पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

घरकुल लाभार्थ्यांच्या निवड यादीत फेरबदल:ग्रामसेवक निलंबित : विभागीय चौकशी करण्याची उपसरपंच सागर देऊरक यांची मागणी

इमेज
घरकुल लाभार्थ्यांच्या निवड यादीत फेरबदल:ग्रामसेवक निलंबित : विभागीय चौकशी करण्याची उपसरपंच सागर देऊरक यांची मागणी दरारा 24 तास न्युज नेटवर्क  मूल: पंचायत समिती, मूलअंतर्गत ग्रामपंचायत, नांदगाव येथे कार्यरत असताना ग्रामसेवक शैलेश सहारे यांनी घरकुल लाभार्थी निवड यादी तयार करताना अनियमितता करून कर्तव्यात कसूर केल्याचे चौकशी अहवालावरून दिसून आले. त्यामुळे महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपिल) नियम १९६४चे ६ नुसार शिस्तभंगविषयक कार्यवाहीस पात्र ठरल्याने जिल्हा परिषद, चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी ग्रामसेवक शैलेश रामचंद्र सहारे यांना सेवेतून निलंबित केले आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायत, नांदगाव येथे कार्यरत असताना घरकुलासाठी गरजू लाभार्थीना डावलून ग्रामसेवक शैलेश रामचंद्र सहारे यांनी यादीत हेराफेरी करून गरजू लाभार्थ्यांना घरकुलापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. ही बाब ग्रामपंचायतीचे उपसरपंच सागर देऊरक व इतर सदस्यांना माहीत होताच त्यांनी गटविकास अधिकारी मूल व मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली.  यासंदर्भात...

जूनगावात भाजपला विक्रमी मतदान! 891 पैकी 696 मते घेऊन भाजप नंबर वन वर

इमेज
जूनगावात भाजपला विक्रमी मतदान! 891 पैकी 696 मते घेऊन भाजप नंबर वन वर दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  पोंभुर्णा:बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार, वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २६ हजार पेक्षा जास्त मतांची आघाडी घेत दणदणीत विजय संपादन केला असून ते सातव्यांदा विधानसभेत पोहोचले आहेत. सातव्यांदा विधानसभेत निवडून जाणारे ते विदर्भातील एकमेव उमेदवार आहे. त्यांच्या विजयासाठी ग्रामीण भाग असलेल्या जुनगाव येथे त्यांना विक्रमी मतदान झाले. येथील प्रभारी सरपंच राहुल भाऊ पाल यांच्या नेतृत्वात हा विक्रम घडून आला. 1008 एकूण मतदानापैकी 891 मतदान झाले. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना 696 मते मिळाली. काँग्रेसचे संतोष सिंहारावत यांना 142 तर इतरांना बावन मते मिळाली. जूनगाव हे गाव सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या साठी अनुकूलच असून भाऊंच्या हस्ते या गावात अनेक विकास कामे झाली असून दोन्ही नदीवर मोठ्या पुलाच्या निर्मितीस त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर येथील सरपंच राहुल भाऊ पाल व त्यांच्या सहकाऱ्यांचे सुद्धा अथक परिश्रम आहेत. सुधीर मुनगंटीवार यां...

सातवीतील विद्यार्थिनी वर काळाची झडप! प्रांजली शेंडे हिचा आकस्मिक मृत्यू

इमेज
सातवीतील विद्यार्थिनी वर काळाची झडप! प्रांजली शेंडे हिचा आकस्मिक मृत्यू दरारा 24 तास न्युज नेटवर्क  चामोर्शी: तालुक्यातील भिक्शी माल येथील प्रांजली कैलास शेंडे राहणार भिक्षी माल या सातवीतील विद्यार्थिनीचा आकस्मिक मृत्यू झाल्याने गावात व शाळेत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रांजली कैलास शेंडे ही विद्यार्थिनी खूप साधा सरळ स्वभावाची विद्यार्थिनी होती. मात्र अचानक तिच्यावर काळाने झडप घातली आणि कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळले. विद्यार्थिनीच्या मृत्यूने गावात व परिसरात शोक पसरला आहे.

वनविभागाच्या नवीन बांधकामात अवैध, निकृष्ट रेतीचा वापर ? या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची

इमेज
वनविभागाच्या नवीन बांधकामात अवैध, निकृष्ट रेतीचा वापर ? या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची दरारा 24 तास न्युज नेटवर्क चंद्रपूर: मध्य चांदा वनविभागा अंतर्गत येणाऱ्या सर्व वनपरिक्षेत्रात कार्यालय व कर्मचारी निवास इमारतीचे बांधकाम सुरू आहे. परंतु हे बांधकामात अवैध आणि निकृष्ठ दर्जाच्या रेतीचा वापर केला जात आहे. माहीत असूनही या बांधकामाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात असल्याने या कंत्राटदारावर मेहरबानी कुणाची? असा प्रश्न समोर येत आहे. राजुरा, विरुर, बनसडी, जिवती, धाबा, बल्हारशाह, पोंभुर्णा,कोठारी या वन परिक्षेत्रात या इमारतीचे काम ठेकेदारामार्फत सुरू आहे. परंतु ही कामे निकृष्ठ दर्ज्याचे होत आहे निकृष्ठ दर्जाची रेती वापरली जात आहे. विशेष म्हणजे कुठेही रेती उपासाला परवानगी नसताना या कामासासाठी रेती कुठून आणली जात आहे. त्याला कुणाचे पाठबळ मिळत आहेः अशी विचारणा आम जनतेतून होत आहे. वनक्षेत्रातील इतर काम सुद्धा याच ठेकेदारांना दिले जात असल्याची माहिती आहे.

एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

इमेज
एकनाथ जी शामकुळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

पोंभुर्ण्यात उद्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होणार

इमेज
पोंभुर्ण्यात उद्या भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी होणार पोंभुर्णा:धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १४७ वी जयंती पोभुर्णा येथील किरण राईस मिलच्या भव्य पटांगणात साजरी होणार आहे. या आदिवासी जयंती कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे जिल्हा अध्यक्ष प्रमोदजी बोरीकर हे असणार असून मुल येथील सामाजिक कार्यकर्ते प्रियदर्शन मडावी सर, सामाजिक कार्यकर्ते संपत कनाके, आदिवासी विकास परिषदेचे युवक आघाडीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा मसराम, सामाजिक कार्यकर्ते प्रदिप गेडाम, सेवानिवृत्त वनपरिक्षेत्राधिकारी मुरलीधरजी टेकाम, सामाजिक कार्यकर्ते इंद्रजासजी कडते, सामाजिक कार्यकर्ते किशोर पेंदाम, सामाजिक कार्यकर्ते चंदुभिऊ जुमनाके, सामाजिक कार्यकर्ते अशोक येरमे सर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. महापुरुषांच्या या जयंती कार्यक्रमात आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवेगाव मोरेचे सरपंच जगदीश सलामे, जूनगावचे माजी सरपंच जीवनदास गेडाम, मुरलीधर सिडाम यांनी केले आहे. कार्यक्रमात येणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांच्या भोजनाच...

गोवर्धन येथे अवैध दारू विक्रीला उधाण! अवैध दारू विक्री बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी🙏 ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील असक्षम असल्याचा आरोप

इमेज
गोवर्धन येथे अवैध दारू विक्रीला उधाण! अवैध दारू विक्री बंद करण्याची गावकऱ्यांची मागणी 🙏 ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील असक्षम असल्याचा आरोप  चंद्रपूर: मुल तालुक्यातील बेंबाळ पोलीस चौकीच्या हद्दीतील गोवर्धन येथे अवैध दारू विक्री सुरू असल्याने या अवैध दारू विक्रीमुळे गावातील संसार उध्वस्त होत आहेत. भावी पिढीवर याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने गोवर्धन येथील अवैध दारू विक्रीवर आळा बसवून उचित कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.  मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व बेंबाळ पोलीस दुरक्षेत्राच्या अंतर्गत गोवर्धन येथे अनेक वर्षापासून अवैध दारूचा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. या अवैध दारू विक्रेत्याला गावातील ग्रामपंचायत सदस्य व पोलीस पाटील सहकार्य करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. अवैध दारू विक्रेत्याला सहकार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा बडतर्फ करण्यात यावे व त्यांच्यावरही उचित कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दोन किलोमीटरवर नांदगाव येथे परवानाधारक देशी चे दारू दुकान आहे. परंतु सरकारी परवानाधारक दुकान असतानाही ठिकठिकाणी दारूचे अड्डे निर्मा...

देवाडा बुज. ते पिंपरी देशपांडे पोचमार्गाची दुर्दशा- अनेकदा निवेदन देऊनही समस्या कायम ! ताबडतोब रस्त्याची मंजुरी करून काम करावे-भाजपाचे दिनेश बदन यांची मागणी

इमेज
देवाडा बुज. ते पिंपरी देशपांडे पोचमार्गाची दुर्दशा- अनेकदा निवेदन देऊनही समस्या कायम ! ताबडतोब रस्त्याची मंजुरी करून काम करावे-भाजपाचे दिनेश बदन यांची मागणी  पोंभर्णा: तालुक्यातील देवाळा बुद्रुक ते पिपरी देशपांडे हा पोचमार्ग वर्षानुवर्षापासून रखडलेला आहे. दोन वर्षांपूर्वी एमआरईजीएस द्वारे या रस्त्याचे माती काम करण्यात आले असल्याची माहिती आहे परंतु हा रस्ता खडीकरण मुरमीकरण न झाल्यामुळे  या मार्गावरील शेतकऱ्यांना व आवागमन करणाऱ्याना, नागरिकांना प्रचंड चिखलातून चिखल तुडवत यावे- जावे लागते.  या विभागाचे आमदार तथा पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सुद्धा या संबंधाने निवेदन दिले आहेत. तसेच स्वर्गीय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांना सुद्धा निवेदना द्वारे या रस्त्यासाठी मागणी केलेली असताना आज तागायत या रस्त्यावर कुठलेही काम झाले नाही. त्यामुळे या रस्त्यावर पावसाळा भर चिखलाचे साम्राज्य असते. निवडणूक आली तर आस्वानांचा भडीमार केल्या जातो परंतु निवडणूक संपली की जो तो आपल्या बिळात लपून बसतो अशीच अवस्था ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बाबतीत व इतर विकास कामांच्या बाबतीत झालेली पाहायला मिळते. दिनेश बदन,भ...

जुनासुरला येथील देशी दारूचे दुकान बंद करा- गावकऱ्यांची व आजी- माजी पदाधिकाऱ्यांची मागणी! ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यासाठी दिले निवेदन

इमेज
जुनासुरला येथील देशी दारूचे दुकान बंद करा- गावकऱ्यांची व आजी- माजी पदाधिकाऱ्यांची मागणी!  ग्रामसभा घेऊन निर्णय घेण्यासाठी दिले निवेदन  - मुल तालुका प्रतिनिधी   दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  तालुक्यातील जुनासुरला या गावात सरकार मान्य देशी दारूचे दुकान आहे. मात्र हे दुकान सर्व नियमांना धाब्यावर बसवून गडचिरोली जिल्ह्यातही गुप्तपणे दारूची ठोकण विक्री करीत असल्याने व कमी किमतीतील दारू जादा किंमत आकारून विकत असल्याने तळीरामांना आर्थिक भुर्दंड सहन करून शौक पूर्ण करावा लागत आहे. सदर दुकान जिल्हाधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या वेळेत उघडत व बंद होत नसून सकाळी साडे सात ते आठ आणि रात्री बारा वाजता बंद होते. त्यामुळे गावातील आरोग्यास व शाळकरी विद्यार्थ्यांस याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या दुकानाला फक्त किरकोळ दारू विक्री करण्याचा परवाना असताना सदर दुकानातून मोठ्या प्रमाणात ठोक दारू गडचिरोली जिल्ह्यात पाठवली जात असते, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  ग्रामपंचायतीने ग्रामसभा आयोजित करून सदर विषयावर चर्चा घडवून आणून हे दारू दुकान बंद...

शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात मुल तालुक्यात खळबळ

इमेज
शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या! आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात मुल तालुक्यात खळबळ  मुल तालुका प्रतिनिधी  दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  मूल शहरातील एका शिक्षकाने शाळेतील आवारातील एका झाडाला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना दिनांक नऊ नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी सात साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली.  योगीराज कुड मेथी असे त्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून राजोली येथील नवभारत शाळेत ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. या घटनेमुळे मूल शहरात खळबळ उडाली आहे.

बल्लारपूर विधानसभाक्षेत्रात अपक्ष उमेदवारांची झुंजार बॅटिंग, राजकीय पक्षांना फुटला घाम !

इमेज
बल्लारपूर विधानसभाक्षेत्रात अपक्ष उमेदवारांची झुंजार बॅटिंग, राजकीय पक्षांना फुटला घाम ! चंद्रपूर जिल्हात सर्वात जास्त उमेदवार नशीब अजमावतायत...! चंद्रपूर :-दरारा 24 तास न्युज नेटवर्क डॉक्टर अभिलाषा ताई गवतुरे यांना ७२ बल्लारपूर विधानसभेमध्ये झुंजार बॅटिंग सुरू केली आहे. त्यांना तसा प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. जनतेला आता खऱ्या अर्थाने प्रामाणिक आणि आपल्या नेतृत्वाची ओळख पटू लागली आहे हे आपली लोकशाही बळकट होत असल्याचं आणि जनतेमध्ये जागृती होत असल्याचं लक्षण आहे नलेश्वर येथील बल्लारपूर ७२ विधानसभ`च्या अपक्ष बहुजनांच्या आणि जनसामान्यांच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर अभिलाषा ताई यांच्या सभेला सुजाण नागरिकांनीप्रचंड गर्दी केली गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा सातत्याने प्रामाणिकपणे जे काम अभिलाषा ताई गावतुरे करीत आहेत त्याची पोचपावती जणू जनता त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी करून देत आहे गेल्या ३० वर्षापासून मतदारसंघांमधील जनता हजारो समस्यांनी ग्रस्त आहे आणि येथील असलेले आमदार आणि विद्यमान पालकमंत्री सपशेल अपयशी ठरलेले आहेत जे प्रश्न ...

आता महिलांना दीड हजार नव्हे 3000 मिळणार! राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा

इमेज
आता महिलांना दीड हजार नव्हे 3000 मिळणार! राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा दरारा 24 तास न्युज नेटवर्क महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांना महालक्ष्मी योजनेतून दरमहा 3 हजार रुपये देणार आणि मोफत एसटी प्रवासाचा निर्णय घेणार असं राहुल गांधी म्हणाले. मुंबई : महाविकास आघाडीच्या पंचसूत्रीपैकी एका गॅरंटीबद्दल माहिती देणार असल्याची माहिती राहुल गांधी यांनी दिली. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे इतर गॅरंटीबद्दल सागंतील.मी तुम्हाला महालक्ष्मी योजनेबाबत माहिती देणार आहे. प्रत्येक महिलेच्या खात्यात 3 हजार रुपये प्रत्येक महिन्याला इंडिया आघाडीचं सरकार पाठवेल. महाराष्ट्रातील महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये थेट खटाखट खटाखट खटाखट खटाखट खटाखट पाठवणार आहोत. महाराष्ट्रातील महिला बसमधून प्रवास करतील तेव्हा त्यांना बस तिकीट खरेदी करण्यासाठी एक रुपया द्यावा लागणार नाही. त्यांना मोफत प्रवास करता येईल.  भाजपच्या सरकारनं महागाईचा त्रास, गॅस सिलिंडरच्या दराचा त्रास, बेरोजगारीचा त्रास सर्वाधिक महिलांना होतो. त्यामुळं महाराष्ट्राच्या महिलांच्या ख...

कान्होलीत आढळला हातपपाच्या पाण्यात नारू

इमेज
कान्होलीत आढळला हातपपाच्या पाण्यात नारू दरारा 24 तास न्युज नेटवर्क चामोर्शी: तालुक्यातील कान्होली गावातील अंगणवाडी केंद्राजवळ असलेल्या हातपंपाच्या पाण्यात महिला पाणी भरत असताना नारू आढळल्याने एकच खळबळ उडाली. येथील नागरिक सुरेश भाकरे यांनी त्या नारुला बाटलीत बंद करून माध्यम प्रतिनिधीला माहिती दिली. गावातील सार्वजनिक पानवठ्याची निगा राखणे ही ग्रामपंचायत प्रशासनाची जबाबदारी आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने येथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हातपंप व विहिरी यात ब्लिचिंग पावडर टाकून पाणी निर्जंतुकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष सिंह रावत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा - शिक्षणाची मंदिरे बंद करणाऱ्या भाजपला हद्दपार करा-नितेश कराडे यांचा भाजपवर निशाणा

इमेज
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी संतोष सिंह रावत यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा शिक्षणाची मंदिरे बंद करणाऱ्या भाजपला हद्दपार करा-नितेश कराडे यांचा भाजपवर निशाणा सिंचन सुविधा नसल्याने शेतकरी हवालदिल दरारा 24 तास न्युज नेटवर्क  पोंभुर्णा : शिक्षणाचे मंदिरे महात्मा फुले यांनी उभी केली मात्र महायुती सरकार राज्यातील शाळा बंद करत असून बहुजनांची मुले शिक्षणापासून वंचित राहतील याची तळजोड करत आहे. राज्यातील उद्योग गुजरातला पळवुन नेण्यास केंद्र सरकारला सहकार्य करणाऱ्या महायुतीच्या राज्य सरकारने युवकांना बेरोजगार केले असुन बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील तीन आदीवासी निवासी आश्रमशाळा बंद करून आदीवासी समाजातील मूला-मूलींना शिक्षणापासुन वंचित ठेवण्याचे काम केले आहे. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे यांनी केला आहे.          ते बल्लारपुर विधानसभा क्षेञातील महाविकास आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ पोंभुर्णा येथील आयोजित सभेत बोलत होते.       ते ...