पोस्ट्स

जानेवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सम्यक फाउंडेशन तळणीपूर्णा संचलित नवजीवन गौरक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा

इमेज
सम्यक फाउंडेशन तळणीपूर्णा संचलित नवजीवन गौरक्षण संस्थेचा उद्घाटन सोहळा दरारा 24 तास न्यूज नेटवर्क अनाथ व बेवारस प्राण्यास आश्रय व अभय देण्याच्या हेतुने तळणीपुर्णा ता. चांदुर बाजार जि. अमरावती या ठिकाणी दि. ०१/०१/२०२५ पासुन आश्रम निर्माण केला असुन या आश्रमाचा उद्घाटन समारंभ रविवार दि. ०२/०२/२०२५ रोजी करण्याचे ठरविले आहे. -: कार्यक्रमाचे उ‌द्घाटक :- आई छोटू महाराज वासू, मोरबिड सेवक (प्रहार जिल्हाध्यक्ष, आम.) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. क्रांतीभुषण खडसे (महाराष्ट्राचे प्रसीद्ध कवी ) सौ. अल्काताई इंगळे (पोलीस पाटील तळणीपुर्णा) अध्यक्ष - भन्ते संघपाल (आयुवेदाचार्य नवजीवन गौरक्षण संस्था) डॉ. अतिथी :- मा. अभिजीत इंगळे (सरपंच तळणीपुर्णा) कार्यकर्ता :- मा. सुधीरभाऊ उगले (सरपंच वलगाव), मा. गजानन लांजेवार (सरपंच पोहरा), मा. सतीशभाऊ प्रधान   (माजी P.S.I.), मा. संजयभाऊ तायडे (न्यूज 24 पत्रकार तळेगाव मोहना), मा. सारंग गाडे (पुणे), मा. मोरेश्वर रामेकर रामा (सामाजिक कार्यकर्ते), मा. प्रतापभाऊ गोंडाणे (आसेगाव), मा. प्रशांतभाऊ शिरभाते (माळी सरपंच वलगाव), मा. रमण पाटील (आसेगाव), मा. जितेंद्र मस्करे (आसे...

विधवा महिलेच्या घरात घुसून विनयभंग!तक्रार दाखल आरोपी फरार। फुटाणा मोकासा येथील घटना ...

इमेज
विधवा महिलेच्या घरात घुसून विनयभंग! तक्रार दाखल आरोपी फरार। फुटाणा मोकासा येथील घटना ... दरारा 24 तास न्यूज नेटवर्क पोंभुर्णा : विधवा महिलेला योजनांचा फायदा मिळवून देतो अशी बतावणी करत फुटाणा ग्रामपंचायतीत आपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या खुशाल पाल याने विधवा महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग केल्याची घटना 22 जानेवारी 2025 रोजी घडली.दरम्यान महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. सविस्तर वृत्त असे की,चार महिन्यापूर्वी तक्रारदार पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्याने दोन मुलींसह घरात राहत असलेल्या विधवा महिलेचा खुशाल पाल (३१) याने घरात घुसून विनयभंग केला. ही घटना बुधवारी (दि. २२) रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपी फरार आहे. मूल पोलिस ठाणे अंतर्गत बेंबाळ दूरक्षेत्राच्या हद्दीतील फुटाणा येथील महिलेच्या पतीचे सप्टेंबर-२०२४ रोजी निधन झाले. त्यामुळे आपल्या मुलींसह मिळेल ती मजुरी करून ती कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहे. पतीच्या मृत्यूनंतर मृत्यू दाखला व शासकीय योजनेच्या लाभासाठी...

सिंधलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न: प्राचार्य संतोष बक्षी यांनी केले ध्वजारोहण

इमेज
सिंधलताई राठोड आदिवासी आश्रम शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न: प्राचार्य संतोष बक्षी यांनी केले ध्वजारोहण विजय जाधव, नांदगाव प्रतिनिधी भारतीय गणराज्य दिनाचा कार्यक्रम व ध्वजारोहण नांदगाव येथील सिंदलताई राठोड आश्रम शाळेच्या भव्य आवारात पार पडला. या प्रसंगी प्राचार्य संतोष बक्षी यांनी ध्वजारोहण करून मानवंदना दिली. याप्रसंगी पालक गावातील नागरिक उपस्थित होते.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोंभुर्णा काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदारला निवेदन

इमेज
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पोंभुर्णा काँग्रेस कमेटीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दरारा 24 तास   पोंभुर्णा:  निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था असून भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूका घेण्यासाठी या संस्थेची स्थापन केली आहे. राज्यघटनेने निवडणूक आयोगाला देशातील संपूर्ण निवडणुकांचे निर्देश आणि नियंत्रण करण्याचे अधिकार दिले आहेत. लोकशाही शासन व्यवस्थेत निवडणूक आयोगाचे अनन्यसाधारण महत्व आहे. देशातील निवडणुका मुक्त आणि निष्पक्षपणे पार पाडण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे आणि निवडणुकीत मतदार हा राजा असतो परंतु मागील काही वर्षातील निवडणूक आयोगाची भूमिका पाहता ती पक्षपाती दिसत आहे.          महाराष्ट्रात नोव्हेंबर २०२४ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय, आश्चर्यकारक, अविश्वसनीय व काहीतरी गडबड असल्याचे दिसले. राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती. सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते, अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ ...

उद्या जूनगाव येथे सांस्कृतिक महोत्सव। मान्यवरांची राहणार उपस्थिती अलकाताई आत्राम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ।

इमेज
उद्या जूनगाव येथे सांस्कृतिक महोत्सव। मान्यवरांची राहणार उपस्थिती अलकाताई आत्राम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी । पोंभुर्णा: प्रतिनिधी । गणराज्य दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनगाव येथे दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी रात्री आठ वाजता सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर दिवसभर विविध स्पर्धा आयोजित केले आहेत.व रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष अलकाताई आत्राम राहणार असून अध्यक्षस्थानी भाजपचे आष्टा ग्रामपंचायतीचे सरपंच हरीश हे राहणार आहेत. तर दीपप्रज्वलन माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष अजय भाऊ मस्के, फुटाणा ग्रामपंचायतचे उपसरपंच नैलेश भाऊ चिंचोलकर, भोसरीचे उपसरपंच जितू भाऊ चुधरी, जूनगावचे प्रभारी सरपंच राहुल भाऊ पाल, यांच्या हस्ते होणार आहे.  माननीय कान्हुजी पाटील भाकरे पोलीस पाटील जुनगाव, तंटामुक्ती अध्यक्ष प्रफुल दसुरजी चुधरी, गटशिक्षणाधिकारी वैभव खांडरे सर, केंद्रप्रमुख अरविंद तामगाडगे स...

युवा सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी। जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची उपस्थिती

इमेज
युवा सेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी। जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची उपस्थिती दरारा 24 तास न्युज नेटवर्क चंद्रपूर:हिंदहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त चंद्रपूर शहरात युवासेनेच्या वतिने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हिंदहृदयसम्राट "बाळासाहेब ठाकरे प्राथमिक चिकित्सा किट" चे लोकार्पण मा. श्री. मुम्मका सुदर्शन साहेब (SP) चंद्रपूर यांच्या हस्ते किट चे लोकार्पण करण्यात आले. व इंदिरा गांधी स्कूल येथे चित्रकला,निबंध स्पर्धा व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे शिष्यवृत्ती आणि बक्शीस वितरण चे आयोजन करण्यात आले. आणि विविध स्कूल मध्ये प्राथमिक चिकित्सा किट चे वितरण कार्यक्रम घेन्यात आले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रा.निलेश बेलखेडे सर (युवासेना पूर्व विदर्भ सचिव(महाराष्ट्र राज्य), सिनेट सदस्य गोंडवाना यूनिवर्सिटी), आदर्श लाडस्कर (युवासेना जिल्हा सचिव, यु.कॉ.कक्ष) सार्थक शिर्के (विधानसभा प्रमुख यु.कॉ.कक्ष), आदर्श खडसे (शहर प्रमुख यु.कॉ.कक्ष),रोशन देंबरे,हर्षल खनके व सर्व कार्यकर्ता उपस्थित होते...  भविष्यात पण अशा प्रकारचे सामाजिक क...

लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर। डायरेक्टर बी. प्रभाकरण यांचा उपक्रम

इमेज
लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिर। डायरेक्टर बी. प्रभाकरण यांचा उपक्रम ✍️ मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी  अहेरी : तालुक्यातील आलदंडी येथे लॉयड्स काली अम्माल मेमोरियल हॉस्पिटलतर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १९ व २० जानेवारी रोजी सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत करण्यात आले. शिबिराचे आयोजन पोलीस स्टेशन समोर आलदंडी येथे करण्यात आले होते. शिबिरामध्ये डोळयांची तपासणी, वाचन चष्मे क्रिया, त्वचा आजारावर पार करीत तपासणी वैद्यकीय सल्ले, हाईवसांचे तपासणी हाडांचे विकार तपासणीसाठी तज्ञांचा सल्ला, कान, नाक व घसा तपासणी समस्यांचे त्वरीत निदान असल्यास मार्गदर्शन, मुलांसाठी आरोग्यसेवा, महिला आरोग्यासाठी विशेष तपासणी यासंदर्भातील तपासणी व सल्ले, आजारांवर तज्ञांची मदत इतर चाचण्या आजारासाठी तपासणी, ईसीओ चाचणी केल्या जाणार असून लायड्स मेटल्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या संकल्पनेतून सदर शिबिराचे आयोजन करून १९ जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आले. भास्कर, साई कुमार, अरुण रावत, विक्रम मेहता, सुनिता मेहता, रोहित, भोलू सोमलानी, संजय चांगलानी, तोडसाच्या सरपंच वनिता कोराम...

वसंत येलमुले यांचे दुःखद निधन। कुटुंबावर शोक कळा

इमेज
वसंत येलमुले यांचे दुःखद निधन। कुटुंबावर शोक कळा पोंभुर्णा प्रतिनिधी तालुक्यातील जुनगाव येथील अल्पभूधारक शेतकरी वसंत केशव एलमुले वय 66 वर्ष यांचे आज दुपारी दीड वाजताचे सुमारास दुःखद निधन झाले. वसंत येलमुले हे आपल्या मुलीच्या गावी म्हणजेच चामोर्शी तालुक्यातील सगनापूर येथे गेले होते तिथेच त्यांना लकवा मारल्याच्या कारणावरून भेंडाळा येथे दाखल करण्यात आले होते. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना गडचिरोलीला रेफर दिला. गडचिरोलीतील डॉक्टरांनी चंद्रपूर च्या दवाखान्यात पाठविले. तिथे त्यांचा उपचार सुरू असतानाच आज सोमवारी दुपारी दीड ते दोनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.  त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात पसरतात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता वैनगंगा नदीच्या तीरावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.  त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन विवाहित मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.  घरातील कमावता व्यक्ती गेल्याने कुटुंबावर आघात झालेला आहे.

ग्रामीण भागात खेळांच्या स्पर्धा म्हणजे एक प्रकारचा उत्सवच! संदीप कोरेत यांचे प्रतिपादन। सिपाटोला येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

इमेज
ग्रामीण भागात खेळांच्या स्पर्धा म्हणजे एक प्रकारचा उत्सवच! संदीप कोरेत यांचे प्रतिपादन। सिपाटोला येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन मनोज गेडाम, तालुका प्रतिनिधी अहेरी । ग्रामीण भागात खेळाला विशेष महत्व आहे. परंतु प्रत्येक गावात मैदान नसल्याने ग्रामीण भागातील खेळाडू आपले खेळ-काला सादर करू शकत नाही, त्यामुळे ग्रामीण भागात खेळाडू आपल्या शक्तीने आपले व्यासपीठ निर्माण करीत आहेत. तसेच ग्रामीण भागातील गाचामध्ये खेळांच्या स्पधा आयोजन करणे म्हणने गावात एक प्रकारचे उत्सवच असल्याचे प्रतिपादन मनसेचे अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांनी केले. खेळांच्या स्पर्धा आयोजित करून ग्रामीण भागातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहेरी तालुक्यातील जिमलग्डा जवळील सिधाटोला येथे जयसेवा क्रीडा मंडळाच्या वतीने ग्रामीण व्हॉलीवॉल वाद्याने स्वागत करण्यात आले. व्हॉलीबॉल स्पर्धेदरम्यान वृद्धांना ऊबदार स्वेटरचे वाटप गाव पाटील चिन्ना बेलादी तर प्रमुख अतिथी म्हणून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सोनल वाकुडकर, वसंत डुरके, श्रीनिवास जव्या, मुन्ना झाडे, संदीप चंदावार, बंडू वेलाची आभ...

गावातील वैध अवैध दारू बंद करा। आणि एक लाख रुपये जिंका! महिला बचत गटांसाठी गंगाभाई इद्दूलवार यांचा अनोखा उपक्रम

इमेज
गावातील वैध अवैध दारू बंद करा। आणि एक लाख रुपये जिंका! महिला बचत गटांसाठी गंगाभाई इद्दूलवार यांचा अनोखा उपक्रम चंद्रपूर : प्रतिनिधी   जीवनदास गेडाम, विशेष प्रतिनिधी  चंद्रपूर:गावातील दारूबंद होऊन गाव सुदृढ व्हावे यासाठी अनेक सामाजिक संघटना आपापल्या क्षेत्रात व आपापल्या परिसरात कार्य करीत असतात, जनजागृती करून अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी व दारूच्या आहारी जाणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. तर काही ठिकाणी या सर्व गोष्टींना झुगारून वैध अवैध दारू विकली जात आहे.  मुल तालुक्यातील जुनासुरला या गावात सरकार मान्य देशी दारूचे दुकान आहे. या दुकानातून वाजवीपेक्षा जास्त किंमत घेऊन देशी दारू विकली जाते. त्यामुळे दारूच्या आहारी गेलेल्या लोकांना आर्थिक भुर्दंड सहन करून आपली शोक भागवावी लागते. येथे सरकारी दारूच्या दुकानातून 35 रुपये किमतीचा देशी दारूचा टिल्लू हा सरळ सरळ 40 रुपये मध्ये विकल्या जात आहे. असा आरोप येथील तरुणांनी व नागरिकांनी केला आहे. यापूर्वी माध्यमातून बातमी प्रसारित झाल्याने 40 रुपयावरून 35 रुपये टिल्लू करण्यात आला होता. परंतु काही दिवसांनी पुन्हा चाळीस रुपये करण्यात आल्याने...

मकर संक्रांतीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक: विनोद भाऊ देशमुख, माजी उपसभापती, व पंचायत समिती सदस्य पोंभुर्णा मकर संक्रांतीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक: विनोद भाऊ देशमुख, माजी उपसभापती, व पंचायत समिती सदस्य पोंभुर्णा

इमेज
मकर संक्रांतीच्या सर्व देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छुक: विनोद भाऊ देशमुख, माजी उपसभापती, व पंचायत समिती सदस्य पोंभुर्णा 

भामरागडातील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे

इमेज
भामरागडातील शेतकऱ्यांना मिळाले आधुनिक शेतीचे धडे दरारा 24 तास न्युज नेटवर्क मनोज गेडाम (तालुका प्रतिनिधी) अहेरी : महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे, कृषी विभाग गडचिरोली व कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली आणि उ-बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भामरागड येथील तहसील कार्यालयात तीनदिवसीय निवासी 'शेडनेट हाऊस व लागवड तंत्रज्ञान' प्रशिक्षण पार पडले. या प्रशिक्षणात अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे देण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन नागपूरच्या स्मार्ट विभागीय नोडल अधिकारी प्रज्ञा गोळघाटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी हेमंत जगताप, तहसीलदार किशोर बागडे, गडचिरोली सोनापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे, अर्चना कोचर, तालुका कृषी अधिकारी कुणाल राऊत, उ- बुंटू शेतकरी उद्योग असोसिएशनच्या अध्यक्ष अनिता कासार, सचिव शरीफा पठाण आदी उपस्थित होते. याप्रसंगी...

वृंदावन जिनिंगची सीसीआय खरेदी मान्यता रद्द करा ■ महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका तालुका प्रशासनाला दिले निवेदन

इमेज
वृंदावन जिनिंगची सीसीआय खरेदी मान्यता रद्द करा ■ महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका तालुका प्रशासनाला दिले निवेदन दरारा 24 तास न्युज नेटवर्क जिवनदास गेडाम, संपादक  चंद्रपूर:गोंडपिपरी तालुक्यात २२ हजार हेक्टर कापसाची लागवड केली आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस गोडपिपरी येथे विक्रीसाठी आणतात तालुक्यात चार जिनिंग आहेत. अशातच निनिंगवर हमीभावापेक्षा कमी हराने कापूस खरेदी करीत सल्याने शेतक-यांनी वृंदावन जिनिंगवर सीसीआय खरेदी कंद्राकडे कापूस विक्रीसाठी गरी केली. अशातच जिनिंग चालक शेतकयांची फसवणूक करीत असल्याचा संपजनक प्रकार सोमवारी उपडकीस आला दरम्यान, महाविकार आघाडीने वृंदावन जिनिंगची सीसीआय खरेदी मान्यता रद्द करावी, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. यासंदर्भात तालुका प्रशासनाला निवेदन दिले आहे. कापसाच्या वजनात तफावत आढळून आली, संतापलेल्या शेकडो शेतकऱ्यांनी अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग सोमवारी अडवून कार्यवाहीची मागणी केली. या आंदोलनाला तालुक्यातील महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून आंदोलनात सहभाग घेत सोमवारी निषेध नोंदविला. घडलेल्या प्रकरणाची गंभीर दखल येऊन मंगळवार...

गदगांव बौध्द समाजास आबादीची जागा देण्यात यावी. - रि. पा. इं मागणी

इमेज
*गदगांव बौध्द समाजास आबादीची जागा देण्यात यावी. - रि. पा. इं मागणी* चिमूर :- मौजा गदगाव येथील प्लॉट नं. 28 आराजी 0.8 हे. आर. ही आबादीची जागा बौध्द समाजास कायमस्वरूपी देऊन गावात सामाजिक सौख्य निर्माण करावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या शिष्टमंडळाने मा. उपविभागीय अधिकारी आणि मा. तहसीलदार चिमूर यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे.       शिष्टमंडळात रिपाई नागपूर प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन, उपाध्यक्ष नेताजी वि. तु. बुरचुंडे, चंद्रपूर ज़िल्हाध्यक्ष गोपाल रायपूरे, गडचिरोली ज़िल्हा रिपाई नेते मुनेश्वर बोरकर, चिमूर ता. अध्यक्ष अँड. जयदेव मुन, अँड. सोंडवले किशोर अंबादे, भद्रावती ता. अध्यक्ष संतोषभाई रामटेके, महिला आघाडी ता. अध्यक्षा नंदा रामटेके, शेवंताबाई मेश्राम, दीपा चांदेकर, वरोरा ता अध्यक्ष अनिल वानखेडे , उपाध्यक्ष पुरषोत्तम वैद्य, महिला आघाडी अध्यक्षा छाया लाभाने नेरी शहर अध्यक्ष मिलिंद जांभुळकर, गदगाव येथील रणजित शंभरकर, चंदा गेडाम, अमोल शंभरकर, विना काळे, तेजस शंभरकर, आणि बौध्द समाज बांधव उपस्थित होते.      याबाबत सविस्तर असे की, गदगाव येथी...

अखेर मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर लागले। शिवसेनेचे महेश श्रीगिरीवार यांच्या मागणीला यश

इमेज
अखेर मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर लागले। शिवसेनेचे महेश श्रीगिरीवार यांच्या मागणीला यश @ सार्वजनिक बांधकाम विभागाला युवासेनेचे महेश श्रीगिरीवार यांनी निवेदनातून केली होती मागणी, मागणीची दखल.... दरारा 24 तास न्युज नेटवर्क   पोंभुर्णा: शहरतातील मुख्य रस्त्यावरिल देशी दारू दुकानाजवळ शहरात जाणारा व स्वामी विवेकानंद स्कुलला लागून तीन मार्ग आहेत. येथे स्पीड ब्रेकर नसल्याने वाहन चालक भरधाव गाडी पळवत आहेत. याच रस्त्यालगत शालेय विद्यार्थ्यांची व कॉन्वेंटच्या लहान मुलांची रेलचेल असते.या मुख्य रस्त्यावर लहान मुले,वृद्ध, पायी जाणारे नागरिकांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  त्यामुळे युवासेनेचे शहर प्रमुख महेश श्रीगीरीवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला मागणीचे निवेदन देण्यात आले होते.मागणीच्या निवेदनाची दखल घेत अखेर मुख्य रस्त्यावरिल त्या चौकात स्पीड ब्रेकर लावण्यात आले. परिसरातील नागरिक व शाळकरी विद्यार्थी या मागणीचे स्वागत करीत आहेत.

घोसरी येथील प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा ठप्प --------------------------------------- जल जीवन मिशन योजनाही रखडली : महिलांची भटकंती ------------------------------------------ प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते जितू भाऊ चुधरी यांची मागणी

इमेज
घोसरी येथील प्रादेशिक योजनेचा पाणी पुरवठा ठप्प --------------------------------------- जल जीवन मिशन योजनाही रखडली : महिलांची भटकंती ------------------------------------------ प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे उपसरपंच तथा भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते जितू भाऊ चुधरी यांची मागणी  जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी) चंद्रपूर :  येथील प्रादेशिक पाणी पुरवठा गेल्या दोन महिण्यापासून बंद पडलेलीआहे. तद्वतच जल जीवन मिशन योजनेअंतर्गत वाढीव पाणी पुरवठ्याकरीता पाईप लाईनकरीता रस्त्याच्या मधोमध खोदकाम केलेले काम रखडलेले असल्याने नागरिकांना मार्गक्रमण करणे कसरतीचे झाले आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा शुध्द पाणी पुरवठा बंद असून महिलांना भटकंती करावी लागत असल्याने संताप पसरलेला आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेवून उपाययोजना करावी अशी मागणी उपसरपंच जितुभाऊ चुदरी यांनी केली आहे.                 बेंबाळ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत घोसरी येथील पाणी पुरवठा प्रशासन व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षीतपणामुळे अनेकदा बंद पडत असते. एवढेच नव्हे तर संपूर्ण गावाला पाणी ...

पोंभूर्णा तालूका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पी.एच.गोरंतवार तर सचिवपदी कावटवार यांची बिनविरोध निवड -उपाध्यक्ष जिवनदास गेडाम, कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार

इमेज
पोंभूर्णा तालूका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी पी.एच.गोरंतवार तर सचिवपदी कावटवार यांची बिनविरोध निवड -उपाध्यक्ष जिवनदास गेडाम, कोषाध्यक्ष दिलीप मॅकलवार  आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती साजरी दरारा 24 तास पोंभूर्णा :- तालुका पत्रकार संघाच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली.या निमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून दि.६ जानेवारीला पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्यात आली.यात पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक लोकमतचे तालुका प्रतिनिधी पी.एच.गोरंतवार यांची तर सचिवपदी दैनिक सकाळचे आशिष कावटवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.यावेळी पोंभूर्णा तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी गठित करण्याच्या उद्देशाने सभेचे आयोजन करण्यात आले होते.सदर सभेत दोन वर्षाकरिता नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवडण्यात आली.पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक ...