पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नदी नाले कोरडे पडल्याने तालुक्यात पाणीटंचाई- भाजयुमो चे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांचा नाम. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना फोन- चिचडोह बेरेज चे पाणी सोडण्याचे दिले आश्वासन

इमेज
पोंभुर्णा प्रतिनिधी     तालुक्यातील सर्व नदी नाले कोरडे पडल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. तापमानात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठावरही होत आहे. नदी,नाले, तलाव, लहान बोळ्या कोरडे पडल्याने, मानवासह वन्य प्राण्यांची सुद्धा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे. तालुक्यात वैनगंगा नदी वाहते परंतु फेब्रुवारी महिन्यातच नदी कोरडी पडल्याने नळ योजना वर परिणाम होऊन पाणी प्रश्न बिकट झाला आहे.       ही बाब जागरूक असलेले, जनतेच्या समस्या लक्षात घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत असणारे, जुनगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांनी पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना संपर्क करून समस्या लक्षात आणून दिली. मंत्री महोदयांनीही तात्काळ समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. व दिनांक 28 फेब्रुवारी रोजी चीजडोह गॅरेज प्रकल्पाचे पाणी सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे सध्या पाणी प्रश्न मिटणार असल्याने राहुल भाऊ पाल तसेच मंत्री महोदय यांचे तालुक्यातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.

*राजुऱ्यात शिवगर्जना यात्रेतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोरदार शक्ती प्रदर्शन* *वज्रमूठ बांधून गद्दारांना धडा शिकवा:-माजी खासदार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे*

इमेज
संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवगर्जना यात्रा चालू आहे. आज चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, युवासेना विस्तारक शरद कोळी, युवासेना पूर्व विदर्भ हर्षल काकडे, सहसापर्क प्रमुख प्रकाश मारावार यांच्या मार्गदर्शनात ही सभा पार पडली. पक्ष फुटी नंतर राजुऱ्यात पहील्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने शिवसैनिक एकत्र आलेले दिसले. या सर्व 40 गद्दारांना गाडून पुन्हा एकदा शिवसेना उभी करूया असा निर्धार शिवसेना नेते खैरे साहेबांनी बोलून दाखवला. पक्षाचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम आणि जिह्वाप्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आणि विधानसभा समन्वयक बबन उरकुडे यांच्या नियोजनात ही सभा यशस्वीरित्या पार पडली. याप्रसंगी महिला संघटिका उज्वलाताई नलगे , माजी संघटिका कुसुमताई उदार,माजी उपसंघटिका सरिताताई कुडे,तालुका प्रमुख वासुदेव चापले, तालुका प्रमुख सागर ठाकुरवार,समन्वयक प्रदीप येनूरकर, युवासेना तालुका प्रमुख बंटी मालेकर, युवासेना तालुका प्रमुख अंकुश वांढरे,उपतालुका प्रमुख रमेश झाडे, रमेश पेटकर, सुधाकर मोरे,माजी संघटक नरसि...

*स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये वार्षिक बक्षीस वितरण सोहळा*

इमेज
पोंभुर्णा प्रतिनिधी  दि.२७ फेब्रुवारी शहरातील स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला. चालू,शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या विविध क्रीडा तसेच शालेय स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे विशेष अतिथी नगर पंचायतचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगर पंचायतचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार,नगरसेवक दर्शन गोरंटीवार, स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूलचे संचालक संदीप ढोबळे,प्राचार्य संगिता देवगडे, रीझवान शेख, व आदी उपस्थित होते. प्रत्येक वर्गातील प्रथम आलेल्या खेळात हस्ताक्षर,रांगोळी, स्मरणशक्ती, चित्रकला, शिल्पकला, वकृत्व यासारख्या बौद्धिक तर धावणे,लिंबू चमचा, बेडूक उडी,कराटे, कबड्डी,क्रिकेट यांसारख्या क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी प्रमुख अतिथीच्या हस्ते गौरवण्यात आले. या संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासाकरिता मैदानी खेळ खेळणे आवश्यक असल्याचे मत शाळेचे संचालक प्रा.संदीप ढोबळे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहा पिदुरकर यांनी केले तर आभार प्रदर्...

दुःखद निधन: दिवाकर गंगाराम गेडाम यांचा अल्पशा आजाराने मृत्यू

इमेज
चामोर्शी: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुका अंतर्गत येणाऱ्या लखमापूर बोरी येथील प्रसिद्ध डहाका वादक श्री.दिवाकर गंगाराम गेडाम यांचे अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ६० वर्षे होते.      परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे पोटाची खडगी भरण्यासाठी पत्नी आणि मुलगा मिरची तोडण्यासाठी तेलंगाना राज्यात गेले होते. सदर गृहस्थ हे एकटेच घरी राहत होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृती बिघडली. यातच त्यांना आज दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी देवाज्ञा मिळाली. ही धक्कादायक बातमी त्यांच्या मुलगी, मुलाला व पत्नीला लागताच तेलंगानातून ते महाराष्ट्रासाठी रवाना झाले आहेत. अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्यांच्या अचानक जाण्यामुळे परिसरातील उत्कृष्ट डाहाका वादक हरपला अशी प्रतिक्रिया लोकांमधून उमटत आहे.      त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा सुधीर,मुलगी शिला, बहीण, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.

*💥 विधानसभेत तारांकित प्रश्न लागताच जिल्हा परिषदेने दिले* *💥सातारा भोसले ग्रामपंचायत गैरव्यवहाराच्या चौकशीचे आदेश* *💥विधानसभेत गाजला तारांकित प्रश्न* *💥शिवसेना तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांच्या पत्राची विधानसभेत दखल*

इमेज
पोंभुर्णा: तालुक्यातील सातारा भोसले ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरणी विधानसभेत तारांकित प्रश्न लागताच चंद्रपूर जिल्हा परिषद व पोंभुरणा पंचायत समितीत एकच खळबळ उडाली आहे.       शिवसेना तालुकाप्रमुख, विरोधी गटनेता आशिष कावटवार यांनी या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन आमदार प्रतिभा धानोरकर, व अन्य आमदार महोदयांनी सदर बाब विधानसभेत लावून धरली. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा परिषदेत याचे पडसाद उमटले.       महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पत्र काढून सदर प्रकरणी चौकशी करून मुदतपूर्व अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद चंद्रपूरचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी ग्रामपंचायत यांनी याप्रकरणी दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पंचायत समिती व ग्रामपंचायत वर्तुळात कमालीची अस्वस्थता पसरलेली आहे.

*सातारा भोसले ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण विधिमंडळात गाजणार बोगस जीएसटी घोटाळा बाबत लक्षवेधी व तारंकित प्रश्न* *नगर पंचायतचे विरोधीक्षनेते व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या मागणीची घेतली दखल* *विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार प्रतिभा धानोरकर,आमदार नाना पटोले,आमदार अशोक चव्हाण,आमदार विजय वेड्डेट्टीवार,सह १८ आमदारांनी विधानसभेत घेतला लक्षवेधी व तारांकित प्रश्ण सातारा भोसले ग्रामपंचायत गैरव्यवहार व बोगस जीएसटीचे प्रकरण* *जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनात खळबळ*

इमेज
*सातारा भोसले ग्रामपंचायत गैरव्यवहार प्रकरण विधिमंडळात गाजणार बोगस जीएसटी घोटाळा बाबत लक्षवेधी व तारंकित प्रश्न* *नगर पंचायतचे विरोधीक्षनेते व शिवसेना तालुका प्रमुख आशिष कावटवार यांच्या मागणीची घेतली दखल* *विधान परिषदचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,आमदार प्रतिभा धानोरकर,आमदार नाना पटोले,आमदार अशोक चव्हाण,आमदार विजय वेड्डेट्टीवार,सह १८ आमदारांनी विधानसभेत घेतला लक्षवेधी व तारांकित प्रश्ण सातारा भोसले ग्रामपंचायत गैरव्यवहार व बोगस जीएसटीचे प्रकरण* *जिल्हा प्रशासनासह तालुका प्रशासनात खडबड*

*बोधिसत्व बुद्धविहारात शिवाजी महाराजांना अभिवादन*

इमेज
चंद्रपर. रयतेचे राजे ,बहुजन प्रतिपालक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कार्यक्रम बाबुपेठ गौरीतलाव येथील बोधिसत्व बुद्धविहारात पंचशील बौद्ध मंडळ व रमाई महिला बौद्ध मंडळाच्या संयुक्त विध्यमाने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचशील बौद्ध मंडळाचे अध्यक्ष सुधाकर वाकडे तर मंचावर मंडळाचे सचिव धर्मराव सहारे, रमाई मंडळाच्या अध्यक्षा पल्लवी खोब्रागडे, सचिव स्मिता ढवळे उपस्थित होते. प्रारंभी पाहुण्यांनी तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर याच्या प्रतिमाना दिप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले.समाजात जातीय वैमनस्य पसरवणाऱ्या शक्तीच्या प्रचाराला आळा बसावा.तसेच समाज जीवनात प्रवेश करणाऱ्या तरुण पिढीला इतिहासाचे नावे भान देण्याचे कार्य पंचशील मंडळाच्या नवनियुक्त कार्यकारणीने हाती घेतलेले असून बहुजन समाजाच्या उत्थानासाठी झटणाऱ्या तमाम महापुरुषांचे कार्यचा वसा समाजात रुजवत ठेवण्यासाठी त्यांच्या कार्याचा सन्मान व गुणगौरव करण्यासाठी त्यांच्या जयंत्या साजऱ्या करण्याचा घेतलेला उपक्रम हा अभिमानास्पद असल्याने सर्व समाजबंधवानी अशा उपक्रमात सहभा...

धान कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट व फसवणूक - जुनगाव येथे सापडले वजन काटा नियंत्रण करणारे रिमोट - व्यापाऱ्याला रंगेहात शेतकऱ्यांनी पकडले,,

इमेज
पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी =========================== तालुक्यातील शेतकऱ्यांचा धान, कापूस खाजगी व्यापारी थेट गावातच येऊन विकत घेत आहेत. त्यांचे वजन काटे अधिकृत की अनधिकृत आहेत याचे कोणतेही मूल्यमापन नाही. धान व कापूस आणि इतर कटान खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आंधळा विश्वास आजही आहे. परंतु यातून शेतकऱ्यांची फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. वजन काटा करणारी माणकी खरोखरच त्या वजनाची असतात का किंवा तानकाट्याने मोजल्या जाणारा कापूस बरोबर वजनाने खरेदी केला जातो का? इलेक्ट्रॉनिक काटा सुद्धा त्यांचा बरोबर आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहेत. या व्यापाऱ्यांवर कोणाचेच वचक नसल्यामुळे व्यापाऱ्यांनी जुनगाव येथे तर जणू हैदोस घातला आहे.   इलेक्ट्रिक काट्याला नियंत्रित करून वजन कमी करणारे यंत्र अर्थात रिमोट उपलब्ध झाले असून या रिमोटच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे. आणि आर्थिक लूट केली जात आहे.         याचे ज्वलंत उदाहरण तालुक्यातील जुनगाव येथे दि.16 फेब्रुवारी रोजी उघडकीस आले. रिमोटने वजन कमी करत असताना शेतकऱ्याने व्यापाऱ्याला रंगेहात पकडले.आण...

उपविभागीय अधिकाऱ्याला हुलकावणी देत अवैध वाळू वाहतूक

इमेज
चंद्रपूर: महसूल विभागातील दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मरूगनाथम एम. यांनी मागील दोन महिन्यात रेती तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाई करीत अक्षरशः रेती माफीयांचे धाबे दणाणून सोडले आहे.       त्यामुळे रेती तस्करांकडून त्यांच्यावर सातत्याने पाळत ठेवली जात असून आता त्यांनाही हुलकावणी देत चंद्रपूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे.       २०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यातील ३८ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून रेतीचा उपसा सुरू आहे. लिलावात केलेल्या सर्व वृत्ती घाटातून एक लाख ८४ हजार १३३ ब्रास रेतिचा उपसा करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय, निमशासकीय आणि खाजगी बांधकामे सुरू आहेत. चंद्रपूर एमआयडीसीतील अनेक उद्योग, चंद्रपूर वीज केंद्र, फेरो अलाय अनेक ठिकाणी बांधकामासाठी रेतीची प्रचंड मागणी आहे.       गंभीर बाब म्हणजे रेतीच्या या व्यवसायात अनेक राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी आहेत. दुसऱ्याच्या ना...

⭐गोसे खुर्द प्रकल्पाच्या कामाच्या कंत्राटदाराची दिरंगाई 💥नळ योजनेचे पाईप फोडले:नांदगाव येथील पाणीपुरवठा तीन दिवसापासून बंद 🌟उन्हाळ्याची चाहूल लागताच पाण्याची समस्या

इमेज
विजय जाधव मूल तालुका प्रतिनिधी       मुल तालुक्यातील नांदगाव येथील नळ योजनेचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसापासून बंद असल्यामुळे ग्रामीण जनतेला उन्हाळ्याची चाहूल लागताच पाहण्यासाठी वन वन करावे लागत आहे. विशेष म्हणजे गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे अंडरग्राउंड पाईपलाईनचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अनेक ठिकाणी या कंत्राटदारांनी आपल्या मनमानी कारभारामुळे नागरिकांना नाहक त्रास भोगाव लागत आहे. विविध ठिकाणी खोदकाम करून नळ योजनेचे पाईप लाईन फोडल्यामुळे नांदगाव आणि बेंबाळ समवेत नऊ गावांचा पाणीपुरवठा गेल्या तीन दिवसापासून बंद आहे. नवेगाव भुजला, बेंबाळ, नांदगाव, गोवर्धन, घोसरी, चेक दुगाळा, दुगाळा माल, कोरंबी, बाबराळा ही गावे एकाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून पाणी मिळवत असल्याने या सर्व गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. पाईपलाईन दुरुस्त होताच वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर जळाला असल्याने तो दुसरा लावतो पर्यंत येथील पाणीपुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे येथील सर्व नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वन वन भटकावे लागणार आहे. पाणीपुरवठा करणारी यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठ...

आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त विशेष

इमेज
दरारा 24 न्युज चंद्रपूर  आदिवासी क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंतीनिमित्त विशेष  1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात चंद्रपूर जिल्हा देखील मोलाचे योगदान आहे. त्यांच्या हक्काच्या स्वातंत्र्यासाठी चंद्रपूरच्या माटिपुत्रांनी हसत हसत आपला जीव गमावला आणि इतिहासात अमर झाला. जरी आमच्या इतिहासकारांनी त्यांचे नाव, काम, त्याग कमी लेखले असले तरी ते या वीरांची वीरता नाकारू शकले नाहीत. त्यांच्या जन्मस्थळाचा सन्मान वाचवताना असे किती आदिवासी नायक शहीद झाले हे माहित नाही, परंतु त्यांची नावेही इतिहासात फारच कमी आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अमर शाहिद क्रांतासुर्य बाबुराव शेडमाके यांचे बलिदान विशेष महत्वाचे आहे, ते क्रांतीचे मशाल होते. वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्म 12 मार्च 1833 रोजी मोल्लंपल्ली (अहेरी) येथील श्रीमंता शेडमाके जामदारी येथे झाला, त्याच्या आईचे नाव जुर्ज्याल (जुर्जाकुंवर) होते. बाबुरावांना वयाच्या 3 व्या वर्षी गोटूलमध्ये जिथे कुस्ती, तिरकामाथा, तलवार, भाला यांचे प्रशिक्षण मिळाले. तो आपल्या साथीदारांसह जंगलात शिकार करण्यासाठी तसेच शस्त्रास्त्रांचा अभ्यास क...

शिवसेनेचा आज रस्ता रोको: जिल्हाप्रमुखासह वंचित चे जिल्हाध्यक्ष करणार नेतृत्व

इमेज
चंद्रपूर: शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तपणे राजुरा सस्ती मार्ग तातडीने निर्माण करावा, या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालय चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.       शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाप्रमुख भूषण फुसे, राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे आणि गौरीच्या सरपंच आशा उरकुडे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.        राजुरा सास्ती हा मार्ग प्रवाशांसाठी अतिशय धोकादायक ठरला असून जड वाहतुकीमुळे या भागात अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तातडीने रस्ता निर्माण व्हावा आणि येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना याच भागातील खानीत नोकऱ्या द्याव्या यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. जिल्हाभरातील शिवसैनिकांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.शिवसेनेचा आज रस्ता रोको: जिल्हाप्रमुखासह वंचित चे जिल्हाध्यक्ष करणार नेतृत्व चंद्रपूर: शिवसेना आणि...

चौथ्या दिवशीही वाघाची दहशत कायम:वाघाला बंदोबस्त करण्यास वन विभागाला अपयश

इमेज
विजय जाधव मूल तालुका प्रतिनिधी                मुल तालुक्यातील नांदगाव शेत शिवारात वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी नांदगाव शेत शिवारातील चोपण भागात वाघ निघाला. अशी चर्चा सुरू असतानाच काल गोवर्धन येथील बंडू दाऊजी शिंदे यांच्या शेतात वाघ दिसून आला. यामुळे शेतात काम करणारे मजूर वर्ग घरी निघून आले.वन विभागाला माहिती दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी रात्र गस्त घातली. परंतु वाघाला पकडण्यात अपयश आले.        पुन्हा आज दुपारी साडेबारा ते एक वाजे च्या दरम्यान नांदगाव शेत शिवारातील फुटाणा मार्गावरून कसर बोडी च्या दिशेने वाघ दिसून आल्याचे अनेकांनी बघीतले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन वाघाची शोधाशोध केली परंतु आजही वाघाला पकडण्यात वन विभागाला यश आल्याचे दिसून येत नाही.         या चार दिवसातील घटनांमुळे व वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी आपल्या शेतात जाण्यास घाबरत असून रब्बी पिकांची अतोनात नुकसान रानटी डुकरांच्या हैदोषामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. वाघाला त्वरित जेर बंद करून शेतकऱ्...

गोवर्धन शेतशिवारात आजही वाघाचा मुक्त संचार: वाघाच्या दर्शनासाठी बघ्यांची अलोट गर्दी

इमेज
                         ‌‌ विजय जाधव: मूल तालुक्यातील गोवर्धन शेतशिवारात वाघदर्शनाची आज दिनांक 8 फेब्रुवारी 2023 ला तिसरी घटना घडली असून सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बंडु दाऊजी शिंदे यांच्या शेतात पट्टेदार वाघ शेतात काम करून परतीच्या मार्गावर असलेल्या शेतकऱ्यांना दिसल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाला भ्रमणध्वनी द्वारे वाघ असल्याची माहिती दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन वाघाला जंगलाच्या दिशेने हुसकावून लावल्याची नुकतीच माहिती प्राप्त झाली आहे.        यावेळी वाघाला बघण्यासाठी अलोट गर्दी उसळल्याचे प्राप्त माहितीनुसार कळते. वन विभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतावर काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी केलेली आहे.      शेतकरी भयभीत झालेला आहे. वाघाचा बंदोबस्त न केल्यास शेतकरी आपल्या शेतात जाऊन कामे कशी करणार? हा प्रश्न उपस्थित झालेला आहे.

*महिला आघाडी घराघरात पोहोचवा : सुषमाताई साबळे* 🚩 चंद्रपूर येथे शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक

इमेज
*महिला आघाडी घराघरात पोहोचवा : सुषमाताई साबळे* 🚩 चंद्रपूर येथे शिवसेना महिला आघाडीची आढावा बैठक   चंद्रपूर : पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य व शिवसेना महिला आघाडी जिल्ह्यातील प्रत्येक घरात पोहोचवा, असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख सुषमाताई साबळे यांनी केले.   चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीची आढावा बैठक ७ फेब्रुवारी रोजी विश्रामगृह, चंद्रपूर येथे पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या.  यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हा संघटीका उज्वला प्रमोद नलगे यांनी सुषमा साबळे यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. सुषमा साबळे यांनी तीनही विधानसभेचा आढावा घेतला. तीनही विधानसभा क्षेत्रातील काही महिला आघाडीच्या नियुक्त्या केल्या. त्यांना नियुक्तीपत्र दिले.  साबळे पुढे म्हणाल्या, जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी महिला आघाडीच्या शाखा सुरू करण्यात आल्या आहे. यामाध्यमातून पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन आणखी कसे मजबूत करता येईल, यावर येत्या काळात महिला आघाडीने काम करावे.  यावेळी जिल्हा संघटी...

चॅम्पियन क्रिकेट क्लब फुटाणा च्या वतीने भव्य टेनिस बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

इमेज
 ‌ विजय जाधव,मूल तालुका प्रतिनिधी:पोभुर्णा तालुक्यातील फुटाणा येथे चॅम्पियन क्रिकेट क्लब च्या वतीने माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार चषक स्पर्धेला दि.८/०२/२०२३ पासून सुरुवात होत असून फक्त ग्रामीण भागाकरिता एक गाव एक टीम व प्रथम दिवशीच सांस्कृतिक स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे.       या स्पर्धेचे उद्घाटक म्हणून राज्याचे वने सांस्कृतिक मत्स्यपालन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री माना सुधीर भाऊ मुनगंटीवार हे उपस्थित राहणार असून सह उद्घाटक जि प चे माजी अध्यक्ष देवराव दादा भोंगळे हे राहणार आहेत.तसेच अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीच्या माजी सभापती अलकाताई आत्राम यांची उपस्थिती राहणार आहे. सह अध्यक्ष माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, हरीश भाऊ ढवस, दीपप्रज्वलन अजय भाऊ मस्के,निलेश भाऊ चिंचोलकर, उपसरपंच ग्रामपंचायत फुटाणा राहुल भाऊ पाल, उपसरपंच ग्रामपंचायत जुनगाव,अमोल भाऊ तालुका सचिव भाजपा, रंगमंच पूजक म्हणून गावच्या सरपंच सौ. संगीता ताई तेलसे तुळशीराम अर्जुनकर, माजी सरपंच चेक फुटाणा, गंगाधर मडावी माजी पंचायत समिती सदस्य, उपसरपंच नवेगाव...

नांदगाव गोवर्धन शेत शिवारात आज बकरीवर वाघाचा हल्ला- नांदगाव मध्ये कालच आढळला होता मृत अवस्थेत वाघ: क्षेत्र सहाय्यक यांचे जाणीवपूर्वकदुर्लक्ष, संपर्क होईना

इमेज
विजय जाधव-मुल तालुका प्रतिनिधी मुल तालुक्यात येत असलेल्या नांदगाव गोवर्धन शेतशिवारात व खेेडी- गोंडपिपरी या मुख्य रस्त्याच्या अगदी जवळच आज दिनांक ७ फेब्रुवारी रोजी वाघाचे दर्शन सदर पट्टीदार वाघ हा दिघोरीच्या वाटेने निघून गेला असल्याचे प्रत्यक्षदर्शी नीी सांगितलेे. घटना दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान घडली.संबंधित बाब वन विभागाला कळविण्यासाठी नागरिकांनी फोन द्वारे फोन केला असता कुठल्याही वनाधिकाऱ्यांनी फोन उचलला नाही अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. मागील दोन महिन्यापासून या परिसरात तीन वाघांचे वास्तव्य असल्याच्या बातम्या नागरिकांनी माध्यमान पुढे सांगितल्या त्यानुसार माध्यमांनी वेळोवेळी त्या बातम्यांना प्रसिद्धी दिली. मात्र वनविभागाला कुठलीच जाग आलेली दिसत नाही. त्याचाच परिणाम असा झाला की काल दिनांक 6 फेब्रुवारी रोजी नांदगाव शेत शिवारात पट्टेदार वाघ मृत अवस्थेत आढळून आला.

नांदगाव शेत शिवारात पट्टेदार वाघाचा मृत्यू! वनविभाग जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया -वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी-शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांची मागणी

इमेज
विजय जाधव:- वाघ शिवारावर फिरत असल्याची चर्चा गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून अनेकदा वर्तमानपत्रातून व इतर माध्यमातून वृत्त प्रकाशित होऊन वन विभागाला जागृत करण्याचे काम केले मात्र, सदर वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. वनविभागाच्या लापरवाहीमुळेच सदर वाघाचा मृत्यू झाला त्यामुळे वनविभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपतालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केलेली आहे.    अनेकदा वाघ फुटाणा, नांदगाव, जुनगाव देवाडा बुद्रुक, बोंडाळा, घोसरी शेत शिवारात व झुडपी जंगलात फिरत असल्याच्या चर्चा अनेकदा ऐकायला आल्या.परिणामी शेतकरी शेतावर जाण्यास घाबरत होते. हल्ली शेतकऱ्यांच्या शेत पिकाची आर्थिक नुकसान होत असल्याने रानटी डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक शेतकरी आपल्या शेतमालाचा बचाव करण्यासाठी, कोणी झटक्याची मशीन लावतात आणि काही लोक विद्युत प्रवाहाची जोडणी सुद्धा करतात असे या घटनेवरून दिसून आले. असे असले तरी शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा वनविभागाच्या निष्काळजी आणि निद्रिस्त कोणामुळे ...

नांदगाव शेतशिवारात वाघाचा मृत्यू! वनविभागात खळबळ

इमेज
नांदगाव शेतशिवारात वाघाचा मृत्यू! वनविभागात खळबळ विजय जाधव: मुल : वनक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या व मूल तालुक्यात समाविष्ट असलेल्या नांदगाव येथे वाघाचा मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे.      सदर घटना आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता चे सुमारास उघडकीस आली. पुनाजी नागमकार यांच्या शेतात ही घटना घडली असून. मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप कळले नाही. वनपरिक्षेत्राधिकारी फनींद्र गादेवार हे घटनास्थळावर उपस्थित होणार असून ते आल्यानंतर पंचनामा केल्या जाईल तेव्हाच वाघाचा मृत्यू कशामुळे झाला हे उघडकीस येईल. विजेचा करंट लागुन मरण पावला असल्याची चर्चा असली तरी त्यात सत्यता काय ? आहे हे पुढील कारवाईनंतरच कळणार आहे.      लोकांची वाघ बघण्याकरिता अलोट गर्दी जमली असून वाघाच्या जवळ जाण्यास सर्वांनाच मज्जाव करण्यात आलेला आहे. पत्रकारांना सुद्धा तिथे जाऊ दिल्या जात नसल्यामुळे रोष व्यक्त होत आहे.

कॅन्सरचे प्रकार आणि लक्षणांची माहिती प्रत्येक नागरिकांनी जाणुन घ्यावी. 🛑 कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे अनेक आहेत प्रकार . 🛑 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रूडे यांनी दिली जनहितार्थ माहिती.

इमेज
नागपूर / चक्रधर मेश्राम दि.४/२/२०२३:-   कर्करोग हा आजार फार गंभीर असून या आजाराबाबत सर्वांना माहीती असणे आवश्यक आहे. या आजाराबाबतची लक्षणे काय आहेत याबद्दल आवश्यक तेवढी माहिती प्रत्येक नागरिकांना नसते. म्हणूनच या जीवघेण्या आजाराचे सर्व प्रकार आणि माहिती सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे. कॅन्सर अर्थात कर्करोग आजही जगासमोर एक आव्हानात्मक जीवघेणी समस्या आहे. दरवर्षी कर्करोगामुळे हजारो लोक मृत्यू पावतात. कर्करोगाचा जगाशी सामना झाला तेव्हा एक समज निर्माण झाला की जे धुम्रपान करतात त्यांनाच कर्करोग होतो किंवा तंबाखू खाल्ल्यानेच कर्करोग होतो. परंतु हळूहळू पोटाचा कर्करोग, स्तनांचा कर्करोग आणि अन्य कर्करोग जगासमोर उलगडू लागले आणि हे सत्य समोर आले की, कर्करोग कोणालाही आणि कसाही होऊ शकतो आणि तेव्हापासून कर्करोगाची जास्त भीती निर्माण झाली. कर्करोग शरीरात असूनही कळत नाही. पण जस जशी वर्षे लोटली तसे.... तसे विज्ञान प्रगत झाले आणि आता कर्करोगापासून वाचवणारे उपचारही आलेत. पण तरी आजही जनमानसात कर्करोगाबद्दल पाहिजे तितकी जागरुकता नाही. कर्करोग हा आता एक सामान्य आजार झाला आहे. त्यामुळे त्याबद्दल प्र...

माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे तथा आमदार सुनील केदार यांच्या हस्ते सहकारी खरेदी-विक्री संस्था चामोर्शी ला पारितोषिक- संस्थाध्यक्ष अतुल भाऊ गणराज पवार यांनी स्वीकारला पारितोषिकाचा उपहार

इमेज
________________________________ गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी   विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांच्या हस्ते खरेदी विक्री सेवा संघ चामोर्संशस्थेचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघाच्या वतीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.        चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने आपल्या कार्याची राज्यस्तरावर दखल दिली असून संघाने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला असून पुरस्कार देण्यात आलेला आहे. जिल्हास्तरावर या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. सदर दोन्ही पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांना प्रदान करण्यात आले आहे.      राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचा...

*शासन स्तरावर शाळा महाविद्यालयातून शिवजयंती महोत्सव आयोजित करण्यात यावा.*

इमेज
   महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराज यांची जयंती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर १९ फेब्रुवारी रोजी जगभर साजरी होत असते. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास नवीन पिढीपर्यंत पोहचण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधून शिवजयंती निमित्ये विविध कार्यक्रम जसे - शिवचरित्रावर स्पर्धा परिक्षा,वकृत्व स्पर्धा,वेषभुषा स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,सांस्कृतिक स्पर्धा,गडकिल्ले नमुने निर्माण स्पर्धा... इ.विविध उपक्रमांचे आयोजन प्रत्येक शाळा महाविद्यालयांमध्ये करुन दरवर्षी १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी मुख्य शिवजयंतीचा कार्यक्रम घेवून त्या कार्यक्रामात प्रोत्साहन पर बक्षिस वितरन करण्यास महाराष्ट्र शासनाचे शिक्षण मंत्रालयाकडून परिपत्रक काढून १९ फेब्रुवारी २०२३ पासून शासकीय स्तरावर प्रत्येक शाळा महाविद्यालयांमधून शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात यावा यासाठी शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षकपरिषदेने महाराष्ट्राचे मा.राज्यपाल, मा.मुख्यमंत्री यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली असल्याची माहिती शिक्षणमहर्षी डाॕ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद महाराष्ट्राचे राज्यउपाध्यक...

चेक नवेगाव येथील 22 वर्षीय मजुराचा थ्रेशर मशीन मध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू

इमेज
विजय जाधव:-चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चेक नवेगाव येथे थ्रेशर मशीन वर तुरी मळणीचे काम करत असताना थ्रेशर मशीन मध्ये उजवा हात गेल्याने तो मशीन मध्ये ओढल्या गेला. या दुर्दैवी घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. आज शुक्रवार दिनांक ३ फेब्रुवारी रोजी नवेगाव मोरे येथील शेत शिवारात घडली. महेश अरुण लोहे वय वर्ष 22 असे मृत तरुणाचे नाव आहे.      सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महेश लोहे हा नवेगाव मोरे येथील शांताराम कन्नाके यांच्या शेतात तुरी मळणीचे काम करण्याकरिता थ्रेशर मशीन वर गेला होता. तुरीची पेंडी मशीन मध्ये टाकता टाकता अचानक नकळत त्याचा उजवा हात मशीनमध्ये अडकल्याने तो थ्रेशर मशीन मध्ये ओढल्या गेला. त्यामुळे मशीन मध्ये दाबूनच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व त्याचे शरीर मशीन मधून काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर पीएसआय गंधेवार, अविनाश झाडे, त्यांची चमु उपस्थित आहे.

शोषितांचे पालनहार तर शोषकांचा कर्दनकाळ म्हणजे जगतगुरु संत तुकाराम महाराज"*

इमेज
     - रामचंद्र सालेकर  (वाघनख शाळेत संत तुकाराम महाराज जयंती संपन्न)    जि.प.चंद्रपूर पं.स.वरोरा अंतर्गत जि.प.उ.प्राथ.शाळा वाघनख येथे २ फेब्रुवारी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची जयंतीचा कार्यक्रम मुख्याध्यापक रामचंद्र सालेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. आपल्या अध्यक्षीय भाषणात सालेकर यांनी संत तुकाराम महाराज यांनी प्रस्थापित शोषकांना आपल्या अभंगरुपी शस्त्राने परास्त करुन त्यांचा कर्मकांड अंधश्रद्धा वर्णभेद जातीभेदाचा डोलारा किर्तनाच्या माध्यमातून ध्वस्त करुन शोषितांना जागवलं याचा बदला त्यांनी इंद्रायनीत अभंगगाथा बुडवून त्यांना संपविले.ज्या गोष्टींवर जगतगुरु तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून घनाघाती वार केले,प्रस्थापित शोषकांच्या विरोधात विद्रोह केला. परंतु दुर्दैव असे की तुकाराम महाराजांनी ज्या गोष्टीचा आयुष्यभर विरोध केला, त्याच काल्पनीक मिथ्या कथा रचून तुकाराम महाराजांचा खुन लपविण्यात आला व पुष्पक विमानाने वैकुंठाला गेल्याची भ्रामक आवई ठोकून या शोषकांनी स्वतःचे पाप लपविले. तुकोबाचा वारकरी म्हणजे अनिष्ठ रुढी परंपरा कर्मकांड अंधश्रद्धा...इत्यादींवर वार करणारा असा होता परंतु...

नांदगाव येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

इमेज
विजय जाधव:-कार्य आहे चळवळीचे जे करेल त्यांचे परि तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या वाक्याला अनुसरून श्री तिरुपती व्यंकटेश देवस्थान नांदगाव तालुका मूल च्या सौजन्याने तिरुपती मंडळ तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ नांदगाव च्या वतीने श्री संत याचयाजी महाराज यांचे स्मरणार्थ नांदगाव च्या पवित्र पावन भूमीत वसंत पंचमी ते रथसप्तमी या तीन दिवसीय कार्यक्रमात राष्ट्रसंतांचे पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.  दिनांक 26 जानेवारी या दिवशी या कार्यक्रमाचा भजन कीर्तनाच्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली 27 जानेवारी या दिवशी मंडळातर्फे रात्री आठ वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  गावकऱ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आस्वाद घेतला. यावेळी या कार्यक्रमात उत्कृष्ट रेकॉर्डिंग डान्स वक्तृत्व यावर मंडळातर्फे बक्षीस वितरण करण्यात आले. दिनांक 28 जानेवारीला मंडळातर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. सदर कार्यक्रमात ग्रामस्थांनी 90 टक्के सहभाग दर्शविला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे मार्गदर्शक माननीय सुरेश पाटील आहिरकर ...

प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत तर्फे सुमेधा वनकर या वीज कर्मचाऱ्यांचा सत्कार

इमेज
विजय जाधव, मूल तालुका प्रतिनिधी:- ________________________________  प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदगाव ग्रामपंचायत तर्फे नुकताच विज वितरण कर्मचाऱ्याचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.  या कार्यक्रमात नांदगाव साठी उत्कृष्ट सेवा देणारे वीज वितरण कंपनी सावलीचे वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावर कार्यरत असलेले सुमेधा गजानन वनकर यांचा नांदगाव ग्रामपंचायत तर्फे शाल व श्रीफळ देऊन जाहीर सत्कार गावच्या सरपंच एडवोकेट कुमारी हिमानीताई वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या कार्यरत सेवेनुसार हा त्यांचा दुसरा सत्कार असून यापूर्वी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे कार्यरत असताना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कर्मचारी शुभम लोणारे यांचा सुद्धा ग्रामपंचायत तर्फे यावेळी शाल व श्रीफळ देऊन चांगल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती माननीय दशरथ भाऊ वाकुडकर ग्रामपंचायत सरपंच हिमानिताई वाकुडकर, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांबोडे, ग्रामपंचायतचे उपसरपंच सागर देऊरकर, पोलीस पाटील प्रिन्सिपल देवताळे, ...

*शिवसेनेतर्फे महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न*

इमेज
पोंभूर्णा : गाव तिथे शाखा व घर तिथे शिवसैनिक असा नारा देत शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीकोणातून पोंभूर्णा शहरात राजराजेश्वर सभागृह येथे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे ) गटातर्फे महिला मेळावा,व हळदी कुंकू कार्यक्रम,शहर महिला आघाडी तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या उद्घाटन मनस्वीताई संदीप गिऱ्हे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख तथा आष्टाचे सरपंच किरणताई किशोर डाखरे, प्रमुख उपस्थिती वर्षाताई विलास मोगरकार, नगरसेविका न.पं.रामेश्वरीताई गणेश वासलवार,शहर महिला संघटीका कांताबाई मेश्राम,ललिता कोवे,भाविका मडावी,रोशनी देवताळे,रेखा निमगडे,रजनी कोटरंगे,मेघा मानकर,सोनी मानकर,अर्जना कोसरे,व आदी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर महिला मेळावा,व हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात उत्तम प्रतिसादाने संपन्न झाला. शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शिवसेना पक्ष अधिक मजबूत, बळकट करण्याच्या सूचना दिल्या व महिला पदाधिकारी कार्यकर्ते चांगले व योग्य रीतीने काम करीत असल्याचे सांगत महिला...