पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

यवतमाळमध्ये ट्रक आणि इनोव्हाची जोरदार धडक,4 जागीच मृत्यू :गुरुद्वाराला दर्शनासाठी निघाले होते शीख कुटुंब, कारचा पूर्णपणे चुराडा

इमेज
यवतमाळमध्ये ट्रक आणि इनोव्हाची जोरदार धडक,4 जागीच मृत्यू :गुरुद्वाराला दर्शनासाठी निघाले होते शीख कुटुंब, कारचा पूर्णपणे चुराडा ब्युरो रिपोर्ट दरारा 24 तास यवतमाळ : अपघातांचे सत्र सुरूच आहे. यवतमाळ जिल्ह्यात इनोव्हा आणि ट्रकची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी पहाटे यवतमाळ -नागपूर महामार्गावरील चापरडा गावाजवळ हा अपघात झाला आहे. - दरारा 24 तास न्युज नेटवर्क नांदेडला गुरुद्वाराला निघाले होते शीख कुटुंब मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब येथील शीख कुटूंब दर्शनाला नांदेड येथील गुरुद्वाराला दर्शनाला जात असताना हा अपघात झाला आहे. यवतमाळ-नागपूर महामार्गावर एका इनोव्हा गाडीतून हे शीख कुटुंब प्रवास करत होते. त्यांची इनोव्हा कार चारपडा गावाजवळ असताना गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार समोर असलेल्या ट्रकवर जोरात जाऊन आदळली. कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर दरम्यान, ही धडक इतकी जोरदार होती की, इनोव्हा कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. इनोव्ह...

मच्छीमाराचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू। घाटकुळ येथील घटना ⭐ मृतक गडचिरोली जिल्ह्यातील, कुटुंबाचा आधार हरपला

इमेज
मच्छीमाराचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू। घाटकुळ येथील घटना मृतक गडचिरोली जिल्ह्यातील, कुटुंबाचा आधार हरपला जुनगाव: येथून दक्षिण दिशेला काही अंतरावर असलेल्या घाटकुळ येथील वैनगंगा नदीत मच्छी मारण्याकरिता गेलेल्या मच्छीमाराचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी रविवारी आठच्या सुमारास उघडकीस आली. शालिक मंडल वय वर्षे चाळीस, राहणार दुर्गापूर,तालुका चामोर्शी असे बुडून मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील दुर्गापुर येथील सात ते आठ मच्छिमार बांधव घाटकुळ येथील वैनगंगा नदी पात्रात उतरले. मात्र यातील एक जण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडाला. घटनेची माहिती गावात होताच नदीकडे लोकांनी धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर गोंडपिपरी पोलीस घटनास्थळावर दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली. अथक प्रयत्नानंतर दुपारी तीन वाजता मृतदेह हाती लागला.  पोलिसांनी मर्ग दाखल करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता गोंडपिपरी येथे पाठवण्यात आला. या घटनेमुळे कुटुंब उघड्यावर आले असून कुटुंबाचा आधारवड हरपला अशी दुर्गापुर या ...

महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-म लाडकी बहीण" योजना सुरु करण्य मान्यता

इमेज
महाराष्ट्र राज्यात "मुख्यमंत्री-म लाडकी बहीण" योजना सुरु करण्य मान्यता दरारा 24 तास  मुंबई:- महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग. शासन निर्णय क्रमांक- मबावि २०२४/प्र.क्र.९६/कार्या-२, नवीन प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक:-२८ जून, २०२४. प्रस्तावना :- महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाणे ५० पेक्षा जास्त आहे. तसेच राज्यात श्रमबल पाहणीनुसार पुरुषांची रोजगाराची टक्केवारी ५९.१० टक्के व स्त्रीयांची टक्केवारी २८.७० ट इतकी आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महिलांच्या आर्थिक, आरोग्य परिस्थितीमध्ये सुधारणा क आवश्यक आहे. मुंबई:- महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योज राबविण्यात येत आहेत. महिलांचा श्रम सहभाग पुरुषांच्या तुलनेत कमी आहे, ज्यामुळे त्यांच्या आडि स्वातंत्र्यावर परिणाम होतो. सदर परिस्थिती लक्षात घेऊन, राज्यातील महिलांच्या आि स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णा भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची...

काँग्रेसच्या आभार सभेत विधानसभा जिंकण्याचा निर्धार ⭐ घनश्याम मूलचंदानी , विनोद अहिरकरांची रणनीती! बैठकीला तीनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती

इमेज
काँग्रेसच्या आभार सभेत विधानसभा जिंकण्याचा निर्धार घनश्याम मुलचंदानी,विनोद अहिरकरांची रणनीती! बैठकीला तीनशे पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती चंद्रपूर: बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील पळसगाव वांढरवाडी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. बैठकीला पळसगाव, मानोरा, इटोली, कोठारी, आंमडी, कोर्टी मक्ता, गिलबिली, कळमगाव आदी गावातील जवळपास 300 हून जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. सदर बैठकीचे नेतृत्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम मूलचंदानी, ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद अहिरकर, गोविंदा उपरे यांनी केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या व इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रतिभाताई धानोरकर यांना या क्षेत्रातून प्रचंड मताधिक्याने मतदान करून विजय संपादन करून दिल्याबद्दल पळसगाव- कोठारी जि ल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने काम करून पक्षाला विजय संपादन करून दिला त्याच पद्धतीने पुढील येणारी विधानसभा...

ओम बिर्ला पुन्हा स्पीकर होणार, 11.30 वाजता नामांकन

इमेज
ओम बिर्ला पुन्हा स्पीकर होणार, 11.30 वाजता नामांकन दरारा 24 तास न्युज नेटवर्क नवी दिल्ली:- सभापतीपदासाठी विरोधक आणि विरोधी पक्षांमध्ये एकमत झाल्यानंतर आता नव्या सभापतींचे नावही समोर आले आहे. माजी स्पीकर ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा स्पीकर बनवण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ते 11.30 वाजता सभापतीपदासाठी अर्ज दाखल करतील. मात्र, विरोधकांनी उपसभापतीपदाची मागणी केली आहे. यासाठी सरकार तयार असल्याचे मानले जात आहे.

लोकसभा अध्यक्षांबाबत एकमत झाले

इमेज
लोकसभा अध्यक्षांबाबत एकमत झाले दरारा 24 तास न्युज नेटवर्क नवी दिल्ली:- लोकसभा अध्यक्षांबाबत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामंजस्य करार झाला आहे. राजनाथ आणि किरेन रिजिजू यांनी विरोधी पक्षांशी चर्चा केली, त्यानंतर विरोधकांनी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. ओम बिर्ला यांनाच पुन्हा लोकसभेचे अध्यक्ष केले जाऊ शकते, तर उपसभापतीपद विरोधकांकडे जाऊ शकते, असे सांगण्यात येत आहे.

वादळी पावसामुळे मौजा - बाबराळा येथील जल शुद्धीकरण संयंत्र उडाले.

इमेज
वादळी पावसामुळे मौजा - बाबराळा येथील जल शुद्धीकरण संयंत्र उडाले. (विजय जाधव): मुल तालुक्यातील मौजा - बाबराळा, येथे 22 जून रोजी सायंकाळी 05.30 च्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे मौजा बाबराला येथील WSSO - RO (जलशुद्धीकरण संयंत्र) संपूर्ण उडून गेल्यामुळे जलशुद्धीकरण संयंत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झाले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.  जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामीण भागात वादळ वाऱ्याचा जोरदार तडाखा बसला असून अनेक झाडे व घरावरील छत्रे पत्रे उडून गेली आहेत.

पोंभूर्णा येथे शिवसेनेतर्फे "सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा" कार्यक्रम संपन्न

इमेज
*पोंभूर्णा येथे शिवसेनेतर्फे "सन्मान महिलांचा, खेळ पैठणीचा" कार्यक्रम संपन्न.* दरारा 24 तास न्युज नेटवर्क पोंभूर्णा: येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप भाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात सन्मान महिलांचा खेळ पैठणीचा सन्मान स्त्री कर्तुत्वाचा कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्सवात सप्नन झाला. या कार्यक्रमाला सौ. मनस्वीताई संदिप गिऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती तर शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटीका सौ. कल्पनाताई घारगोटे,महिला आघाडी तालुका प्रमुख तथा आष्टाचे सरपंच सौ.किरणताई डाखरे,नगरसेविका सौ.रामेश्वरी वासलवार, सौ.कांताबाई मेश्राम, सौ.ललिताताई कोवे,श्रीमंती भावीकाताई मडावी, सौ. अर्जणाताई कोसरे सौ. सोनिताई मानकर, सौ. रेखाताई निमगडे, सौ. रोषनीताई देवतळे, सौ. सूनिताताई गोरंतवार, सौ. मिनाताई इप्पलवार सौ. रजनाताई कोटरंगे, सौ.अर्जना गिरसावडे, सौ.सुनीता कुनघाडकर, सौ. मीनाताई ढोले, सौ.मगलाताई कांनपेलीवार, व आदी महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध खेळ घेण्यात आले संगीत खुर्ची,लिंबू चमचा, पोत्या वरील उड्या,दोन प...

पोंभूर्णात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुथ प्रमुखांची बैठक संपन्न

इमेज
पोंभूर्णात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बुथ प्रमुखांची बैठक संपन्न पोंभूर्णा: पोंभूर्णा येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या बुध व बिएलओ प्रमुखांची बैठक संत जगनाडे महाराज सभागृह येते घेण्यात आली. यावेळी तालुक्यातील ५१ बुध प्रमुख व बिएलओ प्रमुखांची व गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.  आगामी विधानसभा निवडणुकीच्यां अनुषंगाने शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी बुध, बिएलओ व गावप्रमुखांना सर्वांना पक्ष संघटन विस्तार व बुध सक्षम करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी तालुका प्रमुख तथा नगर पंचायतचे विरोधी पक्षनेता आशिष कावटवार व शहर प्रमुख तथा नगरसेवक गणेश वासलवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तालुक्यातील प्रत्येक गावात,वार्डात,प्रभागात शिवसेनेचा कार्य,चिन्ह पोहचवा व समस्या विरुध्द उठाव करा शिवसेनेचा ब्रीद ८०% समाजकारण व २०% राजकारण या प्रमाणे करा असे बैठकीत आवाहन करण्यात आले.यावेळी नगरसेवक बालाजी मेश्राम,युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार, उपतालुका प्रमुख रवींद...

*⭕गळळफास घेऊन तरुणाची आत्महत्या! मुल तालुक्यातील घटना*

इमेज
*⭕गळळफास घेऊन तरुणाची आत्महत्या! मुल तालुक्यातील घटना* दरारा 24 तास न्युज नेटवर्क विजय जाधव (तालुका प्रतिनिधी) मूल:- तालुक्यातील चितेगाव येथे गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना आज 22 जुन रोजी शनिवारला सकाळी उघडकीस आली. दिलीप वसंत कुमरे वय वर्षे 48 असे फाशी लागून आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक दिलीप कुमरे हा ट्रक चालक होता. तो कालपासून घरून निघून गेला होता. आज सकाळी चितेगाव बस स्थानकालगत एका झाडाला फाशी लागून असल्याचे निदर्शनास आले.  ही घटना गावात पसरतात गावकऱ्यांनी बघण्याकरिता गावकऱ्यांनी गर्दी केली होती. त्यानंतर घटनेची माहिती मुल पोलीस स्टेशनला देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह मूल येथिल उपजिल्हा रुग्णालयात छवविच्छेदन व तपासणी करिता नेण्यात आले आहे. मात्र आत्महत्येचे गुढ गुलदस्त्यात आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनात मूल पोलीस करीत आहे.

जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी याआधी तिहेरी हत्याकांडाने हादरलेल्या मौशी गावात पुन्हा थरार

इमेज
जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी याआधी तिहेरी हत्याकांडाने हादरलेल्या मौशी गावात पुन्हा थरार दरारा 24 तास (चंद्रपूर): जादूटोण्याच्या संशयातून तालुक्यातील मौशी येथील एका वृद्धाच्या झालेल्या हत्येप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. आसाराम सदाशिव दोनाडकर (वय ८० वर्षे) असे मृताचे तर संतोष जयघोष मैंद (२६), श्रीकांत जयघोष मैंद (२४) आणि रूपेश राजेश्वर देशमुख (३२) अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आसाराम डोनाडकर आणि त्याचे कुटुंबीय पेरणीविषयी चर्चा करीत होते. अशातच तू जादूखोर आहेस, जादूटोणा करतोस, अशी आरडाओरड करीत दोनाडकर यांच्या घरावर काहीजण धावून आले. एकाएकी घरातून ओढत हाताबुक्क्यांनी मारहाण करीत घरातून रस्त्यावर आणले. आरोपींकडून मारहाण होत असताना आसाराम दोनाडकर हे डोक्याच्या भारावर रस्त्यावर पडले, यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. तरीही आरोपींची मृत आसाराम दोनाडकर शिवीगाळ सुरूच होती. आस...

मनुष्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक - गुणवंत मिसलवाड

इमेज
मनुष्याच्या दैनंदिन जीवनात शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योगा आवश्यक - गुणवंत मिसलवाड नांदेड- आजच्या या धकाधकीच्या जीवनाच्या आधुनिक काळात मनुष्य पैशाच्या मागे धावत असून स्वतःच्या शरीराकडे माणूस दुर्लक्ष करीत आहे, म्हणून स्वतःच्या व इतरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलीत ठेवण्यासाठी योगा हा आवश्यक आहे. असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपा) नांदेड आगार येथे दि. २१ जून २०२४ शुक्रवार रोजी १० वा जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून बोलताना पुढे ते आपल्या भाषणात म्हणाले की, योग दिनाचे ध्येय व उद्दिष्टे बघितले तर सर्व जनतेचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणे आणि जीवन योगमय करणे हेच या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्दिष्ट असून समाजातील सर्व स्थरापर्यंत योगाचा प्रचार आणि प्रसार करणे आणि त्याचे फायदे जाणून घेणे ही काळाची गरज बनली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी बसस्थानक प्रमुख मा.श्री...

अल्पशा पावसानेच नांदगाव बस स्थानक परिसरात साचले पाण्याचे डबके: मुख्य प्रवेश द्वार करत आहेत भरलेल्या डबक्यातून स्वागत

इमेज
अल्पशा पावसानेच नांदगाव बस स्थानक परिसरात साचले पाण्याचे डबके: मुख्य प्रवेश द्वार करत आहेत भरलेल्या डबक्यातून स्वागत चंद्रपूर विशेष प्रतिनिधी: बुधवारी झालेल्या पावसामुळे मुल तालुक्यातील नांदगाव बस स्थानक परिसर पाण्याच्या डबक्यामध्ये तब्दील झाले आहे. परिणामी प्रवाशांना व नागरिकांना डबक्यातील पाण्यामधून ये जा करावी लागत आहे. उन्हाळ्यात नागरिकांना धुळीचा त्रास सहन करावा लागत होता आता पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाने बस स्थानकावरूनच सुरजागड प्रकल्पाच्या जड वाहनांमुळे नागरिकांचे धुडीने हाल झाले. आता पावसाने पावसाळाभर नागरिकांचे कोणते हाल होतील हे सांगता येणे कठीण आहे.  कारण येथील राजकारणी पुढारी हेवे दावे करण्यात मश्गुल आहेत. त्यामुळे म्हणावा तसा नांदगाव या गावाचा भौगोलिक विकास झालेला नाही. दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे मोठमोठे पुढारी या गावात वास्तव्यास असून त्यांनी जर ठरवले तर नांदगाव चा कायापालट होऊ शकते परंतु या सर्व राजकारणी, पुढारींना हेवेदावे झुगारून गावच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. दरवर्षी नांदगाव बस स्थानक परिसरात हीच अवस्था बघायला मिळत असते. यावेळेस...

*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*

इमेज
*दुष्काळग्रस्त गावकऱ्यांना रामचंद्र सालेकर यांनी दिली जलसंजीवनी*  (विशेष प्रतिनिधी) दरारा 24 तास चंद्रपूर:- वरोरा तालुक्यातील महाडोळी गटग्रामपंचायत अंतर्गत शेगांव (खुर्द) हे पाणी टंचाईने अतिशय व्याकुळ असलेले गांव. अनेकवर्षांपासून पाणी टंचाई दूर करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून करून अखेर जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी तथा नळ योजना मंजूर झाली. परंतु पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याकरिता ग्रामपंचायत जवळ सरकारी मालकीची जागा नसल्याने सदर योजना परत जाणार की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. अखेर त्याच गावचे मूळ रहिवाशी, पेशाने शिक्षक,२००७ मध्ये जिल्हा परिषद चंद्रपूरने आदर्श उत्कृष्ठ शिक्षक म्हणून सन्मानित केलेले, मराठा सेवा संघाच्या चळवळीत वाढल्याने नेहमीच समाजसेवेची उत्तकंठा असलेले,एक सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र सालेकर यांनी गावाचे हित लक्षात घेता, सामाजिक बांधिलकी जपत पाण्याच्या टाकीच्या बांधकामाकरिता कसलाही आर्थिक मोबदला न घेता स्वतःच्या शेतातील ६२५ चौ.फूट जागा ग्रामपंचायतला दानपत्र करून बक्षिस दिली व रखडलेली योजना मार्गी लावली. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत अस...

चंद्रपूर जिल्ह्यात घोंगावतेय संदीप गिर्हे नावाचं वादळ! बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मुसंडी, भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

इमेज
बल्लारपूर प्रतिनिधी: चंद्रपूर जिल्ह्यात व विशेष करून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांचे नेतृत्व क्षेत्रातील जनसामान्य माणसांना भावले असून त्यांच्या नेतृत्वात अनेक भाजपच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. काल दिनांक 19 जुलै रोजी बल्लारपूर तालुक्यातील कवडजई या गावच्या माजी उपसरपंच सौ. कल्पना कुकुडकर यांनी त्यांच्या अनेक समर्थक, कार्यकर्त्यांसह संदीप भाऊ गिर्हे यांच्या नेतृत्वात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला.  यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सिक्की भैय्या यादव, तालुकाप्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा साहू, युवासेना नेता प्रशांत गडला, मुकद्दर भाई, महादेव लोणारे प्रामुख्याने उपस्थित होते. माजी उपसरपंच  कल्पना कुकुडकर, संदीप कुकुडकर, वेदांत कुकुडकर, श्रीराम उपरे, गणेश रुपेश जुवारे, गणेश नैताम, प्रकाश बद्दलवार, राकेश, बंडूभाऊ,इत्यादींनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपला चारी मुंड्या चित करून इंडिया आघाडी...

तेलगू देशम पार्टी भाजपच्या मीटिंगला उपस्थित राहिली नाही... एनडीए मध्ये अस्वस्थता

इमेज
तेलगू देशम पार्टी भाजपच्या मीटिंगला उपस्थित राहिली नाही... एनडीए मध्ये अस्वस्थता दरारा 24 तास नवी दिल्ली:राजनाथ सिंह यांच्या घरी बोलावलेल्या बैठकीला टीडीपीने हजेरी लावली नाही. राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एनडीएच्या मंत्र्यांची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीडीपी या बैठकीला उपस्थित नव्हता. अशा स्थितीत युतीमध्ये सर्व काही सुरळीत होत नसल्याची अटकळ बांधली जात आहे. लोकसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. निवडणुकीच्या निकालापासून टीडीपीला लोकसभा अध्यक्षपद हवे असल्याच्या बातम्या येत होत्या आणि आता या बैठकीला टीडीपी उपस्थित न राहिल्याने नाराजीच्या बातम्यांनी जोर पकडला आहे.

दिघोरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पडली पार...

इमेज
दिघोरी येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक संपन्न    दरारा 24 तास  पोंभुर्णा : दि.17/6/2024 रोजी दिघोरी येथे काँग्रेस कार्यकर्त्याची बैठक पार पडली. सदर बैठकीला कृषी बाजार समितीचे संचालक श्री. वसंत पोटे, तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अमित जी पाल, मीडिया सेल बल्लारशा विधानसभा अध्यक्ष प्रशांत झाडे, यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. नुकताच झालेल्या चंद्रपूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख साठ हजार मतांनी दारुण पराभव श्रीमती प्रतिभा धानोरकर काँग्रेसचे उमेदवार यांनी केला. या सर्व निवडणुकीत व पूर्ण पोंभूर्णा तालुक्यातील भरपूर मताधिक्य मिळून दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे जाहीर आभार विनोद अहिरकर यांनी मानले. त्याचबरोबर येत्या काळात महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होऊ घातली असून त्यामध्ये 72 बल्लारपूर विधानसभेसाठी विधानसभेसाठी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागावे अशा सूचना कार्यकर्त्यांना विनोद भाऊ अहिरकर यांनी दिल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सभा घेण्यात आली, सभेला तालुका अध्यक्ष ओबीसी सेल अमित पाल, बाजार, समिती संचालक, वसंत पाटील पोटे, सोसिअल मीडिया अध्यक्ष, प...