पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तालुक्यातील आदिवासी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून वंचित

इमेज
पोभुर्णा : तालुक्यातील आदिवासी लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभापासून मागील पाच महिन्यांपासून वंचित असल्याने अनुसूचित जमाती लाभार्थ्यांची वाताहात होऊन उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने अलीकडच्या काळात आर्थिक दृष्ट्या दृबर्ल, अपंग, निराधार,विधवा, सिकलसेल इत्यादी लोकांना संजय गांधी निराधार योजना सुरू करुन हित जोपासले गेले. परंतु सदर योजनेत केवळ आदीवासी प्रवर्गात मोडत असलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान अडवून ठेवल्याने आदीवासी लाभार्थ्यांना संध्याकाळची चुल पेटवने अवघड बाब झाली आहे.  पाच महिन्यांपासून मानधन लापता असल्याने लाभार्थ्यांत रोष निर्माण होऊन मायबाप आम्ही कसे जीवन जगायचे अशी आर्त हाक कानावर पडत आहे. तेव्हा पालकमंत्री महोदयांनी याकडे लक्ष केंद्रित करून आदीवासी निराधार लाभार्थ्यांना अनुदानासाठी योग्यती कारवाई करावी अशी मागणी आदीवासी निराधार लाभार्थ्यांकडुन करण्यात येत आहे.

भूमी अभिलेख कार्यालयातील बेजबाबदार, कर्तव्यशुन्य, कामचुकार, व्यसनाधिन, लाचखोर कर्मचारी जाधव यांची बदली करा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी

इमेज
भूमी अभिलेख कार्यालयातील बेजबाबदार, कर्तव्यशुन्य, कामचुकार, व्यसनाधिन, लाचखोर कर्मचारी जाधव यांची बदली करा - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी पोंभुर्णा:तालुका भुमि अभिलेख कार्यालय पोंभूर्णा येथे कार्यरत असलेले शिरस्तेदार श्री. ता. बा. जाधव आहेत. यांच्याकडे कार्यालयामधून नक्कल पुरविणे व त्यावर स्वाक्षरी करण्याची जबाबदारी आहे. परंतु हे कायम स्वरुपी कित्येक दिवस वारंवार गैरहजर असतात. ज्या दिवशी कार्यालयात हजर असतात तेव्हा ते दारु पिऊन नशेत तर्र असतात. त्यामुळे कार्यालयात आलेल्या शेतकरी व विद्यार्थीसोबत अशम्य व अशोभनीय कृत्य करतात. नागरीकांना विहीत मुदतीत नक्कल मिळत नाही. ज्या नागरीकांना नक्कल पुरविण्यात येते त्या नागरीकाकडून ते नेहमी लाच मागत असतात. कार्यालयात बायोमेट्रीक हजेरी नसल्याने त्याचा ते गैरफायदा घेऊन शासनाचे लाखो रुपयाचे दर महिन्याचे पूर्ण वेतन उचल करून शासनाची दिशाभुल करीत आहेत. यावर कोणत्याही कर्मचारी व संबंधीत अधिकाऱ्याचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांना मुलांच्या शिक्षणाकरीता, घरकुलाच्या कामाकरीता व शेतीची दस्तऐवज त...

पत्रकार जीवनदास गेडाम रस्ता अपघातात गंभीर जखमी

इमेज
पत्रकार जीवनदास गेडाम रस्ता अपघातात गंभीर जखमी चंद्रपूर: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे चंद्रपूर जिल्हा महासचिव आणि दैनिक चंद्रपूर समाचार चे विशेष प्रतिनिधी जीवन यांचा बुधवारी रस्ता अपघात झाला. या अपघातात त्यांच्या कमरेला जोरदार झाली असून त्यांना उठता बसता हालचाल करता येत नाही. त्यांना चंद्रपूर येथील करण्यात आल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.

पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया!* *‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन* *उत्तम आयोजनाबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक*

इमेज
*पंचप्रण शपथेतून चंद्रपूरला प्रगत करण्याचा संकल्प करुया!* *‘मेरी माटी मेरा देश’ कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन* *उत्तम आयोजनाबद्दल जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक* *चंद्रपूर, दि. २४* : देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप ‘मेरी माटी मेरा देश’ (माझी माती माझा देश) या अभिनव उपक्रमातून होत आहे. भारतमाता आणि या देशाच्या मातीचे आपल्यावर नेहमीच ऋण राहिले आहे. त्यामुळे आता मातेसोबत मातीच्याही रक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. आज आपण माती हातात घेऊन पंचप्रण शपथ घेतली. ही केवळ शपथ नसून या माध्यमातून चंद्रपुरला देशात सर्वांत प्रगत जिल्हा म्हणून नावलौकीक मिळवून देण्याचा आपण संकल्प करुया, असे आवाहन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. बल्लारपूर मार्गावरील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम उद्यान येथे ‘मेरी माटी मेरा देश’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचा समारोप झाला. त्यावेळी ना. श्री. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, वनविकास महामंडळाचे माजी अ...

ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

इमेज
ट्विंकल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश* * अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभिड----क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत,,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद चंद्रपूर द्वारे आयोजित तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा क्रीडा संकुल नागभीड येथे घेण्यात आली नुकतीच आंतर शालेय बुद्धिबळ स्पर्धा 18/08/2023 शुक्रवार ला क्रीडा संकुल नागभीड येथे घेण्यात आली. या स्पर्धेत नागभीड तालुक्यातून सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत टिंकल इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी साहिल सलामे (प्रथम क्रमांक), अनिकेत टेकाम (प्रथम क्रमांक), हर्षल सलामे (प्रथम क्रमांक) यांनी प्राप्त केले. या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना टिंकल इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा, मुख्याध्यापिका सौ शुभांगी पोहेकर, मुख्याध्यापिका संगीता नारनवरे, तसेच शारीरिक शिक्षक महेश जिभकाटे, गणेश लांजेवार, रूपा ताडूलवार व सर्वस्वी शिक्षक वृंद यांनी पुढच्या वाटचाली करीता खूप खूप शुभेच्छा दिल्या...

जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत सुधांशु मेश्रामची निवड.

इमेज
जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेत सुधांशु मेश्रामची निवड. =================== गडचिरोली / प्रतिनिधी दि.22 आगष्ट 2023:- आरमोरी येथील पॅराडाइज इंग्लिश मिडियम स्कूलचा वर्ग १० मध्ये शिकत असलेल्या सुधांशु चक्रधर मेश्राम या विध्यार्थ्यांची गडचिरोली जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.. आरमोरी येथे तालुका स्तरीय स्पर्धेत प्रावीण्य मिळविल्यानंतर जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. आपल्या यशाचे श्रेय आई - वडील , मोठे बंधू प्रबुद्ध मेश्राम , बुध्दिबळ खेळाचे शिक्षक , विशाल सपाटे यांना दिले. पॅराडाईज इंग्लिश मिडियम स्कूल मधुन निवड करण्यात आलेला सुधांशु मेश्राम हा एकमेव विध्यार्थी आहे. जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल मित्रमंडळींनी पुढील यशस्वितेसाठी शुभेच्छा दिल्या.

22 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना

इमेज
22 ऑगस्ट या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना सन 1639 साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तामिळनाडू राज्याची राजधानी मद्रास शहराची स्थापना केली. सन 1902 साली युनायटेड स्टेट येथील केडीलेक मोटार कंपनीची स्थापना करण्यात आली. सन 1921 साली महात्मा गांधींनी विदेशी वस्त्रांची होळी पेटवली.

मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गतविवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

इमेज
  विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय बेंबाळ येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयात ९ आगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान रा.से. यों. विभागामार्फत का.प्राचार्य कमल एन. हिरादेवे यांच्या मार्गदर्शनात  मेरी माती मेरा देश अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात महाविद्यालय तसेच ग्रामपंचायत बेंबाळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचप्राण शपथ घेण्यात आली. तसेच विविध फळ झाडे व फुल झाडांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष मा.सुरेशराव अहिरकर, सहसचिव तुकारामजी पेटकुले, मा. मुकुंदाजी वाढई, मा. नात्थुरावजी आरेकर, चिंतामणजी तिमाडे,दिपकजी वाढई, बेबाळ चे सरपंच मा.चांगदेव केमेकर , उपसरपंच मा.देवाजी ध्यानबोईवार ,ग्रामसेवक उमेशजी आक्कुलावर तसेच समस्त ग्रामपंचायत सदस्य,कार्यक्रम अधिकारी प्रा.सोनाली उमक,प्रा.सोनुले,प्रा चव्हाण,प्रा देशमुख,प्रा भासरकर,प्रा रामटेके तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थितीत होते.

CDCC बँकेच्या नांदगाव शाखेतून मिळाली नकली पाचशेची नोट !

CDCC बँकेच्या नांदगाव शाखेतून मिळाली नकली पाचशेची नोट ! मूल/ प्रतिनिधी    चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक दरवर्षी लाखो रुपये खर्च करून अद्यावत मशनरी खरेदी करीत असते. एवढे असताना बँकेच्या मूल तालुक्यातील नांदगाव शाखेतून बेंबाळ येथील एका शिक्षकानी काही रक्कम काढली व ती रक्कम मूल येथील भारतीय स्टेट बँकेत भरण्यास गेले असता त्यातील एक पाचशेची नोट मशीन द्वारे नकली निघाली. यावरून पाचशेच्या नकली नोटांचा सुळसुळाट जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिसुन येत असल्याने बँकेच्या कार्यशैलीवर शंका व्यक्त केली जात आहे. शेतकरी व सर्वसामान्यांची बँक म्हणुन  चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नाव घेतले जाते. बँकेची उलाढाल बघता व्यवहार जलद गतीने व्हावा यासाठी लाखो रुपये खर्च करून दरवर्षी अद्यावत मशनरी खरेदी केल्या जात आहे. त्या मशनरीच्या साह्याने नोंटाची स्कांनिग व मोजणी केली जाते. त्यामुळे बँकेत जवळ असलेल्या नोटा ह्या खऱ्या असणे अपेक्षित असते. माञ  बेंबाळ येथील शिक्षकानी मूल तालुक्यातील बँकेच्या नांदगांव शाखेतून रक्कम काढून ती रक्कम मूल येथील भारतीय स्टेट बँकेत जमा करण्यास गेले असता स्का...

वैनगंगा नदी ला पाचव्यांदा पुर

 वैनगंगा नदी ला पाचव्यांदा पुर आल्यामुळे जुनगावची रहदारी बंद झाली आहे.

तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर थांबली! जुनगाव येथील तरुण राकेश गेडेकर यांचे निधन

इमेज
तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर थांबली! जुनगाव येथील तरुण राकेश गेडेकर यांचे निधन जुनगाव: मागील वर्षी जुनगाव येथील राकेश मारुती गेडेकर या तरुणाला कॅन्सर या जीवघेण्या आजाराने घेरले. तेव्हापासूनच त्याचे नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना आराम वाटू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना सुट्टी देऊन घरी पाठवले होते. मात्र देवाच्या मनात काही वेगळेच असावे म्हणून की काय?ते घरी आल्यानंतर पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. त्यांच्या तब्येतीसाठी नागपूरची वारी सततची सुरूच होती. परंतु आज दिनांक 16 ऑगस्ट 2023 रोजी पहाटे चार वाजता चे सुमारास त्यांची मृत्यूची झुंज थांबली आणि गावात एकच शोक कळा पसरली. राकेश गेडेकर वय तीस वर्ष या तरुणाचा त्यांचे राहते घरीच मृत्यू झाला. राकेश हा तरुण मनमिळावू, सर्वांशी खेळीमेळीने आणि मित्रत्वाने वागणारा असल्यामुळे सर्वांचा चाहता होता. त्याचा चाहता वर्ग गावात मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्या निनाची वार्ता पसरतात गावात हळ - हळ व्यक्त करून शोक व्यक्त केला जात आहे. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्यावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या तरुणाचा दोन वर्षांपूर...

स्वातंत्र्य दिनानिमित्त नागाळा येथे वृक्षारोपण करून क्रांतिकारकांना अभिवादन

इमेज
स्वातंत्र्य दिनानिमित्त नागाळा येथे वृक्षारोपण करून क्रांतिकारकांना अभिवादन चंद्रपूर: अनेक थोर महापुरुष क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या सर्व महापुरुष क्रांतिकारकांना अभिवादन करत नागाडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी वृक्षारोपण कार्यक्रम केला. याप्रसंगी विकास विरुटकर शिवसेना तालुका समन्वयक,नागाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच सुरज सातपुते आणि शिवसैनिक उपस्थित होते.

देवाडा बुज येथे सोसायटी काॅमन सर्विस सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न

इमेज
पोभुर्णा : तालुक्यातील देवाडा बुज येथील सेवा सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून काॅमन सर्विस सेंटर चा नुकताच उद्घाटन सोहळा आटोपून त्याचा शुभारंभ करण्यात आला.काॅमन सर्विस सेंटरचे उद्घाटन पोभुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा सोसायटीचे अध्यक्ष रवी भाऊ मरपलीवार यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर व इतर जनतेला शासकीय सोयी सुविधा उपलब्ध करून त्यांची गैरसोय टाळणयात यावी तसेच सहकार्यातून समृद्धीकडे जनतेला वाटचाल करण्यात यावी ह्या उदात हेतुने काॅमन सर्विस सेंटरचा श्रीगणेशा करण्यात आला. सर्विस सेंटर मध्ये चारशे प्रकारच्या सरकारी व गैरसरकारी आँनलाईन सेवा बँकींग इन्शुरन्स, आरोग्य विषयक सेवा ,माती परीक्षण सेवा कृषी औजारे बँक , रासायनिक खते बियाणे किटकनाशके विक्री पशुखाद्य विक्री दुध सेवा केंद्र, शेतमाल खरेदी व विविध प्रकारचे उद्योग इत्यादी सर्विस दिल्या जाते. यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे उपाध्यक्ष पांडुरंग पाल सहकार अधिकारी डी टी सरपाते ,गटसचिव निखिल तिमांडे ,दिलीप नागपुरे तसेच सोसायटीचे संचालक दादाजी व्याहाडकर मनोहर कटकमवार नोमाजी चुदरी रूषिदेव अर्जुनकर , काशिनाथ येरम...

नांदगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा ‌ ‌‌

इमेज
नांदगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा  ‌  ‌‌ मुल तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामपंचायत मध्ये सरपंच कुमारी हिमानी दशरथ वाकुडकर यांचे हस्ते ध्वजारोहण पार पडला. यावेळी गावातील संपूर्ण शाळेचे शिक्षक विद्यार्थी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर गावातील पोलीस विभागात कार्यरत असणाऱ्या विविध पदावरील अधिकारी,कर्मचारी यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना शाल, श्रीफळ देऊन ग्रामपंचायत तर्फे सत्कार करण्यात आला.  सकाळी सात वाजता सर्वप्रथम जि प प्राथ. नांदगाव येथील ध्वजारोहण शाळा समितीचे अध्यक्ष चेतन जाधव यांच्या हस्ते पार पडले. तदनंतर जि प हायस्कूलचे ध्वजारोहण तेथील मुख्याध्यापकाचे हस्ते पार पडले. तसेच जनसेवा कनिष्ठ महाविद्यालयाचा ध्वजारोहण कार्यक्रम मुरकुटे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला.  यावेळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली.

जुनगाव जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा🌹

इमेज
जुनगाव जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा सरपंच उपसरपंच व मान्यवरांची उपस्थिती, विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट भाषणे केली पोंभुर्णा: तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जुनगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून रॅली काढून भारत माता की जय, अशा अनेक गगनभेदी घोषणा देत प्रभात फेरी काढली. सर्वप्रथम रॅली गावातील ग्रामपंचायत भावना समोर आल्यानंतर तिथे ग्रामपंचायत कार्यालयाचा ध्वज फडकविण्यात आला. सरपंच पूनम ताई राहुल चुधरी यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वज फडकवला. त्यानंतर शाळा पटांगणात "मेरी माटी मेरा देश" या अभियाना अंतर्गत शीला फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सरपंच पुनम ताई चुधरी, उपसरपंच व भाजपचे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा होमिकाताई मशाखेत्री, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रफुल चुधरी, पत्रकार व माजी सरपंच जीवनदास गेडाम, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष देवराव आभारे, शाळा व्यवस्थापन समितीचे सद...

जाम तुकूम येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत शिलाफलकाचे अनावरण

इमेज
जाम तुकूम येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत शिलाफलकाचे अनावरण पोंभुर्णा: तालुक्यात सर्वत्र आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत मेरी माटी मेरा देश हा उपक्रम मोठ्या प्रमाणात प्रत्येक ग्रामपंचायतीत राबवल्या जात आहे. मेरी माटी मेरा देश अभियाना अंतर्गत जामतुकुम येथील ग्रामपंचायत येथे भालचंद्र जी शंकरराव बोधलकर सरपंच यांच्या हस्ते शीला फलकाचे अनावरण करण्यात आले. या अभियाना निमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. दिनांक 14 ऑगस्ट रोजी शीला फलकाच्या अनावरांना प्रसंगी विविध उपक्रम राबवण्यात आले. याप्रसंगी ग्रामपंचायतचे सचिव श्री टी एन शेंडे साहेब ,त्याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी आणि गावातील नागरिक उपस्थित होते. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर

इमेज
विचारज्योत फाऊंडेशन तर्फे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर चंद्रपूरचा तैतील बट्टे प्रथम तर नागपूरची प्रगती खोब्रागडे द्वितीय चंद्रपुर: विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय ऑनलाईन सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल विचारज्योत फाऊंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनी म्हणजे १२ ऑगस्ट २०२३ रोजी ऑनलाईन घोषित करण्यात आला. यामध्ये चंद्रपूरच्या तैतील कालिदास बट्टे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर नागपूरच्या कु. प्रगती खुशाल खोब्रागडे यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला तृतीय क्रमांक गणेश सोमाजी श्रीरामे यांनी पटकाविला. राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा ही भारतीय संविधान, चालू घडामोडी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्लिश, बुद्धिमत्ता, इतिहास या विषयावर रविवार, दि. ६ ऑगस्ट २०२३ रोजी गूगल फार्मद्वारे घेण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील तब्बल ४७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रोत्साहनपर क्रमांक रविंद्र बापन्ना भंडारवार, शेख इरफान इकबाल, विवेक मुलावकर, भास्कर गंगाधर ताजने, संतोष मोतीराम बट्टे ...

हृदय पिळवटून टाकणारी घटना, पत्नी आणि चिमुकलीचा अपघातात मृत्यू। राजुरा तालुक्यातील दुर्दैवी घटना

इमेज
हृदय पिळवटून टाकणारी घटना, पत्नी आणि चिमुकलीचा अपघातात मृत्यू। राजुरा तालुक्यातील दुर्दैवी घटना चंद्रपूर: दुचाकी ने आपल्या गावाकडे परत येत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील पती-पत्नी आणि एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदय द्रावक दुर्घटना शनिवारी रात्री रात्री आठच्या सुमारास राजुरा तालुक्यातील धोपताडा गावाजवळ घडली. निलेश वैद्य वय 32 वर्ष ,रूपाली वैद्य व 26 वर्ष, मधु वैद्य, वय तीन वर्ष, राहणार धोपटाळा तालुका राजुरा असे अपघातातील मृत्यू पावलेल्या दुर्दैवी पती-पत्नी आणि चिमुकलीची नावे आहेत.