पोस्ट्स

चंद्रपूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 🔹चैत्र महिन्यात सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेत विविध समस्यांना घेऊन व महाकाली मंदिर परिसरातील समस्या घेउन दीले निवेदन 🔹चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थाची विक्री यांबदल चर्चा

इमेज
विविध मागण्यांचे निवेदन घेऊन सामाजिक कार्यकर्ते नकुल कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट 🔹चैत्र महिन्यात सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेत विविध समस्यांना घेऊन व महाकाली मंदिर परिसरातील समस्या घेउन दीले निवेदन 🔹चंद्रपूर शहरात वाढत असलेल्या गुन्हेगारी व अमली पदार्थाची विक्री यांबदल चर्चा ✍️दरारा 24 तास न्युज नेटवर्क महाराष्ट्र  ✍️धर्मपाल कांबळे, (जिल्हा प्रतिनिधी)  चंद्रपूर:सध्या चंद्रपूर शहरांमध्ये मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. व चंद्रपूर शहरांमध्ये  मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची विक्री व अवैध रित्या विकल्या जाणाऱ्या नकली दारू असेल, देशी कट्टा व जिवंत काडतुस सर्रास पने शहरांमध्ये येत आहेत. मागील दोन दिवसात जिल्हयात दारूबंदी कायद्यान्वये ५७ गुन्हयांची नोंद चंद्रपूर पोलिसांनी केलेली आहे.  3 एप्रिल पासून सुरू होत असलेल्या महाकाली यात्रेला येणाऱ्या भाविकांना उत्तम रित्या सुविधा झाल्या पाहिजे व महाकाली परिसरामध्ये पोलीस विभागाने जास्तीत जास्त लक्ष द्यावे, व मराठवाड्यातून व विदर्भातून येणाऱ्या सर्व भाविकांचे दर वर्षी समान...

चंद्रपूरचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी सेलचे उपाध्यक्ष माननीय विनोद भाऊ अहिरकर यांचे कडून सर्व देशवासीयांना होळी आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
माननीय श्री विनोद भाऊ अहिरकर,  माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रपूर  महाराष्ट्र काँग्रेस कमिटी ओबीसी सेल प्रदेश अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य

जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू 🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही 🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा 🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती

इमेज
🌑जूनगावात शिवछत्रपती स्मारक उभारू 🌍जन्मदिनानिमित्त अलकाताई आत्राम यांची ग्वाही  🎁जुनगाव येथे अलकाताईंचा वाढदिवस उत्साहात साजरा  🍞सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पुढाकार। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती  दरारा 24 तास... चंद्रपूर: प्रतिनिधी तुम्ही  दिलेल्या आशीर्वादामुळेच आणि प्रेमामुळे मी या पदापर्यंत येऊन पोहोचले, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, या तुमच्या प्रेमाची परतफेड तुमच्या गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक उभारू आणि तुमच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करू, असे प्रतिपादन वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना भाजपा नेत्या अलकाताई आत्राम यांनी केले. त्या जूनगाव येथे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात बोलत होत्या. भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या कुमारी अलका आत्राम यांचा 12 मार्च रोजी वाढदिवस. त्यांचा वाढदिवस चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. तालुक्यातील जुनगाव येथे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तथा जूनगावचे सरपंच राहुल भाऊ पाल यांनी अलकाताईंचा वाढदिवस सन्मान दिवस म्हणून साजर...

युवा सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी। जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची उपस्थिती

इमेज
युवा सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी। जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची उपस्थिती दरारा 24 तास न्युज नेटवर्क चंद्रपूर:हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चंद्रपूर शहरात युवासेनेच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंदहृदयसम्राट "बाळासाहेब ठाकरे प्राथमिक चिकित्सा किट" चे लोकार्पण मा. श्री. मुम्मका सुदर्शन साहेब (SP) चंद्रपूर यांच्या हस्ते किट चे लोकार्पण करण्यात आले. व इंदिरा गांधी स्कूल येथे चित्रकला,निबंध स्पर्धा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्ती आणि बक्शीस वितरण चे आयोजन करण्यात आले. आणि विविध स्कूल मध्ये प्राथमिक चिकित्सा किट चे वितरण कार्यक्रम घेन्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.निलेश बेलखेडे सर (युवासेना पूर्व विदर्भ सचिव(महाराष्ट्र राज्य), सिनेट सदस्य गोंडवाना यूनिवर्सिटी), आदर्श लाडस्कर (युवासेना जिल्हा सचिव, यु.कॉ.कक्ष) सार्थक शिर्के (विधानसभा प्रमुख यु.कॉ.कक्ष), आदर्श खडसे (शहर प्रमुख यु.कॉ.कक्ष),रोशन देंबरे,हर्षल खनके व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते...  भविष्यात पण अशा प्रकारचे सामाजिक क...

Happy New Year 2025 :

इमेज
Happy New Year 2025 : दरारा 24 तास न्यूज नेटवर्क   बघता बघता २०२४ वर्ष संपले, हे वर्ष कधी आले कधी गेले हे कळलेच नाही. सुखाच्या दुःखाच्या, आनंदाच्या, विरहाच्या अनेक आठवणी ठेऊन हे वर्ष निघून गेले. नवे वर्ष म्हटल्यावर पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागण्याचा संकल्प तुम्ही केला असेल.  हे वर्ष जास्तीत जास्त आनंदाने, प्रियजनांच्या सहसावात, प्रगती आणि भरभराटीने जावे अशी सर्वांची इच्छा असते. याच गोष्टी मनात ठेऊन आपण आपल्या आप्तेष्टांचेही हित चिंतत असतो. सरत्या वर्षाची संध्याकाळ आणि नवीन वर्षाची पहाट आपल्या आवडत्या व्यक्तींसोबत कुणाला घालवायला आवडणार नाही.  त्या दृष्टीने बहुतेक जण नियोजन पण करीत असतील परंतु ज्यांच्या काही जवळच्या व्यक्ती तुमच्यापासून दूर देखील राहत असतील. त्यांना आपण फोनकरुन किंवा एसएमएस करुन शुभेच्छा देणे अगत्याचे आहे. मित्र मैत्रिणींना शुभेच्छा देऊन त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान अढळ आहे असे आपण जरुर सांगू शकतो. काही लोकांची आठवण आपण रोज काढत नाही हे सत्य आहे परंतु जेव्हा त्या व्यक्ती समोर येतात तेव्हा आपण एकमेकांना विसरलो हे कधी पटतच नाही. अशा सर्व नातेवाईक, मित्रांना नवी...

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

इमेज
सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दरारा 24 तास  चंद्रपूर (प्रति ) सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे विदर्भातील भाजपचे एकमेव ज्येष्ठ नेते तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तीन व दोन वेळा निवडून आलेले अनुक्र मे किर्तीकुमार भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही, याबाबत दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू होती. १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात भोपळा १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासू नेते आमदार मुगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या चांगल्या कामगिरीमुळे ओळखला जातो. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो, की वाघांच्या स्थलांतरणाचा विषय, मुनगंटीवार यांनी आपल्या कामाची छाप सोडली. शिलकीचे अंदाजपत्रक सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडे बघितले ...

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर

इमेज
सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर दरारा 24 तास  चंद्रपूर (प्रति) सलग सात विधानसभा निवडणुका जिंकणारे विदर्भातील भाजपचे एकमेव ज्येष्ठ नेते तथा माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तीन व दोन वेळा निवडून आलेले अनुक्र मे किर्तीकुमार भांगडिया आणि किशोर जोरगेवार यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. मुनगंटीवार मंत्रिमंडळात नाही, याबाबत दिवसभर जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरू होती. १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला मंत्रिमंडळात भोपळा १९९० नंतर प्रथमच चंद्रपूर जिल्ह्याला राज्याच्या मंत्रिमंडळात भोपळा मिळाला आहे. चंद्रपूर जिल्हा हा भाजपचे अभ्यासू नेते आमदार मुगंटीवार यांच्या मंत्रिमंडळातील आजवरच्या चांगल्या कामगिरीमुळे ओळखला जातो. राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा निर्णय असो, की वाघांच्या स्थलांतरणाचा विषय, मुनगंटीवार यांनी आपल्या कामाची छाप सोडली. शिलकीचे अंदाजपत्रक सादर करणारे एकमेव अर्थमंत्री म्हणूनही मुनगंटीवार यांच्याकडे बघित...

ग्राहक राजा जागा हो !

इमेज
ग्राहक राजा जागा हो ! रेशनवर नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या सुस्त, नवीन समित्यांचे तातडीने गठण करण्याची मागणी.:-दीपक देशपांडे  राज्यातील वितरण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या रेशनवर नियंत्रण ठेवणाऱ्या दक्षता समित्या सुस्त असून कुठे त्यांची निवड ही नावालाच केली जाते की काय असा संशय निर्माण होत असून जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे. *ही आहेत दक्षता समितीची कामे* शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसार जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रास्त भाब दुकानांतून केला जातो किवा नाही तपासणे, बनावट, खोट्या शिधापत्रिका व शिधापत्रिका न मिळालेल्या गरजू रहिवासी बाबात आढावा घेणे, धान्य दुकानातून गैरप्रकारांना आळा घालणे, गावातील प्राप्त तक्रार नोंदवही तपासणे व इतर अशी अनेक कार्ये दक्षता समितीमार्फत पार पाडली जातात.```  रेशन दुकानातील ग्राम पातळीवरील दक्षता समित्यातील अध्यक्ष, सचिव, सदस्य अनेक वर्षांपासून अनेक तालुक्यात निवडल्याच गेल्या नाहीत तर कुठे नामधारी समित्या असल्याने रेशन दुकानातील दक्षता समिती केवळ कागदोपत्री असल्याचे दिसून येत आहे. ग्राम पातळीवर सार...

वनविभागाच्या नवीन बांधकामात अवैध, निकृष्ट रेतीचा वापर ? या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची

इमेज
वनविभागाच्या नवीन बांधकामात अवैध, निकृष्ट रेतीचा वापर ? या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची दरारा 24 तास न्युज नेटवर्क चंद्रपूर: मध्य चांदा वनविभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व वनपरिक्षेत्रात कार्यालय व कर्मचारी निवास इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतु हे बांधकामात अवैध आणि निकृष्ठ दर्जाच्या रेतीचा वापर केला जात आहे. माहीत असूनही या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याने या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची? असा प्रश्न समोर येत आहे. राजुरा, विरुर, बनसडी, जिवती, धाबा, बल्हारशाह, पोंभुर्णा,कोठारी या वन परिक्षेत्रात या इमारतीचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. परंतु ही कामे निकृष्ठ दर्ज्याचे होत आहे निकृष्ठ दर्जाची रेती वापरली जात आहे. विशेष म्हणजे कुठेही रेती उपासाला परवानगी नसताना या कामासासाठी रेती कुठून आणली जात आहे. त्याला कुणाचे पाठबळ मिळत आहेः अशी विचारणा आम जनतेतून होत आहे. वनक्षेत्रातील इतर काम सुद्धा याच ठेकेदारांना दिले जात असल्याची माहिती आहे.

एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

बल्लारपूर विधानसभाक्षेत्रात अपक्ष उमेदवारांची झुंजार बॅटिंग, राजकीय पक्षांना फुटला घाम !

इमेज
बल्लारपूर विधानसभाक्षेत्रात अपक्ष उमेदवारांची झुंजार बॅटिंग, राजकीय पक्षांना फुटला घाम ! चंद्रपूर जिल्हात सर्वात जास्त उमेदवार नशीब अजमावतायत...! चंद्रपूर :-दरारा 24 तास न्युज नेटवर्क डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांना ७२ बल्लारपूर विधानसभेमध्ये झुंजार बॅटिंग सुरू केली आहे. त्यांना तसा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जनतेला आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि आपल्या नेतृत्वाची ओळख पटू लागली आहे हे आपली लोकशाही बळकट होत असल्याचं आणि जनतेमध्ये जागृती होत असल्याचं लक्षण आहे नलेश्वर येथील बल्लारपूर ७२ विधानसभ`च्या अपक्ष बहुजनांच्या आणि जनसामान्यांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई यांच्या सभेला सुजाण नागरिकांनीप्रचंड गर्दी केली गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा सातत्याने प्रामाणिकपणे जे काम अभिलाषा ताई गावतुरे करीत आहेत त्याची पोचपावती जणू जनता त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करून देत आहे गेल्या ३० वर्षापासून मतदारसंघांमधील जनता हजारो समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न ...

चंद्रपूर जिल्हा युवा सेनेची बैठक संपन्न

इमेज
आज दिनांक 24-10-2024 रोजी युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे , शिवसेना युवासेना सचिव श्री वरुणजी सरदेसाई साहेब आदेशाने व युवासेना कार्यकारणी सदस्य श्री हर्षल दादा काकडे , युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव श्री निलेशजी बेलखेडे चंद्रपूर युवासेना विस्तारक श्री संदीपजी रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख श्री विक्रांत भाऊ सहारे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत सर्व युवासैनेच्या पदाधिकारी व युवासैनिक यांनी असा निर्धार केली कि चंद्रपूर चे लाडके जिल्हाप्रमुख श्री संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या सोबत कोणत्याहि कुठल्याही परिस्थिती मध्ये साथ द्याची आहे व संपूर्ण ताकदीने युवासैनिक भाऊच्या पाठीमागे उभे रहावे असा संदेश विक्रांत भाऊ सहारे व इतर पदाधिकारी यांनी एक मताने केला वचन दिले चंद्रपूर जिल्हा युवा सेनेची बैठक संपन्न यावेळी उपस्थित माझे सहकारी 👇🏻👇🏻👇🏻 युवासेनेचे जिल्हाचिटणीस सुमितभाऊ अग्रवाल उपजिल्हा अधिकारी बंटी भाऊ कमटम, तालुका प्रमुख सूरज शेंडे ,शहर प्रमुख शाहबाज शेख, शहर प्रमुख वैभव काळे , शहर प्रमुख चे...

चंद्रपूरात भिमशक्ती शहर/जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित

इमेज
"आम्ही प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय आहोत!" चंद्रपूरात भिमशक्ती शहर/जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित दरारा 24 तास न्युज नेटवर्क  चंद्रपूर: रविवार, 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 2 वा भीम शक्ती संघटने चा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. स्थळ : प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतीक सभागृह, चंद्रपूर मूल्य,. जय भीम! जय संविधान! संविधानिक आणि राष्ट्रीय मुल्यांचे संरक्षण करण्यासाठी भीमशक्ती शहर / जिल्हा चंद्रपूर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला असून यावर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. तेव्हा हा मेळावा अनुभवण्यासाठी आपण निमंत्रीत आहात. मेळाव्याचे उ‌द्घाटक : मान. चंद्रकांत हंडोरे, खासदार राज्यसभा तथा भीमशक्ती अध्यक्ष महाराष्ट्र. प्रमुख वक्ते :- मान. नानाभाऊ पटोले, आमदार तथा काँग्रेस अध्यक्ष महाराष्ट्र, मान. विजय वडेट्टीवार , विरोधी पक्षनेते, विधान सभा महाराष्ट्र. मान. प्रतिभा धानोरकर, खासदार चंद्रपूर वणी आर्षि लोकसभा मान. सुभाष धोटे, आमदार तथा काँग्रेस विगहा चंद्रपूर मान. एन. डी. पिंपळे, भीमशक्ती उणहाराष्ट्र मान. अपेक्षा पिंपळे, भीमशक्ती महिला यक्ष विदर्भ प्रदेश अ...

सिदूर जि प शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी- विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप-प्रेरणा हाऊस यांचा उपक्रम

इमेज
सिदूर जि प शाळेत महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी- विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप-प्रेरणा हाऊस यांचा उपक्रम दरारा २४ तास    चंद्ररपूर: राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती दि. 2 ऑक्टोंबर 2024 ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर येथे साजरी करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त "प्रतिष्ठान प्रेरणा फार्म हाऊस"चे मालक डॉक्टर नरेंद्रजी कोलते यांनी मुलांच्या शैक्षणिक वापरासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.श्री रविंद्रजी लहांमगे विस्तार अधिकारी पंचायत समिती बल्लारपूर यांच्या हस्ते नोटबुक आणि कंपास पेटी चे वाटप करण्यात आले.  यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मान. बाबा सूर्तीकर, उपाध्यक्ष मान. रेखा शेलवटे आणि सर्व सदस्य गण, ग्रामपंचायतचे उपसरपंच मान. संजयजी गनफाडे , शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सुलोचना माहूरकर मॅडम आणि सर्व शिक्षक वृंद तसेच अंगणवाडी कार्यकर्त्या,गावातील नागरिक उपस्थित होते.

निष्पाप मानव-बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर जेरबंद : संदीप गिऱ्हे

इमेज
*निष्पाप मानव-बळी घेणारा नरभक्षी वाघ अखेर जेरबंद : संदीप गिऱ्हे* *जिल्हा प्रमुख श्री.संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात झालेल्या शिवसेना (उबाठा) पक्षाच्या आंदोलनाला यश...* दरारा २४ तास  *दी. ०3 ऑक्टोबर* शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संदीप गिऱ्हे यांच्या नेतृत्वात २३ सप्टेंबर २०२४ रोजी ' मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला घेराव आंदोलन ' घालुन लोक-हितास्तव नरभक्षी वाघाला जेरबंद ' करण्याची करण्याची मागणी संतप्त जन-समुदायाने या आंदोलनाच्या माध्यमाने केली होती. नरभक्षी वाघांच्या हल्ल्यात मानव-बळी थांबवले गेले पाहिजेत. यासाठी वाघ जेरबंद करण्याची मुख्य मागणी घेऊन आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्या गेला होता. याबद्दल वन-संरक्षण अधिकारी यांनी वन-विभागाला तसे निर्देश देत कामाला सुरुवात केली होती. त्याच माध्यमातुन मानवाला वन्य-प्राण्यांच्या आक्रमणापासुन वाचवण्याकरिता वन विभागाने योग्य प्रयत्न करून जानाळा नियत क्षेत्रातिल कक्ष क्र.117 मधे टी 83 या वाघिनिला जेरबंद  केल्याची माहिती वृत्ताना दिली आहे.  कित्येक दिवसापासुन मुल तालुक्यात वाघांच्या भ्याड हल्ल्यात मानव बळी गेल्याच्या ...

वृक्षारोपण करून सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा -ग्रामपंचायत शिदूर यांचा उपक्रम -सरपंच मंजुशा मते व तंटामुक्ती अध्यक्ष धर्मपाल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती

इमेज
वृक्षारोपण करून सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा -ग्रामपंचायत शिदूर यांचा उपक्रम -सरपंच मंजुशा मते व तंटामुक्ती अध्यक्ष धर्मपाल कांबळे यांची प्रमुख उपस्थिती धर्मपाल कांबळे(जिप्र) चंद्रपूर - प्रतिनिधी : तालुक्यातील शिदुर ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करून "सत्यशोधक समाज स्थापना" दिवस साजरा करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सर्वांसाठी एकच सार्वजनिक सत्यधर्म सांगितला.  या काळात ब्राह्मण घट जोशी इत्यादी लोकांच्या दहशतवातून शूद्र लोकांस मुक्त करण्याकरिता व आपल्या मतलबी ग्रंथांच्या आधारे हजारो वर्षे शूद्र लोकांस नीच मानून गफलतीने लुटणाऱ्या व्यवस्थेला नेस्तनाबूत केले. यातून परावर्तित करण्याकरिता समुपदेश व विद्याद्वारे त्यांचे वास्तविक अधिकार समजून देण्याकरिता धर्म व व्यवहार संबंधी ब्राह्मणांचे बनावट,व कार्य साधक ग्रंथांपासून मुक्त करण्याकरिता काही सुज्ञ शूद्र मंडळींनी हा समाज 24 सप्टेंबर 1873 रोजी स्थापन केला. त्याची आठवण सतत राहावी. आणि समाजाला नवी दिशा मिळावी, समाज जागृत व्हावा या उद्देशाने हा स्थापना दिवस साजरा करण्य...

हास्या प्रशांत विघ्नेश्वर हिचे आकस्मिक निधन! विघ्नेश्वर कुटुंब बुडाले शोक सागरात

इमेज
हास्या प्रशांत विघ्नेश्वर हिचे आकस्मिक निधन! विघ्नेश्वर कुटुंब बुडाले शोक सागरात दरारा 24 तास न्युज नेटवर्क चंद्रपूर: शहरातील जगन्नाथ बाबा नगर येथील रहिवासी,श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व नवराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी प्रशांत विघ्नेश्वर यांची कन्या हास्या हिचे आज, रविवार, 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1.30 वाजता आकस्मिक निधन झाले. उद्या सोमवारी सकाळी अकरा वाजता त्यांच्या राहते घरुण अंतयात्रा निघणार असून पत्रकार क्षेत्रातील सर्व मंडळींनी उपस्थित रहावे अशी विनंती करण्यात आली आहे. #daraara24taas #deth #chandrapur ====================== दरारा 24 तास न्युज नेटवर्क/वैनगंगा न्युज तर्फे भावपूर्ण रद्धांजली

वंदे भारत ट्रेनच्या पायलटचे अम्मा का टिफिन देत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वागत

इमेज
वंदे भारत ट्रेनच्या पायलटचे अम्मा का टिफिन देत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने स्वागत  दरारा 24 तास न्युज नेटवर्क    चंद्रपूर :      नागपुर ते सिकंदराबाद या “वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन’’ चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याद्वारे वर्चुअल उद्घाटन करण्यात आले. या निमित्त चंद्रपूर येथील रेल्वे स्थानकावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी रेल्वेच्या  यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी अम्मा का टिफीन देत सन्मानित केले. यावेळी मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार प्रतिभा धानोरकर, रमणिक चव्हाण, विवेक खोके, अभिषेख  गुप्ता, किरण नागपूरे, एस.एस मानकर, प्रसाद, रमेश राजूरकर, नायब तहसीलदार डॉ. जितेंद्र गादेवार, डाँ. गोपाल मुंदडा, यांच्यासह ईतर मान्यवरांची उपस्थिती होती.

उधारीच्या पैशासाठी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने घटना उघडकीस

इमेज
उधारीच्या पैशासाठी अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण! अल्पवयीन मुलगी गर्भवती झाल्याने घटना उघडकीस  चंद्रपूर: (विशेष प्रतिनिधी)  दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  महिलांवरील अत्याचार दिवसागणिक वाढत चालले आहेत. राज्यभरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार सुरू आहेत. मात्र सरकार आणि यंत्रणा या सर्व घटना मूग गिळून पाहत आहे.  चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा लैंगिक अत्याचाराची घटना घडली आली आहे. दुकानाची उधारी फेळण्यासाठी एका नराधमाने सोळा वर्षीय मुलीवर सतत लैंगिक अत्याचार करून तिला तीन महिन्याची गर्भवती केले. बबन रोहनकर राहणार दुर्गापूर असे या नराधमाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या हालचालीवरून व शरीरातील बदलावरून आईच्या लक्षात येतात तिने रुग्णालयात घेऊन गेले असता मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे उघड झाले. आणि त्यामुळेच हा प्रकार उघड झाला. ====================== ___________________________ ___________________________ ___________________________ ___________________________ ___________________________ ___________________________