शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक माजी आमदार सहसराम कोरेटी साहेब यांच्या नेतृत्वात संपन्न

शिवसेनेची जिल्हा आढावा बैठक माजी आमदार सहसराम कोरेटी साहेब यांच्या नेतृत्वात संपन्न मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी अहेरी: गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त शिव सेना संपर्कप्रमुख माजी आमदार माननीय सहस्राम कोरेटी साहेब यांचे गडचिरोली येथील सर्विस येथे आगमन झाले. त्यांचे आगमन होताच शिवसेना सहसंपर्कप्रमुख माननीय हेमंत जम्बेवार साहेब आणि माननीय राजेश जी बेलसरे साहेब शिवसेना जिल्हाप्रमुख तसेच माननीय दीपक बाबा भारसाकडे, युवा सेना जिल्हाप्रमुख माननीय पौर्णिमा ताई इस्टम, जिल्हा संघटिका यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आले भव्य स्वागत करण्यात आले. त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. तदनंतर जिल्हा आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला माजी आमदार व नवनियुक्त संपर्कप्रमुख सहस्रामजी कोरेटी साहेब यांनी मार्गदर्शन केले. गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी अभियान राबविण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. गाव तिथे शाखा, शाखा तिथे शिवसैनिक असे ब्रीदवाक्य घेऊन कामाला लागा, जेणेकरून भविष्यात शिवसेनेला यशापर्...