी व्हाया चिखलगाव मार्गे असे घुमून जावे लागते. मात्र मात्र सावरगाव येथून एच.पी.पेट्रोलियम पुढील पूर्वेकडील सावरगाव व्हाया गिरगांव ते नवरगाव हा मार्ग अत्यन्त जवळचा मार्ग आहे. मात्र हा मार्ग कित्येक दिवसांपासून पूर्णतः उखळलेला आहे.आणि जागोजागी खड्डे पडलेले आहे. किंबहुना या मार्गांवरील डांबर तर केव्हाचेच नष्ट झालेले आहे.उरली आहे या रस्त्यावर केवळ गिट्...

मजुर घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात* *अकरा मजूरासह ड्रायव्हर गंभीर जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक; सातारा तुकूम जंगलातील घटना*

इमेज
*मजुर घेऊन जाणाऱ्या पिकअपचा अपघात* *अकरा मजूरासह ड्रायव्हर गंभीर जखमी, सहा जणांची प्रकृती चिंताजनक; सातारा तुकूम जंगलातील घटना* पोंभूर्णा: पोंभूर्णा येथील तेंदुपान मजूर जुनोण्याच्या जंगलात तेंदुपत्ता तोडण्याचं काम आटोपून पिकअप गाडीतून पोंभूर्णा गावाकडे परत जात असताना सातारा तुकूम जंगलातील वळण रस्त्यावर विरूद्ध दिशेने येणाऱ्या टाटा योद्धा गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत तेंदुपान तोडणारे अकरा मजूर व ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. यात सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. सदर घटना दि. २५ मे शनिवारला सकाळी अकरा वाजताच्या तेंदुपान तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांना संपूर्ण वैद्यकीय खर्च व आर्थिक मदत तेंदुपान ठेकेदारांनी द्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. अपघातातील जखमींची नावे शांताबाई सोनुले (५५), पंचफुला गुरूनुले (४२), कविता मानकर (४८), लीना फुलझले (४८), प्रकाश मानकर (६२), समाधान मानकर (५२), गीता ऊराडे (४०) ह्याची प्रकृती चिंताजनक असून यातील शांताबाई सोनुले, पंचफुला गुरूनुले, यांना नागपूरला रेफर करण्यात आले आहे. गंभीर जखमीमध्ये बेबी ऊराडे (५०), वैशाली मानकर (४२) व योगेश गुडलावार (ड्रायव्हर) (३०), ...

लाचखोर महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात

इमेज
*लाचखोर महिला तलाठी एसीबीच्या जाळ्यात* जळगाव:- जिल्ह्यातून लाचखोरीची एक मोठी बातमी समोर आलीय. गौण खनिजाची रॉयल्टी भरण्यासाठी २५ हजार रुपयाची मागणी केल्याप्रकरणी शिवरेदिगर (ता. पारोळा) येथील तलाठी वर्षा रमेश काकुस्ते यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांनी ताब्यात घेतले आहे. पारोळा तालुक्यातील मौजे शिवरे दिगर येथील रहिवाशी तक्रारदाराचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. वीट उत्पादनासाठी त्यांना मातीची आवश्यकता असते. यामुळे मातीची वाहतूक करण्याकरता त्यांनी तलाठी वर्षा काकूस्ते यांची भेट घेऊन गौण खनिजाची रॉयल्टी भरण्याकरता तक्रारदार यांच्याकडून २५ हजार रुपये जमा करून घेतले. त्यानंतर तक्रारदाराने गौण खनिज परवानाची चौकशी करण्यासाठी तलाठी वर्षा काकुस्ते यांची १२ डिसेंबर २०२३ ला भेट घेतली. यावेळी त्यांनी तक्रारदाराकडे यापूर्वी दिलेल्या पैशाची पावती न देता त्या व्यतिरिक्त २५ हजाराची मागणी केली होती. दरम्यान सदर तक्रारीची १३ डिसेंबरला पडताळणी केली. पडताळणी दरम्यान तलाठी वर्षा काकुस्ते यांनी तलाठी कार्यालय शिवरे दिगर येथे त्याच दिवशी पुन्हा पारोळा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार यांच्याकडे २५ हजार रु...

पोंभुर्णा तालुक्यात चोर बीटीचा गोरख धंदा: लाखो रुपयांचे बियाणे जप्त

इमेज
पोंभुर्णा तालुक्यात चोर बीटीचा गोरख धंदा: लाखो रुपयांचे बियाणे जप्त जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी चंद्रपूर: जिल्ह्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी कारवाई करीत लाखोंचे चोर बीटी बियाणे पकडले आहे. पहिल्या कारवाईत 15 मे रोजी रात्रीच्या सुमारास मौजा नवेगाव तालुका पोम्भूर्णा येथे गुप्त माहितीच्या आधारे संशयास्पद पक्क्या घरात धाड मारीत त्याठिकाणी चोर बीटी कापूस बियाणे एकूण 80.30 किलोग्राम किंमत एकूण 2 लाख तीन हजार सहाशे चाळीस रुपयांचे जप्त करण्यात आले.  दुसऱ्या कारवाईत 16 मे रोजी रात्री मौजा भीमनी येथे गुप्त माहितीच्या आधारे नीलकंठ गिरसावळे यांच्या शेतातील घरात चोर बीटी कापूस बियाणे एकूण 39.88 क्विंटल एकूण किंमत 76.57 लाख रुपये जप्त करण्यात आले. ही कारवाई 17 मे पहाटे पर्यंत सुरूच होती. दोन्ही कारवाई मध्ये एकूण 79 लाख 60 हजार सहाशे चाळीस रुपयांचे चोर बीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, चंद्रशेखर कोल्हे, लकेश कटरे, श्रावण बोढे, महेंद्र डाखरे, विवेक उमरे,...

बोंडेळा खुर्द येथील गावातील रस्त्याची ऐसी तैशी♈ जल जीवन योजनेची कामे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मुळावर! सिमेंट रोड मधूनच फोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा-नंदाजी बांगरे यांची मागणी

इमेज
बोंडेळा खुर्द येथील गावातील रस्त्याची ऐसी तैशी जल जीवन योजनेची कामे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मुळावर! सिमेंट रोड मधूनच फोडणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा-नंदाजी बांगरे यांची मागणी जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी चंद्रपूर: ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन विभागातर्फे जिल्ह्यात युद्ध पातळीवर कामे सुरू आहेत. मात्र या योजनेचे काम करताना जिल्हा परिषदेने इतर सरकारी विभागाशी कोणताही समन्वय न ठेवल्याने ही योजना ग्रामीण भागातील रस्त्यांच्या मुळावर उठल्याचे चित्र दिसत आहे. मुल तालुक्यातील बोंडेळा खुर्द येथील सिमेंट रस्ता ग्रामपंचायतीची कसलीही परवानगी न घेता मधोमध सिमेंट रोड फोडून ठेवलेला आहे. त्यामुळे ही योजना सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरली आहे. ही योजना राबविताना सरकारी विभागात समन्वय नसल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीचे अर्थात अधिकारातील रस्ते आहेत. पाईपलाईन साठी बहुतांश गावातील रस्ते मधोमध खोदण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण रस्त्यांची अत्यंत दुरावस्था बनली आहे. ठेकेदार, जिल्हा परिषद...

शिळे मटन खाल्ल्याने 19 जणांना विषबाधा

इमेज
यवतमाळ : यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजि येथे 19 जणांना जेवणातून विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडलीय. शिळे मटण खाल्ल्याने 19 जणांना मटनाच्या जेवणातून ही विषबाधा (Poisoning) झाली आहे. यात लहान मुलांचाही समावेश असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

कळमगाव-बोरघाट पांदण रस्त्याची दुरवस्था

इमेज
कळमगाव-बोरघाट पांदण रस्त्याची दुरवस्था चामोर्शी : तालुक्यातील कळमगाव-बोरघाट पांदण रस्ता शेतकरयांना शेताकडे जाण्यासाठी सोयीचा असून सध्या याच रस्त्यावरून रेतीचे ट्रॅक्टर वाहतूक सुरू असून रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे .संबंधित विभागानी लक्ष द्यावे, अशी मागणी कळमगाव येथील शेतकरी मयूर लाड यांनी केली आहे. शेतकऱ्यांना शेतातील उत्पादित माल व शेतीकडे जाणे सोयीचे व्हावे म्हणून पांदण रस्त्याची सोय करण्यात आली. मात्र या रस्त्याचा वापर रेती भरलेले ट्रॅक्टर करीत असल्याने रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.  या मार्गावर कळमगाव येथील शेती आहे. पावसाळ्यात शेताकडे जाणारा प्रमुख रस्ता असल्याने रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून पावसाळ्यात शेतीकडे कसे जायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे संबंधित विभागानी लक्ष देऊन अवैध रेती वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी मयूर लाड यांनी केली आहे.

अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे भरारी पथकाने केले जप्त -नवेगाव मोरे येथील घटना ; कृषि विभागाची मोठी कार्यवाही

इमेज
अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे भरारी पथकाने केले जप्त  -नवेगाव मोरे येथील घटना ; कृषि विभागाची मोठी कार्यवाही   पोंभूर्णा :- तालुक्यातील नवेगाव मोरे येथील पडक्या घरात अनाधिकृत चोर बिटी कापूस बियाणे विक्री साठी घरी बाळगले असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून पकडण्यात आले.यात ८०.३० किलोग्रॅम चोर बिटी ज्याचे मुल्य दोन लक्ष तीन हजार सहाशे चाळीस रुपये किंमतीचे बियाणे ताब्यात घेण्यात आले.यामुळे तालुक्यातील चोरबिटी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अनाधिकृत चोर बिटी कापुस बियाण्यास शासनाची परवानगी नाही.मात्र पोंभूर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे येथे छुप्या मार्गाने चोर बिटी बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक केली जात असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळताच दि.१५ मे बुधवारला संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान नवेगाव मोरे येथील एका घरात ८०.३० किलोग्रॅम चोर बिटी कापूस बियाणे ज्याचे मुल्य दोन लक्ष तीन हजार सहाशे चाळीस रुपये भरारी पथकाच्या माध्यमातून पकडण्यात आले.व संबंधीत विक्री करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले.नामदेव ढवस (वय ५०),आकाश धानोरकर (वय २९ ) दोघेही ...