पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चंद्रपुरात अल्पवयीन मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार; वसतीगृह प्रमुखासह चार जणांवर गुन्हा दाखल

इमेज
चंद्रपुरात अल्पवयीन मूकबधिर मुलीवर लैंगिक अत्याचार; वसतीगृह प्रमुखासह चार जण ताब्यात  विशेष प्रतिनिधी  चंद्रपूर : लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबता थांबेना, आश्रम शाळा, मूकबधिर विद्यालय व अन्य संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सुद्धा आज सुरक्षित नाहीत. सर्वात जास्त आश्रम शाळेमधील विद्यार्थ्यांवरच अत्याचार झाल्याचे उघडतीस येत आहे. चंद्रपुरातील एका शाळेत संतापजनक प्रकार घडला. शाळेच्या वसतीगृहात एका मूकबधिर विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची समता जनक तितकीच खळबळजण घटना उघडतीस आली आहे. विद्यार्थिनी वस्तीगृहात एकांतात असल्याचं दिसताच वसतीगृह प्रमुखांनी जबरदस्तीनं लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. याप्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न :  वसतीगृह प्रमुखानं लैंगिक अत्याचार केल्याचं पीडित विद्यार्थिनीनं शिक्षिकेला सांगितलं. अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर येताच, शाळा प्रशासनानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, असा आरोप आहे. मात्र, पीडित विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय तसे...

कार्यालयात दारू पिऊन येणाऱ्या पटवाऱ्यास तात्काळ निलंबित करा-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांची मागणी

इमेज
कार्यालयात दारू पिऊन येणाऱ्या पटवाऱ्यास तात्काळ निलंबित करा-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांची माग णी चंद्रपूर: कर्तव्यात कसूर करत कार्यालयीन वेळेतच दारू पिऊन येणाऱ्या नांदगाव येथील पटवाऱ्यास तात्काळ निलंबित करावे अशी मागणी पोंभुर्णा तालुका शिवसेना उपप्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केल्याप्रमाणे याबाबतीत थोडक्यात परंतु सविस्तर असे की, मुल तालुक्यातील परंतु पोंभुर्णा तालुक्यातील अनेक गावांचा समावेश असलेल्या नांदगाव येथील तलाठी कार्यालयातील टेकाम नावाचे पटवारी हे सातत्याने दारू पिऊन कार्यालयात येतात. अनेकदा त्यांना लोकांच्या दाखल्यावर सह्या मारण्याचे भान सुद्धा रहात नसल्याचे निदर्शनास आले आहे. दारूच्या नशेत तर्र असणाऱ्या या तलाठ्याचा बियर बार मधील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरून जीवनदास गेडाम यांनी तलाठी टेकाम यांना तात्काळ निलंबित करावे अशी मागणी केली आहे. नांदगाव हे गाव राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे. या गावात भाजप आणि काँग्रेस या दोनच पक्षाचे बाहुबल्य आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि...

शॉर्टसर्किटमुळे डीपी जळाली! मोठा अनर्थ टळला

इमेज
शॉर्टसर्किटमुळे डीपी जळाली! मोठा अनर्थ टळला जुनगाव:अजित गेडाम पोंभुर्णा तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या जुनगाव येथे गावालगत असलेल्या विद्युत डीपीला आग लागल्यामुळे डीपी शेजारी असणारी तनसीचे ठिगारे आणि घर भीतीग्रस्त झाली होती. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने आगीवर नियंत्रण ठेवण्यात आले. व नागरिकांनी वीज पुरवठा बंद करून पाणी टाकून आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला अशी चर्चा गावात ऐकावयास मिळत आहे.
इमेज

चंद्रपूर लोकसभा निवडणूक l प्रचारतोफा थंडावल्या, १९ ला मतदान l जिल्हा प्रशासन सज्ज

इमेज
चंद्रपूर लोकसभा निवडणूक l प्रचारतोफा थंडावल्या, १९ ला मतदान l जिल्हा प्रशासन सज्ज जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूकीसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. चंद्रपूर मतदारसंघात भाजप महायुतीचे सुधीर मुनगंटीवार, महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर, बंचितचे राजेश बेले, बसपाचे राजेंद्र हरिशचंद्र रामटेके जनसेवा गोंडवाना पार्टीचे अवचित सयाम, जय विदर्भ पार्टीचे अशोक राठोड, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे नामदेव शेडमाके, बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीच्या पोर्णिमा घोनमोडे, अखिल भारतीय मानवता पक्षाच्या बनिता राऊत, सनमान राजकीय पक्षाचे विकासा लसंते, भीमा सेनेचे विद्यासागर कासर्लावार, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे सेवकदास बरके, अपक्ष दिवाकर उराडे, मिलींद दहीवले, संजय गावंडे हे उमेदवार रिंगणात आहे. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात ४८ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. छाननीत ३३ नामनिर्देशनपत्र अपात्र करण्यात येऊन पंधरा नामनिर्देशनपत्र पात्र करण्यात आले. ३० मार्च रोजी चिन्ह वाटप झाले. त्यानंतर प्रचाराला सुरुवात झाली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून...

घोसरी येथील देशी दारू दुकानातून होणारी अवैध दारू विक्री बंद करा-विनोद अहिरकर यांची मागणी

इमेज
घोसरी येथील देशी दारू दुकानातून होणारी अवैध दारू विक्री बंद करा- विनोद अहिरकर यांची मागणी विशेष प्रतिनिधी चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील रागिट यांच्या देशी दारू दुकानातून बनावटी दारू बाहेर अवैधरित्या विकली जात आहे. ओरिजनल दारू भट्टीतून चिल्लर विक्रीसाठी ठेवली जाते आणि त्या नावावर बनावटी देशी दारू मोठ्या प्रमाणात बाहेर अवैधरीत्या विकली जाते. या देशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन शुल्क विभागाने व संबंधित पोलीस विभागाने सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी केली आहे. मुल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या या देशी दारूच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार सुरू असल्याचा आरोपही अहिरकरांनी केला आहे. सदर दारू दुकान आमरस्त्यावर व वर्दळीच्या ठिकाणी असल्यामुळे नागरिकांना विशेष करून महिलांना त्रास होत आहे. दुकानातून चिल्लर विक्री केवळ 20 पेट्या दारूच विकली जाते. परंतु रोजच्या सेलिंग मध्ये पन्नास पेट्या दाखवल्या जातात. मग उर्वरित तीस पेट्या कुठे जातात याचा तपास पोलीस विभाग मुल, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी करावा अ...

नांदगाव चे उपसरपंच सागर देऊरकर यांचा भाजपात प्रवेश-माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचे मोलाचे योगदान

इमेज
नांदगाव चे उपसरपंच सागर देऊरकर यांचा भाजपात प्रवेश-माजी सरपंच मंगेश मग्नुरवार यांचे मोलाचे योगदान मुल: तालुक्यातील प्रतिष्ठित बाजारपेठ असलेल्या व राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या नांदगाव येथील उपसरपंच सागर देऊळकर यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला आहे. नांदगाव बिंबड विभागातील ओबीसी समाजाचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. काँग्रेस पक्षात ग्रामपंचायतच्या बाबतीत विकास कामे होत नसल्यामुळे त्यांनी कंटाळून जाऊन भारतीय जनता पक्षाचे लोकसभा उमेदवार व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विकास कामांचा झंजावात बघून ते प्रभावित झाले व त्यांच्या वर विश्वास दाखवत त्यांनी त्यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी चंदू मार्गोनवार, माजी सरपंच मंगेश मगनुरवार, माजी सरपंच प्रशांत बांबोडे, उपस्थित होते. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना बळ मिळेल असे बोलल्या जात आहे.

रवि मरपल्लीवार यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला काहीच फरक पडणार नाही- विनोद अहिरकर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे वक्तव्य

इमेज
रवि मरपल्लीवार यांच्या भाजप प्रवेशाने काँग्रेसला काहीच फरक पडणार नाही- विनोद अहिरकर माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर यांचे वक्तव्य पोंभुर्णा: रवि  मर्पलीवार यांना सरपंच पदापासून ते काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष पर्यंत व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदी तसेच सेवा सहकारी संस्था च्या अध्यक्षपदी बसवून देण्याचे काम आम्ही केलेले आहे. याची जाणीव रवी मरपलीवार यांनी विसरली आहे. त्यांचा नकाब आम्ही नक्कीच उतरवू अशा संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी रवि मरपल्लीवार यांच्या भाजप प्रवेशावर दिल्या आहेत. रवींद्र मरपलीवार हे काँग्रेसचे तालुक्यातील नेते म्हणून वावरत होते. काँग्रेसचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशा पदावरचे कार्यरत  होते .काँग्रेसने त्यांना काही कमी केलेले नाही. असे असताना लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे. असे जाहीर झाल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. रवींद्र मरपल्लीवार हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून वावरत होते. परंतु अचानक त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे कार्यक...

भालचंद्र आनंदराव झरकर यांचा दुर्दैवी मृत्यू। लहान मुले झाली पोरकी- कुटुंबावर दुःखाचे सावट, आज होणार अंत्यसंस्कार

इमेज
भालचंद्र आनंदराव झरकर यांचा दुर्दैवी मृत्यू। लहान मुले झाली पोरकी- कुटुंबावर दुःखाचे सावट, आज होणार अंत्यसंस्कार नांदगाव: विजय जाधव पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज. येथील ऑटो चालक-मालक संघटनेचे सदस्य भालचंद्र आनंदराव पाटील झरकर यांचा त्यांचे राहते घरी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू समयी त्यांचे वय अवघे 35 वर्ष होते..      सेवा सहकारी संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेले आनंदराव पाटील झरकर यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांना कोवळ्या वयातच कॅन्सर सारख्या भयानक आजाराने ग्रासले. त्यांचेवर अनेक दिवस नागपूर येथे उपचार सुरू होते. काही दिवसापूर्वीच त्यांना घरी आणण्यात आले. मात्र आज दिनांक 15 एप्रिल 2024 रोज सोमवारला सकाळी नऊ वाजता चे सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या मागे दोन छोटी छोटी मुले, पत्नी व आई वडील, भाऊ,आप्तेष्ट असा बराच मोठा परिवार आहे. देवाडा वैनगंगा नदीवर त्यांचे वर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती ऑटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सारंग पेदापल्लीवार, यांनी दिली आहे. तसेच सर्व ऑटो चालक-मालक संघटनेचे सर्व सभासद आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार यांनी अंत्यसंस्क...

महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस विनम्र अभिवादन

इमेज
माननीय कबळुजी पाटील कुंदावार, जिल्हा सचिव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी चंद्रपूर तथा जिल्हा अध्यक्ष रास्त भाव दुकानदार संघटना चंद्रपूर आणि प्रथम सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती पोंभुर्णा यांचेकडून बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा!

काँग्रेस व बीजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू: बसपा उमेदवार प्राध्यापक योगेश गोन्डाने

इमेज
*काँग्रेस व बीजेपी एकाच नाण्याच्या दोन बाजू: प्रा.योगेश गोन्नाडे बसपा उमेदवार* अरुण रामुजी भोले, नागभीड तालुका प्रतिनिधी  नागभीड --- बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार प्रा. योगेश गोन्नाडे यांनी पत्रकार परिषद घेऊन गडचिरोली -चिमूर क्षेत्रात भाजपा व कांग्रेस यांनी काय काम केले याचा लेखाजोखा जनतेसामोर मांडावा असे पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.               प्रा. योगेश गोन्नाडे हे नागभीड येथील रहिवासी असून ते बसपाचे उमेदवार आहेत. योगेश गोन्नाडे हे अन्याय ग्रस्त आदिवासी, ओबीसी समाजाचे पुरसकर्ते असल्याने त्यांचा चिमूर, ब्रम्हपुरी मतदार संगात वाढता प्रभाव दिसून येत आहे. गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्र हा अनुसूचित जमाती करिता राखीव असून यात 6 विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे.  या आधी योगेश गोन्नाडे हे शिवसेनेत होते.शिवसेनेत असतानी तालुका प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, जिल्हा विकास यंत्रणा तथा जिल्हा दक्षता समितीवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच नागपूर महानगर पालिकेवर...

लिव्हर निकामी झालेल्या तरुणाची आर्थिक मदतीची हाक! *नवा जन्म घेण्यासाठी लखमापुर बोरी येथील तरुणाची केविलवाणी धडपड* *दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन*

इमेज
लिव्हर निकामी झालेल्या तरुणाची आर्थिक मदतीची हाक! *नवा जन्म घेण्यासाठी लखमापुर बोरी येथील तरुणाची केविलवाणी धडपड* *दानदात्यांनी मदत करण्याचे आवाहन* अजित गेडाम, जुनगाव: प्रतिनिधी  येथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी येथील सचिन घनश्याम वैरागडे या 28 वर्षीय तरुणास लिव्हर आफ हिरोसिस या रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे त्याचा लिव्हर कायमचा निकामी झालेला आहे. त्याच्या लिव्हर ट्रान्सफर साठी 25 ते 30 लाखाचा खर्च असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. सोनल ट्रान्स प्लांट कॉर्डिनेशन सेंटर नागपूर, या संस्थेमार्फत त्याला नवीन जीवनदान देण्यात येणार आहे. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे इतकी मोठी रक्कम जुडवणे शक्य नाही. आतापर्यंत अशा परिस्थितीतही त्याच्या वडिलांनी 18 ते 20 लाख रुपये खर्च केले आहे. 2020 पासून या आजाराने हा युवक ग्रस्त आहे. त्याला नवीन जीवन दान देण्यासाठी दानकर्त्यांनी,नातेवाईकांनी, मित्रांनी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करून मला जीवन दान द्यावा अशी केविलवाणी विनंती त्यांनी केली आहे. गुगल पे खालील प्रमाणे-830145784

चिचडोह बेरेज चे दोन दरवाजे उघडले-अनेक गावातील लोकांना दिलासा! सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पाठपुरावा सफल- मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केली मागणी पूर्ण

इमेज
चिचडोह बेरेज चे दोन दरवाजे उघडले-अनेक गावातील लोकांना दिलासा! सरपंच राहुल भाऊ पाल यांचा पाठपुरावा सफल- मंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी केली मागणी पूर्ण जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी चंद्रपूर: पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव वैनगंगा नदीच्या तीरालगत असलेल्या अनेक गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती नव्हे झाली आहे. वाढत्या तापमानामुळे वैनगंगा नदी कोरडी पडल्यामुळे अनेक गावातील पाणीपुरवठ्याच्या योजना प्रभावित झाल्या. जून गाव येथील नळ योजना पूर्णपणे ठप्प झाली त्यामुळे नागरिकांचा पाण्यासाठी टाहो ऐकायला मिळत होता. ही गंभीर स्वरूपाची बाब सरपंच राहुल भाऊ पाल यांनी लक्षात घेऊन तात्काळ पालकमंत्री व लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्याशी पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटून व दूरध्वनी वरून अनेकदा पाठपुरावा करून गोसेखुर्द धरणाचे पाणी चिचडोह येथे सोडण्यात यावे व चिचडोहाचे पाने वैनगंगा नदीला सोडण्यात यावे अशी मागणी सरपंच यांनी केली होती. त्यांची मागणी लक्षात घेऊन पालकमंत्री महोदयांनी तात्काळ धारण प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाणी वैनगंगा नदीला सोडण्याचे सूचना केली.       त्य...

जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका! गारपिटीसह पावसाची शक्यता

इमेज
जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाचा फटका! गारपिटीसह पावसाची शक्यता जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी चंद्रपूर: गेल्या काही दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पाऊस वादळी वारा व गारपिटीमुळे शेत पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. तरीही येत्या 15 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंता वाढली आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या तीन जिल्ह्यांना पावसाचा अरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

*चिचडोह बरेज प्रकल्‍पाचे दरवाजे खुले,वैनगंगा तिरावरील गावांना दिलासा* *ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांना यश* *शेतकरी आणि गावक-यांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार*

इमेज
*चिचडोह बरेज प्रकल्‍पाचे दरवाजे खुले,वैनगंगा तिरावरील गावांना दिलासा* *ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांना यश* *शेतकरी आणि गावक-यांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार* जिवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी  *चंद्रपूर, 11 एप्रिल -चिचडोह बॅरेज प्रकल्‍पाचे दरवाजे गुरुवारी सुरू करण्‍यात आल्‍यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना करणा-या वैनगंगा नदीच्‍या तिरावरील गावांना मोठा दिलासा म‍िळाला आहे.* जुनगांव चे सरपंच राहुल पाल व तालुक्यातील समस्त जनतेनी  सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे मानले विषेश आभार   चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍याचे वने, सांस्‍कृतिक कार्य, मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री व चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यासाठी सातत्‍याने पाठपुरावा केला होता. गोसेखुर्द प्रकल्‍पाचे मुख्‍य अभियंता यांना त्‍यांनी त्‍यासंदर्भात 15 मार्च 2024 रोजी पत्र पाठवून सदर प्रकल्‍पाचे दरवाजे खुले करण्‍याची विनंती केली होती.  चंद्रपूर जिल्हयातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीत पाणी उपलब्ध नसल्यामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जुनगांव, देवाडा, पिपरी देशपांड...

शहरात प्रशासकीय काळात नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या मुजोरीला जबाबदार कोण? -रविकुमार पुप्पलवार यांचा सवाल

इमेज
* शहरात प्रशासकीय काळात नगरपरिषद अधिकाऱ्यांच्या मुजोरीला जबाबदार कोण? -रविकुमार पुप्पलवार यांचा सवाल* जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी   चंद्रपूर:बल्लारपूर नगरपरिषदेचा कारभार गेल्या 27 महिन्या पासून प्रशासकिय राजवटीत सुरू आहे. वारंवार निवडणूका पुढे ढकलण्यात येत असल्यामुळेच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांविनाच अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर नगरपरिषदेचे कार्य सुरू आहे. या प्रकारामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले. आता यातच नगरपरिषदेतील एका अधिकाऱ्यांकडून एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची घटना समोर येत आहे.  प्रशासकीय काळात अधिकाऱ्यांमध्ये इतकी हिम्मत कूठून येत आहे? नगरपरिषदे अधीन असलेल्या प्रज्ञा दारूंडे नामक महिला कर्मचारीला मारहाण करणारी महिला अधिकारी संगीता उमरे अनेक वर्षांपासून बल्लारपुर नगरपरिषदेत एकाच ठिकाणी कशी काय कार्यरत असू शकते? असा सवाल आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार यांनी उपस्थित केला आहे. अश्या प्रकारामुळे असे दिसून येते कि नगरपरिषदेचे प्रशासक म्हणजेच मुख्याधिकारी यांचे कोणतेही नियंत्रण इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नाही, या सर्व बाबींकडे...

विज पडून गाय मृत्युमुखी, सरपंच भालचंद्र बोधलकर यांची माहिती

इमेज
विज पडून गाय मृत्युमुखी, सरपंच भालचंद्र बोधनकर यांची माहिती पोंभुर्णा प्रतिनिधी  तालुक्यातील जाम तुकुम येथे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळ वारा झाला. यात विज पडून एक गाय दगावल्याचे घटना तालुक्यातील जामतुकुम येथे उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या गाईच्या मालकाचे नाव बालाजी सोनुजी राऊत असे असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती सरपंच भालचंद्र बोधलकर यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी कित्येकदा फोन लावूनही फोन रिसीव केला नाही. त्यामुळे रात्री उशिरा मृत्यूमुखी पडलेली गाय सोमवारी सुद्धा गाईचा मृतदेह तसाच पडून होता. सदर बाब सरपंच बोधलकर यांना माहिती होताच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सरपंच महोदय आमचा फोन रिसीव केला नाही. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी खब्रागडे यांचे विरुद्ध   आक्रोश निर्माण झालेला आहे.      अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाना प्रकारच्या नुकसानी होत आहेत. प्रशासन मात्र अवकाळी पावसात कुठलीच मदत देता येत नाही. असे सांगून शेतकरी, कष्टकरी, ...

विज पडून गाय मृत्युमुखी, सरपंच भालचंद्र बोधनकर यांची माहिती

इमेज
विज पडून गाय मृत्युमुखी, सरपंच भालचंद्र बोधनकर यांची माहिती पोंभुर्णा प्रतिनिधी    तालुक्यातील जाम तुकुम येथे रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास अवकाळी पाऊस व वादळ वारा झाला. यात विज पडून एक गाय दगावल्याचे घटना तालुक्यातील जामतुकुम येथे उघडकीस आली. या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या गाईच्या मालकाचे नाव बालाजी सोनुजी राऊत असे असल्याचे समजते. सदर घटनेची माहिती सरपंच भालचंद्र बोधनकर यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली असता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे रात्री उशिरा मृत्यूमुखी पडलेली गाय सोमवारी सुद्धा गाईचा मृतदेह तसाच पडून होता. सदर बाब सरपंच बोधलकर यांना माहिती होताच त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी खोब्रागडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी संपर्क क्षेत्राच्या बाहेर सांगत होता.       अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाना प्रकारच्या नुकसानी होत आहेत. प्रशासन मात्र अवकाळी पावसात कुठलीच मदत देता येत नाही. असे सांगून शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्गांना वेठीस धरत असल्याचे नागरिक बोलून दाखवत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज चंद्रपुरात रॅली

इमेज

*आईच्या तेरवीला बगल देऊन शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान* *कोट गांव येथे अनोखा उपक्रम*

इमेज
*आईच्या तेरवीला बगल देऊन शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान*    *कोट गांव येथे अनोखा उपक्रम* अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभीड ---नागभीड तालुक्यातील कोटगांव येथे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद नागापुरे यांनी आईची तेरवी न करता शालेय विद्यार्थ्यांना भोजनदान दिले. प्रमोद नागापुरे यांची आई बहिणाबाई नामदेव नागापुरे हिचे 4/3/2024 ला दुःखद निधन झाले होते. आईचा तेरवीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने करायचा असे प्रमोदनी ठरविले. त्या नुसार करून जिल्हा. परिषद शाळा येथील विद्यार्थी, कृषक विद्यालय येथील विद्यार्थी, कोटगांव येथील अंगणवाडी येथील चिमुकली मुलं यांना आमंत्रित केले. तसेच गावातील निमंत्रीत व रिस्तेदार यांना आमंत्रीत करून या सर्वांना भोजनदान देण्यात आले. अनेकदा समाजात तेरवी ही सुद्धा प्रतिषठेची असते. परंतु प्रमोद नागापुरे यांनी वेगळ्या पद्धतीने आईची तेरवी केली. या उपक्रमाची सद्या चर्चा आहे. प्रमोद नागापुरे हा नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. नोकरी वरोरा येथे असूनही गावासी नाळ जोडली आहे. नाहीतर अनेकजण असे आहेत की गावाशी संबंध ठेवत नाही. गाव...

*पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश*

इमेज
*पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश* पोंभूर्णा : तालुक्यातील गंगापूर ,टोक येथील अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर येथील युवा कार्यकर्ते राकेश हस्से,नितेश मेश्राम,अजय शिंदे ,सौरव सातरे,गणेश राऊत,नितेश हसे,सुभाष शिंदे ,प्रवीण यांच्या नेतृत्वात अनेक युवा कार्यकर्तायांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. संदीप गिरे यांच्या नेतृत्वात दररोज जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत असल्यामुळे शिवसेना पक्षात आनंद पसरला आहे.

*पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश*

*पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक येथील युवकांचा शिवसेना (उबाठा) पक्षात प्रवेश* पोंभूर्णा : तालुक्यातील गंगापूर ,टोक येथील अनेक युवा कार्यकर्त्यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे व शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या नेतृत्वाखाली गंगापूर येथील युवा कार्यकर्ते राकेश हस्से,नितेश मेश्राम,अजय शिंदे ,सौरव सातरे,गणेश राऊत,नितेश हसे,सुभाष शिंदे ,प्रवीण यांच्या नेतृत्वात अनेक युवा कार्यकर्तायांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. संदीप गिरे यांच्या नेतृत्वात दररोज जिल्ह्यात शिवसेना पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत असल्यामुळे शिवसेना पक्षात आनंद पसरला आहे.

घोसरीचे उपसरपंच जितूभाऊ चुधरी यांचा भाजपात प्रवेश

इमेज
घोसरीचे उपसरपंच जितूभाऊ चुधरी यांचा भाजपात प्रवेश पोंभुर्णा: तालुक्यातील भोसरी ग्रामपंचायतचे उपसरपंच जितू भाऊ चुधरी यांनी दिनांक 3 एप्रिल 2024 रोजी भाजपचे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपात प्रवेश केला. यावेळी जूनगावचे प्रभारी सरपंच राहुल भाऊ पाल, विनोद देशमुख, व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिभा धानोरकरांच्या विजयासाठी गावागावात बैठका

इमेज
प्रतिभा धानोरकरांच्या विजयासाठी गावागावात बैठका चंद्रपूर: लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजले आहे. महायुती वर्सेस इंडिया आघाडी अशी थेट लढत या वेळेस बघायला मिळणार आहे.   मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला होता. यावर्षीच्या निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र करत इंडिया आघाडी स्थापन केली आहे. ही आघाडी भाजपला पराभूत करण्यासाठी रणनीती आखत आहे. चंद्रपूर लोकसभा निवडणूक देशातच चर्चेची राहिलेली आहे. कारण ही एकमेव सीट काँग्रेसने आपल्या बाजूने वळती केली होती. दुसरी महत्त्वाची गोष्ट राज्याचे हेवी वेट मंत्री सुधीर मुनगंटीवार हे या निर्वाचन क्षेत्रातून लोकसभेची निवडणूक लढवत असल्यामुळे देशातच हे सीट चर्चेचे राहिली आहे. या सीटवर काँग्रेसचाच हक्क आहे आणि तो पुनश्च एकदा आम्ही मिळवणारच असा चंग काँग्रेसच्या व आघाडीच्या नेत्यांनी बांधलेला दिसत आहे. काँग्रेस च्या अधिकृत उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या विजयासाठी काँग्रेस ओबीसी सेलचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विनोद अहिरकर यांनी गावा गावात बैठका घेणे सुरू ...

अवकाळी वादळी पावसाने संसार मोडला! गोवर्धन येथे प्रचंड नुकसान

इमेज
अवकाळी वादळी पावसाने संसार मोडला! गोवर्धन येथे प्रचंड नुकसान जुनगाव: निसर्गाचा लहरीपणा काही नवीन नाही. मानवी जीवनाचे सार्थक निसर्गावरच अवलंबून आहे. मानवी जीवनाला निसर्ग कधी सुखाने नांदावयास सहकार्य करतो तर कधी अनेकांचे संसार मोडतो.तर कित्येकांना आपले जीव गमवावे लागते. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका मुल तालुक्यातील गोवर्धन येथील काही कुटुंबांना बसला असून त्यांचा संसार मोडकळीस आला आहे. दिनांक 2 एप्रिल 2024 रोजी आलेल्या अवकाळी वादळी पावसाने विशाखा चांदेकर, निलेश लाकडे यांच्या घराचे टिनाचे शेड उडून गेले. त्यामुळे घरातील साहित्य पावसामुळे खराब झाले. संसार उपयोगी सर्व साहित्य अस्ताव्यस्त आणि अतोनात नुकसान झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य काजू लाकडे व समीर काळे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.  या वादळी पावसात गावातील विद्युत पोलवरील तार तुटून खाली पडले. त्यामुळे कित्येक तास वीज पुरवठा खंडित राहिला. गोवर्धन येथे अनेक कुटुंबांच्या घराचे प्रचंड नुकसान झाले असून संबंधित विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य काजू लाकडे व समीर काळे यांनी प्रसिद्ध...

वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची बॅटिंग सुरू! वीज पुरवठा गुल

इमेज
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची बॅटिंग सुरू! वीज पुरवठा गुल जुनगाव: आज दिनांक 2 एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास आकाशात मेघ जमा होऊन वादळ वारा सुरू झाला आणि अवकाळी पावसाला सुरुवात झाली. या वादळ वाऱ्यामुळे जून गाव येथील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. वादळ वारा पाऊस आला तर वीज गायब होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यासाठी रोज मरे त्याला कोण रडे ही म्हण तंतोतंत लागू होते.

अवैध मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर एसडीओ ने पकडला

इमेज
अवैध मुरूम वाहतूक करणारा ट्रॅक्टर एसडीओ ने पकडला पोंभुर्णा: प्रतिनिधी तालुक्यात अवैध रेती व मुरूम वाहतूक करणार्‍यांचा धुमाकूळ सुरू असून सर्रास रेती व मुरूम विक्री सुरू आहे. अव्वाच्या सव्वा भाव घेऊन रेती विकल्या जात आहे. संबंधित बाब प्रशासकीय अधिकार्‍यांच्या लक्षात येताच त्यांनी अवैध रेती व मुरूम वाहतूक करणाऱ्यावर पाळत ठेवून मुरूम भरलेला ट्रॅक्टर लाल हेटी (घोसरी) परिसरातून जप्त केला.   यामध्ये देवडा बुज. येथील विनोद मारशेट्टीवार यांच्या मालकीचा मुरूम भरलेला ट्रॅक्टर वाहन आज दिनांक 2 एप्रिल रोजी पकडण्यात आला. सदर ट्रॅक्टर एस डी एम..... यांनी पकडून कारवाई केली.. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध मुरूम, रेती उत्खनन करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.