पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणपती विसर्जनात तीन युवक बुडाले!एकाचा मृत्यू दोघे बेपत्ता चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील दुर्दैवी घटना

इमेज
गणपती विसर्जनात तीन युवक बुडाले!एकाचा मृत्यू दोघे बेपत्ता चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी जिल्ह्यातील सावली शहरातील गणपती विसर्जना दरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन युवक पाण्यात वाहून गेले. त्यापैकी एक जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाला मात्र रुग्णालयात उपचारात दरम्यान त्याचा मृत्यू झाला. गुरुदास दिवाकर पिपरे वय 25 वर्ष असे मृतक युवकाचे नाव असून दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. घटनेची माहिती सावली पोलिसांना होताच घटनास्थळावर दाखल होऊन शोध मोहीम सुरू केली आहे.

प्यारेलाल लाकडे यांना मातृशोक 🔴 कमलाबाई दादाजी लाकडे यांचे वृद्धापकाळाने निधन

इमेज
प्यारेलाल लाकडे यांना मातृशोक 🔴 कमलाबाई दादाजी लाकडे यांचे वृद्धापकाळाने निधन अजित गेडाम, (प्रतिनिधी) जुनगाव: पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील बौद्ध समाज कमेटी चे माजी अध्यक्ष प्यारेलाल लाकडे यांच्या मातोश्री कमलाबाई दादाजी लाकडे यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी सायंकाळी पाच वाजता निधन झाले.मृत्यु समयी त्यांचे वय ९६ वर्ष होते. श्रीमती कमलाबाई दादाजी लाकडे या प्रसिद्ध दाईनबाई म्हणून कार्यरत होत्या. मात्र वयोमानामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वीच ते काम सोडले होते. त्या गावातील सर्वात वयस्कर महिला म्हणून म्हणता येईल. त्यांचा स्वभाव आधीपासूनच प्रेमळ होता आणि सर्वांसोबत आपुलकीचे नाते होते. त्यांच्या पश्चात मुलगा प्यारेलाल, सून, दोन मुली, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर उद्या दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पालक मंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटला बेंबाळ बोर चांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न

इमेज
पालक मंत्र्यांच्या मध्यस्थीने सुटला बेंबाळ बोर चांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न अजित गेडाम, जुनगाव: मुल तालुक्यातील बेंबाळ व बोर चांगली येथील प्रादेशिक पाणीपुरवठा मागील अनेक दिवसापासून बंद होता त्यामुळे नागरिकांचा आक्रोश वाढलेला होता. यावर तोडगा काढण्यासाठी ग्रामपंचायतीने कसोशीने प्रयत्न चालविले.ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य म्हणून पंचायत समितीचे माजी सभापती चंदू मार्गोनवार, संजय भाऊ येनुरकर, मुन्ना भाऊ कोटगले, नांदगाव चे उपसरपंच सागर भाऊ देऊळकर, बेंबाळ ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य किशोर पगडपल्लीवार,यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करत पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचेकडे साकडे घातले. पालकमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी समस्येचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा विकास निधीतून बेंबाळ व बोर चांदली प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी निधी देण्याचे मान्य करून निधी वितरित करण्यात आला. त्यामुळे येत्या तीन ते चार दिवसात बेंबळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व बोर चांदी पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू होऊन नागरिकांना शुद्ध पाणी मिळेल असा आशावाद बेंबाळ आणि बोर चांदली ग्रामपंचायतच्या...

आज दरारा 24 तास न्यूज पोर्टलचा प्रथम वर्धापन दिवस

इमेज
अल्पावधीतच चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात डिजिटल मीडिया क्षेत्रात लोकप्रिय झालेल्या दरारा 24 तास या न्यूज वेबसाईटचा आज प्रथम वर्धापन दिवस आहे. दरारा 24 तास या न्यूज पोर्टलने डिजिटल मीडिया क्षेत्रात अल्पावधीतच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तळागळातील प्रश्नांना वाचा फोडून वंचित पीडितांचे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न, गाव असो की शहर सर्व समस्या या पोर्टलच्या माध्यमातून वर्षभर रेटून मांडल्या गेल्या. बातमीची दखल घ्यायला लावणारे न्यूज पोर्टल म्हणून नावलौकिक या चॅनलने मिळवलेला आहे. दरारा 24 तास या न्यूज पोर्टल कडून सर्व वाचकांना जाहिरातदारांना बातमीदारांना हार्दिक शुभेच्छा असेच प्रेम आमच्यावर टिकून राहावे हीच अपेक्षा वजा विनंती! =========================== मुख्य संपादक रंजन मिश्रा, कार्यकारी संपादक जीवनदास गेडाम ========================== 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 मान्यवरा ंनी दिलेल्या शुभेच्छा शैलेश भाऊ चिंचोलकर ========================== 🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 आशिश भाऊ अहिरकर ==========================🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋 ...

*नागभिड तालुका शिवसेना (उबाठा) च्या वतीने निवेदन*

इमेज
*नागभिड तालुका शिवसेना (उबाठा) च्या वतीने निवेदन*  अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभीड--- तालुक्यातील अनेक रस्ते खराब झालेले असून गावा खेड्यातील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो याकरिता नवनियुक्त ,तालुका शिवसेना प्रमुख बंडूभाऊ पांडव, यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तालुक्यातील रस्ते दुरुस्तीची मागणी केली केली आहे नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव रस्त्याची दुरावस्था बिकट आहे तर तालुक्यातील स्थिती कशी असेल हे सांगणे कठीण आहे याकरिता गावाच्या विकासासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आल्याची नवनियुक्त तालुका प्रमुख बंडूभाऊ पांडव यांनी सुरुवात केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन मागणी करण्यात आली यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख बंडूभाऊ पांडव , युवासेना उपजिल्हाप्रमुख नाजीम शेख , शिवसेना तालुका संघटक विकी मडकाम , शिवसेना शहर प्रमुख अमित अमृतकर गोपाल बैस ,अरविंद बारस्कर शाखाप्रमुख नवेगाव पांडव अनेक शिवसेना कार्यकर्ता मोठ्या संख्खेनी उपस्थित होते,

आम्हाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज-आरक्षण देण्यापेक्षा स्त्रियांना बंदूक द्यावी

इमेज
आम्हाला आरक्षणापेक्षा संरक्षणाची गरज-आरक्षण देण्यापेक्षा स्त्रियांना बंदूक द्यावी महिलांची सोशल मीडियावर मागणी आणि प्रतिक्रिया दरारा 24 तास महिला आरक्षण बिल सध्या देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. काहीजण महिला आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत तर काहीजणांच्या भूमिका मवाळ आहेत. हे आपण संपूर्ण देशाने बघितले आहे. परंतु महिला आरक्षणापेक्षा संरक्षणाची जास्त गरज असल्याचे मत काही स्त्रियांनी व्यक्त केले असून त्यांनी संरक्षणासाठी बंदुकीची मागणी केली आहे. सध्या देशात स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराने स्त्रिया पेटून उठल्या आहेत त्याचाच प्रत्यय सोशल मीडिया वरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करून व्हायरल होत आहेत. महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी ठोस कार्यक्रमाची गरज असून नुसते गाजर दाखवण्यात सरकार तल्लीन आहे.यात सुधारणा होणे आवश्यक आहे.

वाघाच्या हल्ल्यात ताडाळा येथील शेतकरी ठार, मुल तालुक्यातील घटना

इमेज
वाघाच्या हल्ल्यात ताडाळा येथील शेतकरी ठार, मुल तालुक्यातील घटना मुल तालुका प्रतिनिधी मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या व पोंभुर्णा वनपरिक्षेत्रा च्या हद्दीतील ताडाळा शेत शिवारात शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी सात वाजता चे सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून व नव विभागाप्रती संताप व्यक्त केला जात आहे. सूर्यभान टीकले वय 55 वर्षे असे या हल्ल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर उपस्थित झाले आहेत पुढील तपास सुरू आहे. वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा अशी नागरिकांची आर्त हाक आहे.

मुसळधार पावसामुळे बेंबाळ येथील प्रभाकर मोहुर्ले व इतरांची घरे कोसळली 🔴 सरपंच उपसरपंच यांनी केली मोका पाहणी, शासनाने मदत देण्याची मागणी

इमेज
मुसळधार पावसामुळे बेंबाळ येथील प्रभाकर मोहुर्ले व इतरांची घरे कोसळली सरपंच उपसरपंच यांनी केली मोका पाहणी, शासनाने मदत देण्याची मागणी जुनगाव: कालपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरातील अनेकांच्या घराची नुकसान झाल्याचे वृत्त आहे तर अनेकांची घरे पडली, तर काहींची घरे गळतीमुळे चिखलमय झाली आहेत. मुल तालुक्यातील बेंबाळ येथील प्रभाकर मोहरले, कालिदास जी कुंभारे, वामन ध्यानभोईवार, यांचे घर अति पावसामुळे कोसळले. त्यामुळे त्यांच्या घरातील वस्तूंची नासधूस आणि नुकसान झाली आहे. या घटनेची माहिती ग्रामपंचायतीला मिळताच सरपंच चांगदेव केमेकर आणि उपसरपंच देवाजी ध्यानभोईवार, ग्रामपंचायत सदस्य कविताताई नंदीग्रामवार, अरुणाताई गेडाम, आशाताई शेंडे, आशाताई मडावी, यांना होताच त्यांनी घटनास्थळावर दाखल होत पडलेल्या घराची पाहणी केली. त्यांना शासकीय आर्थिक मदत मिळवून देण्याची हमी दिली. वस्ती करण्याचे घर पडल्यामुळे आपातग्रस्त कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. अशा परिस्थितीत शासकीय यंत्रणेने तात्काळ पाहणी करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच चांगदेव केमेकर, उपसरपंच देवाजी ध्यानभोईवार, व ग्राम...

मुसळधार पावसामुळे घरात साचले पाणी-भास्कर गेडाम यांची रोजचीच कहानी

इमेज
मुसळधार पावसामुळे घरात साचले पाणी-भास्कर गेडाम यांची रोजचीच कहानी जुनगाव: कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दिनांक 21 सप्टेंबर,सकाळपासून जुनगाव येथे मुसळधार पाऊस बरसात आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका जुनगाव येथील अत्यंत गरीब असलेल्या भास्कर गेडाम यांच्या झोपडी वजा घरात पावसाचे पाणी साचले असल्याने त्यांची राहण्याची पंचायत निर्माण झाली आहे. पाऊस पडला की हा प्रश्न प्रत्येक वेळेस भेडसावत असतो. या आदिवासी नागरिकास अजून पर्यंत घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याने त्यांना झोपडीतच आपले जीवन कंठावे लागत आहे. दुसरीकडे मात्र अनेकांना गरज नसतानाही घरकुलाचा लाभ देण्यात आलेला आहे.मात्र गरजू लोकांना घरकुल योजनेतून डावलण्यात आल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. गावातील अनेक गरिबांच्या घराची अशीच अवस्था झाल्याचे सांगण्यात येत आहे. शीला विश्वनाथ झबाडे या विधवा व निराधार महिलेच्या घराची पडझड झाली असून जिकडून तिकडून पावसाचा प्रहार घरात होत असल्याने या महिलेची तारांबळ उडाली आहे. पुरुषाचा आधार नसल्याने या महिलेवर प्रचंड तान- तणाव निर्माण झाला. अशा लोकांची यादी बनवून ग्रामपंचायतीने प्...

इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका - ॲड. चैतन्य भंडारी

इमेज
इर्मजन्सी अलर्ट सर्व्हसचा मॅसेज आल्यामुळे तुम्ही घाबरु नका - ॲड. चैतन्य भंडारी जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या सल्लागार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७ धुळे - कालपासून बहुतेक सर्वानाच एक मेसेज येतोय. मलाही आलाय ! त्याचाच स्क्रीनशॉट सोबत आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून चाचणी संदेश आहे असं म्हणत तारीख आणि वेळ त्यापुढे टाकलेली! असे मेसेज येत आहेत. आणि एक नव्हे तर कैक मेसेज असे एकाच मोबाईलवर संगणकावर किंवा इलेक्ट्रीक बाईकवर येत आहेत! या मेसेजमुळे पॅनिक होऊन जाऊ नका ! इतकेच आधी सांगतो. हि एक प्रकारची अशी सुविधा ऍक्टिव्हेट करण्याचे टेस्टिंग सुरु असून त्यामुळे भविष्यात तुम्ही कधी कुठं संकटात सापडला, अडचणीत आला, अपघातात अडकला तर तुमच्या नम्बरवरून एक इमर्जन्सी मेसेज तयार होऊन तो तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील मित्रांना पाठवला जाऊ शकतो. जेणेकरून त्यांना तुम्ही संकटात आहात हे कळून त्यांनी मग धावपळ करून तुम्हाला संकटातून बाहेर काढावे. यातलीच दुसरी एक सुविधा बहुतेक ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न सुरु असावा जो "इमर्जन्सी" नंबर म्हणून ब...

गणपती विसर्जन करताना मोठी दुर्घटना! तिघांचा बुडून मृत्यू

इमेज
गणपती विसर्जन करताना मोठी दुर्घटना! तिघांचा बुडून मृत्यू पालघर   दरारा 24 तास: दीड दिवसाचा गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.   प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गो-हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला असून यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य( वय 38)सुरज नंदलाल प्रजापती (25)अशी कोनसई येथील नाल्यात तर प्रकाश नारायण ठाकरे( वय 35) गो-हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.  गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचतो. राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. त्यामुळे शहरी भागात नाही पण ग्रामीण भागातच अधिकच्या दुर्घटना घडल्याचं दिसून येतं. गणेश भक्तांकडून कित्येक वेळेस नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तर शहराप्रमाणे पोलिस बंदोबस्तही नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी कमी असूनही अशा दुर्घटना ...

आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल!!

इमेज
आंदोलनाचा इशारा देताच सुरू झाले महागाव-सुभाषनगर मार्गाचे डांबरीकरण : सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतली दखल!! अहेरी : तालुक्यातील महागाव-सुभाषनगर या रस्त्याची दुरवस्था होऊन काही महिन्यांपूर्वी मोठे खड्डेही पडले होते. त्यामुळे अहेरी-महागाव-सुभाषनगरपर्यंत नवीन डांबरीकरण करा.अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार यांनी दिला होता.त्याची दखल घेत अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. अहेरी-महागांव- सुभाषनगर या मुख्य मार्गावर खड्डे पडल्यामुळे रुग्णालयात येणारे रुग्ण तसेच शालेय विद्यार्थ्याना,गर्भावती महिलांना या रस्त्यावरून जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जीव धोक्यात घालून त्यांना प्रवास करावा लागत आहे.त्यामुळे याकडे लक्ष देऊन या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम आठवडाभरात सुरू करा.अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.असा इशारा माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी दिला हो...

सुप्रसिद्ध ॲटर्णी धम्मा निमगडे यांना मातृषोक, आज होणार अंत्यसंस्कार

इमेज
सुप्रसिद्ध ॲटर्णी धम्मा निमगडे यांना मातृषोक, आज होणार अंत्यसंस्कार पोंभुर्णा: तालुक्यातील न्यायालयातील सुप्रसिद्ध अॅटर्णी, सामाजिक कार्यकर्ते, धम्मा निमगडे यांच्या मातोश्री श्रीमती बेबीबाई कालिदास जी निमगडे यांचे वृद्धापकाळाने त्यांच्या राहते घरी दिनांक 18 सप्टेंबर 2023 रोजी रात्री दहा वाजता निधन झाले. मृत्यू समयी त्या 78 वर्षांच्या होत्या.   त्यांचेवर सेल्लूर घाट येथे आज अंत्यसंस्कार होणार होणार असून त्यांच्या आप्तेष्टांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जुनगाव:वैनगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी, या मार्गावरील रहदारी ठप्प

इमेज
वैनगंगा नदीच्या पुलावरून पुराचे पाणी, या मार्गावरील रहदारी ठप्प अजित गेडाम- जुनगाव प्रतिनिधी, दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे धरणाचे काही दरवाजे काल सकाळीच उघडण्यात आले आहेत. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील जुनगाव हे गाव आज सकाळपासून पुलावर पाणी असल्यामुळे रहदारी ठप्प झाली आहे. गोसेखुर्द धरणातून साधारणता दोन लाख 91 हजार 505 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती धरण प्रशासनाने दिली आहे. नदी काठावरील शेतकऱ्यांना व नागरिकांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जुनगाव ते नांदगाव   हा रस्ता बंद झाल्यामुळे सात किलोमीटरचे अंतर आता गंगापूर मार्गे, नवेगाव मोरे व्हाया नांदगाव असा 20 ते 25 किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली 18 विद्यार्थी बेपत्ता

इमेज
विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली 18 विद्यार्थी बेपत्ता पटना:बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये नदीत लहान मुलांनी भरलेली बोट उलटली आहे. या दुर्घटनेत २० मुलांना वाचवण्यात यश आलं असून अद्यापही १६ हून आधिक मुलं बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती मिळालीये. सदर घटनेची माहिती मिळताच शोध आणि बचावकार्यास सुरूवात झाली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, गायघाट येथील बेनियाबाद ओपी परिसरातील मधुपट्टी घाटात ही बोट पलटी झाली. बोटीतून सुमारे ३३ लहान मुलं प्रवास करत होते. शाळकरी मुलांची बोट नदीत पलटल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. नदीमधील पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने बोट बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

24 गावांचा डोलारा दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर! ग्रामपंचायत ने पद भरण्याची केली मागणी

इमेज
=================== 24 गावांचा डोलारा दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर!  उपसरपंच देवाजी राजू ध्यानभोईवार यांनी पद भरण्याची केली मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर =================== जुनगाव: (अजित गेडाम) =================== मुल पोलीस ठाणे अंतर्गत बेंबाळ पोलीस चौकीत केवळ दोन पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याने परिसरातील सुरक्षा व्यवस्था कोलमडली आहे. परिणामी अनेक प्रकारचे गुन्हे ,घरफोड्या, चोऱ्या वाढलेल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन ग्रामपंचायत बेंबाळाचे उपसरपंच श्री देवाजी राजू ध्यानभोईवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन रिक्त जागा भरण्याची मागणी केली आहे. या पोलीस चौकीत एकूण सात पदे मंजूर असताना केवळ दोनच पोलीस कर्मचारी 24 गावांचा डोलारा सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या पोलीस चौकी अंतर्गत बेंबळ,नांदगाव, घोसरी, पिपरी देशपांडे, दिघोरी, फुटाणा, नवेगाव भुजला, जुनासुरला, बोंडाळा बुद्रुक, बोंडाळा खुर्द, देवाडा बुद्रुक देवाडा बुद्रुक, इत्यादी गावांचा समावेश असून भौगोलिक दृष्ट्या ही गावे फेरफटका मारण्यास अडचणीचे आहेत. कारण पोलीस ठाणे मूल असले तरी, या ठाण्या...

फीस्कुटी शेत शिवारात वाघिणीचा मृत्यू! वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?

इमेज
फीस्कुटी शेत शिवारात वाघिणीचा मृत्यू! वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह? जुनगाव:(अजित गेडाम) मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील शेत शिवारात वाघीण मृतावस्आथेतढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोंभर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परंतु मूल तालुक्यातील गावातील शेतशिवारात शेतावर काम करायला गेलेल्या महिलांना सदर वाघीण वृत्तावस्थेत आढळून आली. महिलांनी शेतमालकाला याची माहिती दिली. शेतमालकाने सरपंच यांचेशी संपर्क साधून वनविभाग पोंभुर्णा यांना कळविण्यात आले. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल होऊन घटनास्थळ पंचनामा केला. विशेष म्हणजे याच वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापूर्वी नांदगाव येथील शेत शिवारात अशाच एका मोठ्या वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक असे वाघांचे मृत्यू होत असताना वनविभाग गुंगीचे औषध खाऊन गप्प बसले असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

फीस्कुटी शेत शिवारात वाघिणीचा मृत्यू! वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह?

इमेज
फीस्कुटी शेत शिवारात वाघिणीचा मृत्यू! वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह? जुनगाव:(अजित गेडाम) मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील शेत शिवारात वाघीण मृता वस्तीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.पोंभर्णा वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या परंतु मूल तालुक्यातील गावातील शेतशिवारात शेतावर काम करायला गेलेल्या महिलांना सदर वाघीण वृत्तावस्थेत आढळून आली. महिलांनी शेतमालकाला याची माहिती दिली. शेतमालकाने सरपंच यांचेशी संपर्क साधून वनविभाग पोंभुर्णा यांना कळविण्यात आले. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळावर दाखल होऊन घटनास्थळ पंचनामा केला. विशेष म्हणजे याच वनपरिक्षेत्रात मागील काही महिन्यापूर्वी नांदगाव येथील शेत शिवारात अशाच एका मोठ्या वाघिणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. एकापाठोपाठ एक असे वाघांचे मृत्यू होत असताना वनविभाग गुंगीचे औषध खाऊन गप्प बसले असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे.

आईच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनगावला संविधानाची प्रत भेट

इमेज
आईच्या स्मृती प्रित्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जुनगावला संविधानाची प्रत भेट वेळवा शाळेचे प्राथमिक शिक्षक केतन दहिवले सर यांचा उपक्रम जुनगाव:(अजित गेडाम) आई वडिलांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी अनेक महानुभाव वेगवेगळ्या पद्धतीने स्मृती तेवत ठेवतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेळवा तालुका पोंभुर्णा येथील प्राथमिक शिक्षक केतन दहिवले सर यांनी आपल्या आईच्या स्मृती प्रित्यर्थ दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव येथे प्रत्यक्ष येऊन शाळेला भारतीय संविधानाची प्रत भेट म्हणून दिली. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक खुशाबराव पिंपळशेंडे, डोंगरवार सर, बटे सर, कोसरे सर, गेडाम मॅडम, व इतर शिक्षक उपस्थित होते. संविधानाचे प्रत्येकाने वाचन करून भारतीय संविधानाने आपल्याला काय दिले हे जाणून घेऊन संविधान रक्षणाची जबाबदारी स्वीकारावी असे मत व्यक्त करण्यात आले.

नदी नाल्यातून नंदुरबार जिल्ह्यात अंतयात्रा, आदिवासी विकास मंत्र्यांच्या क्षेत्रातील भयान वास्तव

इमेज
नदी नाल्यातून नंदुरबार जिल्ह्यात अंतयात्रा, आदिवासी विकास मंत्र्यांच्या क्षेत्रातील भयान वास्तव Daraaraa24 नंदुरबार : आदिवासी विकास मंत्री यांच्या क्षेत्रात आदिवासींना अंत्यविधी करण्यासाठी मोठ्या नाल्यातून ग्रामस्थ दोरीच्या साहाय्याने जीव मुठीत धरून अंत्ययात्रा नेण्याची वेळ आली आहे. अंत्यविधीसाठी तब्बल १५ तास वाट पहावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातून समोर आला आहे. हा प्रकार आदिवासी विकास मंत्री यांच्या क्षेत्रातील असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.  ८ तारखेला गावात धावजी उखाराव नाईक या व्यक्तीचं अल्पशा आधाराने निधन झालं होतं. त्यावेळी त्यांची अंत्ययात्रा चक्क वाहत्या नाल्यातून न्यावी लागली. नवापूर तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे वागदे गावालगत नाल्याला पूर आला. येथील धावजी नाईक हे अल्पशा आजाराने मयत झाले. त्यांचा अंत्यसंस्कार १५ तास करता आला नाही शनिवारी पाण्याच्या जोर कमी झाल्याने ग्रामस्थांनी नाल्यातून चार फूट खोल पाण्यातून दोराच्या साहाय्याने मला जीव मोठे धरून स्मशानभूमी गाठली. नंदुरबार जिल्ह्यातील आजही अनेक ग...

नाशिकच्या जवानाला वीरमरण: नाशिक जिल्ह्यावर अशोक कळा, श्रीनगर मध्ये वीरगती

इमेज
नाशिकच्या जवानाला वीरमरण: नाशिक जिल्ह्यावर शोक कळा, श्रीनगर मध्ये वीरगती नाशिक: जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील जवानास वीरगती प्राप्त झाली आहे. चांदवड तालुक्यातील हरनुल येथील भारतीय सैन्य दलातील विकी अरुण चव्हाण वय 25 वर्ष ते श्रीनगरला कार्यरत होते. कुस्तीचा सराव सुरू असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विकी चव्हाण या जवानाच्या निधनाने चव्हाण कुटुंबासह संपूर्ण गावावर शोक कळा पसरली आहे.

गडचिरोलीत पोंभुर्णा तालुक्यातील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

इमेज
गडचिरोलीत पोंभुर्णा तालुक्यातील महिलेची गळफास घेऊन आत्महत्या गडचिरोली : गडचिरोली शहरातील फुले वार्डात भाड्याची खोली घेऊन राहणाऱ्या एका महिलेने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवल्याची खळबळ जनक  घटनाशनिवार 9 सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.  घटनेने शहरात एकच खळबळ उडाली. सुवर्णा ऋषी कोटवार (२५) रा. चक बल्लापूर ता.पोंभुर्णा जि. चंदपूर असे गळफास घेतलेल्या महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा कोटेवार हिचे माहेर पोंभुर्णा तालुक्यातील बल्लारपूर चक हे असुन तिचे आठ वर्षापूर्वी सिंदेवाही तालुक्यातील पाथरी परिसरातील तरूणाशी लग्न झाले होते. तिला पाच वर्षाचा मुलगा आहे. ती पतीपासून वेगळी राहत होती. मुलगा पतीकडेच राहतो.सुवर्णा गडचिरोली येथे सहा महिन्यांपूर्वी राहायला आली होती. तिने एका दुकानामध्ये काही दिवस काम केले. फुले वार्डातील खोली भाडयाने घेवून ती राहत होती.  दरम्यान तिने आज गळफास घेत जिवनयात्रा संपविली. घटनेची माहिती पोलीसांना देण्यात आली असता घटनास्थळ गाठून पंचनाम केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठविला. गळफास घेण्याचे कारण अदयाप गुलदस्त्यात आहे.पुढील...

भटारी येथील आदिवासी शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू

इमेज
भटारी येथील आदिवासी शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू पोंभुर्णा: तालुक्यातील भटारी येथील 35 वर्षीय तरुण शेतकरी कपिल एकनाथ आलाम यांचा शेतात काम करीत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी तालुक्यात घडली. सदर शेतकरी स्वतःच्या शेतात काम करीत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास त्याला सर्पदंश झाला. घरी आल्यानंतर त्यांनी घरच्यांना उशिरा माहिती सांगितली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात नेण्यास विलंब लागला. तद्वतच जोराचा पाऊस सुरू असल्याने दवाखाना गाठणे कठीण झाले होते. दवाखान्यात उशिरा पोहोचल्यामुळे त्यांचे वर उपचार होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

*घुग्घुस ते पडोली मार्गा वरील खड्डे लवकरात लवकर बुझवा -* *अन्यथा युवासेना तर्फे शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू - युवासेना उपतालूका प्रमुख सुश्मित गौरकार यांचा इशारा*

इमेज
*घुग्घुस ते पडोली मार्गा वरील खड्डे लवकरात लवकर बुझवा -* *अन्यथा युवासेना तर्फे शिवसेना स्टाईल ने आंदोलन करू -   युवासेना उपतालूका प्रमुख सुश्मित गौरकार यांचा इशारा*   चंद्रपूर : घुघ्घुस ते पडोली मार्ग अत्यंत खड्डेमय झाला असून या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत.ही समस्या लक्षात घेऊन युवासेना उपतालुकाप्रमुख सुश्मित गौरकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. दि.०७/०९/२०२३ रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिर्रे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत भाऊ सहारे यांच्या मार्गदर्शनात आणि युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमराज भाऊ बावणे व शिवसेना तालुका समन्वयक विकासभाऊ विरुटकर याच्या नेतृत्वाखाली सुश्मित गौरकार याच्या पुढाकारातून धानोरा टोल प्लाझा ला निवेदन देण्यात आले.   घुग्घुस ते पडोली मार्गा वर मोठे मोठे खड्डे पडलेले असून या खड्ड्यांमुळे कित्येकदा अपघात झालेले आहे. आणि अपघातामुळे कित्तेक लोकांचे जीवही गेले आहे. या संबंधीत वारंवार निवेदन दिले आहे.  निवेदन दिल्या नंतर सुद्धा निकृष्ट दर्जाचे काम करण्यात येते आणि काही दिवसानंतर तीच परिस्थिती निर्माण होते. या वर कायमचा तोडगा काढून लवकरात...

विज बिल थकल्याने बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा दहा दिवसापासून बंद ----------------------------------------- ऐन पावसाळ्यात महिलांची भटकंती : कंत्राटदाराचे दुर्लक्ष-ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज

इमेज
विज बिल थकल्याने बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा दहा दिवसापासून बंद ----------------------------------------- ऐन पावसाळ्यात महिलांची भटकंती : कंत्राटदाराचे दुर्लक्ष-ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज ------------------------------------------ जुनगाव : मुल तालुक्यातील बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा गत दहा दिवसापासून बंद असुन कंत्राटदाराच्या दुर्लक्षितपणामुळे परिसरातील महिलांना ऐन पावसाळी दिवसामध्ये पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली असल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे.          बेंबाळ प्रादेशिक योजनेमध्ये नवेगाव(भुज), कोरंबी, बाबराळा, चेक दुगाळा, नांदगाव, घोसरी, गोवर्धन या गावाचा समावेश आहे. सदर योजना शुध्द पाणी पुरवठा योजनेसाठी कार्यन्वीत असली तरी संबंधित कंत्राटदार मनमानी धोरण अवलंबिले असल्याने नियमित पाणी पुरवठा होत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अन्य स्त्रोतांतील अशुध्द पाण्यावर तहान भागविण्यासाठी ऐन पावसाळ्यात महिलांना भटकंती करण्याची वेळ आली आहे.             बेंबाळ प्रादेशिक...

*💥 पोंभूर्णा ते गोंडपिपरी व्हाया मोहाळा रै, चेक खापरी बस सेवा सुरू.!* *➡️ विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा.* @वैभव_पिंपळशेंडे

इमेज
*💥 पोंभूर्णा ते गोंडपिपरी व्हाया मोहाळा रै, चेक खापरी बस सेवा सुरू.!* *➡️ विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा.* @वैभव_पिंपळशेंडे अजित गेडाम, प्रतिनिधी  पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा, चेक नवेगाव, मोहाळा रै., चेक खापरी, चेकठाणेवासना, भिमणी, घाटकुळ या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी गोंडपिपरी येथे जावे लागते. तिथे जाण्याकरिता मोहाळा रै. आणि चेक खापरी मार्गे बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी वेळेत शाळेमध्ये व कॉलेजमध्ये पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणत शैक्षणिक नुकसान होत होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता परिसरातील पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी केली होती. याची एस. टी. महामंडळ ने तात्काळ दखल घेत आज दिनांक 06/09/2023 पासून बस सेवा सुरू केलेली आहे. सदर बसची पोंभूर्णा वरून सुटण्याची वेळ सकाळी 8 वाजून 10 मिनिटे आहे. तरी परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तसेच नागरिकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांच्या व नागरिकांच्या मागणीनुसार बस च्या वेळेमध्ये बदल करण्यात येईल. *इंजि. वैभव प...

*जि. प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे शिक्षण दिन साजरा*

इमेज
*जि. प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे शिक्षण दिन साजरा* ( अजित गेडाम, प्रतिनिधी) पंचायत समिती पोंभुर्णा अंतर्गत जि. प. उच्च प्राथमिक शाळा, उमरी पोतदार येथे ०५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून 'स्वयंशासन उपक्रमाचे आयोजन' करण्यात आले. गुरु ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात परब्रह्म तस्मैः श्री गुरुवेः नमः। आपल्या संस्कृतीत आई-वडिलांनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आई जशी मुलांवर संस्कार करते, तसा गुरु हा मुलांना घडवण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे काम गुरु करतो. जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरुचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्त्व आहे. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच, ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.  विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशातून विद्यार्थी हे शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या भूमिका आजच्या दिवशी पार पाडत असतात.  या कार्यक्रमाला मुख्याध्यापक म्हणून राकेश रामलू कल्लमवार, उपमुख्याध्यापक म्हणून सा...