पोस्ट्स

जून, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पोलीस पथकावर काळाचा घाला पोलीस निरीक्षकासह दोघांचा मृत्यू

इमेज
पोलीस पथकावर काळाचा घाला पोलीस निरीक्षकासह दोघांचा मृत्यू जळगाव : जळगावतून एक मोठी बातमी समोर आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर झाड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना समोर आली. संबंधित घटनेमुळे जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही जळगावच्या अंजनी धरणाजवळ घडली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचं हे पथक जळगावहुन एरंडोल-कासोदाकडे एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी होतं. पण रस्त्याने जात असताना अचानक त्यांच्या चालत्या गाडीवर झाड कोसळलं. या घटनेमुळे स्थानिक नागरीकदेखील सुन्न झाले आहेत. ही घटना गुरुवारी रात्री पावणे 9 वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा मृत्यू झालाय. तर इतर तीन कर्मचारी देखील गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची घटना समोर आल्यानंतर कासोदा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. स्थानिकांच्या मदतीने जखमी पोलिसांना बाहेर काढण्यात आले. अंजनी धरणालगत ही दुर्घटना घडल...

गोवर्धन येथून चालतो चोर बीटीचा गोरख धंदा

इमेज
गोवर्धन येथून चालतो चोर बीटीचा गोरख धंदा मुल/पोंभुर्णा प्रतिबंधित असलेल्या बियाणांची विक्री मुल तालुक्यातील गोवर्धन येथून केली जात असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांना फसवल्या जात असल्याच्या बाबी समोर आल्या आहेत. शेतीच्या हंगामाला सुरुवात झाली असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी केंद्रात गर्दी होताना दिसत आहे. तर दुसरीकडे प्रतिबंधित बियाणे घरपोच मिळत आहेत. हे बोगस बियाणे कृषी केंद्रातही उपलब्ध असल्याचे बोलल्या जात आहे. चोर बीटी बियाणांचे मुख्य केंद्र गुजरात असल्याचे बोलले जाते. केवळ शेतीवरच आपली उपजीविका भागवणारा परिसरातील शेतकरी कधी अतिवृष्टी, तर कधी अवर्षणाचे तडाखे सोसत आला आहे. विपरीत परिस्थितीला तोंड देत शेतकरी वर्ग जगत आहे. मात्र या दुर्दम्य आशावादातही त्याला अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित फटके बसत आहेत. प्रामुख्याने कर्ज उभारून केलेल्या शेतीत  पीकच उगवत नाही. उगवले तर त्याची वाढ होत नाही. असे घडल्यानंतर शेतकऱ्यासमोर काहीही पर्याय उरत नाही.त्याच्या या अवस्थेला कारणीभूत ठरणाऱ्या बोगस बियाणांची निर्मिती आणि विक्री करणाऱ्या नफेखोर कंपन्यांन...

विठ्ठल भक्तांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एक ठार,सहा जखमी

इमेज

*धक्कादायक; विहिरीत शॉक लागून चौघांचा मृत्यू*😂 *गोंदिया जिल्ह्यातील सरांडी गावातील दुर्दैवी घटना*

इमेज
*धक्कादायक; विहिरीत शॉक लागून चौघांचा मृत्यू* *गोंदिया जिल्ह्यातील सरांडी गावातील दुर्दैवी घटना* गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी गावात एक दुखद घटना घडली आहे. घरगुती विहिरीतील मोटार पंप दुरस्तीसाठी विहिरीत उतरलेल्या एकाचा जीव वाचवतांना चौघांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. खेमराज साठवणे, सचिन भोंगाडे, प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खेमराज साठवणे यांच्या घरी असलेल्या विहीरीच्या विद्युत पंपाची दुरुस्ती करण्यासाठी साठवणे हे विहिरीत उतरले. मात्र, वीज प्रवाह सुरू झाल्याने साटवणे यांचा विहीरीतच मृत्यू झाला. ते बराच वेळ विहिरी बाहेर न आल्याने सचिन भोंगाडे खाली उतरले. त्यांना वाचविण्याकरता प्रकाश भोंगाडे व महेंद्र राऊत देखील उतरले असता विजेचा शॉक लागून दोघांचाही विहिरीतच मृत्यू झाला. या घटनेमुळं सरांडी गावावर शोककळा पसरली आहे. मोटार सुरु होत नसल्यानं खेमराज साठवणे विहिरीत उतरले होते. विहिरीत उतरल्यानंतर सर्वात प्रथम त्यांना विजेचा धक्का लागला. त्यांच्या पाठोपाठ विहिरीत उतरले...

शिवसेनेच्या दणक्याने दुसऱ्याच दिवशी बँकेची लिंक सुरू: शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार

इमेज
शिवसेनेच्या दणक्याने दुसऱ्याच दिवशी बँकेची लिंक सुरू: शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार मुल: प्रतिनिधी तालुक्यातील बेंबाळ येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया च्या शाखेत मागील पंधरा दिवसापासून लिंक नसल्यामुळे ग्राहकांना, शेतकऱ्यांना, बचत गट महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. दररोज बँकेत जाऊन शेतकरी व महिलांना रिकाम्या हाताने परत येण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. ही बाब लक्षात घेऊन नांदगाव येथील शिवसेना कार्यकर्ते मधुकर झुंगाजी पवार , व जीवनदास गेडाम,शिवसेना उपतालुकाप्रमुख पोंभुर्णा यांनी कार्यकर्त्यांना घेऊन, व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गिर्हे यांच्याशी बातचीत करून बँकेत धडक दिली.  पंधरा दिवसापासून लिंक बंद असल्याचे कारण शाखा व्यवस्थापकांना विचारण्यात आले. शाखा व्यवस्थापकांनी तात्काळ सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन देऊन लगेच दुसऱ्या दिवशीच लिंक सुरू करून सेवा सुरळीत केली. बँकेत ग्राहकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची व पावसाळ्याच्या दिवसात ग्राहकांना उभे राहण्यासाठी किंवा आसरा घेण्यासाठी छावणी करण्याची सूचना शिवसैनिकांनी शाखा व्यवस्...

MPSC च्या विद्यार्थिनी वर कोयत्याने हल्ला, पुण्यातील खळबळ जनक घटना

इमेज
MPSC च्या विद्यार्थिनी वर कोयत्याने हल्ला, पुण्यातील खळबळ जनक घटना   पुणे : पुण्यातील दर्शना पवार हत्याकांडानं राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी दर्शनाचा मित्राला अटक करण्यात आली आहे. या घटनेला आठवडा उलटत नाही तोच पुन्हा पुण्यात एमपीएससी करणाऱ्यावर तरुणीवर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घटनास्थळी काही तरुणांनी वेळीच धाव घेतल्यानं तरुणीचा जीव वाचला आहे.  नेमकं काय घडलं? मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात एमपीएससी क्लासेस असलेल्या भागात ही घटना घटली आहे. पिडित तरुणी ही आज सकाळच्या सुमारास क्लासला गेली होती. परत येताना अचानक मागून येत एका तुरुणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. कोयता तिच्या हाताला लागल्याने ती ओरडली आणि स्वताला वाचविण्यासाठी तीने आरडाओरडा सुरु केला. दरम्यान तिचा आवाज ऐकून परिसरात असलेल्या काही तरुणांनी तिच्या दिशेने धाव घेत तिला वाचवले.

बँक ऑफ इंडिया चा भोंगळ कारभार, 15 दिवसांपासून लिंक नसल्याचा ग्राहकांना फटका- शिवसेनेने केला बँक व्यवस्थापकाचा घेराव, लवकरच सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन

इमेज
बँक ऑफ इंडिया चा भोंगळ कारभार, 15 दिवसांपासून लिंक नसल्याचा ग्राहकांना फटका- शिवसेनेने केला बँक व्यवस्थापकाचा घेराव, लवकरच सेवा सुरळीत करण्याचे आश्वासन मुल: तालुक्यातील बेंबाळ येथे असलेल्या बँक ऑफ इंडिया शाखेत अनेक दिवसांपासून अनेक समस्या उद्भवत आहेत. त्याचा फाटका सर्व ग्राहकांना बसत आहे. वारंवार बँकेत जाऊनही काम होत नसल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते मधुकर झुंगाजी पवार व पोंभुर्णा तालुका शिवसेना उपप्रमुख जीवनदास गेडाम यांच्या नेतृत्वात शाखाधिकार्‍यांना घेराव घेराव घालून जाब विचारण्यात आला. https://youtu.be/Kz9wPbkbHXY मागील 15 दिवसापासून बँकेत लिंक नसल्याचे सांगण्यात येत असून ग्राहकांना याचा मनस्ताप सहन करून आर्थिक देवाणघेवाण होत नसल्यामुळे शेतकरी वर्ग तथा महिला बचत गट चा महिला अडचणीत आल्या आहेत. सरकार महिला सक्षमीकरणाच्या हेतूने अनेक योजना राबवत असून महिलांना स्वयंरोजगारासाठी विविध योजना आखत आहे. उमेद च्या माध्यमातून अनेक महिला बचत गट कार्यरत असून या महिलांना वेळोवेळी बँकेत येऊन काम न करताच परत जावे लागत आहे. शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी वर्ग बी बियाणे ख...

आज पोंभुर्णा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक

इमेज
आज पोंभुर्णा येथे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पोंभुर्णा: अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली जिल्हा शाखा चंद्रपूर च्या वतीने आज दि.27 जुन 2023 रोजी सकाळी 11 वाजता विर बाबुराव शेडमाके सामाजिक सभागृह पोंभुर्णा येथे महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध विषयावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीला आदिवासी सेवक, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश सचिव केशवराव तिरानीक, महिला प्रदेश संघटिका सुनीताताई मरस्कोल्हे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष जनार्दन गेडाम, जिल्हा महासचिव परशुरामजी उईके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. गीताताई सलामे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष शशिकांत मोकासे, महानगर महासचिव अरविंद जी परचाके, सिंदेवाही तालुका अध्यक्ष पुष्पाताई सिडाम, अशोक मेश्राम इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील आदिवासी समाजातील महिला, पुरुष व तरुणांनी मोठ्या संख्येने या बैठकीला उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन बैठकीचे संयोजक,अर्जुनी मोरगावचे सरपंच जगदीश सेमले यांनी केले आहे.

नागरिकांना कोणत्याही पोलिस ठाण्याचे फोटो, व्हिडिओ काढता येणार

इमेज
नागरिकांना कोणत्याही पोलिस ठाण्याचे फोटो, व्हिडिओ काढता येणार नागपूर: आता कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही पोलीस ठाण्याचे आतील व बाहेरील फोटो व्हिडिओ काढता येणार आहे.या संबंधीचे आदेश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. पोलिस स्टेशन ही "लिगल पब्लिक प्लेस" आहे, आणि पोलिस पब्लिक सर्वंट आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्याचा सर्वसामान्य जनतेला अधिकार आहे. त्याला कोणतेही पोलीस अधिकारी व कर्मचारी अडकाठी आणू शकत नाही. कामात पारदर्शकता आणण्याचा दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल आहे. रस्त्यावर ड्युटी बजावत असलेल्या पोलिसांचेही फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा अधिकार सर्वसामान्य नागरिकाला आहे, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटले आहे.

*काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके यांना पितृषोक* *श्री तुकाराम बुटके(गुरुजी) यांचे निधन*

इमेज
*काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके यांना पितृषोक* *श्री तुकाराम बुटके(गुरुजी) यांचे निधन* चंद्रपूर: जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी जि.प. सदस्य गजानन बुटके यांचे वडील *श्री तुकाराम गोविंदरावजी बुटके(गुरुजी)* यांचे काल रविवारी सायंकाळी ०६:४० वाजता त्यांचे नेहरू चौक, चिमूर येथील राहते घरी निधन झाले. त्यांचे पार्थिवावर आज सोमवारला दुपारी *१२:०० वाजता* उमानदी कवडशी घाटावर अंतिम संस्कार होणार आहे.      *दरारा 24 तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली!* 🪔💐🙏

१८ वर्षांखालील मुलांनी दुचाकी चालविल्यास पालकांना २५ हजारांचा दंड;

इमेज
१८ वर्षांखालील मुलांनी दुचाकी चालविल्यास पालकांना २५ हजारांचा दंड; Daraaraa24  मुंबई : कमी वय असलेल्या व लायसन्स नसलेल्या व अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करणे व पालकांचे समुपदेशन करण्याच्या सुचना नविन मोटार वाहन कायद्यात तरतुद करण्यात आली आहे. त्यामूळे १८ वर्षाखालील मुल दुचाकी चालवतांना आढळून आल्यास पालकांना २५ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. १८ वर्षाखालील कोणत्याही मुलांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहन चालवु नये. परंतु ५० सीसी पेक्षा जास्त नसलेली इंजिन क्षमता असलेली मोटार सायकल वयाच्या सोळाव्या वर्षानंतर सार्वजनिक ठिकाणी चालविता येणार आहे. अशा परिस्थितीत लायसन्स नसलेल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी चालविण्यापासून प्रतिबंध करावे. तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करावे तरीही नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मोटार वाहन कायदा १९८८ कलम १८०, १८१ १९९ (अ) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहे. त्याशिवाय दुचाकीवर एका पेक्षा अधिक आणि हेल्मेट सक्ती सुद्धा प्रभावीपणे राबवण्याचे आदेश दिले आहे.

अभियंत्याच्या घरी सापडले ड्रग्स, तालुक्यात खळबळ, अभियंत्यास अटक करून दिल्लीत नेले

इमेज
पोंभुर्णा : तालुक्यात अमली पदार्थ आयात केले जातात याचा उलगडा झाला आहे.अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभाग, दिल्लीच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोंभूर्णा येथे कार्यरत अभियंता हेमंत बिचवे (29) यांच्या घरी छापा टाकून ‘MD व LSD ड्रग्ज’ जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली येथील एका अंमलीपदार्थ प्रकरणाचा शोध घेताना हे पथक चंद्रपूरपर्यंत पोहचल्याने या प्रकरणात अनेक बडे मासे अडकण्याची शक्यता आहे. याप्रकरणी अभियंता बिछवे यांना अटक करून दिल्ली येथे नेण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे अंमली पदार्थ भारतीय टपाल खात्याच्या माध्यमातून पोंभूर्णा येथे पोहोचवण्यात आले होते. या छाप्यात बिछवे यांच्या घरी 3 ग्रॅम एमडी ड्रग्ज मिळाले तर एलएसडी ड्रग्जचे 24 पोस्ट कार्डची तिकीटे मिळाली. यातील एक पोस्टकार्ड तिकीट हे तीन हजार रुपयांचे आहे. या ड्रग्ज प्रकरणाची सर्व सूत्रे दिल्ली येथे जुळलेली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी दिली. अभियंता बिछवे नागपुरातील रहिवासी आहेत. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून ड्रग्स माफिया सक्रिय असल्याची चर्चा होत आहे.

राहुलला आमच्या हवाली करा। आम्ही त्याचे तुकडे केल्याशिवाय

इमेज
  संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल हांडोरे याला मुंबईतून अटक केली आहे. आरोपीला पुण्यात आणण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समजताच दर्शना पवारच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राहुलने माझ्या बहिणीचा घात केला आहे, आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाही तर त्याला मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने दिली आहे. तसेच सोशल मीडियावरही आरोपी राहुल हांडोरेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.आरोपी राहुलने जसे माझ्या दर्शनाचे तुकडे केले, तसे मला राहुलचे तुकडे करायचे आहे, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, असं म्हणत दर्शनाच्या आईने तिचा संताप व्यक्त केला आहे. दर्शना पवार आणि राहुल हांडोरे हे राजगडावर फिरण्यासाठी गेले होते. परंतु गडावरून फक्त राहुल बाहेर पडला होता. काही दिवसांनंतर दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता. राहुल हांडोरे फरार झालेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर आता प...

टोमॅटोच्या दरात तिप्पटीने वाढ, गृहिणींचे बजेट कोलमडले

इमेज
दरारा 24 : सलाडपासून ते प्रत्येक भाजी आणि आमटीमध्ये टोमॅटो हमखास वापरला जातो. टोमॅटोने जेवणाला थोटी आंबट आणि स्वाविष्ट अशी चव येते. त्यामुळे जेवणात टोमॅटो कायम वापरला जातो. या टोमॅटोचे आरोग्याला अनेक फायदे देखील आहेत. मात्र टोमॅटोमुळे आता तुमच्या डोळ्यात पाणी येण्याची शक्यता आहे. कारण वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात तिपटीने वाढ झाली आहे. टोमॅटोचे दर भीडले गगनाला टोमॅटोच्या दरात वाढ होउन १८ ते २० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो थेट ६० रुपयांनी विकला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागलीये. तसेच गृहिणींचे महिन्याभराचे बजेटही कोलमडले आहे. वाशी कृषी उत्पन्ना बाजार समितीमधील दर ४० रुपयांवर पोहचले आहेत. भाजीपाल्याचे दर कडाडले; सामन्य जनतेला फटका वाढतं तापमान आणि कडाक्याच्या उन्हाचा परिणाम थेट भाजीपाल्यावर होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कोथींबीर महागली होती. त्यानंतर आता टोमॅटोचे दर वाढले आहेत. वाशीच्या एपीएमसी बाजारात टोमॅटो कमी प्रमाणात आलेत. माल कमी आणि मागणी जास्त असल्याने बाजारातील टोमॅटोचे दर कडाडले आहेत. आवक कमी झाल्याने भाव वाढले असं व्यापाऱ्...

स्वतःच्या चितेची तयारी करुन वृद्ध दाम्पत्याची

इमेज
कोल्हापूर / जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. स्वतःच्या चितेची तयारी करुन एका वृद्ध दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेतवडे गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. आजारपणास कंटाळून दाम्पत्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस उचललं आहे. महादेव पाटील आणि द्वारकाबाई पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावं आहेत. आत्महत्येपूर्वी या वृद्ध दाम्पत्यानं चितेला लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करुन ठेवली होती. आजारपणास कंटाळून या दाम्पत्याने गळफास घेऊन जीवन संपल्याची माहिती मिळत आहे.

डॉक्टरांनी केलेल्या कार्याची कदर जिवंतपणी नाही तर... 👉 मेलेल्यांच्या टाळूवरील लोणी खाणारी गिधाडांची शासन औलाद व्यवस्था समजायचे का ❓ 👉 अन्यायग्रस्त डॉक्टरांना शासन न्याय देणार का ?

इमेज
मुंबई / प्रतिनिधी  दिनांक -१९ जुन २०२३:-  भविष्यात जेव्हा प्रामाणिक तज्ञ अभ्यासकांकडुन   कोरोनाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हौतात्म्यास नम्रपणे अभिवादन केल्याशिवाय पूर्णच होणार नाही. जिवंतपणी केलेल्या त्यांच्या सेवेचे कौतुक, कदर करता येत नसेल, अन्यायग्रस्त असलेल्या डॉक्टरांना आणि इतर आरोग्य  कर्मचाऱ्यांना योग्य न्याय  देता येत नसेल  तर .... फक्त लोणी खाणारी गिधाडांच्या  औलादीची शासन व्यवस्था  म्हणणे चुकीचे ठरणार नाही. किमान शासनाने दुजाभाव करून अन्याय तरी करु नये. डॉक्टरांचं हौतात्म्य विसरता कामा नये.  कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करतांना हजारोंच्या संख्येने डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी संसर्गजन्य आजाराने बाधित झाले, शेकडो डॉक्टरांचा यामध्ये मृत्यू झाला. या सर्व प्रकारची जुजबी माहिती सामान्य जनतेला तर आहेच, त्याशिवाय त्यांचा संपूर्ण तपशील डॉक्टरांच्या संघटनेला आहे. पण या देशाची आरोग्य व्यवस्था राबिणाऱ्या आणि  नेतृत्व करणाऱ्या केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे मात्र याबाबतची माहिती नसावी याबाबत आश्चर्य...

एसटी बसच्या सीटा तुटलेल्या, खिडक्या मोडलेल्या मात्र शासनाची जाहिरात चमकदार! एसटी बसला दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र 50 करोड रुपयांच्या जाहिराती वर केला खर्च

  एसटी बसच्या सीटा तुटलेल्या, खिडक्या मोडलेल्या मात्र शासनाची जाहिरात चमकदार! एसटी बसला दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र 50 करोड रुपयांच्या जाहिराती वर केला खर्च👈👯

*भावी आर एफ ओ विद्यार्थिनीचा संशयास्पद आढळला मृतदेह*

इमेज
*भावी आर एफ ओ विद्यार्थिनीचा संशयास्पद आढळला मृतदेह* पुणे/भोर : राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ) २६ वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. दर्शना दत्तात्रय पवार (वय २६, रा. कोपरगाव ) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  या प्रकरणी तरुणीचे वडील दत्तात्रय दिनकर पवार (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड किल्यावर रविवारी सकाळी गुराख्याला एक सडलेला मृतदेह आढळला. गुंजवणे गावचे पोलिस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिली.  त्यानुसार सहायक निरीक्षक मनोज पवार, हवालदार औंदुबर अडवाल, ज्ञानदीप धिवार, योगेश जाधव आदी घटनास्थळी गेले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाजवळ मोबाइल आणि चप्पल सापडली. त्यावरून तक्रारदार वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह श...

पोलीस कारवाईच्या भीतीने दोन तरुणांनी घराच्या स्लॅब वरून उडी घेतली, एकाचा जागीच मृत्यू

इमेज
पोलीस कारवाईच्या भीतीने दोन तरुणांनी घराच्या स्लॅब वरून उडी घेतली, एकाचा जागीच मृत्यू कोल्हापुर: शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. साहिल मिनेकर असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर दत्तात्रय देवकुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्रनगरमध्ये परिसरात काल (18 जून) ही घटना घडली. राजेंद्रनगरमध्ये नेमकं काय घडलं? कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील एका दुमजली इमारतीमध्ये काही तरुण रविवारी रात्री जुगार खेळत होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास तिथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच तरुणांची पळापळ झाली. पोलीस पकडतील या भीतीने साहिल आणि दत्तात्रय या दोन तरुणांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली उडी मारली. मात्र दगडावर डोके आपटल्याने साहिल मिनेकरचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे हा तरुण जखमी झाला. पोलिसांनी साहिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी 'सीपीआर'मध्ये प...

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू

इमेज
राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. अशात हिंगोली येथून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलिस निरीक्षकाचा जागीच जीव गेलाय. सदर घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. नीकळकंठ दंडगे असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. अपघातात दंडगे यांच्यासह इतर दोन सहकारी मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त ठिकाण असलेल्या माळेगाव फाट्याजवळ धाव घेत मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचा मृतदेहासह ताब्यात घेण्यात आलाय. यासह जखमींना बाहेर काढत रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. या अपघातामध्ये मृत्यू झालेले पोलीस उपनिरीक्षक निळकंठ दंडगे हे हिंगोली जिल्ह्यातील जामगव्हाण येथील रहिवासी असून त्यांच्या मृत्यूने संपू...

*सामाजिक संघटनेतर्फे पोंभुर्णा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

इमेज
*सामाजिक संघटनेतर्फे पोंभुर्णा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार* पोंभुर्णा तालुका हा शिक्षणाचे माहेरघर ठरत असतानाच पोंभुर्णा येथील  कुमारी श्रंद्धा रामदास बोबाटे रा.पोंभुर्णा ही नुकत्याच झालेल्या नीट 2023 या परिक्षेत कोणतेही कोचिंग क्लास न लावता प्राविण्य प्राप्त केला. गुणवंत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढावे म्हणून तसेच पोंभुर्णा तालुक्यात शैक्षणिक वातावरण निर्मिती व्हावी याचे औचित्य साधून आज कुमारी श्रध्दा रामदास बोबाटे हिचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर प्रज्वल संजय बोबाटे, व अनिकेत दिनेश इप्पलवार या विद्यार्थ्यांनी दहाविच्या परिक्षेत प्राविण्य प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी देवाडा खुर्द येथील सरपंच विलास मोगरकार, शिवराज्य संघटनेचे अध्यक्ष अविनाश कुमार वाळके, पोंभुर्णा नगरपंचायत नगरसेवक गणेश वासलवार, नगरसेवक अभिषेक बद्दलवार, नगरसेवक नंदकिशोर बुरांडे, सामाजिक कार्यकर्ते धम्माजी निमगडे, सरपंच भालचंद्र बोधलकर, पत्रकार विजय वासेकर , जितेंद्र वासेकर इत्यादिंची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या पुढिल वाटचालीसाठी विलास मोगरकार यांनी विद्यार्थ्य...

वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर गुड्डा येथील जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठे नुकसान - आरो प्लांट वरील पत्रे उडाली, पाणीपुरवठा खंडित

इमेज
वादळी वाऱ्यामुळे कोल्हापूर गुड्डा येथील जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठे नुकसान आरो प्लांट वरील पत्रे उडाली, पाणीपुरवठा खंडित चंद्रपूर प्रतिनिधी 9 जुन रोजी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे जिल्ह्यात कहर माजला होता. अनेक तालुके या वादळाचे शिकार झाले. कोरपणा तालुक्यातील कोल्हापूर गुड्डा येथील डी एफ यु प्लांटचे संपूर्ण पत्रे उडून गेली आणि जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जनशुद्धीकरण सयंत्र बंद पडून असल्याने शुद्ध पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून सदर आरो प्लांट पूर्ववत सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वादळी वाऱ्यामुळे भिमनी येथील दोन्ही आरो प्लांट ची पत्रे उडाली

इमेज
वादळी वाऱ्यामुळे भिमनी येथील दोन्ही आरो प्लांट ची पत्रे उडाली पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी तालुक्यात 9 जून रोजी वादळी वाऱ्याने कहर माजविला, या वादळात अनेकांची घरे कोसळली, तर अनेकांची छपरे उडाली. विजेचे खांबही कोसळल्याने वीजही काही काळ खंडीत राहिली. या वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील भीमनी येथील दोन्ही जलशुद्धीकरण (डीएफयु, आरो प्लांट) संयंत्राची पत्रे उडून गेल्यामुळे दोन्ही आरो प्लांट चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामस्थांनी नुकसान भरपाई करून आरो प्लांट तात्काळ सुरू करावा अशी मागणी केली आहे.

वादळी वाऱ्यामुळे चेक ठाणेवासना येथील जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठे नुकसान

इमेज
वादळी वाऱ्यामुळे चेक ठाणेवासना येथील जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठे नुकसान आरो प्लांट वरील पत्रे उडाली, पाणीपुरवठा खंडित पोंभुर्णा: प्रतिनिधी 9 जुन रोजी आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे व पावसामुळे जिल्ह्यात कहर माजवला होता. अनेक तालुके या वादळाचे शिकार झाले. अनेकांच्या घरांची पडझड झाली, तर अनेक जण उघड्यावर आले. पोंभुर्णा तालुक्यातील चेक ठाणेवासना येथील डी एफ यु प्लांटचे संपूर्ण पत्रे उडून गेली आणि जल शुद्धीकरण संयंत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे जनशुद्धीकरण सयंत्र बंद पडून असल्याने शुद्ध पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून सदर आरो प्लांट पूर्ववत सुरू करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

एसटी बसच्या सीटा तुटलेल्या, खिडक्या मोडलेल्या मात्र शासनाची जाहिरात चमकदार! एसटी बसला दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र 50 करोड रुपयांच्या जाहिराती वर केला खर्च

इमेज
एसटी बसच्या सीटा तुटलेल्या, खिडक्या मोडलेल्या मात्र शासनाची जाहिरात चमकदार! एसटी बसला दुरुस्त करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र 50 करोड रुपयांच्या जाहिराती वर केला खर्च जीवनदास गेडाम, (विशेष प्रतिनिधी) मोडक्या, तुटक्या एसटीवर सीटा तुटून पडलेल्या असताना प्रवाशांना अशा खिळखिळ्या झालेल्या आजारी बसवर प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. मोडक्या तुडक्या बसांची दुरुस्ती करण्याऐवजी प्रसिद्धीसाठी सरकार जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. आणि आश्चर्याची बाब म्हणजे याच तुटक्या तुटक्या बसवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहिरात चमकताना दिसते, हे या देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. एसटीवर चिकटवण्यात आलेल्या जाहिरातींवर 50 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे. राज्य शासन एसटी चे कोट्यावधी रुपये खर्च करून उधळपट्टी करत आहे. https://youtu.be/aQz3SdeTzi0 https://youtu.be/aQz3SdeTzi0  दिनांक 18  जून रोजी जुनगावला आलेल्या बसची अवस्था पाहून प्रवाशांच्याही डोळ्यात पाणी आले असावे. पोंभुर्णा ते जुनगाव ही बस सेवा सुरू आहे.या बसमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या आसनांची अवस्था ...

*कोतवाल भरती परीक्षा पारदर्शक न झाल्यामुळे पदभरती रद्द करावी : परीक्षार्थी विद्यार्थी*

इमेज
*कोतवाल भरती परीक्षा पारदर्शक न झाल्यामुळे पदभरती रद्द करावी : परीक्षार्थी विद्यार्थी अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभिड---- बेरोजगारीने त्रस्त असलेल्या अभ्यासु विद्यार्थ्यांना कोतवाल भरती पारदर्शक होईल असे वाटले होते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते त्यामुळे काल दिनांक 15/06/2023 रोजी कोतवाल भरती करिता नागभीड येथील गोविंद राव वारजूकर महाविद्यालय मध्ये पेपर घेण्यात आले होते, त्यावेळी पेपरमध्ये पारदर्शकता राहावी करिता सेंटरमध्ये कुठलेही मोबाईल,घड्याळ, व इत्यादी साधन घेऊन जाण्यास बंदी होती, परंतु परीक्षा रूम मध्ये विद्यार्थी बसले असता, विद्यार्थ्यांना देण्यात आलेले उत्तर पत्रिकेसह प्रश्नपत्रिका संच सिलबंद पॉकेटमध्ये नव्हती, त्यामुळे कुठल्याही विद्यार्थ्यांच्या साहिनीशी पेपर संचाचा सील उघडण्यात आलेला नाही, आजपावेतो झालेल्या कुठल्याही पदभरती मध्ये पेपरसंच हा सील बंद असतो, परंतु इथे पेपरसंच सिलबंद नसल्यामुळे पारदर्शकता राहलेली नसून कोतवाल भरती परीक्षा रद्द करीत पुनश्च कोतवाल भरतीचे पारदर्शक रित्या पेपर घेण्यात यावे, करीता परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी तहसीलदार म...

19 वर्षीय तरुणी 4 जून पासून बेपत्ता, पडोली पोलिसांचे आवाहन

इमेज
19 वर्षीय तरुणी 4 जून पासून बेपत्ता, पडोली पोलिसांचे आवाहन चंद्रपूर: तरुणींचे आणि महिलांचे अचानकपणे गायब होणे, असे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या साखरवाही येथील 19 वर्षीय तरुणी 4 जून पासून घरून बेपत्ता झाली आहे. दिपाली राजेश कुटे असे बेपत्ता असलेल्या तरुणीचे नाव असून रंग सावळा उंची पाच फूट मजबूत बांधा डोक्याचे केस काळे व लांब, अंगात शेंदरी रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केलेली आहे. अशा वर्णनाची तरुणी कुणाला आढळल्यास पोलीस स्टेशन कोडोली येथे संपर्क करावा असे आवाहन पडली पोलीस ठाण्यातून करण्यात आले आहे.

"*मानवतेचे प्रचारक*" पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन.

इमेज
आंतरराष्ट्रीय धम्म जागृती युवा संघातर्फे आयोजित मानवतेचे प्रचारक या काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन जानेवारी 2022 ते एप्रिल 2023 या वर्षात प्रकाशित कविता संग्रह हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सन्मानचिन्ह शाल व भारतीय संविधान प्रत देउन कवींचा सन्मान करण्यात येईल. या काव्य पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविताना कवितासंग्रहाच्या 3 प्रती व फोटोसहित अल्पसा परिचय खाली दिलेल्या पत्त्यावर दिनांक १५ जुलै २०२३ पर्यन्त पाठवावेत. परीक्षकांचा व निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. ऑक्टोंबर महिन्यात आयोजित कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात येईल. पुरस्कारासाठी आलेले साहित्य सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे ग्रंथभेट म्हणुन देण्यात येईल. सोबतच पत्रकारिता, सामाजिक क्षेत्र व धम्मप्रचार व प्रसार व अंधश्रद्धा निर्मुलन क्षेत्रातील मान्यवरांचा सुध्दा मानवतेचे प्रचारक हा पुरस्कार देउन सन्मान करण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झालेल्या व्यक्तींना उपस्थित राहणे गरजेचे आहे. मानवतेचे प्रचारक *सुरेश किसनराव भिवगडे* ( बोधी ) *डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर बुद्ध विहार जवळ* *आर...

युवक काँग्रेसच्या बैठकीत तुफान राडा; कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या

इमेज
युवक काँग्रेसमधील कार्यकर्त्यांचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. दोन गटात तुफान हाणामारी होताना कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या देखील फेकून मारल्या आहेत. यामुळे बैठकीत एकच तणाव निर्माण झाला. मिळालेल्या माहितीनुसार, युवक काँग्रेसच्या बैठकीत दोन गटात तुफान हाणामारी झाली. कार्यकर्त्यांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्या. युवक अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या विरोधात काही कार्यकर्ते भिडले. शिवराज मोरे आणि अनिकेत म्हात्रे या गटाने कुणाल राऊत यांचा विरोध केला. यानंतर काही कार्यकर्त्यांकडून एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. युवक काँग्रेसच्या चार उपाध्यक्षांनी कुणाल राऊत यांना युवक काँग्रेसच्या महाराष्ट्र अध्यक्षपदावरून हटविण्याची मागणी केली. दरम्यान, युवक काँग्रेस अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास हे बैठकीनंतर तातडीने निघून गेले. त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास टाळाटाळ करताना दिसले. त्यांना या बैठकीबद्दल विचारले असता, त्यांनी बैठकीत काही झाले नसल्याचे सांगितले. युवक काँग्रेस अध्यक्ष बी. वी. श्रीनिवास यांची तीन...

प्रेरणादायी....रक्तदुत महेश श्रीगिरीवार ने केला रक्तदान करून वाढदिवस साजरा...

इमेज
प्रेरणादायी.... रक्तदुत महेश श्रीगिरीवार ने केला रक्तदान करून वाढदिवस साजरा... पोंभुर्णा:- काल १६ जून रोजी युवासेना शहर प्रमुख महेश श्रीगिरीवार याचा वाढदिवस होता. महेश हा नेहमी समाज कार्य करून वयाच्या १८ व्या वयापासून आतापर्यंत तो १७-१८- वेळा रक्तदान करून कमी वयात विक्रम केला. रक्तदान हेच श्रेष्ठदान,रुग्णाची सेवा हीच खरी समाजसेवा बोलत महेश स्वतः रक्तदान करीतच तो नेहमीच रुग्णांना रक्ताची आवश्यकता पडली तर तो तात्काळ उपलब्ध करून रुग्णांना मदत करतो . त्यामुळे त्याची ओळख तालुक्यात रक्तदुत अशी पडली आहे. महेश ने वाढदिवसाचे औचित्य साधत मित्रांसह रक्तदान करण्याचे ठरवले व महेश श्रिगीरीवार सह, नोकेश कपाट,आशिष कावडे, साहिल नैताम, सूरज कावडे,सुधीर ढोले, चंदन कपाट, अक्षय सोनुले,अंकुश गव्हारे, महेश धोडरे, राकेश मोगरकर,आकाश गज्जलवार व आदीनी जिल्हा रुग्णालयात चंद्रपूर येथील ब्लड बँक येथे रक्तदान करून तेथे वाढदिवस साजरा केला.  सामाजिक, शैक्षणिक,सोशल मिडिया स्तरातून महेश श्रीगिरीवार याची या अनोख्या वाढदिवसाचे कौतुक करत अनेकांनी शुभेच्छा दिल्या.पत्रकार बंधू भगिनीने देखील महेश ला वाढदिवसाच्या श...