पोस्ट्स

अहेरी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अहेरी अल्लापल्ली पोलिसांची दारू विक्रेत्यांवर कारवाई-एकास अटक

इमेज
अहेरी अल्लापल्ली पोलिसांची दारू विक्रेत्यांवर कारवाई-एकास अटक मनोज गेडाम तालुका प्रतिनिधी अहेरी: विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असताना अवैधरित्या दारू विक्रीचा गोरख धंदा केला जातो. अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी धाडसत्र सुरू केले आहे. अल्लापल्ली येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या चार आरोपींवर कारवाई करण्यात आली. सुरेश गोटमवार यास अटक करून पीसीआर घेण्यात आला आहे. या कारवाईत किंगफिशर बियर-५० नग, रॉयल स्टॅग व्हिस्की-१० नग, देशी दारू -३० नग, मोटर सायकल-०२ असा एकुन 61400 रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक इज्जापवार सर यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात ए पी आय देवेंद्र पटले, पीएसआय करिष्मा मोरे, हेडकांस्टेबल विठ्ठल रामटेके, शंकर बेल्हाडे यांनी केली.  राम नवमी निमित्त पोलिसांचा रूटमार्च राम नवमी निमित्त शहरात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी यासाठी पोलिसांनी शहरातून रूट मार्च काढला. ड्रिल प्रॅक्टिसही घेण्यात आली.

नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील पेंढरीत जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा वाढदिवस साजरा

इमेज
नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील पेंढरीत जिल्ह्याचे सहपालक मंत्री तथा राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा वाढदिवस साजरा मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी    अहेरी: दिनांक ३/४/०२५. महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन ,कृषी ,मदत व पुनर्वसन ,विधी व न्याय ,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री माननीय नामदार एडवोकेट आशिष जयस्वाल साहेब यांचा वाढदिवस धानोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील पेंढरी या गावातील ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात दिनांक 3 .4 .25 रोजी पेंढरी ग्रामपंचायतचे सरपंच पवन येरमे यांचे अध्यक्षतेखाली, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीनिवास दुल्लंम वार  यांचे प्रमुख उपस्थितीत व शिवसेना धानोरा तालुका प्रमुख सोपानदेव मशा खेत्री यांचे मुख्य मार्गदर्शनात नाविन्यपूर्ण साजरा करण्यात आला.   वाढदिवसाच्या शुभेच्छा कार्यक्रमात अनेकांच्या भुवया उंचावल्या .मुख्य मार्गदर्शक सोपानदेव मशाखेत्रि म्हणाले की जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ह्या राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. तरीपण माजी मुख्यमंत्री व आताचे राज्याचे उपमुख्यमंत्री न...

अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण

इमेज
अहेरी पं. स. येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी अहेरी: डिजिटल इंडिया मोहिमेला गती देण्यासाठी नॅसकॉम फाउंडेशनतर्फे अत्याधुनिक साधनाचा व्यवहारिक वापर कसा करावा व नवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे.  त्याअनुषंगाने नुकतेच १५ फेब्रुवारी रोजी अहेरी येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  उद्घाटन येथील गटविकास अधिकारी एल. बी. जुवारे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रशिक्षणात मोबिलायझर, रोजगारसेवक आणि इतर सहभागींना डिजिटल तंत्रज्ञानाशी जोडून त्यांना तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. यात स्मार्टफोन, इंटरनेट, डिजिटल पेमेंट, शासकीय सेवांची ऑनलाइन उपलब्धता, सायबर सुरक्षा या विषयावर ट्रेनर शुभांगी रामगोनवार यांनी सविस्तरपणे माहिती दिली.  अहेरी तालुक्यात पहिल्यांदाच नॅसकॉम फाउंडेशनतर्फे डिजिटल तंत्रज्ञानाचे धडे देण्यात आले. हा उपक्रम डिजिटल साक्षरता आणि जनजागृती प्रशिक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याची आशा व्यक्त केली जात आहे.

माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टिफन बॉक्स वितरित

इमेज
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अहेरी व अल्लापल्ली येथे टीफन बॉक्स वितरित ✍️मनोज गेडाम अहेरी तालुका प्रतिनिधी... अहेरी: महाराष्ट्र राज्याची माजी मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण योजनेचे शिल्पकार एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रात तालुकाप्रमुख अक्षय करपे यांच्या पुढाकाराने आलापल्ली व अहेरी येथे ऑटो रिक्षा चालकांना टिफिन बॉक्स वितरित करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख अक्षय करपे, अहेरी विभाग कामगार सेनेचे प्रकाश गद्दलवार, युवा सेना तालुका प्रमुख प्रीतम पेटेवार, अल्लापल्ली शहर प्रमुख मयूर त्रिनगरीवार,व तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.

शिवसेना जिल्हाप्रमुख व सह जिल्हा प्रमुख यांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा । गावागावात शाखा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश

इमेज
शिवसेना जिल्हाप्रमुख व सह जिल्हा प्रमुख यांचा जिल्ह्यात झंझावाती दौरा । गावागावात शाखा निर्माण करण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश ✍️मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी अहेरी: शिवसेना (शिंदे गट) गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख राकेशजी बेलसरे, सह जिल्हाप्रमुख हेमंत जी जम्बेवार व युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक दादा भारसाकडे यांनी गडचिरोली जिल्ह्याचे सर्व तालुके पिंजून काढण्याचे ठरविले असून तालुक्यातील प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा गठित करण्याचे आदेश प्रत्येक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.  दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी शासकीय विश्राम भवन येथे कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीला उपस्थित राहून मान्यवरांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात ही आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शिवसेना जिल्हा सह प्रमुख हेमंत जी जम्मेवार यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.  मार्गदर्शनात पुढे म्हणाले आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये विजय प्राप्त करण्यात करिता गावागावात शाखा निर्माण करा. तसेच शहरामध्ये प्रभाग रचनेनुसार शाखाप्रमुख, बौद्ध प्रमुख नियुक्त करा आणि शहरांमध्ये प्रभाग रचनेनुस...

शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांची अल्लापल्ली, भामरागड येथे भेट व कार्यकर्त्यांशी संवाद।

इमेज
शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांची अल्लापल्ली, भामरागड येथे भेट व कार्यकर्त्यांशी संवाद। मनोज गेडाम,अहेरी तालुका प्रतिनिधी... शिवसेनेचे गडचिरोली जिल्हाप्रमुख राकेश भाऊ बेलसरे यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला असून नुकताच अल्लापल्ली आणि भामरागड तालुक्याचा दौरा केला. अल्लापल्ली व भामरागड येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बेलसरे यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला. तालुक्यात व जिल्ह्यात पक्ष मजबूत करून सामान्य गोरगरिबांचे, पीडितांचे, सर्वांचे काम करण्याचे निर्देश देण्यात आले.  राकेश भाऊ बेलसरे यांच्या मार्गदर्शनामुळे शिवसैनिकांमध्ये उत्स्फूर्त जिद्द निर्माण झाली असून प्रत्येक कार्यकर्ते पक्ष वाढीसाठी तन-मन-धनाने कार्य करण्याची जिद्द व्यक्त केली. शिवसैनिकांनी कामाला लागावे असे निर्देश जिल्हाप्रमुखांनी यावेळी दिले. याप्रसंगी अहेरीचे तालुकाप्रमुख अक्षय करपे, उपतालुकाप्रमुख मनोज गेडाम, उपजिल्हाप्रमुख अंकुश मंडलवार, अभिषेक बाला, आयुष मंडल, नागेश राजनलावार, अमर पेठेवार, गणेश निब्रड, नागेश सडमेक, सोहेल शेख, मयूर त्रिनगरीवार, विष्णू कुशवाह, राजकुमार आत्राम, प्रीतम पेटेवार, सचिन वर...

लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर। डायरेक्टर बी. प्रभाकरण यांचा उपक्रम

इमेज
लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर। डायरेक्टर बी. प्रभाकरण यांचा उपक्रम ✍️ मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी  अहेरी : तालुक्यातील आलदंडी येथे लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १९ व २० जानेवारी रोजी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत करण्यात आले. शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन समोर आलदंडी येथे करण्यात आले होते. शिबिरामध्ये डोळयांची तपासणी, वाचन चष्मे क्रिया, त्वचा आजारावर पार करीत तपासणी वैद्यकीय सल्ले, हाईवसांचे तपासणी हाडांचे विकार तपासणीसाठी तज्ञांचा सल्ला, कान, नाक व घसा तपासणी समस्यांचे त्वरीत निदान असल्यास मार्गदर्शन, मुलांसाठी आरोग्यसेवा, महिला आरोग्यासाठी विशेष तपासणी यासंदर्भातील तपासणी व सल्ले, आजारांवर तज्ञांची मदत इतर चाचण्या आजारासाठी तपासणी, ईसीओ चाचणी केल्या जाणार असून लायड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे आयोजन करून १९ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. भास्कर, साई कुमार, अरुण रावत, विक्रम मेहता, सुनिता मेहता, रोहित, भोलू सोमलानी, संजय चांगलानी, तोडसाच्या सरपंच वनिता कोराम...

ग्रामीण भागात खेळांच्या स्पर्धा म्हणजे एक प्रकारचा उत्सवच! संदीप कोरेत यांचे प्रतिपादन। सिपाटोला येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

इमेज
ग्रामीण भागात खेळांच्या स्पर्धा म्हणजे एक प्रकारचा उत्सवच! संदीप कोरेत यांचे प्रतिपादन। सिपाटोला येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी अहेरी । ग्रामीण भागात खेळाला विशेष महत्व आहे. परंतु प्रत्येक गावात मैदान नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू आपले खेळ-काला सादर करू शकत नाही, त्यामुळे ग्रामीण भागात खेळाडू आपल्या शक्तीने आपले व्यासपीठ निर्माण करीत आहेत. तसेच ग्रामीण भागातील गाचामध्ये खेळांच्या स्पधा आयोजन करणे म्हणने गावात एक प्रकारचे उत्सवच असल्याचे प्रतिपादन मनसेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी केले. खेळांच्या स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी तालुक्यातील जिमलग्डा जवळील सिधाटोला येथे जयसेवा क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामीण व्हॉलीवॉल वाद्याने स्वागत करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेदरम्यान वृद्धांना ऊबदार स्वेटरचे वाटप गाव पाटील चिन्ना बेलादी तर प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, वसंत डुरके, श्रीनिवास जव्या, मुन्ना झाडे, संदीप चंदावार, बंडू वेलाची आभ...

भामरागडातील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे

इमेज
भामरागडातील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे दरारा 24 तास न्युज नेटवर्क मनोज गेडाम (तालुका प्रतिनिधी) अहेरी : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग गडचिरोली व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली आणि उ-बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील तहसील कार्यालयात तीनदिवसीय निवासी 'शेडनेट हाऊस व लागवड तंत्रज्ञान' प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन नागपूरच्या स्मार्ट विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, तहसीलदार किशोर बागडे, गडचिरोली सोनापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे, अर्चना कोचर, तालुका कृषी अधिकारी कुणाल राऊत, उ- बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशनच्या अध्यक्ष अनिता कासार, सचिव शरीफा पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी...

मेडपल्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! आदेश असूनही कोरोणा काळातील प्रोत्साहनपर भत्ता देण्यास करतोय टाळाटाळ!! 💥माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी अंगणवाडी ताईंनी दिले निवेदन!!

इमेज
💥 मेडपल्ली ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचा मनमानी कारभार! आदेश असूनही कोरोणा काळातील प्रोत्साहनपर भत्ता देण्यास करतोय टाळाटाळ!! 💥माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्याकडे न्याय मिळवून देण्यासाठी अंगणवाडी ताईंनी दिले निवेदन!! अहेरी : तालुक्यातील मेडपल्ली गावातील सर्व अंगणवाड्या, मदतनीस Covid 19 मध्ये मार्च २०११ ते २०१९ आणि मार्च २०२० से डिसेंबर २०२० मध्ये जिवाची पर्वा न करता गरोदर माता स्तनमाता आणि मुले यांना आहार बनवून दिलेला आहे.प्रत्येकाच्या घरी भेटी दिल्या आहेत याच्यापूर्वी ग्रा.प.मेडपल्ली यांचे कडून प्रती सेविका मदतनीस १०००/- प्राप्त झाले आहेत.तरी परंतु तसे पत्र CEO गडचिरोली यांचे पत्र जान / जिपरा/ साप्रावि / पंचा/ स्था- ३ / ११२३/२०२१ दि.३०/६/२०२१ असतांना सुद्धा ग्रामसेवक मडावी यांनी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. याकरिता सरपंच यांना दि. १०/४/२०२३ रोजी ग्रा.पं.मेडपल्ली येथे अर्ज दिलेले आहे.सरपंच आमच्या अर्जाची दाखल घेऊन ग्रामसेवक यांना कोरोणा काळातील प्रोत्साहनपर भत्ता देण्यास सांगितले परंतु ग्रामसेवक यांनी हेतुपुरस्पर थांबविले असून जाणूनबुजून मडावी यांनी ताळाटाळ करीत आहे. ग्रामस...

अल्लापल्लीत युवकाचा खून! अल्लापल्ली शहरात खळबळ

इमेज
आलापल्ली प्रतिनिधी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुका च्या लगत असलेल्या अल्लापल्ली शहरात रात्री ( रविवार सकाळी उघडकीस आली)एका युवकाची हत्या करण्यात आल्याची खळबळ जनक माहिती पुढे आली आहे. राकेश कन्नाके वय 32 वर्ष असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून तो आलापल्ली येथीलच रहिवाशी होता. जुनगाव येथील संजय गेडाम, माजी सरपंच जीवनदास गेडाम, संतोष गेडाम, डॉक्टर विलास गेडाम, यांचे ते जावई होते. त्यामुळे जूनगावातही नातेवाईकांमध्ये शोक कळा पसरल्याचे दिसून आले. पुढील तपास सुरू असून वेळोवेळी अपडेट देण्यात येईल.

आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल!!

इमेज
आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल!! अहेरी : तालुक्यातील महागाव-सुभाषनगर या रस्त्याची दुरवस्था होऊन काही महिन्यांपूर्वी मोठे खड्डेही पडले होते. त्यामुळे अहेरी-महागाव-सुभाषनगरपर्यंत नवीन डांबरीकरण करा.अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला होता.त्याची दखल घेत अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अहेरी-महागांव- सुभाषनगर या मुख्य मार्गावर खड्डे पडल्यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण तसेच शालेय विद्यार्थ्याना,गर्भावती महिलांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे याकडे लक्ष देऊन या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आठवडाभरात सुरू करा.अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिला हो...