*▪️पोंभुर्णा तालुक्यातील एमआयडीसी चे काम त्वरित सुरू करा* *▪️शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन* *▪️काम नसल्याने तालुक्यातील बेरोजगार जाताहेत परप्रांतात*

*▪️पोंभुर्णा तालुक्यातील एमआयडीसी चे काम त्वरित सुरू करा* *▪️शिवसेना तालुका प्रमुख पंकज वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांना निवेदन* *▪️काम नसल्याने तालुक्यातील बेरोजगारांचे परप्रांतात पलायन* *पोंभुर्णा/31 डिसेंबर.* गोंडपिपरी तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र पोंभुर्णा तालुक्याची निर्मिती युती सरकारच्या काळात १९९९ मध्ये करण्यात आली.आदिवासी व अति मागास तालुका म्हणून पोंभुर्णा तालुका ओळखला जातो.त्यामुळे येथील बेरोजगारीही भक्कम वाढलेली आहे.पोंभुर्णा तालुक्याचा औद्योगिक दृष्टीने विकास व्हावा व तालुक्यातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पोंभुर्णा येथे एमआयडीसी स्थापन करण्यासाठी राज्याचे विद्यमान वने,सांस्कृतिक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. यासंदर्भात विधानसभेत जोरकस मागणी केली.आणी त्यांच्या या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले.पोंभुर्णा तालुक्यासाठी स्वतंत्र एमआयडीसी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला.याबाबतची अधिसूचना शासनाच्या उद्योग, उर्...