पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी

इमेज
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांना ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची परवानगी राज्य  निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिका-यांना दि. १ डिसेम्बर रोजी पत्र निर्गमित केले आहे. वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी २८ नोव्हेम्बर ते २ डिसेम्बर या कालावधीत उमेदवारांकडून  अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविणयात आले आहे.३० नोव्हेम्बर पासून आयोगाची वेबसाइट अतिशय मंदगतीने सुरु असल्याने उमेदवारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे, ते अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करू शकत नाहीत .त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उमेदवार अर्ज भरण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी सांस्कृतिक  कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक आयोगाकड़े  केली , आयोगातर्फे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन देखील दिले. निवडणूक आयोगातर्फे तातडीने दखल घेतली गेली व सर्व जिल्हाधिका-यांना ऑफलाइ...

सामाजिक चळवळीत सत्याचा शोध घेणारे युवक निर्माण व्हावे... बापुराव मडावी

इमेज
....................................... संतोष कुळमेथे राजुरा तालुका प्रतिनिधी राजुरा - बहुजन, मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला पुढे नेण्यासाठी आणि प्रस्थापित व्यवस्थेने समाजमनावर निर्माण केलेले गैरसमज, अंधश्रद्धा, वाईट प्रथांना मुठमाती देण्याकरिता महात्मा फुले यांच्या विचारावर चालणाऱ्या सामाजिक चळवळीत सत्याचा शोध घेणारे युवक निर्माण होण्याची आज समाजाला गरज आहे.ते कार्य तुलाना येथिल महात्मा फुले सार्व.वाचनालय चालविणारे युवक करीत असल्याने त्यांचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार गोंडवाना शिक्षण संस्थेचे सचिव तथा पाचगाव ग्राम पंचायत सदस्य बापुराव मडावी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी कार्यालयात तसेच तुलाना प्राथ.शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुधाकरजी हेपट यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना व्यक्त केले.        महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी व जि.प.शाळा तुलाना चे मुख्याध्यापक श्री.सुधाकरजी हेपट यांचा निरोप सत्कार समारंभ महात्मा फुले वाचनालय मंडळाच्या पुढाकाराने तुलाना ...

खासदार बाळूभाऊ धानोरकर आज पोंभुर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर

इमेज
पोंभुर्णा: काँग्रेसचे खासदार बाळू भाऊ धानोरकर हे आज दिनांक १ डिसेंबर रोजी पोंभुर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून तालुक्यातील अनेक गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवींद्र भाऊ मरपलीवार यांनी खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. खासदार धानोरकर हे घोसरी येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास उपस्थित होणार असून त्यानंतर ते दोन वाजता देवाडा बुद्रुक, चेक ठाणा, मोहाळा व अन्य गावांना भेटी देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असून नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून समस्यांचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवींद्र जी मरपल्लीवार यांनी केले आहे. सायंकाळी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांची बैठक होऊन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन खासदार महोदय करणार आहेत. या संधीचा फायदा घेऊन आपल्या अडी अडचणी, शेत पिकातील नुकसान, वाघाची भीती,वन विभागाच्या, कृषी विभागाच्या, महसूल विभागाच्या व इतर सर्व विभागाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी नागरिकांनी आपापली निवेदने अर्ज घेऊन उपस्थित राहावे...

बेकायदेशीरपणे औषधे बनवून गोळा केली कोट्यवधींची माया

इमेज
महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सध्या बेकायदेशीरपणे औषधे तयार करण्यात येतात व त्यांची संपूर्ण भारतात अवैधपणे विक्री करण्यात येते. यामुळे लाखो रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. याविषयीचा स्पेशल रिपोर्ट ‘स्प्राऊट्स’मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. याची दखल महाराष्ट्र्र राज्याच्या अन्न व प्रशासन विभागाने घेतली व तात्काळ नोटीस देवून उत्पादन थांबवले. मात्र अदयाप त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पुण्यामध्ये पवनकुमार जगदीशचंद गोयल यांनी Ace Remidies नावाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी स्थापन केली. सुरुवातीला या कंपनीला काही मेडिकल कंपन्यांच्या औषधांची केवळ विक्री करण्याचे लायसन्स मिळाले होते. मात्र झटपट पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी गोयल यांनी थेट बेकायदेशीरपणे औषधांची निर्मिती व त्यानंतर त्यांची अवैधपणे विक्री करण्याचा सपाटाच लावला. यातून त्यांनी कोट्यवधी रुपयांची काळी माया गोळा केली. ३ मार्च २०२२ व १६ जून २०२२ रोजी याविषयीचे स्पेशल रिपोर्ट्स ‘स्प्राऊट्मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. या रिपोर्ट्सने पुणेकरांची तर अक्षरश: झोपच उडाली. अन्न व प्रशास...

जिवती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये BSNL चे टॉवर बसवा-आशी मागणी

इमेज
प्रतिनिधी-, कृष्णा चव्हाण ----------------------------------------------जिवती  तालुका हा डोंगराळ व अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये मोबाईल नेटवर्क चा खूप मोठा प्रश्न आहे,आणि या भागात नेटवर्क ची अत्यंत आवश्यकता आहे.कारण डिजिटल शिक्षण प्रणालीमध्ये सर्व मोबाईल वर ऑनलाईन शिक्षण झालेला आहे म्हणून जिवती तालुक्यातील विद्यार्थी नेटवर्क नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण पासून वंचित राहत आहे म्हणून जय विदर्भ पार्टीचे नेते सुदामभाऊ राठोड यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन जिवती तालुक्यातील नेटवर्क ची समस्या आपल्या माध्यमातून दूर व्हावी आणि सर्व सामान्य जनतेलाही वणी नेटवर्क चा लाभ घेता यावा यासाठी आपण लक्ष घालून आमची मागणी पूर्ण करून द्याल अशी विनंती राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली.

गावोगावी ओबीसींनी संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा - ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांचे आवाहन

इमेज
  नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 28/11/2022:- ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी भारतीय संविधानात ३४० वे पहिले कलम ओबीसींसाठी नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संविधानानेच ओबीसींना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आजतागायत ओबीसींना त्यांचे हक्क व अधिकार कोणत्याच राज्यकर्त्यांनी मिळू दिले नाही व त्यासाठीच मागील कित्येक दशकापासून ओबीसींचा लढा सुरू आहे. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या जिवन कार्यातून समतेचा व न्यायाचा संदेश दिला. त्यांचा स्मृती दिन समाजातील विविध घटकांनी त्यांच्या हक्काची जाणीव जागृती होण्यासाठी साजरा करावा, यासाठी दोन्ही दिवस ओबीसी समाज बांधवांनी प्रेरीत होवून साजरे करावे. ओबीसी समाजबांधवांनी गावोगावी घरोघरी दिंड्या, रॅली, प्रभात फेरी, व्याख्यान, प्रबोधन, सभा, मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा, असे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे एस.सी. एस.टी. व्ही.जे.एन.टी. व ओबीसी समूदायासाठी त्यांचे हक्क व अधिकार...

पालकमंत्र्यांनी दिले जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना चौकशीचे आदेश - शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणार : सुधीर मुनगंटीवार

इमेज
चंद्रपूर:- दि. 27 नोव्हेम्बर रोजी संध्याकाळी बल्‍लारपूर रेल्‍वे स्‍टेशनवरील फुटओव्‍हर ब्रिजचा एक भाग कोसळल्याने जवळपास १३ जण जखमी झाल्‍याचे प्रथम दर्शनी कळले. या सर्वांना तातडीची मदत करीत रेल्‍वे प्रशासन व पोलिस प्रशासनाने रूग्णवाहिके द्वारा रुग्णालयात पोहचवून त्‍यांच्‍यावर तातडीने उपचार सुरु झाले आहेत. यापैकी काही रुग्‍णांना चंद्रपूर येथील जिल्‍हा सामान्य रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. ही बातमी कळताच राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर जिल्‍हयाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेत त् सर्व जखमींना आवश्‍यक त्‍या सर्व सुविधा पुरविण्‍याचे निर्देश जिल्‍हा सामान्य रुग्णालय प्रशासनाला दिले. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी करण्‍याचे निर्देश ना. मुनगंटीवार यांनी चंद्रपूरचे जिल्‍हाधिकारी श्री विनयकुमार गौड़ा तथा पोलिस अधिक्षक श्री परदेशी यांना दिले आहेत. अपघातानंतर लगेचच भाजपाचे बल्‍लारपूर येथील पदाधिकारी रेल्‍वे स्‍टेशनवर पोहचून त्‍यांनी जखमींना ताबडतोब मदत केली. या प्रकरणी शासन स्तरावरुन मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री...

पोलीस बॉईज असोसिएशन शाखा चंद्रपूर तर्फे 26/11 मुंबई हल्ल्यातील विर शहीद जवानांना भावपुर्ण श्रंध्दाजली

इमेज
चंद्रपूर:- पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य शाखा चंद्रपूर तर्फे 26/11 मुंबई हल्ल्यातील वीर शहिद जवानांना दिनांक 26-11-2022 रोज.शनिवारला ठिक 12-30 ते 3-00 पर्यत पोलीस लाईन नवीन पोलीस जिमखाना तुकूम येथे भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. .या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उप-अधिक्षक आथिंक गुन्हे शाखा मा.श्री शेखरजी देशमुख सर , रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथील ए पी आय श्री कोकोडे सर , तुमसरे मेजर , तिवारी मेजर उपस्थितीत होते.तसेच पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्यचे विदर्भ अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष भुवनेश्वर पदमाकर निमगडे , चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा सौ.सविताताई प्रकाश खुटेमाटे , महिला उपाध्यक्षा सुवर्णा भगवान खोबागडे , जिल्हा उपाध्यक्ष चंद्रशेखर घनश्याम मुरस्कर , जिल्हा सचिव संजय खोबागडे , जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सद्दाम अंन्सारी , शहर अध्यक्ष देवीदास बोबडे , शहर उपाध्यक्ष बशीरभाई अंन्सारी , तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत डोगरे , सिनियर सदस्य तोजितचंद पिपरे, जि.सहसंपर्क प्रमुख दिलीप उरकुंदे , जंयता डेहनकर , च्छगन सेलोटे ,स्वप्नील क्षीरसागर , साहील मडावी , शशीकला ...

भू संपादन केलेल्या जमिनीचा मोबदला द्या भूपृष्ट परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदनातून पवनार येथील शेतकऱ्यांची मागणी

इमेज
  पवनार वार्ताहर :- पवनार-सेवाग्राम- हमदापुर-सेलडोह रोडचे गेल्या २०१७ पासून सहा वर्षांपासून काम सुरू असून शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित करून पवनार-सेवाग्राम महामार्ग सिमेंट रोडचे 60% काम पूर्ण झाले परंतु, जिल्हा भूसंपादन अधिकारी वर्धा विभाग यांचे कडून अद्याप पर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात आला नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यान कडून भूपृष्ठ परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज दि. 26/12/20022 रोजी नागपूर येथे कृषी ऍग्रो व्हिजन सुरू असलेल्या नागपूर येथे निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यानं कडून वारंवार जिल्हा भूसंपादन अधिकारी वर्धा विभाग यांना तक्रारी करत पैसे कधी मिळणार अशी माहिती घेतली असता ऑक्टोंबर महिन्यात मिळेल तर कधी नोहेंबर पर्यंत पैसे मिळतील अशी बतावणी करत बांधकाम विभाग वर्धा यांचे कडून दोन महिन्यांपासून अहवाल आले नसल्याने अवार्ड काढण्यात विलंब होत असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय विभाग सहकार्य करण्यास विलंब करत आहे यात प्रामुख्याने बांधकाम विभाग यांचे कडून दोन महिन्यांपासून अहवाल येत नाही आहे. मग आम्ही करावे तरी काय अशी माहिती सांगण...

विचारज्योत फाउंडेशन तर्फे संविधान दिन साजरा

इमेज
संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन... चंद्रपूर: '26 नोव्हेंबर' हा दिवस देशभर 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाउंडेशन तर्फे चंद्रपूर येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून संविधानाच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहू अशी प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी इंजि. नरेंद्र डोंगरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विचारज्योत फाऊंडेशनचे सुरज पी दहागावकर, मुन्ना तावाडे, इंजी. नरेंद्र डोंगरे, सारंग चालखुरे, शिवाजी गोरघाटे, विजय कांबळे, स्वप्नील निमगडे, एस बी खोब्रागडे, मिलिंद रामटेके, आशिष दहागावकर, आशिष अलोने, संघदिप मुंजनकर, प्रज्योत उराडे, प्रणाली दहागावकर, सृष्टी मुगलवार यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून संविधान दिन यशस्वी केला...

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन 'संविधान दिवस साजरा

इमेज
पुरोगामी पत्रकार संघाचा आगळा वेगळा उपक्रम.... चंद्रपूर- छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य निर्माण करतांना जातीभेद केला नाही,सर्व जातीधर्माच्या लोकांना समानसंधी,समान वागणूक दिली.त्यामुळेच छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत बनले...भारतीय संविधानही सर्व भारतीयांना समान संधी देतो.समता,स्वतंत्रता,बंधुता या मूलभूत तत्वावर आधारलेले भारतीय संविधान छत्रपती शिवरायांच्या सुराज्य निर्मितीची अघोषित घोषणा करतो... मात्र काही राजकारणी देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवरायांचे कार्य कर्तृत्व मुस्लिम समुदायातील तळागाळात पोहचावे ही उदात्त भूमिका घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते भुरुभाई उर्फ नसीर बक्ष,ताजभाई अन्सारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन २६ नोव्हेंबर 'भारतीय संविधान दिवस' साजरा करण्यात आला. यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,ते पन्नास दिवस या कादंबरी चे लेखक पवन भगत,पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुजय वाघमारे,राजू राठोड,नरेश पिंगे उपस्थित ...

कोरोनामुळे निधन झालेल्या थकीत कर्जदारांची माहिती सादर करण्याचे सहकार आयुक्त यांचे आदेश

इमेज
गडचिरोली /  कोरोनामुळे निधन झालेल्या थकीत कर्जदारांची माहिती लवकरात लवकर प्राधान्याने विहित नमुन्यात सादर करण्याचे आदेश सहकार आयुक्त श्री अनिल कवडे सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी 11 नोव्हेंबर 2022 रोजी एका पत्रकाद्वारे राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधक यांना दिलेले आहे.     पत्रकात म्हटले आहे की, कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. कोरोना कालावधीमध्ये घरातील कर्त्या पुरुषाचे निधन झालेल्या कुटुंबांना मोठी आर्थिक झळ बसलेली आहे, मयत कर्जदाराचे राहते घर/ इतर मालमत्ता तारण असल्यास अशावेळी त्यांच्या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे यातून त्यांना काय दिलासा देता येईल या संदर्भात शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी मयत कर्जदारांची माहिती गोळा करण्यात येत आहे. आपल्या विभागातील जिल्ह्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँक नागरी सहकारी बँका व नागरी सहकारी पतसंस्था मधील कोरोनामुळे निधन झालेल्या थकित कर्जदारांची माहिती पत्रकात दिलेल्या नमुन्यांमध्ये लवकरात लवकर साद...

उर्मट व मुजोर बस चालकावर कठोर कारवाई करा-शिवसेनेचे जीवनदास गेडाम यांची मागणी

इमेज
पोंभुर्णा: एसटी महामंडळाची बस म्हणजे सर्वसामान्यांसाठी हक्काची आणि अगदी सोयीची सेवा. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय.मात्र काही वाहक-चालक प्रवाशांना सेवा देण्याऐवजी त्यांची किती गैरसोय करतात याचा अनुभव खुद्द शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा जुनगावचे माजी सरपंच, पत्रकार जीवनदास गेडाम यांना आला.  याबाबत सविस्तर वृत्त असे की, पोंभुर्णा ते जुनगाव ही एसटी महामंडळाची बस सकाळ संध्याकाळ येते. या बसमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची संख्या मोठी असल्यामुळे विद्यार्थ्यांनीच ही बस खचाखच भरलेली असते. दिनांक २४ नोव्हेंबर २०२२ रोज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता (एम.एच. ०७ सी - ९४०८)ही बस पोंभुर्णा वरून नांदगाव बस स्थानकावर आली. तिथून देवाडा बुद्रुक आणि जुनगाव येथील विद्यार्थ्यांनी आपाप...

अंबुजा सिमेंट फाऊंडेशन उत्तम कापुस अंतर्गत महिला उद्योग प्रशिक्षण दौरा

इमेज
कोरपना / अंबुजा फाऊंडेशन अंतर्गत गडचांदूर क्षेत्रात महिला उद्योग व ग्रामीण गावातील  उद्योग प्रशिक्षण दौऱ्या नारंडा ,धामणगाव व पिर्पडा येथील बचत गटाच्या महिलांना मंगी, उपरवाही, कुकुडसाथ येथे महिला प्रशिक्षण दौऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले. मंगी गावा मध्ये जि,प,शाळा,ग्राम कृषी संसाधन केंद्र व (VRC)ऑक्सिजन पार्क ला भेट  दिले व उपरवाही येथे बचत गटातील महिला आलु चिप्स उद्योगला भेट देऊन कुकुडसाथ येथील महादेव पा.चवले यांच्या शेतातील कुकुटपालन व शेळीपालन ला भेट दिले या पासून होणारा आर्थिक लाभ बद्दल सम्पूर्ण माहिती महिला बचत गटातील उद्योग प्रशिक्षण दौऱ्या मध्ये सामील झाले व महिलाना योग्य मार्गदर्शन करण्यात आले व या दरम्यान PM सर ,श्रीकांत कुंभारे , miss.Astrid pereira मॅडम,अस्मिता बोंडे सिद्धेश्वर जंपलवार,ग्रामसेवक भेंडे , सरपंच तथा BCI FF शंकर तोडासे,उपसरपंच,वासुदेव पा. चापले,व शिक्षकवृंद, गावातील नागरिक, ACF सखी FF असे अनेक गावातील महिला अंबुजा फाउंडेशन अंतर्गत उपरवाही उद्योग प्रशिक्षण दौऱ्या मध्ये सामील झाले.

मुल येथे डिजिटल मीडिया पत्रकाराचे दोन दिवसीय अधिवेशन

इमेज
चंद्रपूर : डिजिटल मीडिया पब्लिशर आणि न्यूज पोर्टल ग्रीव्हन्सेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि डिजिटल मीडिया असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय अधिवेशनात चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील 50 हून अधिक डिजिटल मीडिया पत्रकारांनी स्वयं-नियमन करण्याच्या दिशेने एक अग्रगण्य पाऊल पुढे टाकले. डिजिटल मीडिया पब्लिशर्स आणि न्यूज पोर्टल ग्रीव्हन्सेस कौन्सिल ऑफ इंडिया (DMPNPGCI) चे अध्यक्ष ज्येष्ठ वकील फिरदोस मिर्झा उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात अॅड. मिर्झा यांनी भारतातील पत्रकारितेच्या इतिहासाचा मागोवा घेत सांगितले की, बातम्यांनी केवळ कच्ची माहिती देऊ नये तर ज्ञानही दिले पाहिजे. ते म्हणाले की, डिजिटल मीडिया हा विविध विषयांवर त्वरित माहिती मिळविण्याच्या लोकांच्या भूकेचा परिणाम आहे, परंतु पत्रकारांनी ग्राहकांच्या मागण्या पूर्ण करताना त्यांच्या स्त्रोतांची सत्यता सुनिश्चित केली पाहिजे. पत्रकारांना बदनामी किंवा खंडणीच्या प्रकरणांना सामोरे जावे लागलेल्या प्रकरणांबाबत त्यांनी आपला अनुभव सांगितला. त्यांनी असा सल्ला दिला की जर खरी चूक असेल तर प्रामाणिकपणे माफी मागावी. त्यामु...

जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील-मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

इमेज
जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना किसान क्रेडिट कार्डप्रमाणेच मिळणार क्रेडिट कार्ड* चंद्रपूर, दि.21 नोव्हेंबर:  मत्स्यव्यवसाय विभागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  रामाळा तलाव परीसर येथे जागतिक मत्स्यपालन दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मत्स्यपालन करणाऱ्या बंधू-भगिनींना ऊर्जा देण्यासाठी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या दिवसाची प्रासंगिकता आणि महत्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारची मत्स्यपालन संशोधन संस्था भुवनेश्वर येथे आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही संशोधन संस्था नाही, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात संस्थेची शाखा उघडण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतू त्याठिकाणी मत्स्यसंगोपन करताना अडचणी येतात. धान उत्पादक शेतकऱ्यांना जेव्हा पाण्याची गरज भास...

रोजगार और पुनर्वास की मांग : किसान सभा की अगुआई में सैकड़ों भूविस्थापितों ने फिर किया गेवरा खदान को बंद

इमेज
रोजगार और पुनर्वास की मांग : किसान सभा की अगुआई में सैकड़ों भूविस्थापितों ने फिर किया गेवरा खदान को बंद ===================== गेवरा (कोरबा)। छत्तीसगढ़ किसान सभा और भू विस्थापित रोजगार एकता संघ ने बरसों पुराने भूमि अधिग्रहण के बदले रोजगार व मुआवजा देने, पूर्व में अधिग्रहित जमीन की वापसी, खनन प्रभावित गांवों के बेरोजगारों को नियमित काम देने, शासकीय भूमि पर काबिजों को रोजगार, बसावट एवं मुआवजा देने, महिलाओं को स्वरोजगार देने, पुनर्वास गांव में बसे भू विस्थापितों को काबिज भूमि का पट्टा देने आदि 20 सूत्रीय मांगो को लेकर कल फिर 5 घंटे तक गेवरा खदान बंद करवा दिया। इससे प्रबंधन को करोड़ों रुपयों की क्षति हुई है। पुलिस और प्रबंधन की सख्ती भी आंदोलनकारियों को खदान में घुसने से नही रोक पाई। किसान सभा के प्रशांत झा, जवाहर सिंह कंवर, दीपक साहू, जय कौशिक, रोजगार एकता संघ के दामोदर श्याम, रेशम, रघु, सुमेन्द्र सिंह, दीना के साथ प्रभावित गांवों के भू विस्थापित बहतरीन बाई (पूर्व सरपंच), राहुल जायसवाल, बसंत चौहन, शिवदयाल कंवर, सुभद्रा कंवर, बीर सिंह कंवर, बसंत, कांति, प्रमिला, संजय यादव आदि ने आंदोलन का ...

बेछूट गोळीबार करुन खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांना ५ सातारा गुन्हे शाखेने केले जेरबंद… 🔹 सिसिटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते आरोपी. 🔹 गोलबाग येथे घडला होता गोळीबार

इमेज
    मुंबई /चक्रधर मेश्राम विशेष प्रतिनिधी   : दि.०१/११/२०२२ रोजी रात्री २०.३० वा.च्या सुमारास फिर्यादी दिपक उर्फ आप्पा बबनराव मांढरे हे त्यांचे मित्रांना भेटण्याकरीता गोलबाग सातारा येथे गेले असताना २० ते २५ वयोगटातील तीन इसम तेथे आले व त्यामधील एका इसमाने त्याच्याकडील पिस्तुलातून फिर्यादी यांचेवर बेछुट गोळीबार करुन त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये फिर्यादी हे गंभीर जखमी झाले असून त्याबाबत शाहुपूरी पोलीस पोलीस ठाणे गु.र.नं.३५८/२०२२ भादविक ३०७, ३४ सह आर्म अॅक्ट ३, २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेवून श्री.समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून गुन्हयातील आरोपींना निष्पन्न करुन सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिल्या. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी रमेश गजें, सहायक पोलीस निरीक्षक व श्री.अमित पाटील, पोलीस उपनिरीक्षक यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करुन त्...

बालक दिना निमित्त उमरी पोतदार येथे चाईल्ड से दोस्ती सप्ताह साजरा

इमेज
पोंभूर्णा उमरी पोतदार :- आधुनिक भारताचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती निमित्त बालक दिन साजरा करीत असतो. आणि त्यानिमित्त *चाईल्ड लाईन से दोस्ती* या उपक्रमा अंतर्गत चाईल्ड लाईन १०९८ याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच ० ते १८ वर्ष वयोगटातील अनाथ बालके, निवाऱ्याच्या शोधात असणारे बालके, भिक्षेकरी, बालकामगार, एकपाल्य बालके तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेले बालके आढळल्यास १०९८ या टोल फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन केले. सदर उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांमद्ये वातावरण निर्मिती करून कृतीगीत आणि खेळ, स्पर्धात्मक खेळ, चित्रकला स्पर्धा, नृत्य स्पर्धा, मार्गदर्शन खेळ घेण्यात आली. तसेच यास्पर्धे मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास कोपरा बनविण्याचे आव्हाहन करण्यात आले. चाईल्ड लाईन से दोस्ती या उपक्रमात उपस्थित जि. प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय सतीश कदम सर, सुशील गव्हारे सर, टोंगे सर तसेच चाईल्ड लाईन चंद्रपूरचे केंद्र समन्वयक अभिषेक मोहुर्ले समुपदेशका दिपाली मसराम टीम मेंबर प्रणाली इंदुरकर, कल्पना...

पाटण येथे सोमवारी ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळावा - पाटोदा चे आदर्श सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती

इमेज
तालुका प्रतिनिधी,कृष्णा चव्हाण जिवती :- तालुक्यातील राजीव गांधी महाविद्यालय पाटण येथे दि. 21 नोव्हेंबर ला ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. औरंगाबाद जिल्हातील पाटोदा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच श्री. भास्कररावजी पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शासकीय योजनाबद्दल आणि आदर्श गाव निर्माण कसे करावे या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला आदर्श सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांच्यासह चंद्रपूर चे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरूगानंथम एम (भा. प्र. से.) जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. रेजेवाड साहेब, जिवती नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे सचिव अविनाशजी जाधव यांची उपस्थिती राहणार आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातील व परिसरात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, गावपाटील, पोलीस पाटील, नाईक, कारभारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व जनतेला मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे ...

"डिजिटल मीडिया" शिवाय "डिजिटल इंडियाचे" स्वप्न साकार होणे अशक्य-विजय सिद्धावार

इमेज
दिनांक 19 व 20 नोव्हेंबर 22 रोजी चितेगांव येथील एल्गार प्रतिष्ठाणच्या कॅम्पस मध्ये डिजीटल मिडीया असोसिएशन चंद्रपूर—गडचिरोली जिल्हा व डिजीटल मिडीया पब्लिशर अॅंड न्यूज पोर्टल ग्रीवेंस असोसिएशन आॅफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने दोन दिवसाचे अधिवेशन होत आहे. या निमीत्ताने डिजीटल मिडीया असोसिएशनचे कार्याध्यक्ष विजय सिध्दावार यांनी न्यूज पोर्टलच्या शासन मान्यते बाबत टाकलेला प्रकाश न्यूज पोर्टलला शासनमान्यता! अलिकडे सगळीकडे पोर्टल पत्रकारीता बहरत चालली आहे.  न्यूज पोर्टल तयार करण्यांसाठी, वर्तमानपत्र सुरू करण्याकरीता लागणारी शासनमान्यता, रजिस्ट्रार आॅफ न्युजपेपर फॉर इंडिया ची गरज नसल्यांने व अतिशय कमी पैशात न्यूज पोर्टल तयार करून, 'संपादक, पत्रकार' होण्यांची हौस पूर्ण होत असल्यांने, पोर्टलची संख्या आणि त्यातून पत्रकारांची संख्याही लक्षणीय वाढत आहे. न्यूज पोर्टलकडे सुरूवातील शासनाने दुर्लक्ष केले असले तरी, या पोर्टलमधून काही अपप्रवृत्ती शिरल्यांने यासोबतच याच माध्यमाला भविष्यही असल्यांने शासनाचे लक्षही या माध्यमाकडे वेधल्या गेले. न्यूज पोर्टल हा समाज माध्यमाचाच एक भाग झाला आहे आणि हे म...

ओटीपी द्वारे रचलेला नवीन सापळा सायबरच्या या फ्रॉड पासून सावध व्हा.... ऍड. चैतन्य भंडारी यांचा सावधानतेचा ईशारा ....

इमेज
जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुबंई: बँकिंग व्यवहार संदर्भात आपल्याला आलेला ओटीपी, आपला पिन नम्बर, आपला अकाउंट नंबर, कुणालाही अपरिचित लोकांना देऊ नका. हे बँकांनी सर्वाना सांगून सावध केलं आहे. लोकही त्याबाबत सावध झालेत. त्यामुळे आता फसण्याचे ते प्रमाण बरेच कमी झाले आहे. हि समाधानाची बाब आहे.  मात्र हीच गोष्ट असे फ्रॉड करणाऱ्या हॅकर मंडळींनी देखील ओळखून आता नवीन पद्धत आणली आहे. हा नवीन सापळा आहे. तो नीट समजून घ्या आणि सावध व्हा ! हा सापळा नेमका कसा आहे ?  तुमच्या दाराची बेल वाजते. तुम्ही दार उघडता. समोर एक स्मार्ट व बोलघेवडा डिलिव्हरी बॉय उभा असतो. तो म्हणतो, "तुमचं एक पार्सल आहे. कॅश ऑन डिलेव्हरी आहे. तर हे पार्सल घ्या आणि पैसे द्या" तुम्ही तर कसलीच ऑर्डर केलेली नसते. तरी घरच्यांनी परस्पर केली असेल म्हणून घरच्यांना विचारता. घरचेही म्हणतात की त्यांनी काहीच ऑर्डर केली नाही. मग तुम्ही त्या डिलिव्हरी बॉय ला सांगता, "आम्ही ऑर्डर केली नाहीय. परत घेऊन जा"  त्यावर तो बॉय म्हणतो, ...

कधी येणार अक्कल ???

इमेज
जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई: प्रेमाची व्याख्या बदलत चाललीय, मुंबईची श्रध्दा मदन, आफताब पूनावालाच्या प्रेमात बुडून, घरदार आईवडील सोडून लिव्ह इन मध्ये राहायला गेली, आणि लग्नासाठी मागे लागते म्हणून आफताब ने तिला मारून, तिचे 35 तुकडे करून, ते 300 लिटर च्या नवीन फ्रीज मध्ये साठवून, पुढचे 16 दिवस रोज एक एक तुकडा जवळपासच्याच जंगलात नेऊन टाकला, ह्या विचाराने की प्राण्यांनी खाल्ल्यावर कुणाला जे झालंय ते कळणार नाही. आई वडिलांनी खूप सांगून सुध्दा न ऐकल्याचा इतका भयंकर परिणाम असू शकतो हे श्रध्दा ला कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत कळलं ही नसेल. प्रेम करताना एक लाख वेळा सजगपणे विचार करायला हवाच, की आपलं प्रेम आंधळ नाही ना, डोळ्याला जे दिसतंय तेच सत्य आहे की घरातली मोठी माणसं सांगतायत ते सत्य आहे. एकदा नक्की विचार करायला हवा !!

जागतिक पत्रकार दीना निमित्ताने लिहिलेले पत्रकारिताचे वास्तव:

इमेज
आज पत्रकार दिवस मीडियातील सर्व पत्रकार बंधूंना शुभेच्छा मित्रांनो, आजकाल पत्रकारिता करणे फारच कठीण काम झाले आहे.कारण ज्याची बातमी दिली व ज्याचा विषय मांडला तो प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शत्रू होतो व आपल्यावर डुख-डाव धरून राहतो.वेळप्रसंगी तो आपली चूक शोधत राहतो‌ व खोटानाटा कोणताही गुन्हा टाकण्याचा तो प्रयत्न करतो. काही राजकीय लोक तर नेहमीच आमच्या मागे जाळे लावलेला तयारच असतात.कारण मीडियातील 50 टक्के बातम्या या राजकारणावर असतात व नेत्यांच्या आर्थिक लफड्यांवरच असतात. म्हणून 90% पत्रकार हे केवळ सामान्य बातम्या देऊन मोकळे होतात. जोखमीची बातमी कोणताही पत्रकार सहसा टाळत असतो. म्हणून अतिशय दोन-चार पत्रकारच मोठ्या हिमतीने लिहीत असतात, व्हिडिओ टाकत असतात व शोध पत्रकारिता करून बातम्या देत असतात. बातमीमुळे आमची बदनामी झाली. आमच्याकडून खंडणी मागितली. पेड न्युज दिली.  आमच्याकडून पैसे मागितले.  विरोधकांनी आमच्या मागे तुम्हाला आर्थिक सुपारी देऊन लावले आहे तुम्ही अमुक अमुक पक्षाचीच व मी त्याचीच बाजू घेऊन बातमी देऊन तो लेख लिहितात. हे क्षेत्र असं आहे की उत्पन्न शून्य,पण शत्रुत्व मात्र शंभर टक्के असते. कोळश...

जिवे मारण्याच्या धमक्या देऊन कोळसा वाहतुकदारांकडून अवैध वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा ? हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रशासनाची भुमिका संशयास्पद !

इमेज
चंद्रपूर ( का . प्रति.) चंद्रपूर जिल्ह्यात कोळश्याचा खाणी आहेत, वणी एरिया अंतर्गत येणाऱ्या खाणींमध्ये फार मोठ्या प्रमाणात अफरातफरी होत असल्याचे अनेकदा निदर्शनास येत असते. परंतु आत्तातर चक्क कोळसा ट्रान्सपोर्टिंगचा डिओ असतांना सुद्धा ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडून जिवे मारण्याच्या धमक्या देवून कोळश्याचे ट्रक अडविले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यात हिंदुस्थान लालपेठ कॉलरी प्रशासनाची भुमिका ही संशयास्पद आहे. याविषयी चंद्रपूर शहर पोलिस स्टेशन व सब एरिया मॅनेजर हिंदुस्थान लालपेठ कॉलरी येथे रितसर तक्रार करून ही या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कोणतीच कारवाई केल्या गेली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सविस्तर वृत्त असे की, मनोज धिरीजन गोंड यांचा चंद्रपूर कोळसा यांचा कोळसा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असुन हिंदुस्थान लालपेठ कॉलरीमधून लॉयड मेटल्स घुग्घूस येथे कोळसा ट्रान्सपोर्टिंगचे मनोज गोंड यांना अधिकृत कंत्राट मिळाले आहे. तसा त्यांना डिओ सुद्धा देण्यात आलेला आहे. परंतु हिंदुस्थान लालपेठ कॉलरीच्या चेकपोस्टवर परमिट पावत्या बनविण्याचे काम गुंड प्रवृत्तीच्या राहुल बोल्लम व १० - १२ लोकांनी या ट्रान्सपोर...

अँड गणेश रायकर यांची पुणे येथील रहिवाशी सोसायटीतील कनव्हेन्स डीड बाबत बजावलेली भुमिका व सामान्य जनतेसाठी केलेले योग्य मार्गदर्शन

इमेज
जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पुणे: पुणे येथील नऱ्हे गावात असलेल्या तक्षशिला सोसायटीतील सर्व सदनिका धारकांची कन्व्हेयन्स डीड करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून जुळवा जुळव चालली होती. त्या अनुषंगाने सोसायटीतील सभासदांनी या क्षेत्रातील कायदेशीर बाबींचा दीर्घ अनुभव असलेले अँड गणेश रायकर यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला सोसायटीतील सभासदांच्या मनामध्ये कन्व्हेयन्स डीड बाबत अनेक प्रश्न होते ज्यांचे निवारणासाठी त्यांनी सोसायटीतच एक बैठक बोलावली.   सोसायटीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सभासदांनी कनव्हेन्स डीड बाबत विविध प्रश्न विचारले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि नाजूक मुद्दा होता तो म्हणजे प्रपोज एफ.एस.आय संदर्भ मधला कारण कन्व्हेयन्स डीड होत असताना सोसायटीला एफएसआय किती हस्तांतरित होणार ह्यावरून सभासदांमध्ये मतभेद असतात, तसेच या विषयाची कायदेशीर माहिती सभासदांना नसते, त्यामुळे एफएसआय ह्या विषयावरती  कायदेशीर मार्गदर्शन या बैठकीमध्ये सर्व सभासदांना एडवोकेट गणेश रायकर यांनी दिले. तसेच काही सोसायटी आणि ग्राम...

अँड गणेश रायकर यांची पुणे येथील रहिवाशी सोसायटीतील कनव्हेन्स डीड बाबत बजावलेली भुमिका व सामान्य जनतेसाठी केलेले योग्य मार्गदर्शन

अँड गणेश रायकर यांची पुणे येथील रहिवाशी सोसायटीतील कनव्हेन्स डीड बाबत बजावलेली भुमिका व सामान्य जनतेसाठी केलेले योग्य मार्गदर्शन जगदीश का. काशिकर,  कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ पुणे: पुणे येथील नऱ्हे गावात असलेल्या तक्षशिला सोसायटीतील सर्व सदनिका धारकांची कन्व्हेयन्स डीड करण्यासाठी बऱ्याच वर्षापासून जुळवा जुळव चालली होती. त्या अनुषंगाने सोसायटीतील सभासदांनी या क्षेत्रातील कायदेशीर बाबींचा दीर्घ अनुभव असलेले अँड गणेश रायकर यांच्याशी संपर्क साधला. सुरुवातीला सोसायटीतील सभासदांच्या मनामध्ये कन्व्हेयन्स डीड बाबत अनेक प्रश्न होते ज्यांचे निवारणासाठी त्यांनी सोसायटीतच एक बैठक बोलावली.   सोसायटीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सभासदांनी कनव्हेन्स डीड बाबत विविध प्रश्न विचारले. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि नाजूक मुद्दा होता तो म्हणजे प्रपोज एफ.एस.आय संदर्भ मधला कारण कन्व्हेयन्स डीड होत असताना सोसायटीला एफएसआय किती हस्तांतरित होणार ह्यावरून सभासदांमध्ये मतभेद असतात, तसेच या विषयाची कायदेशीर माहिती सभासदांना नसते, त्यामुळे ए...
इमेज
चंद्रपूर -किरण घाटे - आदिवासी समाज हा चंद्रपूर जिल्हाचा गौरव आहे. या समाजाने देशासाठी दिलेले योगदान अमुल्य आहे. आज शहिद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेसूर शेडमाके राजगोंड सामाजिक सभागृहाच्या बांधकामाची सुरुवात होत असल्याचा आनंद आहे. तयार होत असलेले हे सामाजिक भवन समाजाच्या सक्षमीकरणाचे, पारंपरिक, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांसह क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा गौरवशाली इतिहास समाजापर्यंत पोहचविणारे केंद्र ठरेल असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.    25 लक्ष रुपयांच्या स्थानिक आमदार निधीतून मुल रोड येथील श्रध्दा सुमन अर्पण स्थळ येथे मंजुर शहीद स्वातंत्र्यवीर बाबुराव पुलेसुर शेडमाके राजगोंड सामाजिक सभागृहाचे आमदार जोरगेवार यांच्या हस्ते भुमिपुजन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरेंद्रशाहा आश्राम, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लाॅ, फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष शांताराम उईके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजयसिंह मडावी, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष बापुजी मडावी, गोंडियन सामाजिक सहाय्यता कल्यान संस्थाचे अध्यक्ष सुधाकर कन्नाके, उर्जानगर ग्रामपंचायत सदस्या मिनीषा इरपा...