पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बल्लारपूर विधानसभेत संतोष सिंह रावत यांचा जलवा

इमेज
बल्लारपूर विधानसभेत संतोष सिंह रावत यांचा जलवा मुल: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या बल्लारपूर विधानसभेत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र दिसत आहे.  भारतीय जनता पक्षाने राज्याचे वजनदार मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवर यांना उमेदवारी दिली आहे.आणी  ते प्रचारात आघाडी घेऊन आहेत. मात्र काँग्रेस पक्षाने ऐन वेळेवर उमेदवारी वाटपाचा तिढा सोडवला. आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांना उमेदवारी जाहीर केली.  त्यांनी काल शक्ती प्रदर्शन करत मुलं येथील उपविभागीय कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या अधिकृत चिन्हावरून अर्ज दाखल केला. यावेळी संपूर्ण मूल शहर काँग्रेसमय झालेले दिसले. प्रचंड प्रमाणात आलेल्या महिला व पुरुष कार्यकर्ते जोशाने रॅलीत सहभागी झालेले दिसले.  मूलमध्येच नव्हे तर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक भागात संतोष सिंह रावत यांच्या कालचा रॅलीची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर इंडिया आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी सुद्धा त्यांना समर्थन व सहकार्य करण्याची भूमिका स्पष्ट केल्याचे सूत्रांनी...

चंद्रपूर जिल्हा युवा सेनेची बैठक संपन्न

इमेज
आज दिनांक 24-10-2024 रोजी युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे , शिवसेना युवासेना सचिव श्री वरुणजी सरदेसाई साहेब आदेशाने व युवासेना कार्यकारणी सदस्य श्री हर्षल दादा काकडे , युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव श्री निलेशजी बेलखेडे चंद्रपूर युवासेना विस्तारक श्री संदीपजी रियाल पटेल यांच्या मार्गदर्शनात व युवासेना जिल्हाप्रमुख श्री विक्रांत भाऊ सहारे यांच्या नेतृत्वात चंद्रपूर युवासेना पदाधिकारी व युवासैनिक यांची आढावा बैठक पार पडली असून या बैठकीत सर्व युवासैनेच्या पदाधिकारी व युवासैनिक यांनी असा निर्धार केली कि चंद्रपूर चे लाडके जिल्हाप्रमुख श्री संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या सोबत कोणत्याहि कुठल्याही परिस्थिती मध्ये साथ द्याची आहे व संपूर्ण ताकदीने युवासैनिक भाऊच्या पाठीमागे उभे रहावे असा संदेश विक्रांत भाऊ सहारे व इतर पदाधिकारी यांनी एक मताने केला वचन दिले चंद्रपूर जिल्हा युवा सेनेची बैठक संपन्न यावेळी उपस्थित माझे सहकारी 👇🏻👇🏻👇🏻 युवासेनेचे जिल्हाचिटणीस सुमितभाऊ अग्रवाल उपजिल्हा अधिकारी बंटी भाऊ कमटम, तालुका प्रमुख सूरज शेंडे ,शहर प्रमुख शाहबाज शेख, शहर प्रमुख वैभव काळे , शहर प्रमुख चे...

बिल्डर संजय पाटील यांची धार धार शस्त्राने भोसकून हत्या

इमेज
शिवाजीनगर पोलिस स्टेशन च्या परिसरात रातभर अनधिकृत बेकायदेशीर अवैध धंदे जसे, ढाबे, डान्सबार, पाब, हुक्का पार्लर, जुगार अड्डे, गांजा द्रग्ज विक्री, क्रिकेट फुटबॉल टर्फ, व इतर चालू असतात आणि विशेष माहितीनुसार पोलिसांच्या आशीर्वादाने इकडे द्रग्ज विकणारे पेडलार्स बिनधास्त गांजा, चरस, एमदी, गुटका व इतर व्यसन पदार्थ विकून पोलिसांना त्यातून वाटा देतात अशी १००% खात्रीची माहिती आहे. म्हणूनच असे खतरनाक मर्डर या परिसरात होत आहे. डीसिपी, एसीपी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीस अधिकारी भ्रष्टाचारी करून हफ्ते खाऊनही लोकांना न्याय देण्याचे काम करतात की नाही हा मोठा आहे..... आता या घडलेल्या मर्डर च्या गुन्ह्यात आरोपींना पकडतात की त्यांना लपण्यासाठी मदत करतात हे ही मोठे प्रश्न आहे....... जगदीश का. काशिकर, मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा-सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी

इमेज
नुकसानीचे पंचनामे तात्काळ करा-सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष भालचंद्र बोधलकर यांची मागणी पोंभुर्णा: (प्रतिनिधी) तालुक्यातील , अनेक गावात व तहसील मंडळात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करून प्रस्ताव तात्काळ शासन स्तरावर पाठवा असे अशी मागणी सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष व माजी सरपंच जामतुकुम यांनी केली आहे. भालचंद्र बोधलकर तालुका तालुका अध्यक्ष सरपंच संघटना तथा माजी सरपंच तालुक्यातील सर्व तहसील मंडळातील शेतकऱ्यांचे धान (भातपीक)कापूस, मका, सोयाबीन, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यास्तव तहसील मंडळात अतिवृष्टीचे पंचनामे करण्याचे आदेश करावे व अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात यावा अशी मागणी बोधलकर यांनी केली आहे.

*संतोष भाऊ रावत यांनी दिला कॅन्सरग्रस्त महीलेला मदतीचा हात*

इमेज
*संतोष भाऊ रावत यांनी दिला कॅन्सरग्रस्त महीलेला मदतीचा हात*   *पोभुंर्णा:-* शहरातील सौ.लता शालीक दुधबळे यांना कॅन्सरग्रस्त आजाराने ग्रासलेले आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने एक छोटासा मदतीचा हात म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या मार्गदर्शनात काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मदतीचा हात म्हणून आर्थिक सहाय्य केले. कॅन्सरग्रस्त महिलेला आर्थिक सहाय्य देताना युवक काँग्रेसचे प्रशांत उराडे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष पवन निलमवार, पोभुंर्णा काँग्रेस तालुका अध्यक्ष वासुदेवजी पाल, काँग्रेसचे नेतेओमेश्वर पद्मगिरीवार, अशोकजी गेडाम,अमर घुगे, आनंदराव पातळे, ऋषी पुल्लकवार, पराग मुलकलवार, राहुल देवतळे, नंदू बुरांडे, रुपेश पुडके, राजू बोलमवार, धम्मा निमगडे, दिवाकर गुरूनुले, रफिक शेख तथा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली* *@पोंभूर्णा आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम सपन्न*

इमेज
*शहीद वीर बाबुराव शेडमाके यांना आदरांजली* *@पोंभूर्णा आदिवासी समाजाच्या वतीने कार्यक्रम सपन्न* पोंभूर्णा: राष्ट्रीय क्रांतिकारी शहीद योद्धा वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी इंग्रजाविरुद्ध आवाज उठविला. त्यांच्या संघर्षाचे योगदान समाजाला सदैव स्मरणात राहावे यासाठी दरवर्षी शहीद दिन आयोजीत केला जाते. पोंभुर्णा आदिवासी चौक येथे सोमवार ला 167 वा शहीद दिन कार्यक्रम पार पडला. यावेळी विर बाबुराव शेडमाके यांच्यावर चंद्रपूर गिरणार चौकाला लागून असलेल्या तुरंग परिसरातील पिंपळाच्या झाडाला विर बाबुराव शोेडमाके यांना इंग्रजांनी २१ ऑक्टोबर १९५८ रोजी फासावर लटकविले होते शहीद विर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके यांच्या कार्यावर प्रकाश नगरसेवक आशिष कावटवार यांनी टाकला.  तर क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या जीवन कार्यावर व त्यांचा क्रांतिकारी इतिहासावर व घोट, गोंडपिपरी पोंभुर्णा, मुल तालुक्यात वीर बाबुराव शेडमाके यांनी केलेला पराक्रमावर सखोल मार्गदर्शन आदिवासी समाजाचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते महेंद्र शेडमाके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आदिवासी समाजाच्या आयोजित 167 व...

वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन

इमेज
वरोरा-भद्रावती विधानसभा तिकीटासाठी शिवसैनिकांची जोरदार मागणी, मुकेश जीवतोडेंच्या उमेदवारीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती  भद्रावती दि.21:' महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या (काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीत 75 वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला यावा, अशी जोरदार मागणी उचलली जात आहे. आज शिवसेना जिल्हा संपर्क कार्यालयात मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आवाहन करत मुकेश जीवतोडे यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत, "75 वरोरा-भद्रावती शिवसेनेच्या वाट्याला आलीच पाहिजे!" आणि "मुकेश जीवतोडेंना तिकीट मिळालेच पाहिजे!" अशा आवाजात आपली मागणी व्यक्त केली. शिवसैनिकांचे म्हणणे आहे की, मुकेश जीवतोडे यांनी वरोरा-भद्रावती मतदारसंघात शिवसेनेचे संघटन मजबूत केले आहे आणि त्यांच्या नेतृत्वात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. युवकांना रोजगार मिळवून देणे, शेतकरी आणि व...

जय जगन्नाथ मंडळातर्फे वीर बाबुराव शेडमाके व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन संपन्न

इमेज
जय जगन्नाथ मंडळातर्फे वीर बाबुराव शेडमाके व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन संपन्न महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि 21:- राष्ट्रसंताचे विचार च भारत देशाला सुजलाम सुफलाम बनवू शकतात तसेच वीर बाबुराव शेडमाके यांचा पराक्रम उजूनही प्रेरणा देणारा असून त्यांचा आदर्श घेऊन वाटचाल करावी असे प्रतिपादन करुन स्थानीक गवराळा वॉर्ड येथील जय जगन्नाथ महाराज सेवानिवृत्त मित्र मंडळ तर्फे राष्ट्र संत तुकडोजी महाराज व वीर बाबुराव पुल्लेश्वर शेडमाके स्मृतिदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे जेष्ठ सदस्य नीलकंठ आत्राम, ज्ञानेश्वर परचाके श्यामराव खापने, उद्धव निळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महादेव डोगें, बाबाराव नीखाडे, राजू माडेकर, विनोद सावनकर, गणेश ढोके, रमेश परचाके, विलास खापने यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सू त्रसंचालन लिमेश माणूसमारे तर आभारप्रदर्शन पांडूरंग कोयचाडे यांनी केले. खाऊचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शिवसेनेचे वरोरा येथील मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले.

इमेज
शिवसेनेचे वरोरा येथील मध्यवर्ती कार्यालय शिवालय येथे आढावा सभेचे आयोजन करण्यात आले. महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.19:- 75-वरोरा भद्रावती विधानसभा आगामी महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असतांना वरोरा विधानसभेतील शिवसेना पदाधिकारी यांना संघटनात्मक महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्याकरीता वरोरा विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याकरीता चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज पक्षप्रमुख यांचे कडुन वेळोवेळी येणारे आदेशाचे पालन करुन निवडणुकीला समोरे जायचे आहे अश्या सुचना पदअधिकारी यांना देण्यात आल्या. सभेला चंद्रपूर जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख रोहन कुटेमाटे, महिला जिल्हा संघटीका नर्मदाताई बोरेकर, वरोरा तालुका प्रमुख दत्ताभाऊ बोरेकर, वरोरा शहर प्रमुख खेमराज कुरेकार, भद्रावती तालुकाप्रमुख नरेद्र पढाल,भद्रावती शहरप्रमुख घनश्याम आस्वले विधानसभा समन्वयक वैभव डहाणे, विधानसभा संघटक मंगेश भोयर, युवती जिल्हा अधिकारी, प्रतिभा मांडवकर, भद्रावती महिला तालुका संघटीका आशाताई ताजणे, वरोरा तालुका महिला सं...

*हम लढेंगे - हम जितेंगे* गावागावात निर्धार॥ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोषसिंह रावत यांचा डंका

इमेज
*हम लढेंगे - हम जितेंगे* गावागावात निर्धार॥ बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोषसिंह रावत यांचा डंका * चंद्रपूर | दरारा २४ तास राज्यात विधानसभा निवडणूकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे अनेक संभाव्य उमेदवारांनी गेल्या अनेक दिवसापासून मोर्चेबांधणी करीत आहेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितलं तर बल्लारपूर विधानसभेत कांग्रेस पक्षाचे पारडं जड आहे. याच धर्तीवर कांग्रेस चे नेते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी बल्लारपूर विधानसभेत अनेक मुद्यांना घेऊन रस्त्यावरील आंदोलन करुन जनसामान्य नागरिकांना न्याय मिळावा म्हणून सतत भुमिका घेत आहेत. त्यामुळे विधानसभा मतदार संघात सध्यातरी कांग्रेस चे संतोष सिंह रावत यांचा गावागावात डंका आहे. गावागावात संतोष सिंह रावत यांच्या विजयासाठी नागरिकांनी कंबर कसली असून आता निर्धार करीत आहेत की "हम लढेंगे हम जितेंगे" त्यामुळे विरोधकांचै धाबे दणाणले आहेत. संतोष सिंह रावत म्हणजे दलीत, शोषित,पिडीत व मागासवर्गीय यांच्या मदतीला धाऊन जाणारे नेतृत्व मानले जाते. त्यामुळे त्यांची बल्लारपूर विधानसभा मतदार संघात मोठी ओळख व कार...

महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या तालुका अध्यक्षपदी शरद राजुरकर

  महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या तालुका अध्यक्षपदी शरद राजुरकर महेश निमसटकर  तालुका प्रतिनिधि भद्रावती  दरारा 24 तास न्युज नेटवर्क  भद्रावती,दि.१७:-येथील लोकमान्य विद्यालयातील गणित शिक्षक शरद राजुरकर यांची महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळाच्या भद्रावती तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल लोकमान्य विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन सरपटवार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी उपप्राचार्य रुपचंद धारणे, पर्यवेक्षक प्रफुल्ल वटे आणि इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते. राजुरकर यांचे लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, सचिव नामदेवराव कोल्हे, सहसचिव अमित गुंडावार, शाळा समितीचे अध्यक्ष उल्हास भास्करवार, संचालक मनोहरराव पारधे, गोपालराव ठेंगणे, उमाकांत गुंडावार, अविनाश पाम्पट्टीवार, संजय पारधे यांनी अभिनंदन केले आहे. इतर कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष हरिश्चंद्र हरणे, सचिव कवीश्वर शेंडे, सहसचिव नितेश मिलमिले, कोषाध्यक्ष संजय जेऊरकर, प्रसिद्धी प्रमुख उमेश पाटील, सदस्य दयाकर मग्गीडवार, किरण उपासे, हर...

लाडकी बहीण योजनेपासून अनेक महिला वंचित - दिवाळी आली,मात्र बहिणींना भावाचे पैसेच आले नाही!

इमेज
  लाडकी बहीण योजनेपासून अनेक महिला वंचित  - दिवाळी आली,मात्र बहिणींना भावाचे पैसेच आले नाही!  दरारा 24 तास न्युज नेटवर्क  पोंभुर्णा: तालुक्यातील अनेक महिलांना लाडकी बहिण योजनेचे पैसे आले नसल्याने महिला हवालदिल  झाल्या आहेत.  लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३० सप्टेंबरपासून बंद करण्यात आली होती त्याला मुदतवाढ देवून १५ ऑक्टोबर करण्यात आली. यातून शिल्लक महिलांचे पुढे काय? याविषयी अनेक प्रश्न आहेत. तसेच नोंदणी करूनही अजूनही काही महिलांना पैसे आलेले नाहीत. त्यामुळे महिला हवालदिल झाल्या आहेत. तालुक्यातील अनेक गावातील महिलांना या योजनेचे एकही रुपये आले नाही. विशेष म्हणजे ज्या महिला अत्यंत गरीब निराधार आहेत त्यांनाच या योजनेचे पैसे मिळाले नाही . तालुक्यातील जुनगाव येथील अनेक महिलांना या योजनेपासून वंचित रहावे लागले आहे.त्यामुळे महिला हवालदिल झाल्या आहेत. या विषयी महिलांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. • महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे.• या योजनेला महिलांचा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र सरकारने या योजनेची दोन टप्प्यांमध्ये जुलै ...

बुडून मृत्युमुखी पडलेल्या दिलीप सातपुते यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी घेतली सांत्वन पर भेट

इमेज
बुडून मृत्युमुखी पडलेल्या दिलीप सातपुते यांच्या कुटुंबीयांची काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांनी घेतली सांत्वन पर भेट दरारा 24 तास न्यूज नेटवर्क मुल: तालुक्यातील दुगाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व प्रगतशील तरुण शेतकरी दिलीप सातपुते यांचा देवी विसर्जन दरम्यान बुडून मृत्यू झाला. राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते मात्र राजकीय फायदा बघूनच जनतेच्या भेटीगाठी घेतात. इतकी दुर्दैवी घटना घडवून सुद्धा विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून असणाऱ्या तथाकथित पुढाऱ्यांनी कुटुंबीयांची सांत्वन पर साधी भेट घेतली नाही. परंतु याला अपवाद ठरत काँग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, बल्लारपूर विधानसभेचे काँग्रेस पक्षाचे प्रबळ दावेदार, जनतेच्या सेवेत सतत आपले अस्तित्व अर्पण करणारे संतोष सिंह रावत यांनी दिनांक 15 आक्टोबर रोजी मृतकाच्या कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेऊन त्यांच्या दुःखात सहभागी होऊन त्यांना धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत सरपंच प्रीती भांडेकर, माजी सरपंच बनकर गुरुजी, घनश्यामजी येनुरकर, गुरु गुरनूले इत्यादी कार्यकर्ते व गावातील महिला पुरुष उपस्थित होते.

नगर परिषद भद्रावतीच्या चित्रकला स्पर्धेत अन्वी लोणे प्रथम

इमेज
महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती  भद्रावती दि.14 : स्वच्छ सर्वेक्षण २०२४ माझी वसुंधरा अभियानांतर्गत भद्रावती नगर परिषदेने हाती घेतलेल्या स्वच्छता ही सेवा २०२४ अभियानातील नागरिकांचा सहभाग या घटकांतर्गत आयोजित चित्रकला स्पर्धेत अन्वी वतन लोणे हिने प्रथम क्रमांक पटकाविला.  स्वच्छता ही सेवा २०२४ हे अभियान भद्रावती नगर परिषदेतर्फे १४ सप्टेंबर ते १ऑक्टोबर २०२४ या पंधरवाड्यात राबविण्यात आले. याच अभियानाचा एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधींना त्यांच्या जयंती निमीत्त आदरांजली अर्पण करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली.  यामध्ये वर्ग १ ते ४ या क गटातून लोकमान्य ज्ञानपीठ येथे वर्ग ४ मध्ये शिक्षण घेत असलेली अन्वी वतन लोणे हीने प्रथम क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र तसेच सायकल देवून अन्वीला गौरविण्यात आले. यावेळी नगर परिषद भद्रावतीच्या मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. विशाखा शेळकी, उपमुख्याधिकारी विजयकुमार जांभुळकर, लिपीक (आरोग्य विभाग) दिनेश माशीरकर, स्वच्छता निरीक्षक उमेश ब्राम्हणे, शहर समन्वयक कलीम शेख यांनी कौतुक केले. सदर उपक्रम ...

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

इमेज
  *शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा* *प्रकृती अस्वास्थ्यामुळे छोटेखानी कार्यक्रम व घरीच मान्यवरांच्या भेटीगाठी* *वाढदिवसानिमित्त दिव्यांगाना तीनचाकी सायकल, रुग्णांना आर्थीक सहकार्य, निराधार विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेतले* *शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार व राजकीय क्षेत्रातील तसेच महाविकास आघाडी दिग्गजांची शुभेच्छांकरीता एकच गर्दी* महेश निमसटकर  तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.14:-शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांचा वाढदिवस (दि.१३) रोज रविवारला दिवसभर मान्यवरांच्या भेटी व शुभेच्छांच्या माध्यमातुन साजरा करण्यात आला. दरवर्षी मोठ्या स्वरुपात होणारा कार्यक्रम यावर्षी सुध्दा आयोजीत करण्यात आला होता, परंतु मागील एक आठवड्यापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मोठा कार्यक्रम न घेता घरीच मान्यवरांच्या भेटीगाठी घेत शुभेच्छा स्वीकारण्यात आल्या. प्रत्येक गरजूंना आरोग्य विषयक, विकलांगाना उपयोगी वस्तु आदी मदत घरपोच करण्यात येत आहे. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रविंद्र शिंदे यांच्या वाढदिवसाचे...

राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी महाविकास आघाडी ची बैठक संपन्न

इमेज
  राजुरा विधानसभा निवडनुकीसाठी महाविकास आघाडी ची बैठक संपन्न  महेश निमसटकर  तालुका प्रतिनिधि भद्रावती भद्रावती दि.14:' आज दिनांक 13ऑक्टोबर रोजी राजुरा विधानसभा आमदार तथा राष्ट्रीय काँगेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे यांच्या अध्यक्षतेखाली राजुरा विधानसभा येथील महाविकास आघाडी पक्षातील शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या तिन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती.यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवींद्रजी शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस चे अरुणजी निमजे तसेच काँग्रेस पक्षाचे अरुणजी धोटे हे प्रमुख स्थानी होते. यावेळी तिन्ही पक्षाच्या वतीने येणारी राजुरा विधानसभा ही सर्वांनी मिळून ताकतीने लढवून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने निवडून आनू असा विश्वास यावेळी व्यक्त केला. यावेळी रवींद्र शिंदे यांचा आज वाढदिवस असल्याने तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी यांनी केक व पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना-उबाठा पक...

देवी विसर्जनासाठी गेलेला ग्रामपंचायत सदस्य नहरात बुडाला- चंद्रपूर जिल्हा, मुल तालुक्यातील घटना-शोध मोहीम सुरू

इमेज
  देवी विसर्जनासाठी गेलेला ग्रामपंचायत सदस्य नहरात बुडाला-  चंद्रपूर जिल्हा, मुल तालुक्यातील घटना-शोध मोहीम सुरू दरारा 24 तास न्यूज नेटवर्क   विजय जाधव, तालुका प्रतिनिधी  मुल: तालुक्यातील चक दुगाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व युवा शेतकरी दिलीप सातपुते वय 42 यांचा दुर्गा देवी विसर्जन दरम्यान पाण्यात बुडून लापता झाल्याची घटना आज 13 रोजी रविवारला सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास घडली आहे.  त्यामुळे गावात सर्वत्र हळ हळ होत असून शोककळा पसरली आहे. पोलिस घटना स्थळी दाखल होत शोध कार्य सुरू केले असून पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बुडणाऱ्या व्यक्तीचा शोध वृत्त लीहिस्तोवर  लागलेला नव्हता. आज रविवारी ता. 13/10 लां सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास  दुगाळा येथील महिला व पुरुष यांनी  दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा दुर्गा देवीचे मोठ्या थाटामाटात, वाजत- गाजत मिरवणूक काढत गावा शेजारी वाहत जाणाऱ्या गोशीखुर्द  नहरात विसर्जन करण्यासाठी देवीला घेऊन गेले असता सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास कालव्यातील पाण्याचे प्रवाह जोराने असल्याने दुगाळा येथील ग्रामपंचायत सदस्य व शेतकरी दिलीप सातपुते हे पाण्यासोबत वाहून गेले असल्या...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -युवासेना आढावा बैठक संपन्न* *अनेक युवकांचा युवासेनेत प्रवेश*

इमेज
 *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे -युवासेना आढावा बैठक संपन्न* *अनेक युवकांचा युवासेनेत प्रवेश* दरारा 24 तास न्युज नेटवर्क  धर्मपाल कांबळे जिल्हा प्रतिनिधी  चंद्रपूर: युवासेना प्रमुख श्री आदित्य साहेब ठाकरे, शिवसेना -युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब यांच्या आदेशाने तसेच कार्यकारणी सदस्य हर्षलजी काकडे साहेब, पूर्व विदर्भ विभागीय सचिव सिनेट सदस्य श्री निलेश भाऊ बेलखेडे व चंद्रपूर  युवासेना विस्तारक श्री संदीप रियाल (पटेल) यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर युवासेना जिल्हाप्रमुख श्री विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी आढावा बैठक जेष्ठ नागरी संघ सभागृह येथे पार पडली.   चंद्रपूर , बल्लारपूर , राजुरा या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी  येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल विचार करता सर्व पदाधिकारी कडून त्त्यांच्या विधानसभेचा आढावा घेण्यात आला तसेच यावेळी विधानसभेत आपला भगवा फडकवायचा असून त्यासाठी सर्व पदाधिकारी, युवासैनिक व शिवसैनिक जोमाने काम करून आपले कर्तव्य पार पाडावे व मशाल घरोघरी पोहोचवावी. शिक्षण, आरोग्य व रोजगार या बद्दल त्रिसूत्री कार्यक्रम राबवून युवक ...

अहेतेशाम अली यांची देवालय सोसायटी येथील शारदा महिला मंडळाला भेट

इमेज
अहेतेशाम अली यांची देवालय सोसायटी येथील शारदा महिला मंडळाला भेट महेश निमसटकर तालुका प्रतिनिधि भद्रावती  भद्रावती,दि.११:- शहरातील विंजासन रोड भद्रावती देवालय सोसायटीला नुकतेच 4 वर्ष झाले असून पुरुष मंडळी दरवर्षी गणेश उत्सव साजरा करत असतात.या दरम्यान महिलांनी सुद्धा पुढाकार घेऊन या वर्षीपासून शारदा उत्सवाला सुरवात केली. या निमित्याने माजी नगराध्यक्ष नगर परिषद,वरोरा तथा वरोरा भद्रावती विधानसभा नेता मा. श्री.अहेतेशाम अली यांची सोसायटी वासीयांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थिती दर्शविली सोसायटीच्या वतीने स्वागत करण्यात आले.तसेच त्यांच्यासह  श्री.धर्मेंद्र हवेलीकर, श्री.रविद्र पवार मान्यवर उपस्थित होते. यावेळी भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सखोल विविध विषयांवर समस्येवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी सोसायटी मधील देवालय शारदा महिला मंडळाच्या पदाधिकारी  सौ.निलेशा बिस्वास, सौ.हर्षदा चटपल्लीवार,सौ.प्रियंका राजूरकर, सौ. रेश्मा मेंघरे, सौ. रेखा सुंकुरवार, सौ.हिना चंदनकर, सौ.सिमा मुळे, सौ.पल्लवी शर्मा,सौ. सोनाली सुकारे, सौ. किरण राऊत,सौ.समृद्धी खैरकर, तसेच पुरुषांमध्ये हंसराज नागपुरे, अंजय्या...

महाविकास आघाडी मुल वतीने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली

इमेज
महाविकास आघाडी मुल वतीने उद्योगपती रतन टाटा यांना श्रद्धांजली दरारा 24 तास न्युज नेटवर्क मुल: उद्योगसूर्य रतन टाटा यांचे यांचे छानशी या वर्षी निधन झाले. देशातच नव्हे तर संपूर्ण जगातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि येत आहे.  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती, सामाजिक कार्यासाठी व सेवेसाठी आपले महत्वपूर्ण योगदान देणारे देशातील पहिले उद्योगपती *स्व. रतनजी टाटा* यांना मुल येथील गांधी चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ वाहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे महासचिव व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राकेश रत्नावार, कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, शिवसेना (ऊ बा.ठा.) गटाचे मुल तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार, शहर कांग्रेस सरचिटणीस संदीप मोहबे, विविध कार्यकारी सह.सोसायटीचे संचालक विवेक मुत्यलवार, सौरभ वाढई व कार्यकर्ते उपस्थित होते.

बल्लारपुरात प्रा. शाम मानव यांचे जाहीर व्याख्यान

इमेज
बल्लारपुरात प्रा. शाम मानव यांचे जाहीर व्याख्यान दरारा 24 तास न्यूज नेटवर्क  चंद्रपूर: राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत. निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी वेगवेगळे माध्यम उपयोगात आणून समाजात पोहोचत आहेत. बल्लारपूर विधानसभा राज्यातच चर्चेची ठरत आहे. याला कारण म्हणजे राज्याचे वजनदार मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना पराभूत करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना टपून बसली आहे. या विधानसभेत काँग्रेसचा आणि सेनेचा मोठा धबधबा निर्माण झालेला आहे.  काँग्रेस नेते डॉक्टर संजय घाटे हे या विधानसभेत निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांनी विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रम राबवून समाज बांधणीचा विडा उचललेला आहे.  दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी बल्लारपूर येथे संविधान बचाओ महाराष्ट्र बचाओ या अभियानाखाली प्रख्यात विचारवंत प्राध्यापक श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर संजय घाटे हे असून राजे बल्लाळ शाह सभागृह येथे होणार आहे. या जाहीर व्याख्यानाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन...

कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची व्हिडिओ शुटींग करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी

इमेज
कामचुकार अधिकारी कर्मचाऱ्यांची व्हिडिओ शुटींग करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी दरारा 24 तास न्युज नेटवर्क  मुंबई: (प्रतिनिधी) कार्यालयीन कामे करताना शासकीय गुपिते अधिनियम २०२३ या अधिनियमाचा कामचुकार अधिकारी कर्मचारी हे नेहमीच मोठा बाऊ करतात. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कार्यालयीन कामे पार पाडताना असे अधिकारी कर्मचारी बेबनाव करून बनवाबनवीचे उत्तर देत आहेत. परिणामी अशा सर्वसामान्य नागरिकांची कामे विनाविलंब व तत्परतेने पार पडत नाहीत, म्हणून सर्वसामान्य नागरिकांना कार्यालयात आपले काम अधिकाऱ्यांकडून करून घेण्याकरिता बऱ्याचदा कार्यालयात बारंवार खेट्या माराव्या लागतात व कार्यालयाची उंबरठे झीजवावी लागतात. बाबर उपाय म्हणून सात्विक विनोद कुमार बांगरे व रवींद्र उपाध्याय या याचिकाकर्त्यांना शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष अशोक आठवले यांनी समाज माध्यमाचा सदुपयोग करून फेसबुकच्या माध्यमातून विस्तृत रित्या मार्गदर्शन करून सेवा हमी अधिनियम, दप्तर दिरंगाई अधिनियम २००५ च माहिती अधिकार अधिनियम २००५ तसेच भारतीय संविधानातील अनुच्छेद १४ व १५ या तरतुदीस अनुसरू...

*साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️

* साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ साला मी अडाणी होतो तेच बरं होतं ... साधा सर्दी खोकला झाला, की आलं, तुळशीचा काढा घ्यायचो, पोट दुखलं की ओवा चावत जायचो, ताप आला की डोक्यावर पाण्याची पट्टी ठेवायचो, ना टेस्ट, ना स्पेशालिस्टच झंझट, ना हॉस्पिटलच्या एडमिशन मध्ये अडकत होतो... निरोगी आयुष्य जगत होतो.. *साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ राम राम ला राम राम, सलाम वालेकुम ला, वालेकुम अस्सलाम,  आणि जय भीम ला जय भीमनेच प्रेमाने उत्तर देत होतो, ना धर्म कळत होता ना जात कळत होती  माणूस म्हणून जगत होतो... *साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ सकाळी न्याहारीला दूध भाकरी, दुपारी जेवणात कांदा भाकरी आणि रात्रीच्या जेवणाला कोरड्यास भाकरी पोटभर खात होतो,  हेल्दी ब्रेकफास्टचा मेनू  लंचचा चोचलेपणा आणि  डिनरच्या सोफेस्टिकेटेड उपासमारी पेक्षा दिवस भर भरपेट चरत होतो... *साला मी अडाणी होतो* *तेच बर होत...* ☺️ शक्तिमान सोबत गिरकी घेत होतो रामायणात रंगून जात होतो, चित्रहार सोबत आयुष्याची चित्र रंगवत होतो, ना वेबसिरीजची आतुरता,  ना सासबहुचा लफडा ,  ना बातम्यांचा फालतू ता...

रतन टाटा राहिले नाहीत वयाच्या ८६ व्या वर्षी निधन

इमेज
रतन टाटा राहिले नाहीत वयाच्या ८६ व्या वर्षी निधन दरारा 24 तास न्युज नेटवर्क मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा राहिले नाहीत. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रतन टाटा हे भारतीय उद्योगाचे महत्त्वाचे स्तंभ होते, ज्यांनी आपल्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला नव्या उंचीवर नेले. त्यांचे योगदान आणि परोपकारी कार्य सदैव स्मरणात राहील. 🙏दरारा 24 तास न्यूज नेटवर्क तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात पोंभुर्णात सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन

इमेज
काँग्रेस नेते संतोष सिंह रावत यांच्या नेतृत्वात पोंभुर्णात सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन   धरणे आंदोलनात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग  पोंभुर्णा : दरारा 24 तास न्युज नेटवर्क  पोंभुर्णा : मागील वर्षातील शेतक-यांच्या खरीप व रब्बी पिकांची फार मोठी नुकसान झाली होती.चौदा हजार शेतक-यांनी पीएम पिक विमा योजनेचा विमा काढलेला होता.नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाले तरीदेखील शासनाने व विमा कंपनीने विम्याचे पैसे दिले नाही. करीता शेतकऱ्यांच्या हितासाठी ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात वकिलाच्या मार्फत कोर्टात केस दाखल केली. त्यामुळे शासन व विमा कंपनीला जाग आली.  यासाठी ०९ ऑक्टोबर २०२४ रोजी पोंभुर्णा येथे शासनाचा निषेध करण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.  तसेच बेरोजगारी,आरोग्य,वाढती महागाई स्टॅम्प पेपर भाववाढ  आदीं अनेक समस्या बाबत सुद्धा सरकारचा धरणे आंदोलनाद्धारे निषेध नोंदवण्यात आला. धरणे आंदोलनात विचार मांडतांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संतोषसिंह रावत म्हणाले की,शेतक...
   BSNL Vs Jio : बीएसएनएलची जिओला तगडी टक्कर! १ वर्षांच्या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी बेस्ट कोण? By दरारा २४ तास | BSNL Vs Jio : आज आम्ही तुम्हाला Jio आणि BSNL या दोन्ही टेलिकॉम कंपन्यांच्या एका वर्षाच्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत. दोन्हींची तुलना केल्यास तुम्हाला कोणता योग्य आहे, हे ठरवता येईल. featured-img BSNL Vs Jio : बीएसएनएलची जिओला तगडी टक्कर! १ वर्षांच्या प्लॅनमध्ये तुमच्यासाठी बेस्ट कोण? googleNews BSNL Vs Jio : टेलिकॉम मार्केटमध्ये जिओच्या आगमनानंतर डझनभर कंपन्यांनी कायमस्वरुपी आपला गाशा गुंडाळला. आधी एक वर्षी फ्री इंटरनेट आणि कॉलिंग दिल्यानंतर जिओ अजूनही आकर्षक ऑफर्स आणत आहे. जिओच्या प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. मात्र, आता सरकारी कंपनी बीएसएनएलमध्ये टाटांनी गुंतवणूक सुरू केल्यापासून जिओला तगडा स्पर्धक मिळाल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांत जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतींमध्ये मोठी वाढ केली होती. त्यानंतर अनेकांनी जिओकडून बीएसएनएलकडे आपला मोर्चा वळवला. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल आजकाल लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. याशिवाय, अन...

चंद्रपूर जिल्हा बँकेत लिपीक, शिपाई पदांसाठी भरती!

इमेज
  चंद्रपूर जिल्हा बँकेत लिपीक, शिपाई पदांसाठी भरती! दरारा 24 तास न्युज नेटवर्क  चंद्रपूर: नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी महत्त्वाची  बातमी समोर आली आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Chandrapur District Central Cooperative Bank)  यथे लिपीक व शिपाई पदांच्या (Clerk and Peon Recruitment) एकूण ३५८ पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी ८ ऑक्टोबरपासून बँकेचे अधिकृत संकेतस्थळ  http://cdccbank.co.in/ वर जाऊन अर्ज करू शकतात.  अर्ज करण्याची अंतिम मुदत १९ ऑक्टोबर (Deadline October 19) देण्यात आली आहे.  चंद्रपूर जिल्हा बँकेतील एकुण ३५८ रिक्त जागांपैकी लिपीक पदाच्या २६१ तर शिपाई पदाच्या ९७ जागांसाठी ही भरती राबवण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. यासाठी उमेदवारांचे वय हे १८ ते ४५ वर्षाच्या मध्ये असणे आवश्यक आहे. लिपीक पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर शिपाई पदांसाठी १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.  ...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव - मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला दिलेला शब्द केला पूर्ण

इमेज
शासकीय औद्योगिकGovernment Industrial Training Institute named after Bhagwan Veer Birsa Munda प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव - मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला दिलेला शब्द केला पूर्ण पोंभुर्णा, (दरारा 24 तास न्युज नेटवर्क)  आदिवासी समाजाच्या मेळाव्यात महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी तीन दिवसांत पूर्ण केला. महिलांसाठी समर्पित चंद्रपूरमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वीरांगणा राणी दुर्गावती यांचे नाव आणि आदिवासी समाजासाठी समर्पित पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, दोन्ही मागण्या अतिशय तत्परतेने पूर्ण करून घेण्यासाठी मुनगंटीवारांनी विशेष प्रयत्न केले. पोंभुर्णा येथे १ ऑक्टोबरला आदिवासी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. देशाच्या स...

💥 प्रेतावरही कर आकारणारा पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय शासकीय आहे की खाजगी..? - शवविच्छेदन करण्याकरिता पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा - वैभव पिंपळशेंडे - पोंभूर्णा तालुक्यातील गोर-गरीब जनतेची होत असलेली लुटमार कदापिही खपवून घेणार नाही

इमेज
💥 प्रेतावरही कर आकारणारा पोंभूर्णा येथील ग्रामीण रुग्णालय शासकीय आहे की खाजगी..? - शवविच्छेदन करण्याकरिता पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करा - वैभव पिंपळशेंडे - पोंभूर्णा तालुक्यातील गोर-गरीब जनतेची होत असलेली लुटमार कदापिही खपवून घेणार नाही पोंभूर्णा : तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची समस्या सोडविता यावी, वेळेवर उपचार करता यावे यासाठी करोडो रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाची भव्य दिव्य इमारत बांधण्यात आली. मात्र ग्रामीण रुग्णालय फक्त नावापुरतीच उभी असून त्यामध्ये ना कर्मचारी पुर्ण आहेत, ना कायमस्वरूपी वैद्यकीय अधिक्षक आहे. ग्रामीण रुग्णालय येथे अनेक अपेक्षा घेऊन येणाऱ्या रुग्णांना फक्त रेफर नावाची चिठ्ठीच मिळते. अनेकदा काही रुग्णांना खासगी रुग्णालयातून उपचार घेण्याचा फुकटचा सल्लाही दिला जातो. यामुळेच येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. एवढे काही कमी होते की काय तर या दवाखान्यात आता मुरद्यांवरही कमालीचा कर आकारला जात आहे. पोंभूर्णा हा आदिवासी बहुल तालुका आहे. या तालुक्यात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, बेरोजगारांची संख्या विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे येथील ९०% जनतेला फक्त आण...