पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नेवजाबाई हितकारिनी विद्यालय ब्रम्हपुरी येथील शिक्षकांनी घेतली राष्ट्रीय एकता दिनाची शपथ

इमेज
सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी  ब्रम्हपुरी :-  नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी येथे ३१ऑक्टोबरला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार पटेल यांनी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेत मोठी भूमिका बजावली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एन.रणदिवे होते. उपमुख्याध्यापक के.एम.नाईक, पर्यवेक्षक पि.व्ही.घोरुडे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक रणदिवे यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना राष्ट्रीय एकता शपथ दिली. यावेळी जी.एन.रणदिवे, नाईक सर, घोरुडेसर, बेंदेवार सर, वदनलवार सर यांनी भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरती प्रकाश टाकेले व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आपल्या भाषणात केला. तसेच स्व.ईंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मेश्राम सर यांनी केले व आभार प्रदर्शन मराठे मॅडम यांनी केले. सदर कार्यक्रमाला नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय व उच्च मा...

चंद्रपूरात रंगली लोककला नृत्य स्पर्धा ! महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा पुढाकार -विदर्भातील अनेक कलावंतांनी घेतला स्पर्धेत सहभाग

इमेज
चंद्रपूर -किरण घाटे - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ ललित कला भवन बंगाली कॅम्प चंद्रपूर येथे आज सोमवार दि.३१ऑक्टोंबरला दुपारी एका नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .सदरहु स्पर्धा कल्याण आयुक्त मुंबईचे रविराज इळवे व सहाय्यक कल्याण आयुक्त नागपूरचे नंदलाल राठोड यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आली .  आयोजित या स्पर्धेचा मान्यवरांच्या उपस्थितीत विधीवत उद्घाटन सोहळा पार पडल्या नंतर नृत्य स्पर्धेला उत्साहपूर्वक वातावरणात सुरुवात झाली.या वेळी कामगार कल्याण अधिकारी रामेश्वर अळणे ,सेवानिवृत्त शिक्षिका मंगला वैरागडे, निल बिनकर ,कमल वर्मा भुवनेश्वरी गोपनवार , सुरेश इटनकर ,दौलत गोरे ,छाया गिरडकर ,सविता वरखेडकर ,सुषमा ढाले ,समिक्षा सरुडकर , रोशनी कांबळे उपस्थित होते.दरम्यान पार पडलेल्या या नृत्य स्पर्धेत विदर्भातील चंद्रपूर ,वर्धा , गडचिरोली आदीं जिल्ह्यातील (टीमच्या) नृत्य कलावंतांनी आपला सहभाग नोंदविला होता.एकाहुन एक सरस नृत्य या स्पर्धेत रसिकांना बघावयास मिळाले . उपस्थित प्रेक्षकांनी ही टाळ्यांचे कडकडाटात या वेळी कलावंतांचे कौतुक केले.स्थानिक स्री शक्ती महिला आघाडीच्या कलावंतांनी आज या स्पर्...

डिजिटल मीडिया असोसिएशन चंद्रपूर तर्फे नवनियुक्त पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा सत्कार

इमेज
शांतता व सुव्यवस्था बाधित राखण्याचे कामही पोलीस विभागाबरोबर पत्रकाराची मुख्य भूमिका :् चंद्रपुरात नुकतेच रुजू झालेले डिजिटल मीडिया असोसिएशन तर्फे नवनियुक्त पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा सत्कार असोसिएशन चंद्रपूर शिष्टमंडळाने भेट घेतली. व त्यांचा पुस्तक गुलदस्ता देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष जितेंद्र चोरडिया तसेच प्राध्यापक विजय सिद्धावर यांनी सोशल मीडिया चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून कार्यरत असून डिजिटल मीडिया द्वारे प्रसारित होणाऱ्या बातम्या, आणि त्यातून वाचकांना मिळणारा भरभरून प्रतिसाद सोशल मीडिया वाढत असून. यामुळे सोशल मीडियाचे महत्व वाढल्याचे नमूद केले. शहरात होणाऱ्या समस्या, तसेच गुन्हेगारीवर आळा घालावा. शहरातील सुव्यवस्था , शहरातील वाहतूक कोंडी व इतर समस्या बाबत माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्याशी मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली. प्रशासन पोलीस प्रशासनाला पत्रकारांची साथ, तसेच पोलीस विभागातून निघणाऱ्या बातम्या प्रसारित करणे व जनतेला शांतता व सुव्यवस्था बाधित राखण्याचे कामही पोलीस विभागाबरोबर पत्रकाराची मुख्य भूमिका असते. . असे जिल्ह्यात नुकतेच रुजू झ...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा निषेध मोर्चा

इमेज
नागपूर:आज नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस वतीने मा. महेबुब भाई शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास स्थानावर निषेध मोर्चा काढून तीव्र निर्दशने करण्यात आली. मागील दोन महिन्यामध्ये खोके सरकार आल्यापासून महाराष्ट्र राज्यातून जवळपास चार मोठे उद्योग गुजरातला पळविण्यात आले आहेत. वेदांत फॉक्सकॉन, नागपूर मिहानमध्ये होणारा टाटा एअरबसचा प्रकल्प गेला. यावरुन हे सरकार गुजरातला उद्योगाचे आंदण देतंय आणि महाराष्ट्र राज्यातील तरुणांच्या हातात बेरोजगारीचा कटोरा देत आहे. त्याच्या निषेधार्थ आज नागपूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर निषेध मोर्चा काढून तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर, नागपूर शहराध्यक्ष दुनेश्वरजी पेठे, नागपूर युवक शहराध्यक्ष शैलेंद्र तिवारी, नागपूर ग्रामीण अध्यक्ष आशिष पुंड व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुल तुटल्यामुळे मोठा अपघात, ६०० लोक पाण्याखाली

इमेज
गुजरातमधील मोरबी शहरातील मच्छू नदीवरील जवळपास शतक जुना असलेला झुलता पूल रविवारी संध्याकाळी कोसळला. या अपघातात ६० लोकांचा मृत्यू झाला. हा पूल लाकडाचा आहे, म्हणून त्याला लकडा पूल असेही म्हणतात. पाच दिवसांपूर्वी हा पूल दुरुस्तीनंतर पुन्हा जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यावर उभ्या असलेल्या लोकांचा भार सहन न झाल्याने हा पूल तुटल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूल कसा हलला, कसा लटकला आणि नंतर नदीत कसा कोसळला हे घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.  लोक आरडाओरडा करत जीव वाचवण्यासाठी नदीतून बाहेर येऊ लागले. अनेकांनी पुलाचा काही भाग पकडून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.  प्रत्यक्षदर्शी अमित पटेल आणि सुक्रम यांनी सांगितले की, दिवाळीच्या सुट्ट्या आणि शनिवार व रविवार असल्याने अनेक लोक येथे आले होते. हे पर्यटकांचे एक आवडते ठिकाण आहे. पुलावर प्रचंड गर्दी असल्याने हा अपघात झाला असावा. जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा लोक एकमेकांवर पडले. प्रत्येकाला फक्त आपला जीव वाचवायचा होता एका तरुणाने सांगितले की, तोही पुलाला भेट देण्यासाठी आला होता. तो पुलाच्या मधोमध जात होता. मात्र पुलावर चढण्यापूर्वीच ह...

नागपूर मिहानमधील प्रस्तावित टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करणे हा विदर्भावर अन्याय - राजु झोडे

इमेज
चंद्रपूर:- वेदांता-फॉक्सकानच्या पाठोपाठ नागपुरातील मिहान मध्ये प्रस्तावित टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याच्या मुद्द्यावरून नागपूर विदर्भ कर्मभूमी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विदर्भावर घोर अन्याय केलेला आहे.टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विदर्भाचे प्रचंड नुकसान होणार आहे. विदर्भातील तरुणांना नोकरी रोजगारासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांची वाट धरावी लागणार आहे. ही सरकार व उपमुख्यमंत्री हे गुजरात समोर लोटांगण घालणारे आहेत अशी टिका देखिल उलगुलान संघटनेचे संस्थापक‌ तथा अध्यक्ष राजू झोडे यांनी आज बोलताना केली‌ आहे .   भाजपा नेत्यांनी आजपर्यंत वेगळा विदर्भ आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. सत्ता मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर मात्र त्यांना विदर्भाचा विसर पडलेला दिसत आहे. विदर्भाची जनतेची मते घेऊन विदर्भात येणारे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे षडयंत्र फडणविस करीत आहेत.फडणविसांसाठी विदर्भातील जनतेपेक्षा गुजरात महत्त्वाचा आहेत .त्यामुळे त्यांनी पुढची निवडणूक गुजर...

इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. सुधा मुर्ती यांचा लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार

इमेज
जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ सातारा: रयत शिक्षण संस्था, सातारा येथे नुकताच *इन्फोसिस फौंडेशनच्या* अध्यक्षा सौ. सुधा मुर्ती यांचा नुकताच रुपये २.५ लाखाचा* लक्ष्मीबाई पाटील राष्र्टीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. सौ. सुधा मुर्तींनी त्याची परतफेड म्हणुन रु १० लाखाची* देणगी रयत शिक्षण संस्थेला अनाथ विद्यार्थ्यांसाठी दिली हा झाला मनाचा मोठेपणा..... पण सौ. सुधा मुर्ती यांच्या बाबतची आश्चर्यकारक माहीती तुम्हाला माहीत आहे हे का ? सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा १०,००० कोटी चा व्याप असलेल्या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा असुन दरवर्षी त्या १०० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून दान करतात. तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा *खास कटाक्ष असतो... सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात त्या साड्या कमी किंमतीच्या असतात. पर्स २०० ते ४०० रुपयाची असते. मनगटी घड्याळ वेळ बघता आली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही साधे सुधे ८००—९०० रुपयाचे असते. मोबाईल ७ ते ८ हजाराचा. फेसबुक, व्हाटसअप मध्ये १५—१५ दिवस लक्ष...

युवानेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त 51 जणांनी केले रक्तदान- विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा

इमेज
पोंभूर्णा: प्रतिनिधी   शिवसेना तालुका प्रमुख तथा नगरपंचयातचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या शिबिरामध्ये 51 जणांनी रक्तदान देऊन वाढदिवस साजरा केला, त्यानंतर ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप व शालेय विद्यार्थांना नोट बुक व पेन्सिल वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयचे डॉक्टर अनिकेत गेडाम,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे,सरपंच विलास मोगरकार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार,सूरज माडूरवार,जयपाल गेडाम,महेद्र शेडमाके,शेषभुषण कुडसंगे,अनिल पेंदोर,प्रीतम उराडे,भोलानाथ कोवे,अवी वाकडे,रविंद्र ठेंगणे,उपसरपंच वेदनाथ तोरे,शंकर वाकूडकर,पवन गेडाम,कालीदास उइके,प्रफुल दिवसे,  आदि मान्यवर उपस्थीत होते.आयोजन युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रिगिरीवार,राकेश मोगरकर,आशिष कावडे,नितीन येरोजवार,पराग मोरे,साहिल पोरटे,स्वप्निल चौधरी,साहिल धोडरे,गैरव पेंदोर,संदीप ठाकरे,ताराचंद गुरूनुले,अमोल कावटवार,महेश धोडरे,संदीप सुमटकर,शुभम वासेकर आदी मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

लष्कर - ए - देवेंद्र'ला मिळालेल्या पन्नास हजार रुपयांच्या गिफ्ट व्हाऊचरचा सर्वत्र बोलबाला शिंदेंच्या दरबारात आज निवडक पत्रकारांसाठी भंडारा ! पत्रकारांनाही मिळणार 'खोके' ? भाजप व शिंदे शिवसेना गटाचा घातक पायंडा

इमेज
दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 50 हजारांची गिफ्ट कार्ड दिल्यामुळे राज्यातील पत्रकारांच्या वर्तुळात हा एक चर्चेचा विषय ठरला आहे. या चर्चेला अनेक फाटे फुटले असून आता ही चर्चा थेट दिल्ली दरबारी पोहोचल्याचेही समजते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीत महाराष्ट्रातील बहुसंख्य पत्रकार आहेत. त्यांना पत्रकारांच्या ग्रुपमध्ये 'लष्कर- ए - देवेंद्र' म्हणून संबोधले जाते. या 'लष्कर - ए - देवेंद्र'मधील सर्वच ( नैतिकतेचा बुरखा पांघरलेले ) पत्रकार व संपादक यांना फडणवीस यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलावले होते. तेथे त्यांना स्नेहभोजन देण्यात आले. त्यानंतर त्यांना निमूट लाईनीत उभे करण्यात आले व ५० हजार रुपयांचे गिफ्ट व्हाउचर देण्यात आले. हे गिफ्ट व्हाउचर रिलायन्स कंपनीचे आहे. त्यामुळे ही 'दिवाळी' मिळावी म्हणून एकाच वृत्तपत्र व चॅनेलमधील ४ ते ५ जण उत्सुक होते.  या सर्वांना रिलायन्सची गिफ्ट व्हाउचर्स मिळालेली आहेत. या माध्यमातून फडणवीसांनी ऐन दिवा...

आम आदमी पार्टी महाराष्ट्र, धनंजय रामकृष्ण शिंदे, राज्य सचिव यांचे राज्यपालांना निवेदन

इमेज
  जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७                                                                                                                                 मुबई: आपणांस व आपल्या परिवारास दिवाळीच्या व नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. राज्यातील "बेरोजगारी" आणि राज्य सरकारचा नाकर्तेपणा या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. १. लाखो नोकऱ्या निर्माण करणारे राज्यातील मोठे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्र राज्याबाहेर गेल्या काही महिन्यांमध्ये गेले आहेत. त्यामुळे नोकरीसाठी इच्छूक राज्यातील लाखो तरुण तरुणी व कुटुंबीयांचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. २. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण विभागामार्फत २०१९ रोजी प्रकाशित केलेल्या जिल्हा परिषदांतील सुमारे १३५१४ पदांसाठी राज्यातील २० लाख तरुण तरुणींनी अर्ज भरले होते. सर्व इच्छूक तरुण तरुणी गेल्या ३ वर्षांपासून परीक्षेची तयारी करत होते. अर्जापोटी, रु. ५०००/- ते रु. ६०००/- भरून गेल्या ३ वर्षांपासून चातकासारखी वाट पाहत असतानाच जिल्हा प...

आनंदाचा शिधा पोंभुर्णा तालुक्यात पोहोचलाच नाही!

इमेज
  पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी        राज्यात नव्याने सत्तेत आलेल्या सरकारने दिवाळीनिमित्त सर्वसामान्य नागरिकांना शंभर रुपयात चार वस्तूंचा "आनंद शिधा" देण्याची योजना जाहीर केली, मात्र ही योजना पूर्ती फसवी ठरली असून सर्व सामान्यांना हा "आनंद शिधा" अजूनही मिळाला नाही. त्यामुळे सामान्यांची दिवाळी गोड होण्याऐवजी कडूच झालेली आहे.       सर्व सामान्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशाने शंभर रुपयात एक किलो रवा' मैदा' चणाडाळ आणि एक किलो तेल देण्याची योजना शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केली. मात्र दिवाळी संपूनही गेली तरीही हा "आनंद शिधा" तालुक्यात अनेक गावात पोहोचला नसल्याची ओरड होत आहे. याबाबतीत तहसील कार्यालयात जाऊन विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता दिनांक 25 ऑक्टोबर 2022 रोजी कसलीही शासकीय सुट्टी नसताना तहसील कचेरी कर्मचाऱ्यांना होती. पुरवठा विभागाला तर चक्क कुलूपच लागले होते.        आनंदाचा शिधा योजनेतील किटमध्ये दिवाळीत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब अर्थात केशरी शिधापत्रिका धारकांना शंभर रुपयांमध्ये दिवाळीचा शिधा मिळणार होता. परंतु तो अद्यापही मिळाला नाही. ...

कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड गडचांदूर येथे सोयाबीन खरेदीचा शुभारंभ !!

इमेज
तालुका प्रतिनिधी,  कृषी उत्पन्न बाजार समिती कोरपना अंतर्गत गडचांदूर उप बाजारपेठ मार्केट यार्ड वर शेतकरी उत्पादित सोयाबीन लिलावाद्वारे खुल्या बाजारपेठेत खरेदी सुरु झाली आहे. व त्यामध्ये शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी आणला होता.शुभारंभ दिनी ४७३० रुपये भावाने खरेदी करण्यात आले व पहिल्या दिवशीच आवक हि चांगल्या प्रकारे होती. कृषी उत्पन्न बाजार समिती गडचांदूर चे सचिव .कवडू देरकर यांनी प्रथम बोली लिलावाद्वारे माल विक्री केलेल्या प्रथम शेतकरी .बापूराव गोरे यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सिल्वर स्टोन शेतकरी उत्पादक कंपनी व शिवमांगल्य शेतकरी उत्पादक कंपनी यांनी हि सोयाबीन खरेदी केली. व बाजार समितीने अडत व दलाली मुक्त शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सोयाबीनची खरेदीची सुरूवात केली.व शेतकऱ्यांना कोणतेही अडत नसल्याने RTGS द्वारे धान्य विक्रीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याने तसेच शेतकऱ्यांने स्वत: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काट्यावर माल तुलाई होत असल्याने कसल्याही प्रकारची शेतकऱ्याची लुट केल्या जात नसल्याचे मत शेतकऱ्याने व्यक्त केले.या प्रसंगी सय्यद आबिद अली,गणेश वाभि...

शेतकरी अनुदानापासून वंचित! शिधापत्रिकाधारकांना दिवाळी किट मिळालेच नाही, दिवाळी अंधारात,,,,,,, राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष सुहेल अली यांचा आरोप

इमेज
 तालुका प्रतिनिधी  शासनाने जुलै ऑगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने नुकसानीचे पंचनामे करून दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा सहा हजार आठशे ऐवजी हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये मदत देण्याची गोड घोषणा केली मात्र दिवाळी साजरी होईल हतबल झालेला शेतकरी मोठ्या आशेने दिवाळी साजरी करण्याचा बेत आखला प्रशासनाकडून गावनिहाय याद्या तयार करून प्रसिद्धी देण्यात आली.  मात्र अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात रकमात जमा झाली नसल्याने पावसाने पिकावर पाणी फिरवले तर शासनाने घोषणा करून दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरवल्याचे चित्र या भागात असून अनेक शेतकऱ्यांच्या घरात दिवाळीच्या दिव्या ऐवजी अंधार दिसून आला महाराष्ट्र शासनाने ऑक्टोबर 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंतोदय लाभार्थी व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांना आनंदा दिवाळी किट देण्याची घोषणा केली व 100 रुपयांमध्ये दिवाळीचा आनंद साजरा होईल अशी आशा शिधापत्रिका धारकांना होती मात्र कोरपणा तहसीलचे मुख्यालय असलेल्या शहरांमध्ये अंतोदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थींना शंभर रुपयाचे किट उपलब्ध झाले नसल्याने दिवा...

आईला मध्ये आणून घाणेरडे राजकारण करू नये... 🔹आमदार बच्चू कडू आणि रवी राणात राजकीय शीतयुद्ध. ?? मुंबई / चक्रधर मेश्राम

इमेज
मुंबई / चक्रधर मेश्राम आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद आणखी विकोपाला जाण्याची शक्यता आहे. नुकताच राजापेठ पोलीस ठाण्यात महिलांनी बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार दिली आहे यात रवी राणा यांच्या आईवर अपशब्द वापरल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आमदार बच्चू कडू यांनी हा आरोप फेटाळून लावत रवी राणा यांना चांगलच सुनावलं… यावर बच्चू कडू म्हणाले, मी आमदार रवी राणांच्या आईवर मी काहीही बोललो नाही , राणानी हे घाणेरडे राजकारण करू नये राणा यांच्या आरोपाविरोधात 50 कोटी रुपयांचा दावा देखील ठोकणार असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे स्वतःला लपण्यासाठी आईला समोर करित असल्याचा आरोप देखील यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे… त्यामुळे आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या वादात मध्यस्थी करणार आहेत का हे पाहावे लागेल. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. याविरोधात दाद मागूनही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात अद्याप कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांनी सरकारची साथ सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचा इशारा दिला ह...

पोंभुर्णा तालुका कांग्रेस नेतृत्वात बदल...... मामा ला मिळाला डच्चू तर अण्णा बनला बच्चू

इमेज
पोंभुर्णा तालुका कांग्रेस नेतृत्वात  जिल्हा संपादक | रुपेश निमसरकार चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने संपूर्ण तालुक्यात तत्कालीन तालुका अध्यक्षांना पायउतार करीत पक्षाला नवीन उर्जा देणारे कार्यकर्ते यांना संधी देत तालुका अध्यक्ष पदावर विराजमान केले आहे. यात पोंभुर्णा तालुक्यात सुद्धा तत्कालीन मंत्र्याच्या मामा ला डच्चू देत अनेक वर्षापासून पक्षाशी एकनिष्ठ राहून सर्वसमावेशक कार्य करणारे सोसायटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देणारे रवी मरपल्लीवार (अण्णा) यांची तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.  या बदलाने पोंभुर्णा तालुक्यात कांग्रेस कार्यकर्त्यात आंनदाचे वातावरण निर्माण झाले असून नवचैतन्य पसरले आहे.  तत्कालीन मंत्री वडेट्टीवार असताना त्यांच्या अंत्यत जवळचे व रिश्तेदार(मामा) म्हणून ओळख असणारे कवडूजी कुंदावार यांची पोंभुर्णा तालुका अध्यक्ष म्हणून निवड केली होती. परंतु त्यांच्या कार्यकाळात व नेतृत्वात नुकत्याच झालेल्या नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीत कांग्रेस पक्षाची मोठी पिछेहाट झाली. व नगरपंचायत मध्ये केवळ एक सिट जिकंण्यात समाधान मानावे लागले.  पोंभुर्णा तालुक्यात व शहरात का...

ग्रामीण स्तरावर खेळले जाणारे क्रिकेट आपल्या खेळाडूंना मोठा आकार देऊ शकते

इमेज
काँग्रेस नेते व सी डी सी सी बँकेचे जिल्हाध्यक्ष संतोष सिंह रावत यांचे प्रतिपादन विजय जाधव, नांदगाव ग्रामीण भागात खेळले जाणारे क्रिकेट ग्रामीण भागातील सर्वसामान्य खेळाडूंची प्रतिभा उंचावण्याचे कार्य करते, कला, क्रीडा,व साहित्य आणि संस्कृती जोपासण्याकरिता ग्रामीण भागाचा मोलाचा वाटा आहे. असे प्रतिपादन काँग्रेस नेते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंहरावत यांनी केले. ते नांदगाव येथे रात्र कालीन भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. थ्री स्टार क्रिकेट मंडळ नांदगाव च्या वतीने सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ भाऊ वाकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर सामन्यांचे आयोजन करण्यात आले असून हे क्रीडा सत्र रात्र कालीन सुरू झाले आहे. याप्रसंगी संतोषसिंहरावत यांनी या सामन्यांच्या आयोजनासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि मदत करण्याचे आश्वासन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी मंचावरून आपले विचार व्यक्त करताना केले. या सामन्यांचे उद्घाटन राजुरा विधानस...