पोंभुरणा तालुक्यात रेती तस्करी जोमात! प्रशासन कोमात - माजी शिवसेना तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे

जिवनदास गेडाम:-पोंभूरणा तालुक्यातील मोहाळा, भीमणी, बलारपूर इत्यादी रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा व वाहतूक सुरू आहे. दिवस रात्र रेतीचा उपसा करून चोरी करणारे गब्बर झाले आहेत. तालुक्यात सध्या रेतीचे दर गगनाला भिडले असून घरकुल च्या बांधकामा करिता रेतीचा प्रश्न आवासून उभा आहे. सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेती तस्करांवर आळा बसवण्यासाठी विधानसभेत घोषणा केली.घाटांचे लिलाव बंद करून साडेसहाशे रुपयात घरपोच वाळू मिळेल असे सरकारने जाहीर केले. मात्र त्यांच्या या निर्णयाचे तालुक्यात पालन आणि अंमलबजावणी होताना दिसत नसून मोठ्या प्रमाणात हायवा ट्रक व इतर साधनांनी रेती चोरी होत असताना प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शिवसेना माजी तालुकाप्रमुख दत्तू भाऊ मोरे यांनी केला आहे. घाटांचे लिलाव झाले नसताना सुद्धा मोठ्या प्रमाणात घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे. तालुक्यात रेतीची तस्करी जाेमात तर महसूल प्रशासन कोमात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण! पोंभुर्णा तालुक्या...