पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सैनिक समाज पार्टीच्या बैठकीचे आयोजन. 👉 जनतेच्या समस्या जाणून शासनाकडे करणार पाठपुरावा

इमेज
सैनिक समाज पार्टीच्या बैठकीचे आयोजन. 👉 जनतेच्या समस्या जाणून शासनाकडे करणार पाठपुरावा. गडचिरोली (प्रतिनिधी) सैनिक समाज पार्टीचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या , अडचणी जाणून घेण्यासाठी आणि त्या समस्यांचे संविधानिक मार्गाने रितसर निवारण व्हावे त्यासाठी शासन दरबारी पाठवुन पाठपुरावा करण्यात येणार आहे तसेच आगामी ग्रामपंचायत नगरपरिषद , नगर पंचायत , विधानसभा, विधान परिषद,लोकसभा निवडणूकीसाठी संभाव्य उमेदवारांची निवड यादी तयार करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच देशातील महिलांवरील होणारे अन्याय - अत्याचार , शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कारणीभूत घटक ,वाढती बेरोजगारी , वनजमीनीचे पट्टे, जिल्ह्यातील शैक्षणिक तसेच आरोग्य विषयक समस्या, परिवहन , शहरातील आणि दुर्गम भागातील विविध प्रकारच्या समस्या,पेंशन, शासनाने निर्गमित केलेले चुकीचे धोरण ,व्यवसाय आणि बॅकेचे धोरण याबरोबरच विविध प्रकारच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी दिनांक ३० जुलै २०२३ रोजी दुपारी २ वाजता गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकातील विश्राम भवन येथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. तरी ...

*संघटन म्हणजे नेमकं काय* ? *संघटन कशासाठी?संघटनेची गरज काय?आपण संघटित का व्हायचे?*

इमेज
*संघटन म्हणजे नेमकं काय* ? *संघटन कशासाठी?संघटनेची गरज काय?आपण संघटित का व्हायचे?*     मोहनभाऊ देवतळे..  विविध उद्देश साध्य करण्सासाठी विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन ध्येय प्राप्तिसाठी एकत्रित आलेला जनसमुदाय म्हणजे संघटन होय. *1.मी,माझे,मला ह्या संकुचित विचारातून बाहेर पडण्यासाठी व मीही समाजाचं देणं लागतो ही समाज ऋणाची भावना विकसित करण्यासाठी संघटनेची गरज आहे.* *2.या देशातील शोषणाची व्यवस्था बदलण्यासाठी संघटनेची गरज आहे.* *3.अन्यायाचा प्रतिकार व सामाजीक,आर्थिक न्याय प्रस्थापीत करण्यासाठी संघटनेची गरज आहे.* *4.दुःखी,कष्टी,वंचित, उपेक्षित ह्यांचा उद्धार करण्यासाठी संघटनेची गरज आहे.* *5.संविधान व आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी संघटनेची गरज आहे.* *6.आपले सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी संघटनेची गरज आहे.* *7.आपला एकटेपणा घालविण्यासाठी संघटनेची गरज आहे.* *8.सामाजिक ऐक्य व बंधुत्वाची भावना रुजविण्यासाठी संघटनेची गरज आहे.*  *9.लाचारी,गुलामगिरी, हुजरेगिरी झिडकारण्यासाठी संघटनेची गरज आहे.*.* *10.स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी संघटनेची गरज आहे.*  *11.भयमुक्त,भूखमु...

*विकासकामाचे बोल मिरवणाऱ्या चष्म्यातून भकास कामे दिसत नसतात -न.पं.विरोधी पक्षनेता आशिष कावटवार* *-पोंभूर्णा शहरातील कोट्यावधीच्या विकास कामांना गेले अल्पावधीत तडे, विकास कामं फक्त कागदावरच*

इमेज
*विकासकामाचे बोल मिरवणाऱ्या चष्म्यातून भकास कामे दिसत नसतात -न.पं.विरोधी पक्षनेता आशिष कावटवार* *-पोंभूर्णा शहरातील कोट्यावधीच्या विकास कामांना गेले अल्पावधीत तडे, विकास कामं फक्त कागदावरच* पोंभूर्णा :- पोंभूर्णा शहरातील विकासाच्या नावाखाली कोट्यावधीचे जे काम झाले आहेत ते झालेच आहेत या बद्दल शंका नाही.मात्र प्रमाणतेपेक्षा अधिक पैसे असलेले कामं सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले त्यांचे काय कुणी तरी फलाण्याने काम आणलं हे सांगण्यापेक्षा ते चांगले केलो हे सांगणे महत्वाचे आहे. काम आणणे हे ज्या त्या क्षेत्राच्या लोकप्रतिनिधीचं कामच आहे.झालेल्या कामाची ओळख हि तिच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.जर ते कामं गुणवत्तेत उतरले असते तर आमच्या सह अनेकांनी त्यांचं कौतूकच केले असते . पण असे काम झालेले उदाहरण हे बोटावर मोजण्या सारखेच आहेत.मग जे निकृष्ट झाले ते कामं जनतेनी डोळे बंद करून बघायचे का?फक्त पाच-सात फुटाची सिलिंग कोसळली असं म्हणून पडदा झाकण्यापेक्षा जर त्या सभागृहात सभा सुरू असताना कुणाच्या डोक्यावर पडली असती अन् अनपेक्षित काही हानी झाली असती तर भक्तजण त्यांची जबाबदारी घेतले असते का.जो सभागृहात उपस्थित र...

अतिवृष्टीमुळे विधवा महिलेचे घर पडले! नुकसान भरपाई देण्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी

इमेज
अतिवृष्टीमुळे विधवा महिलेचे घर पडले! नुकसान भरपाई देण्याची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मागणी ================== जुनगाव: अजित गेडाम ================== संततधार पावसाने काही दिवस झोडपून काढले असून यामुळे नदी नाल्यांना पूर आला तर कित्येक जणांच्या घरांची पडझड झाली. मुल तालुक्यातील बेंबाळ येथील भारती नेताम या महिलेचे घर पावसामुळे पडून मोठी नुकसान झाली आहे. शासनाने त्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य किशोर भाऊ पगडपल्लीवार, कविता नंदीग्रामवार, राकेश दहीकर, माजी सरपंच मुन्ना भाऊ कोटगले, सामाजिक कार्यकर्ते किशोर नंदिग्रामवार यांनी केली आहे.

विज पडून महिलेचा मृत्यू,7 जन जखमी

इमेज
विज पडून मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांना तालुका काँग्रेसकडून आर्थिक मदत काँग्रेस तालुका अध्यक्ष रवी भाऊ मरपर्लिवार, माजी जि प अध्यक्ष विनोद अहिरकर यांच्याकडून सांत्वन व मदत पोंभुर्णा: तालुक्यातील वेळवा माल येथे शेतामध्ये काम करीत असताना वीज पडून एक महिला मृत्युमुखी पडली तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. गुरुवारी चार वाजताच्सुयमारास सदर घटना घडली. अर्चना मोहन मडावी वय 28 वर्ष असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. तर खुशाल विनोद ठाकरे वय 31 वर्ष, रेखा अरविंद सोनटक्के वय 45 वर्ष, राधिका राहुल भंडारे वय 22 वर्ष, सुनंदा नरेंद्र इंगोले वय ४५ वर्ष, वर्षा बिजा सोयाम वय 40 वर्ष, रेखा ढेकलू कुडमेथे वय 55 वर्ष, अशी जखमींची नावे आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विनोद भाऊ अहिरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत मृतक महिलेच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना आर्थिक सहकार्य केले. याप्रसंगी अमित विनोद अहिरकर व गावकरी उपस्थित होते.

विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण | नांदगाव, घोसरी विभागात जासन तास वीज गायब

इमेज
विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण | नांदगाव, घोसरी विभागात तासन्तास वीज गायब जुनगाव : नांदगाव, घोसरी,जुनगाव, देवाडा बुज.परिसरातील विजेच्या लपंडावाने नागरिक हैराण झाले आहेत.खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत कधी होईल याची वाट नागरिक पाहत आहेत. महावितरणचा भोंगळ कारभराचा फटका नागरिक व व्यावसायिकांना, रात्रीला मच्छरांचा प्रकोप वाढलेला असल्याने लहान मुलांची झोप उडाली आहे.कधी कधी रात्रभर वीज गायब राहते. याचा फटका विनाकारण सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. सततच्या खंडित वीज पुरवठ्याने नागरिक मेटाकुटीला आले असून यापासून महावितरण कधी सुटका करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोंभुर्णा परिसरातील अनेक भागात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिक विजेच्या लपंडावाने हैराण झाले आहेत. एकदा वीज गेली तर ती परत तासनतास येत नसल्याचा परिणाम मुलांच्या अभ्यासावरही होत आहे. परिसरातील नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी वाट पाहणे नित्य नियमाचा खेळ झाला आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. तक...

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप

इमेज
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व फळवाटप* @ ग्रामीण रुग्णालयातील भरती असल्येल्या चिमुकल्या बाळाच्या हस्ते केक कापून केला गेला वाढदिवस साजरा @पोंभूर्णा युवासेना तर्फे घेण्यात आले विविधकार्यक्रम पोंभूर्णा : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण हा विचार घेऊन युवासेना शहर पोंभूर्णा तर्फे शिवसेना तालुका प्रमुख आशिषभाऊ कावटवार यांच्या मार्गदर्शनात व युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार यांच्या नेतृत्वात शहरातील शासकीय कार्यालयात वृक्ष रोपण व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. युवासेनेचे कार्यकर्ते एकत्र येत वाढदिवसानिमित्त तहसील कार्यालय,पोलीस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय,कृषी उत्पन्न बाजार समिती,वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या आवारात वृक्ष रोपण करण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे, बिस्कीट वाटप करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या चिमुकल्या बाळाच्या हाताने डॉक्टर,नर्स,कर्मचारी युवासेनेचे कार्यक...

त्या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा अन्यथा शिवसेनेतर्फ़े तीव्र आंदोलनाचा इशारा !

इमेज
त्या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करा अन्यथा शिवसेनेतर्फ़े तीव्र आंदोलनाचा इशारा ! चंद्रपुर- चंद्रपुर तालुक्यातील नागाळा (सि), सोनेगाव, येरूर, वांढरी येथील शेतशिवारात मागील एका महिन्यापासून वाघाचा धूमाकुळ घातला असुन स्थानिक गावकरयांणमधे त्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. ऐन शेतीच्या कामाचा हंगामात वाघाचा वावर असल्यामुळे गावातील शेतकरी, शेतमजुर तसेच नागरिकांनमधे भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवसामधे या वाघाने अंदाज़े ८-१० पाळीव जनावरांची शिकार केली असुन भविष्यात या वाघाकडून मानसांवर हल्ला करण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे अन्यथा शिवसेनेतर्फ़े तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आज दिनांक 24/07/2023 ला मा.विभागीय वन अधिकारी प्रशांत जी खाडे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. यावेळी शिवसेना उद्घव साहेब ठाकरे पक्षाचे युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे, शिवसेना तालुका समन्वयक विकास विरूटकर, ग्रामपंचायत नागाला उपसरपंच सुरज सातपुते,आकाश घागी,चेतन कामडी, सार्थक शिर्के व ग्रामस्थ यादी उपस्थित होते.

*जिल्हा मागणी साठी महिलांचे धरणे आंदोलन* *जिल्हा मागणीचा लढा आणखी तीव्र*

इमेज
*जिल्हा मागणी साठी महिलांचे धरणे आंदोलन* *जिल्हा मागणीचा लढा आणखी तीव्र* अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभीड--- गेल्या अनेक दिवसांपासून नागभीड तालुक्यात जिल्हा मागणी साठीचा लढा आणखी तीव्र झाला असून आता नागभीड जिल्हा निर्मिती कृती समिती महिला आघाडी नागभीड च्या माध्यमातून महिला पुढे सरसावल्या असून दिनांक 24 जुलै रोजी तहसील कार्यालय परिसरात महिलांनी नागभीड जिल्ह्याचे विभाजन करताना नागभीड जिल्ह्याची निर्मिती करावी,चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्याक्षेत्रातून नागभीड तालुका वगळण्यात यावा, मणिपूर येथील महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार उमेश कावळे यांना देण्यात आले.  यावेळी नागभीड व तालुक्यातील अनेक महिलांचा सहभाग होता. "नागभीड जिल्हा झालाच पाहिजे", "आपला जिल्हा,नागभीड जिल्हा " या घोषनेने तहसील कार्यालय परिसर दनानले होते.यानंतर नागभीड जिल्हा निर्मिती कृती समितीच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकारी यांना नागभीड नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्व गाव व प्रभागात पावसाचे पाणी साचले असल्याने डेंगू, ...

*हिंदी ब्राम्हण समाज की नई कार्यकारिणी का हुआ गठन*

इमेज
*हिंदी ब्राम्हण समाज की नई कार्यकारिणी का हुआ गठन*  चंद्रपूर:_पिछले एक वर्ष से हिंदी ब्राम्हण समाज के सभी सदस्य विविध उपक्रमों के माध्यम से संगठन को मजबूत करने के लिए प्रयास रत रहे,जिसके अंतर्गत परशुराम जयंती,होली मिलन समरोह, गुणवंत विद्यार्थियों का सत्कार के साथ साथ ब्राह्मण समाज के परिजनों के घरों में जाकर सदस्यता फॉर्म के माध्यम से जनसंपर्क अभियान प्रारंभ किया गया। जिसकी सराहना ब्राम्हण समाज के हमारे वरिष्ठों ने की और उनके ही मार्गदर्शन में सम्पूर्ण कार्यक्रम आयोजित किए जा रहे है।_  *हिंदी ब्राम्हण समाज के बढ़ते हुए स्वरूप को देखकर हम सबके मार्गदर्शक डा. कीर्तीवर्धनजी दीक्षित एवं सभी वरिष्ठ अभिभावक मार्गदर्शको के द्वारा सुझाव आया की हिंदी ब्राह्मण समाज का पंजीयन भी किया जाय जिससे किसी भी आयोजन की पारदर्शिता बनी रहे और ब्राम्हण समाज का विकास और विस्तार होता रहे*।        _इसी उद्देश्य से स्थानीय गायत्री शक्ती पीठ मंदिर दातारा रोड स्थित दिनांक 16जुलाई ,और जटपुरा गेट स्थित दुर्गामंदिर में 23 जुलाई को हिंदी ब्राम्हण समाज की मीटिंग का आयोजन आयोजक मंडल द्वारा क...

पोलिस पाटील व पत्रकार शशिकांत गनविर यांचा वाढदिवस

इमेज
सर्वासामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे दैनिक लोकमत चे पत्रकार, युवकांना प्रेरणादायी ठरावे असे शून्यातून विश्व् निर्माण करणारे शानदार व्यक्तिमत्व, भेजगांव चे पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते आयु. शशी यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक मंगलमय शुभेच्छा... 🎂🎂🎂🎂

लोकमान्य टिळक हे भारत स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते - गुणवंत मिसलवाड

इमेज
लोकमान्य टिळक हे भारत स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते - गुणवंत मिसलवाड नांदेड- भारत देश स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीर, क्रांतीकारक, समाजसुधारक, स्वातंत्र्य सेनानींनी आपापल्या परीने शेवटच्या श्वासापर्यंत कार्य करुन देशासाठी मोठे योगदान दिले आहेत. त्यापैकीच एक भारत देश स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते म्हणजे लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक होत असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगार येथे दि. २३ जुलै २०२३ रविवार रोजी सकाळी ठिक ११.०० वाजता थोर समाजसुधारक, जहाल मतवादी, पत्रकार, महान अभ्यासक, तत्त्वज्ञ लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळक यांच्या १६७ व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना मा.श्री. गुणवंत एच. मिसलवाड यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, लोकमान्य केशव बाळ गंगाधर टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळविणारच हे ध्येय उराशी बाळगून केसरी, द मराठा (इंग्रजी) वर्तमानपत्राच्या माध्यमा...

वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण

इमेज
वाघाच्या हल्ल्यात कालवड ठार; शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण   पोंभूर्णा:-दरारा 24           तालुक्यातील ठाणेवासना येथे वाघाने कालवडीवर हमला करून ठार केल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या दरम्यान घडली.या घटनेमुळे येथील नागरिक भयभीत झाले असून वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी दिला आहे.   चेकठाणा परिसरात रविवारी दुपारी  डोंगराच्या खाली कक्ष क्र डि ५५४ सी परिसरात गायकी गुरं-ढोरं चारत असतांना दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने कडपातील कालवडीवर हल्ला चढवून ठार केले.ठाणेवासना येथील मुर्लीधर कोंडूजी दहिवले यांची हि कालवड असून अंदाजे १५ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे.या घटनेने ठाणेवासना शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असून वाघाचा बंदोबस्त न केल्यास वनविभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.  -------------------------- दहा दिवसा अगोदर दीपक गंगाधर पोतराजे, ईश्वर नागापुरे यांच्या बकरीवर वाघाने हल्ला चढवून ठार मारले होते.गा...

महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर! गंभीर पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री दिल्लीत

इमेज
महाराष्ट्रातील जनता वाऱ्यावर! गंभीर पूर परिस्थिती असताना मुख्यमंत्री दिल्लीत मुंबई: महाराष्ट्रातील अनेक गावात अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा प्रसंगी पूर्वग्रस्त भागातील जनतेला वाऱ्यावर सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्ली गाठली. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री म्हणून समर्थकांकडून सुरू असलेली बॅनरबाजी त्यातच राज्यात लवकरच अजित पर्वाची सुरुवात होणार असल्याचे करण्यात आलेले सुचक ट्विट, यामुळे राज्यात नेतृत्व बदलाची आणि अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यातील पूर परिस्थिती आणि राज्य मंत्रिमंडळातील सहकारी असणाऱ्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे वाढदिवस काढून मुख्यमंत्री शिंदे यांनी शनिवारी दिल्ली दरबारी हजेरी लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायंकाळी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस मधील आपल्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा सुरू आहेत.  त्यातच जनतेच्या मनातील मुख्...

*गृहस्थाश्रमातून वृध्दाश्रमाकडे* - *भविष्यातील गरज*💥 *श्री गिरीष देशपांडे यांचे मनोगत !!*

इमेज
*गृहस्थाश्रमातून वृध्दाश्रमाकडे* - *भविष्यातील गरज* *श्री गिरीष देशपांडे यांचे मनोगत !!* जगदीश का. काशिकर, पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७. मुंबई: खूप वेगळा असा विषय आहे. पूर्वी आपल्या इतिहासकाळात समाजात आपले प्रापंचिक जीवन जगून झाल्यावर पुढील पिढीकडे कुटुंबाची सूत्रे सुपूर्द करून वनात म्हणजेच जंगलात जायची परंपरा होती.त्याला नप्रस्थाश्रम असे म्हणायचे. तेंव्हा जंगले होती, म्हणून वन म्हणायचे. आधुनिक काळात सिमेंटची जंगले आहेत. शुद्ध हवा, चांगले वातावरण, चुलीवरचे जेवण, सकाळच्या शुद्ध हवेत प्रभातफेरी, योगासन,प्रायायाम इत्यादी शहरी भागात शक्य नाही. आपल्या घरातील चुली आपण बंद केल्या. आणि चुलीवरचे जेवण कुठल्या हॉटेल मध्ये मिळते का..?  याचा शोध आपण आपल्या चारचाकी गाडीत बसून महामार्गावर घेत असतो. लहानपणी साईकल मिळावी म्हणून आकाशपाताळ एक करायचो आता तीच सायकल चालविण्यास आपण जिम जॉईन करतो. घरातील पोळीवर भाजी घालून गुंडाळी करून खायचे सोडून बाजारात आपण तोच प्रकार Franky म्हणून 50/ रुपयाला घेण्यात आनंद मानतो.घरी लहानपणी त्याच पोळीभाजीची गुंडाळी आई ...

*तालुका पातळीवरील दक्षता समितीवर संतोष रडके यांची अध्यक्ष पदी निवड .....*

इमेज
*तालुका पातळीवरील दक्षता समितीवर संतोष रडके यांची अध्यक्ष पदी निवड .....* अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभिड---चंद्रपूर जिल्ह्यातील अन्न नागरी पुरवठा विभागाद्वारे नागभिड तालुक्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरण करण्यात येणाऱ्या जिवनाश्यक वस्तूंवर देखरेख करण्याकरिता माजी पंचायत समिती सदस्य आणि भाजपा तालुकाध्यक्ष संतोष विठ्ठलराव रडके यांची नागभीड तालुका पातळीवरील दक्षता समितीवर अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्य सदस्य म्हणून तालुक्यातील महिला, सौ,वसुधा नामदेव गुरपुडे , सौ,नीता अरविद बोरकर, सौ,गायत्री संजय हेमने, सौ,धनश्री धनराज काटेखाये, सौ, माधुरी विलास दोनोडे, बाळूजी अभिमन डबले, केदारनाथ काशिनाथ मेश्राम, मारोती रामदास उईके, धनराज राजाराम बावनकर, हेमराज दौलत ठाकरे यांची सदस्य पदी निवड झालेली आहे.  या निवडीबद्दल मिञ मंडळीनी अभिनंदन केले आहे,

*सर्प दंशाने चिधी(माल) रयतवाडी येथील मुलीचा मृत्यू.*

इमेज
*सर्प दंशाने चिधी(माल) रयतवाडी येथील मुलीचा मृत्यू.* अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभिड तालुक्यातील आठवड्यातील दुसरी घटना       नागभिड ----तालुक्यातील चिंधी (माल) येथील मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाला.        सविस्तर वृत्त, काल रात्री कु. अपसरा विलास सुतार, वय (११ वर्ष) ही आपली आजी व भावां सोबत घरात झोपेत असताना मन्यार हा विषारी साप चावल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली .  पहाटेला 3:20 वाजताचे दरम्यान गाढ़ झोपेमध्ये असताना विषारी साप चावल्यानंतर तिला नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र तिथे पोहोचेपर्यंत अप्सराचा मृत्यू झालेला होता.  मृतक ही कर्मवीर विद्यालय नागभीड येथे ५ व्या वर्गात शिकत होती. तिचे आई वडील हे उडिसा मध्ये व्यवसाय करायला गेलेले आहेत.         या पूर्वी सुद्धा १२ जुलै ला नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील अमित संतोष महाडोळे वय (१२) वर्षे याला सुद्धा सर्पदंश झाला होता त्याचा सुद्धा सर्पदंशाने मृत्यू झालेला होता.     पावसाळ्याचे दिवस सुरू झाल्यामुळे सापांच्या बिळामध्...

*तुझ्यात मी मराठी चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल्ल, लोकांचा उदंड प्रतिसाद*

इमेज
*तुझ्यात मी मराठी चित्रपटाचा पहिला शो हाऊसफुल्ल, लोकांचा उदंड प्रतिसाद* आज सोमय्या फिल्म्स निर्मित, तुझ्यात मी हा त्यांचा पहिला मराठी फीचर फिल्म चंद्रपूर आणि संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्याचा पहिला शो आज दुपारी १२ वाजता चंद्रपूरच्या प्रसिद्ध राजकला थिएटरमध्ये झाला जो विक्रमी पद्धतीने हाऊसफुल्ल झाला.  चंद्रपूरच्या निर्मात्या निर्मित आणि चंद्रपूरच्या कलाकारांनी अभिनित केलेला मराठी चित्रपट पहिल्याच दिवशी हाऊसफुल्ल हा इतिहासापेक्षा कमी नाही. सोमय्या फिल्म्सचे फक्त 10 ते 15% कलाकार आणि कर्मचारी सिनेमा हॉलमध्ये होते, बाकीची तिकिटे काउंटरवर विकली गेली, जे स्वत: निर्माते आणि कलाकारांसाठी एक सुखद आश्चर्य होते. इतकंच नाही तर आयटम साँगवर लोकं वारंवार शिट्ट्या वाजवतात, टाळ्या वाजवतात आणि स्वतःच्याच सीटवर नाचतात अशी दृश्यंही चित्रपटादरम्यान पाहायला मिळाली.  चित्रपट संपल्यानंतर प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिला ते ऐकून निर्माते आणि कलाकार भारावून गेले. चित्रपटानंतर, बहुतेक प्रेक्षकांनी याला एक उत्तम कौटुंबिक मनोरंजन म्हटले, त्याचप्रमाणे तरुण मुला-मुलींनी गाण्यां...

बोंडाळा खुर्द च्या पोलीस पाटील पदी सुधीर बांगरे यांची नियुक्ती

इमेज
बोंडाळा खुर्द च्या पोलीस पाटील पदी सुधीर बांगरे यांची नियुक्ती मुल: मुल पोलीस ठाण्यात च्या हद्दीतील व तालुका अंतर्गत येत असलेल्या बोंडाळा खुर्द येथील पोलीस पाटील पदी युवा कार्यकर्ते सुधीर बांगरे यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र येऊन धडकताच त्यांच्या मित्रमंडळीत व गावात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरारा ट्वेंटी फोर न्यूज तर्फे त्यांच्या उज्वल भविष्यासाठी व पुढील वाटचालीकरिता हार्दिक शुभेच्छा.

मुसळधार पाऊस सुरू, जुनगाव येथील नागरीक भास्कर गेडाम यांच्या घरात फुटभर पाणी

इमेज
मुसळधार पाऊस सुरू, जुनगाव येथील नागरीक भास्कर गेडाम यांच्या घरात फुटभर पाणी पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी आज सकाळपासूनच पावसाच्या सरी सुरू होत्या मात्र साडेदहा च्या नंतर मुसळधार पावसाची सुरुवात झाली. या पावसामुळे अनेकांच्या घराची गळती सुरू आहे तर जळगाव येथील नागरिक भास्कर गेडाम यांच्या झोपडी वजा घरात पावसाचे पाणी साचले असून हा त्यांचा दरवर्षीचाच वनवास आहे. मात्र त्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने दरवर्षी घरात पाणी असतानाच पाण्यातच वास्तव्य करावे लागत आहे.

आज शिवसेना चंद्रपूरच्या वतीने किरीट सोमय्या ला जोडे मारो आंदोलन

इमेज
आज शिवसेना चंद्रपूरच्या वतीने किरीट सोमय्या ला जोडे मारो आंदोलन चंद्रपूर: भारतीय जनता पार्टीचा स्वयंभू नेता अश्लील चाळे करून अनेकांवर आरोप करणारा तिरीत थोमय्या याच्या वक्तव्याच्या आणि कृतीच्या निषेधार्थ आज शिवसेना चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने जोडे मारो आंदोलन दुपारी दोन वाजता करण्यात येत आहे. सदर आंदोलन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्या नेतृत्वात होत असून जिल्ह्यातील व शहरातील शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना चंद्रपूरच्या वतीने करण्यात आले आहे.

सोमय्याची बातमी दाखवणाऱ्या वाहिनीचे प्रक्षेपण बंद पाडले💥 लोकशाहीची क्रूर थट्टा! सत्य दाखवण्याचा आवाज बंद पाडण्याचा डाव

इमेज
सोमय्याची बातमी दाखवणाऱ्या वाहिनीचे प्रक्षेपण बंद पाडले 💥 लोकशाहीची क्रूर थट्टा! सत्य दाखवण्याचा आवाज बंद पाडण्याचा डाव दरारा 24 न्यूज  ईडीच्या आरोपाने अनेकांचे आयुष्य उध्वस्त करणारा भाजपचा माजी खासदार किरीट सोमय्याच्या सेक्सकांडचा अखेर पर्दाफाश झालाच. पण हे प्रकरण उजेडात येऊ नये तसेच यानंतर जनआंदोलन होऊ नये यासाठी काही यंत्रणा अजुनही धडपडताना दिसत आहेत. हे या राज्यसरकार आणि प्रशासकीय यंत्रणेच्या पाठिंब्या शिवाय शक्य नसल्याचेही यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. कोल्हापूरातील लोकशाही न्यूज चॅनेलच बंद करण्यात आले आहे. शिवसेनेला पोलिसांकडून आज आंदोलन करण्यासही पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली आहे. उठ-सुठ विरोधकांवर भ्रष्टाचाराचा आरोप करुन, ईडी कारवाईचे स्टंट किरीट सोमय्या याने केल्याचे आजपर्यंत दिसून आले. आरोप झालेल्यांपैकी आज अनेक जण भाजपसोबत सत्तेत असल्याचे दिसून येत आहेत. त्यानंतर त्यांची चौकशी बंद झाल्याने पिढीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणेचा सोमय्या याच्याकडून गैरवापर केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. त्यात विक्रांत पाणबुडी वाचविण्यासाठी गोळा केलेल्या आणि गायब केलेल्या निधीबाबत सोमय्य...

सैनिक समाज पार्टीची २२ व २३ जुलै रोजी गडचिरोलीत बैठक . 👉 विविध विषयांवर होणार चर्चा आणि सभासद नोंदणी. 👉 इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन.

इमेज
सैनिक समाज पार्टीची २२ व २३ जुलै रोजी गडचिरोलीत बैठक . 👉 विविध विषयांवर होणार चर्चा आणि सभासद नोंदणी.  👉 इच्छुकांनी सहभागी होण्याचे आवाहन.  गडचिरोली / प्रतिनिधी दि. १९ जुलै २०२३:- सैनिक समाज पार्टी गडचिरोलीच्या वतीने हर जन सैनिक, घर..सैनिक तयार करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष बलविर सिंह परमार, किसान मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.श्रीधर दरेकर,महाराष्ट्राचे प्रभारी कमांडो ईश्वर मोरे, प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजी डमाळे , युध्दविर कॅप्टन अरुण कदम, राष्ट्रीय फिल्म इंडस्ट्री प्रमुख जिवन कोल्हे, प्रदेश सचिव अरुण खिची , कार्याध्यक्ष तुकाराम डफळ,विदर्भ प्रमुख संतोष चर्हाटे, सुचिता भोयर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील सर्व विधानसभा क्षेत्रात सभासद संख्या वाढवून , सैनिक समाज पार्टी मजबूत करण्यासाठी तसेच गडचिरोली , अहेरी आणि आरमोरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात विविध प्रकारच्या महत्त्वाच्या पदांची निवड करण्यात येणार आहे.   त्याबरोबरच सर्व विधानसभा क्षेत्रातील जन प्रतिनिधी, जनतेच्या कृषी , पोषण आहार ,बॅकिंग , ग्रामीण व शहरी आवास - निवास योजना , परि...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यापवार यांची नियुक्ती🌷 प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीचे पत्र

इमेज
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल गण्यारपवार यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले नियुक्तीचे पत्र जाहिरात  जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी NCP गडचिरोली जिल्हाध्यक्षपदी माजी कृषी सभापती व चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अतुल भाऊ गण्यारपवार यांची नियुक्ती केली आहे. गण्यारपवार यांच्या नियुक्तीमुळे गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीचे जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे.

संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, जूनगावच्या पुलावरून पुराचे पाणी

इमेज
संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर, जूनगावच्या पुलावरून पुराचे पाणी पोंभुर्णा: कालपासून तालुक्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वैनगंगा नदीला पूर आलेला आहे. गोसे खुर्द धरणाचे संपूर्ण ३३ पैकी 33 दरवाजे उघडले गेले असून बारा दरवाजे अर्धा मीटरने तर 21 दरवाजे एक मीटरने उघडले गेले आहेत. संपूर्ण 33 दारातून 5955.85 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. या पुरामुळे जळगावच्या वैनगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने रहदारी ठप्प झाली आहे. जून गाव ते नांदगाव हे 7 किलोमीटरचे अंतर बावीस ते पंचवीस किलोमीटर वाढले आहे. अर्थात जुनगाव ते गंगापूर, गंगापूर ते चेक ठाणा ,नवेगाव मोरे नंतर नांदगाव असा प्रवास करावा लागत आहे. या पावसामुळे अनेकांच्या घराची गळती सुरू आहे. त्याचा फटका गोरगरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना बसत आहे. भास्कर गेडाम या गरीब आदिवासी शेतमजुराच्या झोपडी वजा घरात दरवर्षीच पावसात पाणी साचून पाण्याखालीच वास्तव्य करावे लागत आहे.

नांदगावच्या महिला सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार- वृक्षतोड प्रकरण आले अंगलट, विकास कामेही थंड बस्त्यात

इमेज
नांदगावच्या महिला सरपंचावर अपात्रतेची टांगती तलवार- वृक्षतोड प्रकरण आले अंगलट, विकास कामेही थंड बस्त्यात -उपसरपंच देउरकर यांचा आरोप  चंद्रपूर: मुल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिसंवेनशील असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतच्या सरपंच एडवोकेट हिमानी वाकुडकर यांना अप्पर आयुक्त नागपूर यांनी सुनावणी नोटीस बजावली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सरपंच िमानी वाकुडकर यांचे वर जिल्हा परिषद शाळेतील 20 वृक्ष तोडल्याचा आरोप आहे. कुठलीही परवानगी न घेता शाळा प्रशासनाला सुद्धा विश्वासात न घेता वृक्ष तोडून त्यांनी वृक्ष लागवडीचा जणू फजा उडवला आहे असा आरोप खुद्द उपसरपंच सागर देवकर यांनी केला आहे.  एकीकडे वृक्ष लागवड करून पर्यावरण वाचवण्याचे आवाहन करण्यात येत असताना त्यांनी वृक्ष लागवडी ऐवजी वृक्ष तोड केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून अप्पर आयुक्त नागपूर यांचेकडे तक्रार दाखल केली असल्याने त्यांना 17 जुलै 2023 रोजी उपस्थित राहण्याची सुनावणी नोटीस बजावले आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे नागरिकांच्या नजरा खिळल्या आहेत. मात्र सरपंच स्वतः वकिलीच्या विद्यार्थिनी असल्यामुळे यातून त्या सुखरूप बाहेर निघतील अस...

*घोडाझरी तलावात शेगांव ता. वरोरा येथील ४ युवक बुडाले*

इमेज
*घोडाझरी तलावात शेगांव ता. वरोरा येथील ४ युवक बुडाले* अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभिड---- तालुक्यातील पर्यटन स्थळ असलेल्या घोडाझरी तलावाच्या काठावर सेल्फी काढण्याच्या नादात चार युवक पाण्यात बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असुन, प्राप्त माहितीनुसार चंद्रपुर जिल्हातील वरोरा तालुक्यातील शेगांव येथील रहिवासी आहेत, नागभिड पासुन अवघ्या आठ कि,मी अंतरावर अभयारण्य असलेल्या घोडाझरी तलाव पाहण्यासाठी आठ युवक आले होते .  सेल्फी काढण्याच्या नादात एक जण घसरून पडला व पाठोपाठ तीन जण पडले . त्यात (1)मनिष श्रीरामे वय (26 ) (2) धिरज झाडें वय (27) (3) संकेत मोडक (25) (4) चेतन मांदाडे वय (17) हे पाण्यात पडले व बुडाल्याची माहिती पुढे आली, त्या बातमीची माहिती नागभीड पोलीसांना देण्यात आली, माहिती मिळताच पोलीस निरीक्षक योगेश घारे ,वैभव कोरवते,सह इतर पोलीस चंबू घटनास्थळी रवाना होऊन तलावात बोटीच्या साह्यायाने बुडालेल्या युवकांचा शोधकार्य /शोध मोहिम वृत लिहेपंर्यत सुरु होती,